Mogra lagvad | मोगरा लागवड । मोगरा लावण्याची पद्धती
Mogra lagvad in Marathi मोगरा ही भारतीय वनस्पती असून नोव्हेंबर महिन्यामध्ये मोगऱ्याला बहार येतो. मोगरा हा झुडूप किंवा वेल मध्ये येतो,ते फुलांनी बहरतात. मोगरा ही खूप सूर्यप्रकाशामध्ये वाढणारी वनस्पती असून सावलीमध्ये या झाडाला चांगली फुले येत नाही. सावलीमध्ये असणाऱ्या मोगऱ्याला कधीही फुले येत नाहीत. सूर्यप्रकाशामध्ये मोगरा चांगला बहरतो .मोगऱ्याला फुल येतात पण फळधारणा होत नाही फळे नसल्यामुळे बिया नसतात. त्यामुळेच मोगऱ्याची रोपे तयार करण्यासाठी मोगऱ्याच्या फांद्या वापरल्या जातात. पावसाळ्यामध्ये मोगऱ्याची फांदी लावली असतात, लवकर उगवणी होते.
भविष्य काळामध्ये मोगऱ्याची लागवड फार मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे. मोग्ऱ्याची फुले मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जातात. फुलांची बाजारपेठ सर्वत्र जोरात आहे. मोगऱ्याची शेती हा फुलशेतीत शेतकऱ्यांना चांगला पर्याय ठरू शकेल. मोगरा हे सुगंधित फुल असून साधारणपणे मोगऱ्याच्या रंगाचा विचार केला तर ते पांढऱ्या रंगाची फुले असते. मोगरा फुल हे अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. मोग्ऱ्यामध्ये औषधी गुणधर्म मिळते, शतकांपासून वापरले जाते अनेक काळापासून फुल वापरले गेलेले आहे.
सौंदर्य प्रसाधने बनवण्यामध्ये मोगऱ्याच्या खूप मोठ्या प्रमाणात मध्ये वापर केला जातो. मोगऱ्याचा सुगंधच नाही तर केस आणि चेहऱ्यासाठी ही फूल खूप फायदेशीर ठरते. मोगऱ्याचे फुल हे दुर्गंधीनाशक म्हणून वापरले जाते. मोगराच्या सुगंध मन प्रसन्न करतो. मोगऱ्याचे भरपूर फायदे आहात. मोगऱ्याच्या तेलाचा वापर हा अगरबत्ती बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. मोगराच्या तेलाचा वापर अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरला जातो.
मोगरा हा वारंवार धार्मिक समारंभ मध्ये म्हणजेच विवाह सोहळ्यामध्ये अर्पण, हार आणि दागिने म्हणून वापरले जाते .शिवाय मोगरा फुलं मधून काढलेल्या आवश्यक तेलाचा वापर वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरला जातो. मोगरा त्याच्या गोड आणि मोहक सुगंधासाठी औषधी फॅक्टरी आणि परफ्युमरी मध्ये अत्यंत मूल्यवान आहे. त्याच्या सुगंधाचा मानसिक आराम आणि उत्साहावर्धक प्रभाव असल्याचे मानले जाते. ज्यामुळे ताण तणाव कमी करण्यासाठी आणि विश्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी फायदेशीर ठरते.
लागणारी जमीन :
- मोगरा लागवड आपण सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये करू शकतो.
- चांगले उत्पन्न घेण्यासाठी मोगऱ्याला मध्यम खोलीची व भूरकट रंगाची चुनखडी नसलेली जमीन चांगली ठरते.
- ज्या जमिनीमध्ये पाण्याचा उत्तम नीचरा होतो, अशा जमिनी मोगरा लागवडीसाठी निवडाव्या.
- पाणथळ जमिनींमध्ये मोगऱ्याची पाने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पिवळी पडतात.
- जास्त प्रमाणामध्ये क्षार असलेल्या जमिनी मोगरा लागवडीसाठी वापरू नयेत.
लागणारे हवामान :
- मोगरा लागवडीसाठी स्वच्छ हवामानाची गरज असते.
- मोगरा लागवड अतिशय थंडीमध्ये चांगले होत नाही.
- मोगऱ्याची चांगली वाढ होण्यासाठी 25 डिग्री सेल्सियस ते 35 डिग्री सेल्सियस हे तापमान या योग्य ठरते.
- अशा हवामानामध्ये मोगऱ्याच्या झाडाला भरपूर कळ्या लागतात आणि उत्पन्न देखील चांगले येते.
- मोगरा लागवडीसाठी कडक उन्हाळा देखील अयोग्य ठरतो.
मोग्ऱ्याच्या जाती :
1. मोतीचा बेला :
या जातीच्या मोगऱ्यामध्ये गोलाकार दुहेरी पाकळ्या असतात. कळी आकाराने गोल असते.
2. बेला :
या जातीच्या मोगऱ्याला दुहेरी पाकळ्या असतात. पण आकाराने पाकळ्या लहान असतात.
3. मुंग्ना :
मोगऱ्याच्या या जातीच्या कळ्या आकाराने मोठ्या असून फुलांमध्ये गोलाकार पाकळ्यांची संख्या जास्त असते. कन्नड भाषेमध्ये एलूसुत्ते असे म्हणतात.
4. शेतकरी मोगरा :
या जातीच्या मोगऱ्याला एक कळीचा मोगरा असं म्हटलं जाते .या मोगऱ्याला चांगल्या प्रतीच्या कळ्या येत असून हार व गजरे बनवण्यासाठी या जातीची फुले वापरली जातात.
5. बट मोगरा :
या मोगराच्या कळ्या आखूड असून कळ्या चांगल्या प्रकारे फुगलेले असतात. या जातीच्या मोगऱ्याला डबल पाकळीचा मोगरा देखील म्हटले जातात. या जातीच्या पाकळ्या कमळासारखे एकावर एक घट्ट असतात. त्याला आकर्षक चमक व मंद दीर्घकाळ दरवळणारा सुगंध असतो.
लागवड :
- मोगरा या पिकाची लागवड जून महिन्यांमधील पहिला पाऊस पडल्यानंतर करावी.
- मोगऱ्याची लागवड शक्यतो पिशवी मधील रोपे लावून केली जाते.
- असं केल्यामुळे दीड ते दोन महिने मध्ये रोपे नर्सरी मध्ये वाढलेले असतात.
- त्यामुळे मर या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
- रोपे लावत असताना पिशवी दोन्ही बाजूला ब्लेडने कापून घ्यावी ब्लेड वापरत असताना मुळाना इजा होणार नाही याची योग्य काळजी घ्यावी.
- नंतर हुंडीच्या आकाराची माती खड्ड्यांमध्ये मधोमध रोप लावून माती घालावी.
- रोपाचे खोड वर राहील याची काळजी घ्यावी.
- नंतर शेजारील माती रोपाला लावून हलके पायाने दाबावे.
- त्यामुळे जमिनीत पोकळी राहत नाही आणि झाड कोलमडत नाही आणि सरळ वाढते.
झाडांना ताण देणे :
- झाडांना ताण देणे म्हणजे आपण पाणी देणे थांबवतो.
- शक्यतो डिसेंबर या महिन्यांमध्ये खांदणी करून जानेवारीमध्ये शेणखत व पाणी दिले जाते.
- फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून झाडांना कळ्या लागायला सुरुवात होते.
- एकूण चार ते पाच महिने फुलांचा बहर असतो.
- झाडांना पाणी देत असताना लगेच पाणी देऊ नये हळूहळू पाणी द्यावे.
खत आणि पाणी व्यवस्थापन :
- मोगऱ्याच्या झाडांना लागवड केल्यानंतर खत व्यवस्थापन करणे गरजेचे असते.
- जमीन तयार करत असताना जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत घालून घ्यावे.
- जमिनीमध्ये घन जीवामृत किंवा गांडूळ खत देखील घालून घ्यावे.
- त्यानंतर वेळोवेळी मोगऱ्याच्या झाडांना जीवामृत सोडावे.
- त्यामुळे जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि जमीन सुपीक बनते.
- मोगऱ्याला कमी प्रमाणामध्ये पाणी लागते तरी जमिनीनुसार उन्हाळ्यामध्ये चौथ्या दिवशी व हिवाळ्यामध्ये सात ते आठ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
- पाणी देण्यासाठी बांगडी पद्धत वापरावे. सध्याच्या काळामध्ये ठिबक सिंचनाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
- ठिबक सिंचन केल्यामुळे पाण्याची बचत होते.
- तनांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि जीवामृत सुद्धा ठिबक सिंचना मधून सोडता येते.
आंतर मशागत आणि आंतरपिके :
- मोगरा या पिकाला लागवड केल्यानंतर तानांचा प्रादुर्भाव होतो.
- तणांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळोवेळी जमिनीमध्ये येणारे सर्व तन हाताने उपरून टाकावे.
- वेळोवेळी खुरपणी करावी आणि दोन ते तीन कोळपाच्या पाळ्या मारून घ्याव्यात.
- मोगराच्या लागवडी मध्ये आंतरपीक म्हणून आपण बटाटा, बीट, गाजर, कोथिंबीर, शेपू, अशा कमी कालावधीच्या पिकांची लागवड करू शकतो.
- आंतरपीक म्हणून आपण हिरवळीची पिके देखील घेऊ शकतो.
- चवळी, मूग, हरभरा, या सर्व पिकांच्या मुळाला गाठी असतात.
- त्या गाठी रायझोबियम च्या असतात. ह्या गाठी हवेमधील नत्र जमिनीमध्ये फिक्स करतात.
- त्यामुळे नैसर्गिक नत्र मोगऱ्याला मिळते
- आंतरपीके उत्पन्न घेतल्यानंतर आपण आच्छादन म्हणून देखील वापरू शकतो.
महत्वाच्या किडी आणि रोग :
किडी :
1. मावा :
मावा ही कीड रस शोषक कीड आहे. ही कीड झाडाच्या पानांमधून मोठ्या प्रमाणावर रस शोषते. त्यामुळे झाड पूर्णपणे पिवळे पडते. ही कीड स्वतःच्या शरीरामधून चिकट गोड पदार्थ स्त्रवते. त्या पदार्थावर काळी बुरशी लगेच आकर्षक होते. त्यामुळे संपूर्ण झाड काळे पडते आणि प्रकाश संश्लेषण ची क्रिया मंदावते. याचा अनिष्ट परिणाम झाडाच्या वाढीवर होतो आणि उत्पन्नावर देखील होतो. या किडीचा नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी व शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा. एकरी वीस ते पंचवीस चिकट सापळे लावावे.
2. कळी पोखरणारी आळी :
ही अळी नवीन आलेल्या कोवळ्या कळ्यांवर प्रादुर्भाव करते. मोगऱ्याच्या आलेला नवीन कळ्या पूर्णपणे पोखरून खाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट होते. या किडीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.
रोग :
1. मर रोग :
या रोगाचा प्रादुर्भाव बुरशीजन्य विषाणूंमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव रोपांना होतो. रोप अवस्थांमध्ये झाड कोलमडून पडते. या रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची आळवणी रोपांना द्यावी. मोगरा लागवडीसाठी लागणाऱ्या काड्या निरोगी वापरावे. मोगऱ्याच्या काड्या लावत असताना जैविक बुरशीनाशकांमधून बुडवून घ्याव्या.
2.करपा :
करपा या रोगाचा प्रादुर्भाव मोगराच्या झाडावर दिसून येतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर काळ्या रंगाचे आकाराने गोल ठिपके झाडाच्या पानांवर दिसतात. हळूहळू हे ठिपके फांद्यांवर देखील प्रादुर्भाव करतात. त्यामुळे प्रकाश संश्लेषांची क्रिया मंदावते याचा अनिष्ट परिणाम झाडाच्या वाढीवर होतो आणि उत्पन्नामध्ये घट होते.या रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.
काढणी :
- मोगराच्या लागवडीच्या पहिल्याच वर्षी काही प्रमाणामध्ये फुले येतात.
- त्यानंतर पुढील वर्षी उत्पादनामध्ये वाढ होते.
- दुसऱ्या वर्षापासून फुलाचे चांगले भरपूर उत्पन्न मिळते.
- सर्व साधारणपणे फेब्रुवारी ते ऑगस्टपर्यंत फुलांचा हंगाम असतो.
- संक्रांतिपासून कळ्यांना चांगलाच बहार आलेला दिसतो.
- योग्य व्यवस्थापन केल्यामुळे डिसेंबर मध्ये देखील मोगरा चांगला येतो.
- पुढील दिवाळीपर्यंत मोगऱ्याच्या कळ्या काढल्या जातात.
- कळी खुडत असताना चांगली फुगलेली लांब व घट्ट अश्या कळ्या काढावे.
- नियमित कळ्या खुडल्यामुळे मागील येणाऱ्या कळ्या लवकर मोठ्या होतात.
- कळी खुडताना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जमा करून घ्याव्या, कारण कळ्या अंगाच्या उष्णतेमुळे उमलतात व पिवळा पडून जातात.
- कळ्या ओटी मध्ये जमा करू नये, प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्याने कळ्या व्यवस्थित राहतात आणि पिवळ्या पडत नाहीत.
- मोगऱ्याच्या कळ्या रोजंदारीने न खुडता प्रति किलो उपलब्धतेनुसार खुडाव्या.
- मोगरा सकाळी सूर्योदयापूर्वी खुडावा.
उत्पन्न :
- मोगऱ्याला पहिल्या वर्षी कमी कळ्या लागतात.
- पण दुसऱ्या वर्षी पासून भरपूर उत्पन्न वाढते.
- प्रत्येक झाडाला कमीत कमी 20 ग्रॅम एका वेळी एवढ्या कळ्या लागतात.
- दुसऱ्या वर्षापासून डिसेंबर महिन्यामध्ये छाटणी केल्यानंतर जमिनीची चाळणी करून खत दिले जाते.
- पहिल्या वर्षी एक ते दीड किलो प्रत्येक झाडाला मोगरा लागतो.
- झाडाचे वय 5 वर्ष झाल्यानंतर एकूण एका झाडापासून पाच किलो पर्यंत फुले मिळतात.
Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi