कारली लागवड
कारल्याची लागवड हे महाराष्ट्र मध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. कारल्याला देशात आणि विदेशात दोन्ही जागी खूप मागणी असल्याचे दिसते. कारल्यापासून लोणचे आणि भाजी बनवली जाते. कारल्याची फळे आणि पानांमध्ये देखील औषधी गुणधर्म असलेले दिसतात. रक्तदोष दूर करण्यासाठी कारल्याचा रस वापरला जातो. पोटाच्या विकारावर कारल्याचा उपयोग होऊ शकतो.
मधुमेह आणि दम्यासाठी देखील कारले गुणकारी ठरते करल्यामध्ये जीवनसत्वे आणि लोह सर्व वेलवर्गीय भाज्यांपेक्षा जास्त असते. तसेच कारल्यामध्ये चुना, शिष्टमय पदार्थ, तसेच प्रोटीन, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम ही खनिजे असतात. कारल्याच्या बियांपासून तेल काढले जाते. त्याचे तेल वास रहित असते आणि त्याचा उपयोग खाण्यासाठी केला जातो.
ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे, अशा व्यक्तींसाठी कारले उपयोगी ठरते. कारल्याचा ज्यूस पिल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण राहते. कारल्याचा ज्यूस पिल्यामुळे पोटाची पचनक्रिया चांगली होते आणि भूक देखील वाढायला मदत होते. कारल्याच्या ज्यूस चे सेवन केल्यामुळे कॅन्सर सारखे रोग यांचा धोका कमी होतो.
कार्ले डोळ्यासाठी सुद्धा चांगले असते. कारले खाल्ल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते. कारल्यामध्ये अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम दूर होण्यासाठी मदत होते. कारले खाल्ल्यामुळे रक्त शुद्धीकरण होते आणि विटामिन सी देखील कारल्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असते. कारल्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण देखील मुबलक प्रमाणामध्ये असते. त्यामुळे शरीरामधील रक्तदाब नियंत्रण होते.
लागणारी जमीन :
कारल्याची लागवड करण्यासाठी जमीन निवडताना पाण्याचा उत्तम निचरा होणारी निवडावे ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ जास्त असतात. अशा जमिनीमध्ये कारल्याची लागवड चांगली होते.
कारल्याची लागवड आपण हलक्या रेताड जमिनींपासून मध्यम भारी जमिनीमध्ये यशस्वीरित्या करू शकतो. ज्या जमिनीचा सामू सहा ते सातच्या दरम्यान असतो. अशा जमिनीमध्ये कारल्याची लागवड उत्तम ठरते.
लागणारे हवामान :
कारल्यासाठी उष्ण आणि दमट हवामान चांगले ठरते. कारल्यामध्ये जर सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामान जास्त असेल तर नर फुलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते.
कारल्याच्या वेलीच्या वाढीसाठी आणि फळांचे उत्पादनासाठी 24 ते 27 अंश सेल्सिअस तापमान पोषक ठरते. कारल्याच्या लागवडीसाठी आद्रताचे प्रमाण जास्त असल्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये झालेला दिसतो.
सुधारीत जाती :
1. मोनिका :
ही कारल्याची एक संकरित जात आहे. लागवड केल्यानंतर सरासरी 50 ते 55 दिवसांमध्ये पीक परिपक्व होते. या जातीच्या फळाची लांबी 15 सेंटीमीटर ते 18 सेंटीमीटर पर्यंत असते. या जातीच्या फळाचे वजन 120 ग्राम पर्यंत असते. या जातीच्या फळांचा रंग गडद हिरवा असतो.
2. अमनश्री :
ही जात देखील लागवड केल्यानंतर सरासरी 50 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार झालेली दिसते.
या जातीच्या फळांची लांबी 22 ते 24 सेंटीमीटर पर्यंत असते आणि फळांचा रंग हा गडद हिरवा असतो. ही कारल्याची संकरित जात आहे आणि या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात.
3. अस्मिता ( सिंजेंता ) :
ही देखील कारल्याची संकरित जात आहे. या जातीची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. ही जात प्रत्येक हंगामामध्ये येते. या जातीच्या फळांना परिपक्व होण्यासाठी सरासरी 50 ते 60 दिवसांचा कालावधी जातो.
या जातीच्या एका फळाचे वजन 130 ते 140 ग्राम पर्यंत असून एकेरी 600 ते 700 ग्राम एवढे बियाणे वापरले जातात.
