Blogभाजीपाला

सोयाबीन लागवड

5/5 - (1 vote)

सोयाबीन हे महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, कोल्हापूर, नाशिक, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मुख्य पीक म्हणून घेतले जाते. भारतामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक आणि तेलंगणा ही राजे मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन घेते. मध्य प्रदेश हे राज्य सर्वात जास्त प्रमाणामध्ये सोयाबीनचे उत्पन्न घेते. सोयाबीन हे खाण्याच्या दृष्टीने खूप पोषक धान्य आहे. सोयाबीन मध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. सोयाबीन पासून तोफु,सोयाबीन मिल्क, सोया सॉस बनवले जातात. सोयाबीन हे शाकाहारी व्यक्तींसाठी प्रोटीनचे उत्तम पर्याय आहे. सोयाबीन पासून तेल निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जाते.

सोयाबीनच्या बियाचे सरासरी 20% पर्यंत तेल निघते. त्याचा वापर आपण खाण्यामध्ये करतो . सोयाबीन मध्ये प्रोटीन सोबतच विटामिन, मिनरल्स असतात .सोयाबीन चा वापर आहारामध्ये केल्यामुळे मधुमेहा साठी फायदेशीर ठरते. सोयाबीनच्या वड्यांची भाजी केली जाते .सोयाबीन खाल्यामुळे मासिक पाळीच्या वेळी होणारे त्रासांपासून आराम मिळतो. सोयाबीन खाल्ल्यामुळे शरीरामध्ये रक्तभिसरण चांगले होते.सोयाबीन मध्ये कोपर आणि लोह या घटकांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे लाल पेशी पुरेशा प्रमाणामध्ये तयार होतात. सोयाबीन मध्ये फॉलिक ऍसिड आणि बी कॉम्प्लेक्स जास्त प्रमाणामध्ये असते.

त्यामुळे गरोदर महिलांसाठी सोयाबीन खाणे फायदेशीर ठरते. सोयाबीनमध्ये प्रोटीन सोबतच कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी सोयाबीन चांगली मदत करते .सोयाबीनमध्ये फायबरचे प्रमाण देखील मुबलक प्रमाणामध्ये असते, त्यामुळे गॅस होणे, पोटाच्या समस्या, पोट फुगणे, बद्धकोष्ठतेचे असे त्रासदायक गोष्टींवर सोयाबीन चा चांगला फायदा होतो .सोयाबीनमध्ये फायबर असल्यामुळे पोट लवकर साफ होते आणि त्यामुळे पोटाच्या समस्या, लठ्ठपणा कमी होण्यासाठी मदत होते आणि वजन आपोआप कमी होण्यासाठी देखील मदत होते. सोयाबीन मध्ये मोठ्या प्रमाणावर एंटीऑक्सीडेंट आढळतात. त्यामुळे कर्करोगाचा धोका सुद्धा सोयाबीन खाल्ल्यामुळे कमी होते. सोयाबीन लागवड केल्यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा चांगला फायदा होतो.

लागणारी जमीन :

सोयाबीन साठी साधारण मध्यम ते भारी प्रकारची जमीन लागवडीसाठी निवडावी.

सोयाबीन लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडल्यास उत्पादन चांगले मिळते .

लागवडीसाठी जमिनीचा सामू 6-6.5 च्या दरम्यान असल्यास उत्पन्न वाढते.

अति खोल जमिनीमध्ये सोयाबीनची लागवड करणे टाळावे.

लागणारे हवामान :

सोयाबीनचे पिके उष्ण हवामान मानांमध्ये चांगले येते. सोयाबीन लागवडीसाठी साधारणपणे 18 ते 35 अंश डिग्री सेल्सिअस तापमान चांगले ठरते.

अशा तापमानामध्ये लागवड केल्यानंतर पिकाची वाढ देखील चांगली होते. सोयाबीनच्या पिकाला जास्त प्रमाणामध्ये कडाक्याची थंडी सहन होत नाही.

सर्वसाधारणपणे वार्षिक 600 ते 1000 मी. मे पाऊस सोयाबीन साठी पुरेसा ठरतो.

सुधारीत जाती :

1.फुले दुर्वा (के. डी .एस 999) :

या जातीची लागवड केल्यानंतर साधारणपणे 100 ते 105 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीचे शेंगांमधील दाणे मोठ्या आकाराचे असतात.

