नैसर्गिक पपई लागवड तंत्रज्ञान :
पोस्ट इंग्लिश मधे वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇
👉 https://naturekrushi.com/natural-papaya-cultivation-technology
पपईचे मूळ स्थान दक्षिण मॅक्सिको आहे. भारतात बिहार, राजस्थान, आसाम, ब्रह्म प्रदेश आणि महाराष्ट्र मध्ये जळगाव, धुळे, नागपूर, बुलढाणा, अहमदनगर, वर्धा, अमरावती, नाशिक व पुणे या जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. पपई हे पीक कमी वेळात, कमी खर्चात व कमी जागेत जास्त उत्पादन मिळून देणारे पीक आहे. तसेच पपईचे आरोग्यास खूप फायदे असून पपईच्या फळापासून पेपेन नावाचा जो चिकट पदार्थ मिळतो त्याचा उपयोग औषधामध्ये केला जातो. पपई या फळांमध्ये खनिज द्रव्ये, लोह, स्फुरद, कॅल्शियम तसेच अ, ब, क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात.
पपईसाठी लागणारी जमीन आणि हवामान :
पपईची मुळ्या उथळ वाढत असल्यामुळे मध्यम काळ्या, गाळाच्या मुरमाड तसेच जांब्या खडकापासून तयार झालेल्या उत्तम नीचऱ्याच्या जमिनीत पपईची लागवड चांगल्या प्रकार होऊ शकते. पपईची लागवड उष्ण व दमट हवामानात चांगली होते, पपईची वाढ २५-३५ अंश सल्सिअस तापमानात चांगली होते. जास्त पाऊस पपई या पिकाला मानवत नाही, कडाक्याची थंडी, जोरदार वारे, धुके आणि दव या पिकास हानिकारक असते.
पपईच्या जाती :
वॉशिंग्टनकूर्ग
हनिड्यू
को – २
को – ७ रांची
पुसा डेलीशियस
पुसा मजेस्टी
सोलो
पुसा जायंट
तैवान – ७८६
अभिवृद्धी आणि लागवड पद्धती :
पपईची लागवड नेहमी बियांपासून रोप तयार करून केली जाते. वाफ्यावर किंव्हा पिशवीत रोपे तयार केली जातात आणि त्यांची लागवड केली जाते. रोपे तयार करण्यासाठी निवडक जातीची फळे वापरावी. बी काढल्यानंतर ताबडतोप रोपे तयार करण्यासाठी वापरावेत. बी काढल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यावे आणि त्यावर बीजमृत ची प्रक्रिया करावी. बियाणे सावलीत सुकवून लावायला घ्यावे. २५०-३५० ग्राम बियाणे प्रती हेकटर लागतात. उभयलिंगी जात लागवडीसाठी १०० ग्राम बी प्रती हेक्टरी लागते. निवडलेल्या जमिनीत नांगरट करून घ्यावी. नांगरणी करत असताना शेतात घन जीवामृत पण मिसळून घ्यावे. नांगरट झाल्यानंतर पाणी सोडावे आणि वापसा आल्यानंतर रोपे लावावीत. नर झाडे व मादी झाडे वेगवेगळ्या झाडावर असलेल्या जातीची रोपे असल्यास प्रत्येक खड्ड्यात (वीस सेंटीमीटर च्या अंतराने) तीन ते चार रोपे लाववीत. परंतु उभलंबी असल्यास प्रत्येक खड्ड्यात एकच रोप लावावे. लागवड नेहमी ढगाळ वातावरणात किंवा दुपारनंतरच करावी. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. पपईची लागवड वर्षातून तीन वेळा करतात जून – जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि फेब्रुवारी – मार्च
खते व पाणीपुरवठा:
झाडे लावताना घन जीवामृत प्रत्येक खड्ड्यात द्यावे. झाडाला प्रत्येक महिन्यात एकदा तरी जीवामृत देणे गरजेचे आहे. प्रमाण (१०० लिटर पाणी – ५ लिटर जीवामृत ). प्रत्येक महिन्यात जीवामृत एक लिटर जास्त वाढवावे. उदा : १०० लिटर पाणी – ६ लिटर जीवामृत. पपई ला हिवाळ्यात दर ८-१० दिवसाने पाणी द्यावे आणि उन्हाळ्यात ४-५ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. पपई ला जास्त पाणी देऊ नये आणि पाण्याचा खोडशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. नाहीतर खोड कुजने या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
आंतर मशागत आणि आंतर पिके :
पपईच्या मुळाची वाडी उथळ असल्यामुळे पपईच्या आळ्यात सारखी खुरपणी करावी, तिथे तन वाळून देऊ नये. पपईच्या लागवडीमध्ये शक्यतो लहान वाढणारी पिके आंतरपीक म्हणून घ्यावीत जसे की हरभरा, चवळी.
रोग व किड नियंत्रण :
नैसर्गिक पद्धतीने लागवड केल्यामुळे आणि शेतात जैव विविधता असल्यामुळे रोग व कीड यांचा प्रादुर्भाव कमी असतो. पण गरज पडल्यावर जीवामृत, दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्क, अग्निस्त्र, अंबलेले ताक या नैसर्गिक औषधांचा वापर शेतकऱ्याने करावा.
फळांची काढणी व उत्पादन :
पपई ची लागवड केल्यानंतर पपईच्या झाडाला १२० ते १८० दिवसांनी फुले येतात आणि फुले उमलेल्या पासून १४०-१६० दिवसात फळे काढण्यास तयार होतात.
फळे काढण्यास तयार आहेत कसे ओळखावे :
१. फळांवर पिवळसर चट्टा दिसू लागला म्हणजे फळ काढणीस तयार झाले असे समजावे, यालाच कवडी पडणे असेही म्हणतात.
२.फळावर ओरखडा काढल्यास चीक पाण्यासारखा पातळ झालेला दिसतो. त्यावेळी फळ पक्व झालेले असे समजावे.
हे बदल दिसल्यानंतर फळे टोकाला धरून हळुवारपणे पिवळटून देटा सहित काढावीत .पपईच्या झाडाचे आयुष्य तीन ते चार वर्षे असते. दरवर्षी १ -२ किलो वजनाची, ३० -५० पर्यंत पपईच्या प्रत्येक झाडापासून मिळतात. पपई तून दरवर्षी ६०- १०० टन उत्पादन मिळते.
पोस्ट इंग्लिश मधे वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇
👉 https://naturekrushi.com/natural-papaya-cultivation-technology-in-marathi
पोस्ट पाहण्यासाठी फेसबुक पेजला फॉलो करा 👇
👉https://naturekrushi.com/naturekrushi-facebook-page / 👉 https://www.facebook.com/naturekrushi