मसाले

जायफळ लागवड तंत्रज्ञान :

5/5 - (1 vote)

जायफळ हे उत्तम आणि सुगंधित असे मसाला पीक आहे. भारतामध्ये जायफळाची लागवड ही केरळ, तामिळाडू आणि महाराष्ट्रात मध्ये केली जाते. महाराष्ट्रात जायफळाची सर्वाधिक जास्त लागवड कोकण विभागात केली जाते. जायफळाची फळे ही गोल, पिवळसर आणि गुळगुळीत असतात. जायफळ वापर हा गोड पदार्थ बनविण्यासाठी केला जातो. जायपत्रीचा वापर विविध मसाल्या मध्ये केला जातो. जायफळाला उग्र वास व तिखट चव असते . जायफळीचा वापर अतिसार, निद्रानाश, उलटी, उचकी बद्धकोष्ठता व खोकल्यावर खूप गुणकारी ठरतो . जायफळामुळे दात निरोगी राहतात आणि जायफळ मधुमेहावर सुद्धा प्रभावी आहे. जायफळ हे अँटिबॅक्टरियल गुणधर्माने निपुण असल्यामुळे दातांच्या आरोग्यासाठी जायफळ खूप लाभदायी जायफळाचे सेवन केल्याने लहान मुलांच्या डोळ्यांचे विकार बरे होतात. लहान मुले सर्दी खोकल्याला लवकर बळी पडतात जर आपण त्यांना आहारामध्ये थोड्या प्रमाणामध्ये जायफळ दिले तर लहान मुलांपासून सर्दी खोकला लांब राहतो. जायफळापासून मिळालेले तेल हे फिकट पिवळे किव्हा रंगहीन असते . कॅफेनचे प्रमाण जायफळाच्या तेला मध्ये जास्त असते . सालीचा उपयोग मुरांबा, लोणचे, चटणी, कँडी बनवण्यासाठी केला जातो. जायफळ मधील तेल सुद्धा साबण, औषद, टूथपेस्ट बनवण्यासाठी केला जातो.

लागणारी जमीन:

उत्तम पाण्याचा निचरा होणारी, सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण जास्त असलेली, गाळाच्या तसेच जांभ्या दगडापासून तयार झालेल्या लाल जमिनीमध्ये जायफळाची लागवड उत्तम होते. आच्छादन पालापाचोळा कुजून तयार झालेल्या माती मध्ये जायफळाची लागवड करणे योग्य ठरते. समुद्र किनारपट्टीतील रेत असलेली रेताळ गाळ मिश्रित वर्कस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पण उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये जायफळाची लागवड चांगली होते

लागणारे हवामान:

जायफळ हे उष्कटिबंधीय पीक आहे. याला १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी आणि ४०अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान मानवत नाही. पिकाला वर्षभर ७०-७५%अदर्ता आवश्यक असते. पिकाला सावलीची गरज असते. हे पीक नारळच्या बागेत आंतरपीक म्हणून घेतले जाते. जायफळाला 2500 ते 4000 मिमी पर्यंत पाऊस असल्यास असल्यास उत्पन्न चांगले येते.

जायफळाच्या सुधारित जाती :

जायफळ मध्ये नर व मादी झाडे वेगवेगळे असतात त्यामुळे विविधता आधळून येते. उभयलिंगी जातीसुद्धा विद्यापीठाने विकसित केल्या आहेत.

१. कोकण सुगंधा :

जायफळाची ही जात डॉक्टर बाबासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे ही जायफळाची उभयलिंगी जात आहे म्हणजेच नर आणि मादी फुले दोन्ही एकाच झाडावर वेगवेगळ्या ठिकाणी येतात त्यामुळे परागीभवन साठी वेगळे नर झाडे लावण्याची गरज पडत नाही या जातीपासून सुमारे 525 ते 550 फळे दरवर्षी मिळतात बियांचे वजन 5.25 ग्राम पर्यंत मिळते.

२. कोकण स्वाद :

जायफळाची ही जात देखील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहे आणि ही जायफळाची मादी जात आहे याची वाढ सरळ होते जायफळाच्या बियांचा आकार सुमारे पाच ग्रॅम पर्यंत असतो आणि जायपत्रे सुमारे एक पॉईंट तीन ग्रॅम पर्यंत असते या जातीची सरासरी 760 ते 780 फळे प्रतिवर्षी मिळतात

३. कोंकण श्रीमंती :

ती जाते डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण या विभागासाठी विकसित केलेली आहे ह्या जातीची फळे टपोरी आणि आकारात मोठे असतात या जातीपासून दरवर्षी सुमारे 900 ते 920 फळे मिळतात या जातीच्या जायफळांचे बी आकाराने मोठे असून साधारणपणे दहा ग्रॅम चे असते आणि जायपत्री सुमारे दोन ग्रॅम पर्यंत मिळते.

४.कोंकण सुगंधा:

ही जात सुद्धा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण विभागासाठी विकसित केलेली आहे आणि ही एक उभयलिंगी जायफळाची जात आहे या िच्या झाडापासून साधारणपणे 500 फळे दरवर्षी मिळतात आणि जायफळाच्या बियांचे वजन नऊ ग्रॅम पर्यंत असते आणि जायपत्रीचे वजन एक पॉईंट झिरो सात ग्रॅम पर्यंत मिळते.

अभिवृद्धी :

जायफळाची अभिवृद्धी बियांपासून किंव्हा कलमे तयार करून केली जाते. रोपंपासून लावलेल्या झाडांमध्ये विविधता असल्यामुळे आणि झाडाला उशिरा फळे येतात. त्यामुळे कलमाची लागवड करणे योग्य ठरते. साधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये भेट कलम, बगल कलम, अंकुर कलम या पद्धतीचा वापर करून तयार केली जातात आणि परत त्यांचे लागवड केली जाते.

जायफळाची अभिवृद्धी भेटकलम ,मृदा कष्टकम या पद्धतीने केली जाते .जायफळाचे कलम लावल्यामुळे आपल्याला बरेच फायदे होतात .आपण पाहिजे तेवढी मादीची आणि नरांची झाडे लावून लागवड करू शकतो. कलम करताना जर आपण मादी झाडाच्या काड्यांचा बांधण्यासाठी वापर केला तर तयार होणारे कलम हे मादी कलम तयार होते. तसेच नर कलमांच्या झाडाच्या काढण्या बांधण्यासाठी वापरल्यास नर कलमे तयार होतात. आपण ज्या झाडांच्या काड्या बांधण्यासाठी वापरतो त्याच झाडांचे वैशिष्ट्ये असलेले कलम तयार होते. म्हणजेच जायफळाची कलमे लावल्याने आपणास पाहिजे तशा गुणधर्माच्या झाडे तयार करू शकतो. जायफळाची कलमे लावून जर आपण लागवड केली तर आपल्याला नर आणि मादी या झाडांचे प्रमाण बागेमध्ये ठेवावे लागते .जर फक्त मादी झाडांचीच लागवड केली तर मादी झाडांना फुले येणार पण नर झाडे बागेत नसल्यामुळे फळधारणा होणार नाही. दहा मादी झाडांच्या साठी सर्वसाधारणपणे एक ते दोन नर कलमाची लागवड करावी. विद्यापीठांनी उभयलिंगी जाती तसेच केल्या आहेत आपण तशा जातींचे सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणावर करू शकतो.

लागवड :

लागवड ही पावसाळ्याच्या सुरुवातीला केली जाते . लागवडीसाठी जून महिन्यात खड्डे खणून घ्यावे. त्याच्यामध्ये कलम लावून त्याच्या भोवती पायाने घट्ट माती दाबून घ्यावी.रोपांची लागवड करायची झाल्यास एक ते दोन वर्षाची निरोगी रोपे निवडावे. झाड लावायच्या अगोदर खड्डे शेणखताने भरून घ्यावे. कलम लावल्यानंतर कलमाचा जोड व्यवस्थित जमिनीच्या वरती राहील याची काळजी घ्यावी.कलमांना पहिल्या दोन ते तीन वर्ष सावली दिली पाहिजे. त्यासाठी केळीची लागवड करावी. जायफळाची लागवड सात मीटरच्या अंतरावर केली तर आपण त्यामध्ये सुपारीची आंतरपीके घेऊन अधिक नफा मिळवू शकतो.

खत आणि पाणी पुरवठा:

रायफल रोपांची लागवड केल्यानंतर एक ते दोन महिने रूपाला तग धरणासाठी लागतात त्यावेळी पाण्याचे योग्य नियोजन करणे खूप गरजेचे असते नाहीतर झाड सुकून मरते. एकदा त्याची वाढ सुरू झाल्यानंतर हिवाळ्यामध्ये ७-८ दिवसांनी आणि उन्हाळ्यात ३-५ दिवसांनी पाणी द्यावे. दरवर्षी पावसाच्या अगोदर शेणखत द्यावे. शेणखत खोडाच्या सभोवार चर खणून त्यात द्यावे. शेण खताचा डोस दरवर्षी झाडाच्या वयानुसार वाढवावा. झाडाला घन जीवामृत घालावे आणि झाडाला महिन्यातून एकदा जीवामृत सोडावे.

काढणी व उत्पादन :

जायफळाच्या रोपांना सात ते आठ वर्षानंतर फळे लागतात आणि कलमंपासून साधारणपणे चौथ्या वर्षापासून उत्पादन मिळते. जायफळाला वर्षभर फुले येतात परंतु जुलै -ऑगस्ट आणि फेब्रुवारी -मार्च या कालावधीत फळांची जास्त काढणी केली जाते. फळधारणा झाल्यानंतर फळे पक्व होऊन पर्यंत आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो. पूर्णपणे पक्व झालेल्या फळांचा रंग पिवळा पडतो. तसेच सालीला तडा जातो. तयार फळे झाडावरून काढावीत आणि खाली पडलेले गोळा करावेत. जायफळाची साल, जयपत्री आणि जायफळ वेगळे करावे आणि वेगवेगळे वाळवावे. दहा वर्षाच्या झाडापासून दरवर्षी 500 ते 800 फळे मिळतात आणि झाडाच्या वयानुसार दरवर्षी उत्पन्न वाढत जाते. जायफळाची साल जायपत्रे आणि त्याचा बी हे काढून वेगवेगळे सुद्धा विकले जातात किंवा त्यावर प्रक्रिया करून सुद्धा म्हणजेच लोणचे पावडर तयार करून बाजारामध्ये विकली जाते.

रोग व कीड व्यवस्थापन :

जायफळाच्या झाडावर जास्त प्रमाणामध्ये नुकसान करणारे किडी आणि रोग येत नाहीत आणि आले तरी त्यांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये आढळून येतो. जायफळावर पडणारे काही रोग आणि किडी खालील प्रमाणे आहेत :

1.खवले कीटक :

हे कीटक पांढऱ्या रंगाचे असून एका भागावर जास्त संख्येमध्ये आढळतात. खवले कीटक जायफळाच्या नर्सरी मधील रोपांवर कोवळ्या शेंड्यांवर आणि नवीन पालवीवर जास्त दिसतात. खवले नवीन पालवीतून रस शोषतात त्यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि त्याचा अनिष्ट परिणाम उत्पादनावर होतो. किडीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.

2. फांद्या सुकणे :

हा रोग जायफळामध्ये बुरशीमुळे होतो .या रोगाची लक्षणे म्हणजे बागेमधील काही झाडांच्या फांद्या शेंड्याकडून खाली सुकल्या जातात. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी सुकलेल्या फांद्या झाडावरून काढून टाकाव्या आणि त्या जागावर जैविक बुरशीनाशक लावावे.

3. फळे सडणे :

हा सुद्धा एक बुरशीजन्य रोग आहे. या रोगामध्ये फळाला सुरुवातीला देठाजवळ पुरळ उठतात आणि ते पुरळ फळावर हळूहळू पसरत जातात. त्यामुळे फळाची साल तपकिरी होते आणि फळ सडू लागते .जास्त प्रादुर्भाव वाढल्यास फळाच्या आतील जायपत्री देखील सडू लागते, त्यामुळे फळाचा वास येतो . या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी झाडावरील रोगग्रस्त फळे काढून टाकावी आणि फळे अर्धपक्व असताना झाडावर जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

4.करपा :

जायफल मध्ये दोन प्रकारचा करपा बघितला जातो. पहिल्या प्रकारच्या करपा मध्ये बुरशीचे पांढरे धागे जायफळाच्या खोडावर वाढलेले दिसतात आणि जायफळाच्या पानांच्या खालच्या बाजूवर पंख्याप्रमाणे वाढलेले बुरशी दिसते .त्यामुळे प्रादुर्भाव झालेला भाग सुकलेला दिसून येतो . आणि दुसरा करपा म्हणजे जायफळाच्या खोडावर आणि पानांवर काळ्या रंगाच्या बारीक बुरशीच्या धाग्यांची जाळे तयार झालेली दिसते. या रोगामुळे झाडाचे फारसे नुकसान होत नाही तरी या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

पोस्ट पाहण्यासाठी फेसबुक पेजला फॉलो करा 👇

👉 https://www.facebook.com/naturekrushi

👉https://naturekrushi.com/category/spices/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *