नैसर्गिक पेरू लागवड तंत्रज्ञान
पेरू हे खूप कणखर पीक आहे. कमी पाण्याच्या ठिकाणी हे पीक जास्तीत जास्त येऊ शकतात. म्हणून महाराष्ट्रात बऱ्याच जागी पेरूची लागवड केली जाते . पेरू मध्ये “क” जीवनसत्व जास्त प्रमाणात असते. याच्यापासून मुख्यत जेली, सरबत, हवाबंद डब्यातील फोडी, आईस्क्रीम, पुडिंग, तयार करण्यात येते महाराष्ट्रामध्ये बुलढाणा, भंडारा, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर , नाशिक, सातारा या ठिकाणी सर्वात जास्त पेरूचे उत्पादन घेतले जाते. पेरू खाल्ल्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते हिंदू मधील रक्त परिसंचरण सुधारते . ते कॉपर चे प्रमाण जास्त असते जे हार्मोन्सचे उत्पादन आणि शोषणासाठी आवश्यक असते. पेरू हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि कॅन्सर पासून वाचवते. मधुमेह साठी पेरूचे सेवन चांगले ठरते आणि डोळ्यांचे आरोग्य ही चांगले राहते. पेरूच पान चावून खाल्ल्याने दातांचे आरोग्य चांगले राहते आणि पचनक्रिया सुद्धा चांगली राहते.
लागणारी जमीन व हवामान :
हलकी ते मध्यम जमीनीत पेरूची लागवड यशस्वी होते. पाण्याचा निचरा होणाऱ्या चांगल्या मातीमध्ये पेरूची लागवड करावी .पाणथळ ,चुनखडीयुक्त ,पाण्याचा निचरा होत नसलेल्या जमिनीत पेरूची लागवड करू नये. निर्माता तर असलेली असेल तर पेरूची लागवड जास्त यशस्वी होते जमिनीचा सामू सुमारे 6.5 ते 7.5 असावा.
पेरूच्या सुधारित जाती :
पेरू मध्ये फळाचा ,आकार फळाची साल पृष्ठभाग, तसेच फळातील गराचा रंग या भागावरून त्याच्या जातीचे वर्गीकरण केले जाते .पांढऱ्या गरांचे पेरू जास्त गोड असतात आणि लाल गराचे पेरू आरोग्यासाठी चांगले असतात.
१.लखनऊ -49 : पेरूच्या या जातीचे उत्पादन सर्वाधिक अधिक असते .या जातीच्या पेरूच्या झाडांची उंची ही लहान असते पण पेरूची चव गोड असते .या जातीच्या एका झाडापासून 130 ते 155 किलो पेरूचे उत्पादन मिळते.
२.थाई पेरू : वर्तमान काळामध्ये या पेरूची खूपच चर्चा आहे .या पेरूची बाजारात किंमत खूप असते आणि टिकण्यासाठी हा पेरू उत्तम मानला जातो .या झाडांना कमी वेळात वेळ लागते त्यामुळे कमी वेळेमध्ये शेतकऱ्यांना नफा मिळतो. या जातीच्या झाडाला चार ते पाच वर्षानंतर 100 ते 120 किलो फळे लागतात.
३.अलाहाबाद सफेदा : महाराष्ट्र मध्ये सर्वात चर्चेत असलेली पेरूची ही जात मांनली जाते. अलाहाबाद सफेदा ही पेरूची उत्कृष्ट जात आहे .या झाडापासून आपल्याला 40 ते 50 किलो उत्पादन मिळते .या जातीचे झाड सरळ वाढते आणि उंच असते या जातीचा पेरू हा खायला गोड असतो.
४.पंत प्रभात: पंतनगर कृषी विद्यापीठाने पेरूची ही जात विकसित केलेली आहे. या जातीपासून आपण 120 किलो पर्यंत उत्पादन घेऊ शकतो .या जातीचा पेरू हा खायला खूप चविष्ट आणि गोड असतो.
पेरूची अभिवृद्धी :
पेरूची अभिवृद्धी बियांपासून तसेच शाखीय पद्धतीने केली जाते. पण बियानपासून तयार केलेला झाडांपासून उत्पादन मिळायला खूप वेळ जातो आणि फळांची प्रत आणि उत्पादन या विषयावर आपल्याला खात्री नसते. आणि झाड सरळ वाढणारे असते त्यामुळे इच्छित जातींची लागवड करण्यासाठी त्या जातीची कलमे आपण गुटी कलम, भेट कलम पद्धतीने लावू शकतो.
लागवडीचे अंतर व हंगाम :
वृक्ष लागवड करताना उत्तम अंतर हे 6×6 मीटर ठेवले तर आपण त्याच्यामध्ये पहिल्या चार वर्षात आंतरपिके घेऊन नफा मिळवू शकतो. नवीन घनदाट लागवडीच्या पद्धती झाडांतील अंतर 4.5 ×4.5 मीटर राखतात . पावसाच्या सुरुवातीला किंव्हा पावसाळा संपल्यानंतर कलम शेतात लावावी कलम खड्ड्यांमध्ये मधोमध लावून त्याला काठीचा आधार द्यावा आणि त्याला पाणी नियमित अंतराने द्यावे.
झाडाची छाटणी आणि वळण :
पेरूची सारखी छाटणी करावी लागत नाही पण लहान असताना आवश्यकतेनसार कधी कधी छाटणी करावी लागते. झाडाचा समतोल राखण्यासाठी ३-४ फांद्या ठराविक अंतरावर राखाव्यात. झाड हे सर्व बाजूने वडेला हवे . सुरुवातीला येणारी फळ आणि फुले काडून टाकावेत. कारण पहिले थोडे दिवस झाडाला मजबूत होण्यासाठी आवश्यक असतात. पेरूच्या फांद्या पसरतील अशी छाटणी करावी. सरळ वाढणाऱ्या झाडांना फळ कमी लागते.
लागणारी खते व पाणी पुरवठा :
झाडांची लवकर वाढ होण्यासाठी खते व पाणी पुरवठा व्यवस्थित करावा लागतो . झाडे लावताना खड्यातशेणखत घालावे आणि झाडाने जीव धरल्यानंतर जीवामृत ची आळवणी करावी.
शेणखत प्रमाण :
१ वर्ष – ५ किलो
२ वर्ष – १० किलो
३ वर्ष – १५ किलो
४ वर्ष – २० किलो
पेरूच्या झाड बिना पाण्याचे बराच वेळ राहू शकतात. पाणी पुरवठा व्यवस्थित केल्याने झाडाची वाढ चांगली होते. उन्हाळ्यात १० – १५ दिवसातून पेरूच्या झाडाला पाणी द्यावे आणि हिवाळ्यात २० दिवसाने पाणी द्यावे.
बहार धरणे :
महाराष्ट्र हवामानात पेरूच्या झाडाला मृग बहार ,हस्त बहार आणि आंबे आहार असे तीन बहार येतात. महाराष्ट्रातील हवामानात मृगभभार घेणे फायदेशीर ठरते .या बहराची फळे नोव्हेंबर ते जानेवारी या काळात विक्रीसाठी तयार होतात .त्यांची प्रतही चांगली राहते. तसेच पावसाळ्यात अपक्व अवस्थेत असल्याने फळ माशीच्या प्रादुर्भावापासून फळे मुक्त राहतात. मृग बहार घेण्यासाठी उन्हाळ्यात झाडांना पाण्याचा ताण द्यावा लागतो .या काळात बहुतेक भागात पाणीटंचाई असते .त्यामुळे झाडांना ताण देणे सुलभ होते.
आंतर पिके व आंतरमशागत :
लागवडी नंतर ४ वर्षा पर्यंत आपण झाडांच्या मध्ये आंतर पिके घेऊन आपण नफा मिळवू शकतो आंतर पिके ही कमी कालावधीची व कमी खोलीवर जाणारी असावी. आंतर पिके ही द्विदल वर्गातील असावी. कारण ती झाडे जमिनीमध्ये नत्र स्थिर करणारे असतात. त्याचा वापर पेरूच्या झाडाला ही होतो. उन्हाळ्यात हलकी मशागत करून घ्यावी. जर आपण आंतरपिके घेणार नसू तर आपण आच्छादन करून तणांचे नियोजन करू शकतो. झाडाच्या आळ्यातील तन काढून घ्यावं.
पेरुवर पडणाऱ्या किडी :
किडी :
१.फळमाशी :
फळमाशीही घरमाशी सारखी दिसणारी एक माशी आहे .प्रौढ माशा या अर्धपक्व पेरूच्या फळांमध्ये साली खाली अंडी घालतात. एक माशी साधारण शंभर ते दीडशे अंडी घालते . का जागी कमीत कमी 15 ते 20 अंडी घातली जातात .दोन ते तीन दिवसानंतर अंद्यांमधून अळ्या बाहेर पडतात . अळ्या बाहेर पडल्या पडल्या फळाच्या आतील गर खाऊ लागतात .परिणामी काही दिवसात फळ पूर्णपणे सडून जाते. बारा ते पंधरा दिवसानंतर या अळ्या मोठ्या होऊन खाली जमिनीवर पडतात आणि जमिनीमध्येच कोश अवस्थेत जातात. साधारणपणे आठ-दहा दिवसातून कोशातून प्रौढ माशा बाहेर पडतात आणि परत फळांवर अंडी घालतात. अशी ही क्रिया वर्षभर सुरू असते आणि सर्वसाधारणपणे एका वर्षात अनेक पिढ्या तयार होतात .फळमाशीवर फवारणी करून नियंत्रण भेटत नाही कारण ह्या माशीची अंडी ही फळाच्या आत असतात आणि कोश देखील मातीच्या आत तयार होतात.