ही जात जांभळे दाणे, तांबेरा रोग, जीवाणूजन्य ठिपके या किडी आणि रोगांसाठी मध्यम प्रतिकारक्षम आहे. या जातीची आपण हार्वेस्टर ने काढणे करू शकतो.

2.सोयाबीन गोल्ड :

या जातीची पाने निमुळते असतात. त्यामुळे झाडाचा जास्त पसारा होत नाही आणि शेंगा जास्त लागतात. या जातीच्या झाडांना 60% शेंगा लागतात आणि प्रत्येक शेंगांमध्ये चार दाणे असतात.

ही जात आपण उशिरा काढली तरी चालते ,या जातीच्या शेंगा परिपक्व झाल्यानंतर फुटत नाहीत.

3. फुले संगम ( के. डी .एस 726 ) :

या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 100 ते 105 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते .या जातीच्या सोयाबीनच्या तेलाचा उतारा 18% एवढा येतो.

ही जात तांबेरा रोगाला कमी बळी पडते आणि मूळ कूच, खोडकूज आणि खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक आहे.

4. एस.एल 525 :

या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 144 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीच्या शेंगा या हलक्या राखाडी ,चमकदार ,क्रीम रंगाचे धान्य असणाऱ्या असतात.

जातीच्या सोयाबीन मध्ये 21.9% तेल उतारा मिळतो .या जातीपासून सरासरी सहा क्विंटल प्रति एकरी असे उत्पन्न मिळते.

5. एस एल 744 :

या जातीच्या शेंगांमध्ये बिया चमकदार असतात आणि हलक्या पिवळ्या रंगाच्या असतात या जातीपासून सरासरी सात क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते लागवड केल्यानंतर 135 ते 140 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते या जातिच्या शेंगांचा 21% तेल उतारा मिळतो.

6. एस एल 958 :

सोयाबीनची ही जात मोजक विषाणू ला प्रतिकारक आहे. या जातीची लागवड केल्यानंतर 142 दिवसानंतर आपण पीक काढनी करू शकतो.

या जातीच्या शेंगांमधील दाणे चमकदार आणि फिकट पिवळ्या रंगाचे असतात. या जातीपासून तेलाचा 20% पर्यंत उतारा मिळतो .या जातीपासून एकरी सरासरी 7.3 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते .

लागवड :

लागवड करण्यासाठी निवडलेली जमीन खोल नांगरट करून घ्यावी. नांगरणी करत असताना जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे आणि कोळप्याच्या सहाय्याने सगळीकडे पसरवून ढेकळे फोडून सर्व जमीन सपाट करून घ्यावी.

सोयाबीनची लागवड ही जून ते जुलै या महिन्यांमध्ये केली जाते. पेरणी करत असताना सर्वसाधारणपणे तीन ते पाच सेंटीमीटर पर्यंत बिया खोल जातील अशी पेरणी करावी.

दोन सरी मधील अंतर हे तीन फूट असावे . सोयाबीन ची लागवड 45 ×5 सेंटीमीटर या अंतरावर केल्याने चांगले उत्पन्न मिळते.

त्यामुळे आपण अंतर मशागत करू शकतो. सोयाबीनची लागवड आपण अंतर पीक म्हणून उसामध्ये देखील घेऊ शकतो. त्यावेळी भुंड्यावर सोयाबीनची लागवड केली जाते.

खत आणि पाणी व्यवस्थापन :

जमीन तयार करत असताना चांगले कुजलेले शेणखत , घनजीवामृत किंवा गांडूळ खत शेतामध्ये टाकावे. पाणी 💧 व्यवस्थापन करताना जीवामृत द्यावे.

जीवामृत दिल्यामुळे झाड वाढीसाठी चांगले ठरते. सोयाबीन हे खरीप हंगामा मधील पीक आहे.

त्यामुळे या पिकाला पाण्याची जास्त गरज नसते परंतु काही अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडल्यावर उत्पादन कमी होऊ शकते.

म्हणजेच पिकाला जेव्हा फांद्या फुटत असतात, तेव्हा लागवड केल्यानंतर 25 ते 30 दिवसानंतर पाणी देणे गरजेचे असते, फुलोरा येण्याचा काळामध्ये पाणी देणे गरजेचे असते आणि शेवटी शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये साधारण 60 ते 70 दिवसानंतर पाणी देणे गरजेचे असते.

असे पाण्याचे नियोजन केल्यामुळे सोयाबीन चांगली होते.

आंतर मशागत :

सोयाबीन ची पेरणी केल्यानंतर पहिले सहा ते आठ आठवडे तन भरपूर प्रमाणामध्ये उगवतात. त्यामुळे पीक वाढीवर अनिष्ट परिणाम दिसतात.

सोयाबीन तनवीरहित ठेवण्यासाठी 20 ते 30 दिवसांच्या अंतराने एकदा हलकी कोळपणी घ्यावी आणि त्यानंतर 45 दिवसानंतर दुसरी कोळपणी घ्यावे.

त्यासोबतच आपण तणांचे नियोजन करण्यासाठी एक ते दोन खुरपण्या देखील घेऊ शकतो.

महत्त्वाच्या किडी आणि रोग :

किडी :

1.पांढरी माशी :

पांढरी माशी ही रस शोषक कीड आहे. ही किड पानाच्या खालच्या बाजूला आढळते या किडीचे पिले आणि प्रौढ दोन्ही अवस्था मोठ्या प्रमाणावर झाडाच्या पानांमधून रस शोषतात. त्यामुळे झाड कमकुवत बनते आणि उत्पन्न मध्ये देखील कमी येते.

या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतामध्ये निळ्या आणि पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा आणि जैविक कीटकनाशकांची वेळोवेळी फवारणी घ्यावी.

2.ब्लीस्टर बीटल :

ही कीड मोठ्या प्रमाणावर फुलाच्या अवस्थेमध्ये नुकसान करते .या किडी मोठ्या प्रमाणावर फुले आणि कळ्या खातात.

त्यामुळे उत्पादनामध्ये घट होते, या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वेळोवेळी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.

3.केसाळ सुरवंट :

या किडीच्या मादी पानाच्या खालच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर अंडे घालतात.

अंड्यातून आळे बाहेर पडल्यानंतर किडी मोठया होतील तशा या आळीच्या अंगावर केस येतात.

ही कीड पानामधील हिरवा भाग खाते. प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर पानांच्या फक्त शिरा दिसतात.

या किडीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि दिसणारे सुरवंट हाताने उचलून मारून टाकावे.

रोग :

1.पिवळा मोजैक विषाणू :

या रोगाचा प्रादुर्भाव पांढऱ्या माशी मुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अनियमित पिवळे आणि हिरवे ठिपके पानावर दिसतात. ज्या झाडाला हा रोग झालेला असतो अशा झाडाला शेंगा येत नाहीत.

त्यामुळे उत्पादन मध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आपल्याला दिसून येते. या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी आणि पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन करावे.

2.तांबेरा :

या रोगाचा प्रसार ढगाळ आणि पावसाच्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला दिसतो. ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सोयाबीनच्या पानावर लालसर रंगाचे चट्टे पडलेले दिसतात. पानाच्या मागच्या बाजूला तपकिरी रंगाचे पुरळ दिसू लागतात आणि त्या पुरळ वर लाल रंगाची पावडर जमा झालेली असते असे दिसून येते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यावर झाडाची वाढ मंदावते आणि पाने मोठ्या प्रमाणामध्ये गळतात. या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.

काढणी आणि उत्पादन :

सोयाबीनचे काढणी प्रत्येक जातीच्या कालावधीनुसार केली जाते. सर्वसाधारणपणे 95 ते 110 दिवसानंतर पीक काढण्यासाठी पूर्णपणे तयार होते.

सोयाबीनची पाने पूर्णपणे पिवळी पडून गळतात आणि 95 टक्के शेंगा तपकिरी झालेल्या दिसायला सुरुवात झाल्यावर सोयाबीनची काढणी करावी.

सोयाबीन हे हाताने उपटून काढले जाते. काढणीसाठी उशीर झाल्यावर शेंगा झाडावरच तडकून बी बाहेर पडल्यामुळे नुकसान होते.

त्यामुळे योग्य वेळेवर सोयाबीनची काढणी करावी.

काढणी केल्यानंतर सोयाबीनची मळणी केली जाते. मळणी यंत्राच्या मदतीने सोयाबीनची मळणी करून घ्यावी.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/vegetables

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *