गुलाबाची लागवड मोट्या प्रमाणात naturekrushi

गुलाबाची लागवड मोट्या प्रमाणात

Blog फूल

गुलाबाची लागवड

गुलाबाची लागवड मोट्या प्रमाणात: गुलाब हे सर्व व्यापारी फुल पिकातील महत्त्वाचे पीक आहे. गुलाब हे जगातील सर्वात लोकप्रिय फुलांपैकी एक असून त्याचे अल्पकालीन सौंदर्य आणि नाजूक सुगंध सर्वांना आकर्षित करतो. गुलाबाची लागवड मोट्या प्रमाणात: गुलाब विविध पर्यावरणीय परिस्थितीमध्ये उत्तम प्रकारे येतो. शोभिवंत वनस्पती म्हणून उपयुक्त असून कापलेल्या फुलांना देखील चांगले महत्व बाजारामध्ये आहे. गुलाबाला असाधारण महत्व प्राप्त आहे. 

गुलाबाची लागवड मोट्या प्रमाणात गुलाबाचा वापर देवळामध्ये, डेकोरेशन साठी, सौंदर्यप्रसाधनांमध्ये, अंतिम क्रिया, अशा सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. गुलाबापासून तेल निर्मिती देखील केली जाते आणि गुलाब जल देखील बनवले जाते. ज्याचा वापर मोठ्या प्रमाणावर सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. गुलाबामध्ये अनेक प्रकारचे रंग, आकार असल्यामुळे आपण वेगवेगळया वाणांची लागवड करून चांगला नफा मिळवू शकतो.गुलाबामध्ये बरेच वाण प्रचलित आहेत. गुलाब लागवड करण्यासाठी संपूर्ण तंत्रज्ञान खालील प्रमाणे दिलेले आहे. गुलाब लागवड केल्यामुळे शेतकऱ्याला नक्कीच नफा होतो.

लागणारे हवामान :

  • गुलाब या पिकाला थंड आणि कोरडे हवामान चांगले मानवते.
  • स्वच्छ हवा, भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम तापमानांमध्ये गुलाबाची वाढ चांगली होते.
  • पंधरा ते वीस अंश सेल्सिअस तापमानामध्ये गुलाबाची वाढ झाल्यावर उत्पादन चांगले येते.
  • हवेतील सापेक्ष आद्रता 60 ते 65 असावी. समुद्रसपाटीपासून 4000 मीटर उंचीपर्यंत गुलाबाची लागवड चांगली होते.

लागणारी जमीन :

  • गुलाब हे जास्त काळापर्यंत उत्पन्न देते.
  • त्यामुळे काळजीपूर्वक गुलाबासाठी जमीन निवडावी.
  • ज्या जमिनीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा होतो, भरपूर सेंद्रिय पदार्थ असतात, अशी जमीन गुलाबासाठी निवडावी.
  • जमिनीची खोली एक मीटर ⬇ असावी.
  • जमिनीचा सामू 5 ते 7.5 या दरम्यान असल्यावर जमीन लागवडीसाठी योग्य असते.
  • चुनखडीयुक्त, क्षारयुक्त, कठीण खडकाच्या जमिनी गुलाब लागवडीसाठी मानवत नाहीत अशा जमिनीमध्ये लागवड करणे टाळावे.

पुर्व मशागत :

  • गुलाब लागवडीसाठी जमिनीची उभी – आडवी खोल नांगरणी करून घ्यावी.
  • त्यानंतर सर्व ढेकळे फोडून कुळवणी करावी.
  • जमीन तण विरहित करून घ्यावी आणि योग्य अंतरावर खड्डे पाडून घ्यावेत.
  • गुलाबाची लागवड खड्डे पाडून किंवा चर काढून केली जाते.
  • गुलाबाची लागवड खड्डे पाडून किंवा चर काढून केली जाते.
  • खड्डे अथवा चराचा आकार जमिनीच्या प्रकार व गुलाबाच्या जातींवर अवलंबून असतो.
  • खड्ड्याचा आकार उन्हाळ्यामध्ये 50 × 50 × 50 सेंटीमीटर (लांबी, रुंदी ,खोली) आणि चराचा आकार 45 × 45 सेंटिमीटर (रुंदी आणि खोली) असतो.

अभिवृद्धी :

  • गुलाबाची अभिवृद्धी छाट कलम, गुटी कलम, डोळे भरून केली जाते.
  • जास्त करून डोळे भरून या पद्धतीने गुलाबाची अभिवृद्धी केली जाते.
  • अभिरुद्धीसाठी खुंट रोप तयार करून त्यावर डोळा भरला जातो.

T” पद्धतीने डोळा भरणे :

  • पावसाळी हंगामामध्ये खुंट रोपांची पॉलिथिनच्या पिशवीमध्ये लागवड केली जाते.
  • खुंट रोपांची चांगली वाढ झाल्यानंतर ज्या जातीचा डोळा भरावयाचा आहे.
  • त्या काडीवरील T आकारचा डोळा काळजीपूर्वक काढला जातो.
  • खुंट रोपावर याच टी आकाराची खाची पाडून त्यामध्ये भरला जातो.
  • प्लास्टिकच्या पट्टीच्या साह्याने डोळा खुंट रोपाशी घट्ट बांधल्यानंतर एका महिन्यांमध्ये डोळा व फांदी कलम एक होऊन फूट होऊ लागते.
  • मात्र या दरम्यान खुंट रोपावर येणारे कोवळी फुट काढून टाकावी.
  • चांगली वाढ झाल्यानंतर रोप शेतात किंवा बागेत लावून घ्यावे.

लागवडीचे अंतर :

  • गुलाबाची लागवड वेगवेगळ्या अंतरावर केली जाते.
  • परंतु जमिनीचा प्रकार, जातीची निवड, मशागतीची पद्धत यानुसार पुढील अंतरावर लागवड करता येते.
  • खड्ड्यात 1 मी.× 1 मी. व 1.5 मी × 1.0 मी. वर लागवड केली जाते.
  • चरा मध्ये 1.5 मी.× 6.6 मी अंतरावर लागवड केली जाते.

खड्डे भरणे आणि लागवडीची वेळ :

  • गुलाबासाठी खड्डे मातीचे चांगले मिश्रण तयार करून भरले जातात.
  • योग्य प्रतीच्या गार्डन मिक्स तयार केल्यास झाडांची वाढ चांगली व्हायला मदत होते.
  • मिक्सचर मध्ये खड्ड्यातून निघालेली माती, शेणखत, सेंद्रिय खतांचा वापर करावा.
  • खड्डे पावसाळ्यापूर्वी भरून घ्यावे.
  • गुलाबाची लागवड वर्षभरात कधीही करता येते.
  • परंतु लागवड करताना काही गोष्टी विचारात असाव्यात.
  • कमी पर्जन्यमानाच्या भागांमध्ये जून ते जुलै महिन्यामध्ये लागवड करावे.
  • जास्त पाऊस पडून पाणी साचत असल्यास ऑगस्ट ते सप्टेंबर या दरम्यान लागवड करावी.
  • महाराष्ट्र मधील हवामानाचा विचार केल्यावर जून ऑक्टोबर व जानेवारी महिन्यांमधील कालावधी लागवडीसाठी योग्य ठरतो.

लागवड :

  • गुलाबाची लागवड ही दोन पद्धतीने केली जाते.
  • पहिल्या पद्धतीमध्ये निवडलेल्या अंतरावर कलमांची रोपे लावली जातात.
  • दुसऱ्या पद्धतीमध्ये अगोदर लागवडीच्या जागी खुंट लावून त्यावर हव्या त्या जातीचा डोळा भरला जातो.

आंतर मशागत :

  • गुलाब हे बहुवर्षीय पीक असल्यामुळे सहा ते दहा वर्षे शेतामध्ये राहते.
  • त्यामुळे अंतर्मशागत करणे गरजेचे असते.
  • आंतरमशागत वेळेवर केल्यामुळे उत्पादनामध्ये भर होते व गुणवत्ता देखील चांगली राहते.
  • खुरपणी, मातीची भर, खुंट रोगावरील फुटवे काढणे इत्यादी गोष्टींचा समावेश अंतर्मशागतीमध्ये होतो.
  • लागवड पासूनच शेत खुरपून स्वच्छ ठेवावी.
  • हराळी सारख्या प्रकारची तण एकदा वाढली तर नियंत्रण करणे अवघड जाते.
  • त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्येच यांचा नायनाट करावा.
  • गुलाबाच्या चांगल्या वाढीसाठी पुढील पद्धती वापरल्या जातात.

1.डी – सकरींग :

डोळा भरल्यानंतर खुंट रोपावर येणारे फुटवे काढण्याच्या क्रियेला डी – सकरींग म्हणतात. कोवळीफूट वेळेतच काढावी लागते कारण ती फूट डोळे भरलेल्या फांदीच्या वाडीवर परिणाम करू शकते. डोळ्या भरल्यानंतर वर्षभर डी – सकरींग करणे गरजेचे असते.

2.पिंचींग :

वाडीच्या काळामध्ये टोकाकडील फांदीचा जोमाने वाढणारा थोडा भाग कापण्याच्या क्रियेला पिंचिंग असे म्हटले जाते. झाडाच्या योग्य व एकसारखा आकारआणण्यासाठी पिंचिंग करणे गरजेचे असते. लागवडीनंतर काही फांद्या जोमाने व उरलेल्या हळुवार वाढतात. जोमाने वाढणाऱ्या फांद्या टोकाकडे थोड्या प्रमाणामध्ये कापल्यानंतर त्यांची वाढ थांबते .आपोआप इतर फांद्यांना वाढीला संधी मिळते. यामुळे सर्व फांद्या एकसारख्या वाळून झाडाला व्यवस्थित आकार येतो. जास्त प्रमाणामध्ये फांद्या वाढल्यामुळे त्यावर फुलांची संख्या देखील वाढते.

3. डिस – बडींग :

गुलाबावरील लहान फुले व कळ्या काढण्याच्या क्रियेला डिस बडींग असे म्हटले जाते. झाडावर भरपूर फुले आल्यानंतर झाड सगळ्या कळ्यांना पोसू शकत नाही. त्यामुळे त्यांचा आकार लहान राहतो ,या उलट मर्यादित फुले झाडावर असल्यावर फुलांचा दर्जा चांगला राहतो. म्हणून डिस – बडींग करणे देखील गरजेचे असते.

4. मलचींग :

पालापाचोळा किंवा प्लास्टिकचे कागद याने दोन रोपांमधील जमीन झाकण्याच्या क्रियेला मल्चिंग (आच्छादन)असे म्हणतात. जमिनीमधील ओलावा टिकवून तणांची वाढ रोखण्यासाठी आच्छादन केले जाते. आच्छादनासाठी वाळलेले गवत पालापाचोळा किंवा काळ्या पॉलिथिन कागदाचा वापर केला जातो. अच्छादन हे पावसाळ्यामध्ये तणांची वाढ रोखते आणि उन्हाळ्यामध्ये मातीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत करते.

5 . छाटणी :

फुलांची संख्या वाढवण्यासाठी फांदीचा काही भाग काढण्याच्या क्रियेला छाटणी असे म्हटले जाते. गुलाबाला नवीन वाढीवर फुले येतात, जुन्या फांद्यांवर फुले येत नाहीत. त्यासाठी छाटणी करणे गरजेचे असते. छाटणी केल्यामुळे नवीन फांद्यांची संख्या मर्यादित राहण्यासाठी मदत होते. फांद्यांची गर्दी वाढल्यानंतर झाडांचा आकार बिघडला जातो. छाटणीत जोरदार वाडीच्या निरोगी फांद्या ठेवल्या जातात. बारीक ,कमजोर, रोगग्रस्त व कीडग्रस्त वाळलेल्या अयोग्य दिशे मध्ये वाढणाऱ्या फांद्या काढून टाकल्या जातात.

पाणी पुरवठा :

  • गुलाब या पिकाला पाणी देणे गरजेचे असते.
  • जमिनीचा प्रकार, हंगाम, वाढीच्या अवस्थेवर, पाणी देण्याचे प्रमाण ठरलेले असते.
  • भारी जमिनीमध्ये जास्त अंतराने तर हलक्या जमिनीमध्ये कमी अंतराने पाणी दिले जाते.
  • झाडे फुलधारणाच्या अवस्थेमध्ये असताना पाण्याची कमतरता होऊ नये याची योग्य काळजी घ्यावी.
  • हंगामाचा विचार केल्यावर पावसाळी हंगामामध्ये 15 ते 20 दिवसाच्या अंतराने तर उन्हाळी हंगामामध्ये आठ ते दहा दिवसांच्या अंतराने गुलाबाच्या झाडांना पाणी द्यावे.
  • ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन या पद्धतीने पीक चांगला प्रतिसाद देते.
  • या पद्धतीने पाण्याचे नियोजन केल्याने पाण्याची चांगल्या प्रकारे बचत होते आणि तणांचा देखील प्रादुर्भाव कमी आढळतो.

फुलांची तोडणी, प्रतवारी व उत्पन्न :

  • गुलाबाची लागवड केल्यानंतर साधारणपणे सहा महिन्यानंतर पुढे लागण्यासाठी सुरुवात होते.
  • सुरुवातीच्या काळामध्ये फुलांची संख्या कमी असते.
  • परंतु एका वर्षानंतर भरपूर आणि नियमित प्रकारे फुले येण्याला सुरुवात होते.
  • फुलांच्या बाहेरील एक ते दोन पाकळ्या उमरल्यानंतर त्यांची तोडणी केली जाते.
  • फुलांच्या वापरावरून तोडणी करायचे वेगवेगळे प्रकार असतात.
  • हार, अत्तरे तयार करण्यासाठी तसेच देवाला वाहण्यासाठी पूर्ण उमललेली फुले तोडावी.
  • अशी फुले उघड्या टोपलीमध्ये गोळा केली जातात.
  • फुलदाणी करण्यासाठी 15 ते 60 सेंटीमीटर लांबीची देठ ठेवून फुले तोडावीत.
  • निरोगी डोळ्यांच्या वरील बाजूस देठावर धारदार चाकूने कट द्यावा.
  • गुलाबाची तोडणी नेहमी सूर्योदयापूर्वी अथवा सूर्यास्ताच्या वेळी केली जाते.
  • त्यामुळे उन्हामुळे होणारे फुलांचे नुकसान आपण टाळू शकतो.
  • उशिरा तोडणी केल्यामुळे फुल दांडी व फुलांचे आयुष्य कमी होते.
  • अत्तर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी फुले उशिरा तोडल्यानंतर सुगंधी द्रव्याचे प्रमाण देखील कमी होते.
  • तोडणी झाल्यानंतर सर्व फुले सावलीमध्ये ठेवावी.

प्रतवारी :

  • तोडणी केल्यानंतर सावलीमध्ये ठेवलेला फुलांचे प्रतवारी केली जाते.
  • सुकलेली व खराब फुले बाजूला काढावीत.
  • चांगल्या व निरोगी फुलांची देठाच्या लांबीनुसार प्रतवारी करून ठेवावी.
  • तसेच त्यांना बाजारात किंमत देखील जास्त मिळते.

उत्पन्न :

  • लागवडीनंतर सहा महिन्यांनी फुले काढण्यासाठी तयार होतात.
  • गुलाबाचे उत्पन्न निवडलेली जमीन, असणारे हवामान, जातींची निवड, आंतरमशागत, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव या सर्व गोष्टींवर अवलंबून असतो.
  • प्रतिवर्षी फुलांचे सरासरी एकरी 1.25 लाख फुले मिळतात.
  • दुसऱ्या वर्षापासून स्थिर उत्पादन मिळायला सुरुवात होते.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/flower

5/5 - (2 votes)