उपाय योजना : प्रादुर्भाव झालेली फळे एकत्र. करावी आणि नष्ट करावे. झाडाच्या बाजूची माती कुदळणी करून भुसभुशीत करावी .बागे मध्ये स्वच्छ भरपूर सूर्यप्रकाश व खेळती हवा राहण्यासाठी झाडाची वेळोवेळी हलकी छाटणी करावी. बागेमध्ये रक्षक सापळ्यांचा वापर करावा.( एकरी दहा ते बारा)
२.साल पोखरणारे अळी :
अळी प्रथम साल खाऊन त्याचा भुगा आणि लाळ याच्या साह्याने तिथे तोंडापासून जाळे तयार करायला सुरुवात करते. नंतर ती पेरूच्या खोडांना छिद्र पाडते . छिद्रा मध्ये राहून रात्रीच्या वेळी बाहेर येते आणि भुयारी जाळत राहून पुढे पुढे साल खात जाते आणि जाळी तयार करते. परिणामी झाडाला भेटणार अन्नपुरवठा थांबवला जातो आणि झाड कमकुवत बनत जाते.
व्यवस्थापन : या किडीच्या व्यवस्थापनासाठी पावसाळ्यानंतर विशेष लक्ष देऊन उपाययोजना करावी .यावेळी पेरूच्या खोडामध्ये फारशी छिद्रे दिसत नसतात. फक्त जाळ्या तयार झालेला असतात त्या जाळ्या नष्ट कराव्या आणि जर कुठे छिद्र दिसले तर तार घुसून वर खाली हलवावी म्हणजे आत अळी असेल तर ती मारली जाईल आणि त्या छिद्रामध्ये जैविक कीटकनाशक टाकावे.
३.पांढरी माशी :
या माशीची पिले आणि प्रौढ या या दोन्ही अवस्थेत ही कीड झाडाला नुकसान पोहोचवते . प्रौढ आणि पिले सतत पानांमधून रस शोषण करीत राहतात. रस शोषण करतानाही पानावर चिकट गोड पदार्थ स्त्रवतात. त्यामुळे अन्य बुरशी सुद्धा त्या पानावर येते आणि पाने काळी पडतात. फळांवर सुद्धा हा प्रादुर्भाव लवकरच आढळून येतो. त्यामुळे पानाच्या अन्न तयार करण्याच्या क्रियेत खंड पडतो .त्यामुळे उत्पादनावर सुद्धा विपरीत परिणाम पडतो आणि अशा फळांना बाजारात खूप कमी भाव मिळतो.
व्यवस्थापन : बागेमध्ये पांढऱ्या म्हशीच्या नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापडे लावावेत.
४.मावा : या किडींचे पिल्ले आणि प्रौढ समूहाने पानातून अनेक पेरूच्या कोवळ्या फांद्यांमधून रस शोषण करतात. त्यामुळे झाडाचे पाने पिवळे पडतात आणि चुरगळून शेवटी पानगळ होऊ लागते .परिणामी उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
व्यवस्थापन : जिथे माव्याची संख्या जास्त असते. तेथील पाने काढून पूर्णपणे नष्ट करावेत आणि निंबोळी अर्काची फवारणी करावी.
उत्पादन आणि काढणी :
फुले आल्यानंतर ९० ते १५० दिवसात पेरूची फळे काढणीसाठी तयार होतात. फळे एकादशी तयार होत नाहीत. फळे तीन ते चार दिवसांच्या अंतराने शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी तापमान कमी असताना काढावित व काळजीपूर्वक हाताळावी. लागवड केल्यानंतर चार वर्षापासून पुढे पेरूचे उत्पादन सुरू होते आठव्या वर्षानंतर उत्पादन वाढत जाऊन दहाव्या वर्षी पर्यंत झाडापासून 700 ते 1500 फळे भेटू लागतात. काही सुधारित जातींच्या पेरूच्या झाडाला तिसऱ्या वर्षापासून भरघोस उत्पन्न मिळते.