4. S W – 811 :
कारल्याची संकरित जात असून शेतकरी मोठ्या प्रमाणावर या जातीची लागवड करतात. लागवड केल्यानंतर फक्त 55 ते 60 दिवसांमध्ये या जातीची फळे काढण्यासाठी तयार होतात.
या जातीच्या फळांचा वजन 150 ग्राम पर्यंत असते आणि लांबीला फळे 18 ते 20 सेंटीमीटर पर्यंत असतात.
5. नूर एफ 1 :
ही देखील कारल्याची संकरित जात आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. या जातीच्या फळांचे वजन 140 ग्रॅम पर्यंत असते आणि लागवड केल्यानंतर सरासरी 50 दिवसांमध्ये या फळांची काढणी केली जाते. या जातीच्या फळांची लांबी सरासरी 19 ते 20 सेंटीमीटर पर्यंत असते.
6. पुसा दो मोसमी :
कारल्याची ही जात लागवड केल्यानंतर सरासरी 55 ते 60 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होते. या जातीच्या फळांचा रंग हिरवा असतो आणि फळे वजनाला जास्त असतात आणि लांबीला देखील जास्त असतात.
7. अर्का हरित :
जातीच्या कारल्याचा आकार मध्यम लहान असतो आणि मध्यभागी ही कारली फुगीर असतात आणि रंगाने हिरवीगार असतात, दिसायला आकर्षक असतात. या जातीच्या फळांमध्ये बियाणांचे प्रमाण अल्प असते.
8. पुसा विशेष :
या कारल्याची लागवड नदीकाठच्या जमिनीवर म्हणजेच गाळाच्या मातीमध्ये चांगली होते. या जातीची लागवड उन्हाळ्यामध्ये केल्यावर उत्पादन चांगले मिळते. या जातीच्या करल्याचा रंग हिरवा गार असतो आणि कारले दिसण्यासाठी आकर्षक असतात.
लागवड :
लागवडीसाठी निवडलेली जमीन हे नांगरून घ्यावी .सर्व ढेकळे फोडून शेतामधील तन आणि काडीकचरा बाजूला करावा. त्यानंतर जमीन सपाट करून घ्यावे. कोळपे च्या साह्याने जमिनीमध्ये शेणखत मिसळून घ्यावे. कारल्याची लागवड ही मंडप किंवा तारकाटी पद्धतीने केली जाते.
त्यासाठी दीड ते एक मीटर अंतर ठेवावे आणि प्रत्येक ठिकाणी तीन ते चार बिया लावून पाणी सोडावे. कारल्याच्या लागवडीसाठी हेक्टरी 2-2.5 किलो बियाणे पुरेसे ठरते.
खत आणि पाणी नियोजन :
कारल्यासाठी जमीन तयार करत असताना चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे. ठिबक💧 सिंचनाचा वापर केल्यास आठवड्यातून एकदा जीवामृत सोडावे.
जीवामृत सोडल्यामुळे जमिनीत भुसभुशीत होते आणि उत्पन्न देखील वाढते. कारल्याला खरीप हंगामामध्ये पाण्याची गरज भासत नाही. तरीही गरज भासल्यास पाणी 💧 द्यावे.
उन्हाळ्यामध्ये चार ते सहा दिवसांच्या अंतराने पाणी देणे गरजेचे असते. फळ वाढण्याच्या काळामध्ये पाण्याचा ताण पडू नये याची योग्य काळजी घ्यावी.
आंतरमशागत :
कारल्याची लागवड केल्यानंतर कारल्याचे शेत पूर्णपणे वेळोवेळी तण काढून तनविरही ठेवावे आणि जमीन भुसभुशीत करावी. कारल्याच्या वेलींना वाढीसाठी आधाराची गरज असते. त्यासाठी बांबूचा किंवा तारेचा मांडव करून आधार दिल्याने उत्पादनामध्ये चांगली वाढ होते.
कारल्याची लागवड करताना शक्यतो शेतकरी मांडव घालतात त्यामुळे कारल्याचे उत्पन्न जास्त येते. कारल्याच्या लागवडीमध्ये शेत तन विरहित ठेवणे खूप गरजेचे असते.
कारण तन शेतामध्ये असल्यावर वेगवेगळ्या रोगांचा आणि किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. कारण अनेक किडी तनावर त्याचा उदरनिर्वाह करत असतात.
महत्वाच्या किडी आणि रोग :
1.फळमाशी :
कारल्यामधील फळ माशी ही फुलांमध्ये अंडी देते. अंड्यातून आळी बाहेर आल्यानंतर फळातील गर खात असते अशी फळे गळून पडतात.
ज्या ठिकाणी मादी माशी ने छिद्र पडलेले असतात अशा ठिकाणी रोगकारक घटकांचा शिरकाव झालेला दिसतो.
त्यामुळे पूर्ण फळ सडून गळून पडते. काही फळे प्रादुर्भाव झालेले असून बाहेरून चांगले दिसतात पण आतून पूर्णपणे सडलेले असतात. या किडीचे नियोजन करण्यासाठी पीक काढल्यानंतर खोल नांगरणी करावी.
असे केल्यामुळे सूर्य प्रकाशामुळे कोश अवस्थांमध्ये असलेले अळ्या नष्ट होतात. शेतामध्ये नर माशी आकर्षित करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
2.रसशोषक किडी :
कारल्यावर फुलकिडे, मावा, पांढरी माशी, या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या किडी मोठ्या प्रमाणावर कारल्याच्या वेली मधून रस शोषतात.
त्यामुळे वेलीची पाने वाकडे तिकडे होतात आणि ह्या किडीमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार वेलीमध्ये होतो.
या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांचा फवारा घ्यावा आणि चिकट सापळ्यांचा वापर करा.
नाग अळी : ही कीड पानाच्या शिरांच्या आतील भाग खाते आणि त्यामुळे पानांवर नाग मोडी वळणे असलेले दिसतात या किडीपासून 10 टक्के ते 80 टक्के नुकसान होऊ शकते.
या किडीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त पाने झाडावरून काढून टाकावी आणि जैविक कीटक नाशकांची फवारणी घ्यावी.
रोग :
1. केवडा :
या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये पानाच्या वरच्या बाजूला फिकट हिरव्या रंगाचे पिवळसर दाग दिसतात.
ज्यावेळी वातावरण ढगाळ होते अशा वातावरणामध्ये ठिपक्यांच्या खालच्या बाजूला जांभळ्या रंगाची बुरशीची वाढ होते.
नंतर हे डाग पांढरे काळे किंवा राखाडी झालेले दिसतात. या रोगाला डावणी मिल्डू देखील म्हणले जाते.
या रोगावर नियंत्रण करण्या साठी रोगट पाने काढून टाकावे आणि नष्ट करावे आणि जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.
2. डींक्या रोग :
प्रादुर्भाव झाल्यानंतर वेलींच्या काड्यांच्या भागांमधून तपकिरी रंगाचा डिंकासारखा द्रव बाहेर येतो आणि वेळेनुसार त्याचा रंग काळा होतो.
जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झाल्यावर फळे आणि खोडावर चिरा पडलेला दिसतात.
त्यामुळे वेल पूर्णपणे वाळतो आणि कारल्याची फळे स. या रोगाचा प्रादुर्भाव बियाणे आणि जमिनीमधून होतो.
यासाठी या रोगाचे प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी आणि बीज प्रक्रिया करून बियाणे लावावे.
3. भुरी :
सर्व वेलवर्गीय पिकांमध्ये भुरि या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पाण्याच्या दोन्ही पृष्ठभागावर पिठासारखे पांढरे बुरशी वाढलेले दिसते.
या रोगाच्या प्रादुर्भाव जास्त वाढल्यानंतर पूर्ण झाडावर ती बुरशी पसरते.
त्यामुळे पूर्णपणे झाड कमकुवत बनते आणि उत्पादनामध्ये घट होते. या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.
काढणी आणि उत्पादन :
कारल्याची काढणी कारली जुन होण्यापूर्वीच करावी लागते. कोवळ्या फळाला बाजारामध्ये जास्त मागणी असते. काढणीला उशीर झाल्यानंतर फळे पक्व होतात आणि बी गळून पडतात. त्यामुळे उत्पादनामध्ये घट होते. म्हणून काढणी वेळेवर करणे गरजेचे असते. कारल्याची काढणी ही हातानेच केले जाते. कारल्याचे उत्पादन प्रत्येक जातीनुसार वेगवेगळे येते सरासरी कारल्याचे उत्पादन 20 ते 25 टनापर्यंत मिळते. कारल्याचे उत्पन्न लागवडीचे वेळी असणारे हवामान, जमिनीच्या मगदूराप्रमाणे आणि जातीनुसार बदलते.
Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi