Blogभाजीपाला

Methi lagvad in Marathi

5/5 - (2 votes)

Methi lagvad

Methi lagvad in Marathi : मेथी ही भाजीपाला पिकांमध्ये लोकप्रिय भाजी आहे. मेथीचा वापर आहारामध्ये विविध प्रकारे केला जातो. महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर मेथीची लागवड केली जाते. सर्व जिल्ह्यांमध्ये मेथीचे थोड्या जास्त प्रमाणावर Methi lagvad केली जाते. महाराष्ट्र मधील हवामानामध्ये मेथी हे खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येऊ शकते. मेथीच्या भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी टप्प्याटप्प्याने लागवड करून मेथीचे पीक वर्षभर घेतले जाते. मेथीच्या हिरव्या पानांची आणि कोवळ्या फांद्यांची भाजी केली जाते. मेथीच्या बियांचा वापर देखील मसाल्यामध्ये, लोणच्यामध्ये, चटणी मध्ये उपयोग केला जातो. मेथी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये औषधे गुणधर्म देखील असतात. मेथी पाचक असून यकृत आणि पिल्हा यांची कार्यक्षमता वाढून पचनक्रिया देखील सुधारते. मेथी मध्ये प्रोटीन्स, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह इत्यादी खनिजे आणि जीवनसत्वे देखील भरपूर प्रमाणामध्ये आढळतात.

लागणारे हवामान

  • मेथी थंड हवामानामध्ये खूप चांगल्या प्रकारे येते. विशेषतः कसुरी मेथी ही थंड हवामानामध्ये चांगले येते.
  • हे कमी दिवसांमध्ये येणारे पीक आहे.
  • विविध प्रकारच्या हवामानामध्ये मेथीचे पीक येत असेल तरी उन्हाळ्यामध्ये मेथी लागवड जोमाने होत नाही, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मेथीचे उत्पन्न हिवाळ्याच्या पेक्षा कमी मिळते.
  • जास्त प्रमाण मध्ये तापमान मध्ये वाढ पिकावर अनिष्ट परिणाम करते.

लागणारी जमीन

  • लागवडीसाठी मध्यम ते कसदार जमीन निवडावी.
  • मेथी लागवडीसाठी उत्तम सेंद्रिय पदार्थ असलेले, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
  • या जमिनीमध्ये पाणी साचून राहते क्षारयुक्त, पाणथळ, चोपण जमीन मेथी लागवडीसाठी वापरू नये.
  • मध्यम प्रकाराच्या जमिनीमध्ये खतांचे आणि पाण्याचे योग्य नियोजन करून देखील आपण मेथीची लागवड करू शकतो.
  • मध्यम प्रकाराच्या जमिनीमध्ये खतांचे आणि पाण्याचे योग्य नियोजन करून देखील आपण मेथीची लागवड करू शकतो.
  • मेथी लागवडीसाठी जमिनीचा सामू 5.5 ते 8.5 या दरम्यान असल्यास उत्तम दर्जाची भाजी मिळते.

मेथीच्या सुधारीत जाती

1.पुसा अर्ली बंचींग :

मेथीच्या ह्या पानाला भरपूर फांद्या येतात आणि रोपे पूर्णपणे उंच वाढते. या जातीच्या मेथीची पाने लंबगोल किंवा गोलसर आणि मोठे असतात. हा वाण लवकर वाढतो मेथीची फुले पांढरी असतात आणि शेंड्याकडे पानाच्या बेचक्यातून प्रत्येक ठिकाणी दोन ते तीन येतात. या जातीच्या मेथीच्या शेंगा लांब आणि मोठे असतात. पाने गडद हिरव्या रंगाचे असतात लागवड केल्यानंतर सरासरी 125 दिवसांमध्ये बिया तयार होतात.

2. मेथी नं.47 :

महाराष्ट्र मध्ये या मेथीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. हा एक सुधारित वा असून बऱ्याच ठिकाणी स्थानिक वाणांची लागवड देखील केली जाते. ही मेथी हिरवी, कोवळी, लुसलुशीत पाने लवकर येतात आणि लवकर फुलावर देखील येते. या जातीच्या मेथीचा कोवळेपणा जास्त काळापर्यंत टिकून राहतो.

3. कसुरी सेलेक्शन :

या जातीच्या मेथीची पाने ही लहान गोलसर असून वाढ सावकाश होते या मेथीची फुले आकर्षक पिवळ्या रंगाचे असतात, लांब दांड्यावर येणारे, असून शेंगा लहान कोयत्याच्या आकाराच्या असतात आणि बियाचा आकार लहान असतो. कसुरी मेथी अधिक सुगंधित आणि स्वादिष्ट असते. कसुरी मेथी दोन महिन्यांमध्ये तयार होते. या मेथी पासून अनेक खोडवे घेता येतात. हा वाण परस बागेत लावल्यावर फारच उपयुक्त ठरतो. या वाणांचे बी तयार होण्यासाठी 150 ते 160 दिवस सरासरी लागतात.

4. फुले कस्तुरी :

ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विकसित करण्यात आलेले आहे. या जातीला जास्त फुटवे असतात आणि उत्पादन क्षमता देखील जास्त असते. ही जात मर आणि नाग अळीला प्रतिकूल असून लागवड केल्यानंतर सरासरी सात ते आठ दिवसांमध्ये मेथी उगवायला चालू होते.

5. पुसा हायब्रीड :

मेथीची ही जात संकरित असून या जातीला मोठी आकर्षक हिरवी पाने असतात. पीक रोगाला प्रतिकारक्षम असतो .लागवड केल्यानंतर सरासरी 35 ते 40 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीपासून 160 ते 200 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.

6. कसुरी मेथी :

ही जात कसुरी पानांसाठी ओळखले जाते. या पानांचा सुगंध चांगला असतो.याचा वापर मसाल्यामध्ये मुख्यता केला जातो. या जातीची लागवड केल्यानंतर 45 ते 50 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. ही जात हेक्टरी 100 ते 120 क्विंटल उत्पादन देते.

लागवडीचा हंगाम

मेथी हा थंड हवामानामध्ये येणारे पीक असल्यामुळे महाराष्ट्र मध्ये खरीप आणि रब्बी हवामानामध्ये मेथीचे पीक मोठ्या प्रमाणावर पेरले जाते.

मेथीची लागवड खरीप हंगामामध्ये जून जुलै महिन्यामध्ये आणि रबी हंगामामध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये केली जाते.

सतत पुरवठा होण्यासाठी मेथीची पेरणी केली जाते.

मेथीचे लागवड वर्षभर करता येते, परंतु थंड हवामानामध्ये पिकाचा दर्जा चांगला मिळतो आणि उत्पन्न देखील जास्त मिळते.

लागवड पध्दती

  • मेथीची लागवड सपाट वाफ्यांमध्ये केली जाते.सपाट वाफेमध्ये वीस ते पंचवीस सेंटीमीटर अंतरावर ओळीतून पेरणी केली जाते.
  • मेथीचे पीक आंतरपीक म्हणून देखील घेतले जाते. पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी दिले जाते.
  • बिया नेहमी ओळीमध्ये पेरावे, त्यामुळे खुरपणी आणि तन काढणे सोपे जाते.
  • तसेच कापणी करणे देखील सोपे होते.
  • साधी मेथी केल्यानंतर तीन ते चार दिवसांमध्ये उगवते.
  • कसुरी मेथी मात्र सहा ते सात दिवसानंतर उगवतात.
  • एका हेक्टर साठी नेहमीच्या मेथीला 25 ते 30 किलो बियाणे पुरेसे होते.
  • अंतर पीक घेण्यासाठी बियांचे प्रमाण आवश्यकतेनुसार घ्यावे.
  • बियाणे पेरत असताना एकसारखे पातळ पडतील याची दक्षता घ्यावी.

खते आणि पाणी व्यवस्थापन

  • मेथीच्या लागवडीसाठी पूर्व मशागत करत असताना जमिनीमध्ये शेणखत घालावे आणि त्यासोबत घन जीवामृत आणि गांडूळ खत देखील जमिनीमध्ये मिसळून घ्यावे.
  • पाण्याचे नियोजन करताना जमिनीमध्ये जीवामृत देखील सोडावे.
  • त्यामुळे जमीन चांगली भुसभुशीत होते आणि सेंद्रिय पदार्थाची वाढ देखील जमिनीमध्ये होते.
  • मेथीच्या पिकाला नियमित पाणी देणे गरजेचे असते.
  • कोवळे आणि लुसलुशीत मेथी मिळण्यासाठी तीन ते पाच दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • पाण्याचा चांगला पुरवठा नियमित केल्यावर उत्पादन चांगले मिळते आणि खोडवे ही जास्त मिळतात.

आंतर मशागत

  • मेथी हे कमी कालावधीचे पीक आहे.
  • त्यामुळे जास्त अंतर मशागतीची गरज मेथीला भासत नाही.
  • पण मेथी या पिकामध्ये तन नियोजन करणे गरजेचे ठरते.
  • लागवडीनंतर 15 ते 20 दिवसाच्या नंतर पहिले खुरपणी करून घ्यावी.
  • मेथीच्या पिकामध्ये तन वाढू देऊ नये. त्यामुळे उत्पादनामध्ये घट येऊ शकते.

महत्वाच्या किडी आणि रोग

किडी :

1.मावा :

मेथीच्या पिकावर मावा या किडीचे प्रादुर्भाव होतो .मावा हे लहान कीटक असतात, जे मेथीच्या रोपामधून सर्व अन्न रस शोषून घेतात. त्यामुळे मेथीचे रोग कमकुवत होते. मावा ही कीड स्वतःच्या शरीरामधून एक चिकट गोड पदार्थच स्त्रावते .त्या पदार्थावर मोठ्या प्रमाणावर काळी बुरशी आकर्षित होते. त्यामुळे पूर्ण पीक काळी बुरशीमुळे झाकले जाते. त्याचा अनिष्ट परिणाम प्रकाश संश्लेषण या क्रियेवर होतो आणि ती क्रिया मंदावते. त्यामुळे पीक पूर्णपणे कमकुवत होते आणि उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होते. या किडीला नियंत्रण करण्यासाठी शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा. मेथी सोबत शेतामध्ये झेंडू देखील लावावे आणि जैविक कीटकनाशकांची फवारणी देखील करावी.

2. पाने खाणारी अळी :

ही अळी पानावरील रस शोषून घेते आणि वेडी वाकडे पानांमधून पुढे पुढे जाते. त्यामुळे पानावर पांढऱ्या रंगाच्या अनियमित वेड्यावाकड्या रेषा दिसू लागतात. त्यामुळे रोपाची प्रत खराब होते. या किडीच्या नियंत्रणासाठी पीक लहान अवस्थेमध्ये असतानाच पिकावर निंबोळी अर्काची फवारणी करावी.

रोग

1.मर रोग :

मेथीच्या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकांची फेरपालट करावी. पाण्याचा उत्तम निचरा व्हावा, असे नियोजन करावे. दाट पेरणी करू नये, पिकाला नियमित पाणी द्यावे, शेतामध्ये स्वच्छता राखावी. या रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यावर जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

इतर रोग :

मेथीच्या पिकावर इतर काही जसे मूळकुझ,पानावरील ठिपके, केवढा ,तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. यासाठी जमिनीची चांगली मशागत करणे ,जमिनी उन्हामध्ये चांगली तापवून देणे ,योग्य अंतरावर बिया लावणे, पाण्याचे उत्तम नियोजन करणे ,पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणे. जैविक बुरशीनाशकांची फवारणी करणे गरजेचे असते.

काढणी आणि उत्पादन

  • मेथीचे उत्पादन पेरल्यानंतर 30 ते 35 दिवसांमध्ये तयार होते.
  • मेथीची काढणी करत असताना संपूर्ण रोपटे मुळापासून उपटून काढले जाते किंवा जमिनीलगत खुडून घेतली जाते.
  • मेथीच्या पिकाचा खोडवा दोन ते तीन वेळा जास्तीत जास्त घेता येतो.
  • पण कसुरी मेथी मध्ये खोडवे जास्त निघतात.
  • प्रामुख्याने हिवाळ्यामध्ये खोडवा घेणे शक्य होत नाही.
  • काही वेळा दोन ते तीन खोडवे घेतल्यानंतर पिक बियांसाठी ठेवले जाते.
  • मेथीचे पाने तजेलदार असतानाच आणि फुले येण्यापूर्वी काढणी करून घ्यावी.
  • काढणीच्या दोन ते तीन दिवसाच्या आधी पाणी दिल्यास काढणी करणे सोयीस्कर होते आणि पाने देखील ताजी राहतात.
  • काढणीनंतर मेथीच्या योग्य आकाराच्या जोड्या बांधाव्या आणि कापडामध्ये किंवा जाळीदार पिशवीमध्ये जोड्या व्यवस्थित रचून बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवून द्याव्या.
  • मेथीचे उत्पादन काढण्याच्या पद्धतीनुसार हेक्टरी 7 ते 8 टन इतके मिळू शकते.
  • कसुरी मेथीचे उत्पादन मात्र हेक्टरी 9 ते 10 टन पर्यंत मिळते.
  • पीक बियाण्यांसाठी ठेवल्यावर साध्या मेथीचे हेक्टरी 1 ते 1.5 टन पर्यंत उत्पन्न मिळते आणि कसुरी मेथीचे ते 600 ते 700 किलो बियाणे एवढं उत्पन्न मिळते.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/vegetables

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *