Cultivation of milk pumpkin naturekrushi.png

Dudhi Bhopla In Marathi

Blog भाजीपाला

Dudhi Bhopla / दुधी भोपळा लागवड :

Dudhi Bhopla In Marathi: उन्हाळ्यामध्ये जास्त मागणी असलेले पिक दुधी भोपळा आहे. या पिकाची लागवड आपण वर्षभर करू शकतो. अलीकडच्या काही दिवसांमध्ये संशोधन केल्यानंतर दुधी भोपळा हा हृदयरोग यावर संजीवनी ठरला आहे. त्यामुळे बाजारामध्ये या भाजीला खूप मागणी असते. दुधी भोपळ्याचा वापर आपण थालीपीठ, कोशिंबीर, पराठा, हलवा, सुप, अशा स्वरूपात करू शकतो. भोपळ्यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, तंतुमय वशिष्ठमय पदार्थ, खनिजे आद्रता, प्रथिने असे बरेच पोषक तत्वे असतात. दुधी भोपळ्याचा उष्मांक कमी असतो, त्यामुळे दुधी भोपळा हा हृदय रोगांसाठी चांगला असतो. हृदयविकारांमध्ये शक्यतो रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साठवून रक्तपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे अडथळा निर्माण झालेला दिसतो. यावर देखील दुधी भोपळ्याचा चांगला फायदा होतो.

दुधी भोपळ्यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते आणि कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी दुधी भोपळा संजीवनी ठरतो. स्थूल व्यक्तींनी रोजच्या आहारामध्ये दुधी भोपळ्याचे वापर करावे. दुधी भोपळ्याचा सूप करून प्यावा त्यामुळे शरीराचे वजन लवकर कमी होण्यास मदत होते. दुधी भोपळ्याच्या तेला पासून त्वचेच्या समस्या दूर होतात. ज्या व्यक्तींना मधुमेह असतो आणि अति तेलकट खाण्यामुळे तहान लागणे, आम्लपित्त, जुलाब, उष्णता, असे विकार असतील त्यांनी दुधी भोपळ्याच्या वापर खाण्यामध्ये करावा. त्यामुळे क्षार शरीराबाहेर जाण्यास मदत होते.

अति ताप असल्यावर दुधी भोपळ्याचा रस पिल्याने ती समस्या देखील दूर होते. दुधी भोपळ्याचे बी हे औषध म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी दुधी भोपळ्याच्या बियांचा वापर केला जातो. अति मेंदूचा ताण तणाव वाढल्यामुळे, डोकेदुखी असेल तर अशावेळी दुधी चा रस घेतलाने डोकेदुखी थांबते. उष्णता कमी करण्यासाठी दुधीचा रस खडीसाखर घालून पिल्यानंतर शरीराची उष्णता कमी होते. शरीरातील मुद्रामध्ये अति अमलाचे प्रमाण असेल तर दुधीमुळे जळजळ होणे थांबते.

ज्या व्यक्तींना तळपायांना भेगा पडतात. अशा व्यक्तींनी दुधी भोपळ्याचे तेल तळपायांना लावून झोपल्याने सर्व भेगा भरून येतात.

लागणारी जमीन:

  • भोपळ्याची लागवड ही महाराष्ट्र मधील सर्व विभागांमध्ये केले जाते आणि भोपळ्याची लागवड हलक्या ते भारी जमीन अशा सर्व जमिनीमध्ये करता येते.
  • भोपळ्यासाठी शक्यतो रेताड ते मध्य वालुकामय किंवा उत्तम निचऱ्याची जमीन निवडावे त्यामुळे उत्पादन वाढते.
  • ज्या जमिनीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा होतो आणि सेंद्रिय खत जास्त असते.
  • जमिनीचा सामू सारासरी 5.5 ते 7 पर्यंत असतो अशा जमिनीमध्ये भोपळ्याचे उत्पन्न जास्त येते.
  • हलक्या जमिनी मध्ये खते घालून आपण दुधी भोपळ्याचे चांगले उत्पादन घेऊ शकतो.

लागणारे हवामान :

  • भोपळ्याच्या पिकाला खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामांमध्ये जास्त उत्पादन घेऊ शकतो.
  • भोपळ्याच्या पिकाला जास्त उष्ण आणि दमट हवामाना चांगले मानवते.
  • थंडीच्या दिवसांमध्ये तीव्र थंडी आणि थंड वारे या पिकावर अनिष्ट परिणाम दाखवतात आणि पावसाच्या दिवसांमध्ये ढगाळ हवामान असल्यावर किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला दिसतो.

सुधारीत जाती :

1. पुसा मेघदूत :

भोपळ्याची ही जात संकरित जात आहे. या जातीच्या फळांचा रंग फिकट हिरवा असतो आणि या जातीपासून सरासरी 300 क्विंटल पर्यंत दुधी भोपळ्याचे उत्पादन मिळते.

2. पुसा समर प्रॉफिलीक लॉंग :

या जातीची सरासरी उत्पन्न 110 ते 120 क्विंटल हेक्टरी पर्यंत मिळते. त्यांची लांबी 45 ते 50 सेंटीमीटर लांब असून 25 ते 3 सेंटीमीटर गाडीला असते. फळांचा रंग हिरवा किंवा पिवळसर असतो.

3. पुसा नवीन:

या जातीच्या भोपळ्यांची काढणी लवकर केली जाते आणि एका फळाचे सरासरी वजन 800 ते 900 ग्राम पर्यंत भरते. या जातीपासून हेक्‍टरी 150 ते 170 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.

4. सम्राट :

भोपळ्याची ही जात महाराष्ट्र मधील महात्मा फुले कृषी विद्यापीठ या विद्यापीठाने विकसित केलेली आहे.

या जातीची फळे ही दंडगोलाकार आणि लांबीला असतात .या जातीच्या भोपळ्यांची लांबी सरासरी 30 ते 40 सेंटीमीटर पर्यंत असून रंग हिरवा असतो

जातीच्या फळे आपण निर्यात करू शकतो. कारण वाहतूक आणि पॅकिंगसाठी फळ सोयीस्कर असतात आणि एका हेक्टर मधून सरासरी 49 पर्यंत मिळते.

5. पंजाब कोमल :

या जातीच्या दुधी भोपळ्याचे वजन सरासरी एक ते दीड किलोपर्यंत भरते आणि फळाची लांबी 40 ते 45 सेंटीमीटर पर्यंत असते.

जातीपासून हेक्‍टरी 130 ते 140 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.

6. अर्का बहार :

दुधी भोपळ्याची ही जात उद्यान विद्या संशोधन केंद्र बेंगलोर मधून प्रसारित केलेली आहे .

या जातीच्या भोपळ्यांचा रंग फिकट हिरवा असतो आणि फळाचे वजन एका किलो पर्यंत वाढते. या जातीच्या भोपळ्यांचे सरासरी उत्पन्न 400 ते 500 क्विंटल हेक्टरी मिळते.

लागवड :

  • लागवड करायच्या वेळी निवडलेल्या जमिनीमध्ये नांगरट करावी आणि जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा घन जीवामृत मिसळून घ्यावे.
  • ढेकळे फोडून कोळप्याच्या दोन ते तीन पाया माराव्या आणि जमीन एकसारखे करून घ्यावे.
  • दुधी भोपळ्याची लागवड दोन पद्धतीने केली जाते.
  • एक मंडप पद्धतीने आणि दुसरी सरळ जमिनीवर लागवड करणे दुधी भोपळ्याची लागवड मंडप पद्धतीने करत असताना 3×1 मीटर या अंतरावर लागवड केली जाते आणि जमिनीवर लागवड करताना 2.5 × 1 मीटर या अंतरावर आणि तयार केले जातात.
  • प्रत्येकाळ्यामध्ये पाच ते सहा किलो आणि घन जीवामृत आणि पोयट्याची माती टाकली जाते आणि त्यानंतर तीन ते चार बिया प्रत्येक खड्ड्यांमध्ये लावल्या जातात.
  • बियाण्यांची पेरणी करण्याच्या वेळी बियाणे हे 24 ते 48 तास ओल्या कापडामध्ये बांधून ठेवावे.
  • त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते.
  • एका हेक्टर लागवडीसाठी सरासरी दोन ते अडीच किलो पर्यंत बियाणे पुरेसे होते.

खत आणि पाणी व्यवस्थापन :

  • लागवडीच्या वेळी जमीन तयार करत असताना आपण शेणखत घालत असतो.
  • त्यानंतर ठिबक सिंचनाचा वापर केल्यास दुधी भोपळ्याच्या वेलांना वेलींना घन जीवामृत सोडावे.
  • एकरी 200 लिटर एका आठवड्यातून जीवामृत सोडल्याने उत्पादनामध्ये चांगली भर होते.
  • रोजी भोपळ्याला पाण्याचे नियोजन जमिनीच्या मगदूराप्रमाणे करावी.
  • उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तीन ते चार दिवसाच्या अंतराने आणि रब्बी हंगामामध्ये आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • अंतर मशागत : लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये खुरप्याच्या सहाय्याने सर्व तण काढून टाकावे आणि आळे स्वच्छ ठेवावी.
  • दुधी भोपळ्याची उत्पादन घेण्यासाठी शेतकरी दुधी भोपळ्याच्या वेली मांडवावर चढवतात, त्यामुळे चांगले उत्पादन मिळते.

महत्वाच्या किडी आणि रोग :

किडी :

1.फळमाशी :

फळमाशी दुधी भोपळ्यातील जास्त नुकसान करणारी कीड आहे. या केडीच्या मादी फळाच्या साली खाली अंडी घालतात.

योग्य तापमान मिळाल्यानंतर ती अंडी फुटतात आणि फळाच्या आतील आळ्या फळाच्या आतील गाभा खाऊन मोठ्या होतात आणि परत फळ पोखरून खाली पडतात आणि मातीमध्ये कोष अवस्थेत मध्ये जातात.

त्यामुळे या किडीचे नियंत्रण करणे अवघड जाते. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर दुधी भोपळा पूर्णपणे आतून खराब होतो.

त्यामुळे उत्पन्नामध्ये कमी होते त्या किडीचे नियंत्रण करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा.

डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठने दिलेला रक्षक सापळा या किडीवर चांगला फायदेशीर ठरतो.

या सापळा मध्ये कामगंधाचा वापर केला जातो.

त्यामुळे किडीचे नर सापळ्याकडे आकर्षित होते आणि त्यामुळे नर आणि मादी माशीचा संपर्क येत नाही आणि मादी माशी अंडी न घातल्या मुळे काही प्रमाणामध्ये प्रादुर्भाव टाळला जातो. त्याचा वापर शेतामध्ये करावा.

एकरी शेतामध्ये 3-4 कामगंध सापळ्यांचा वापर करावा.

2. मावा :

मावा ही एक रसशोषक कीड आहे. या किडीची पिल्ले आणि प्रौढ दोन्ही वेलीच्या पानातून रस मोठ्या प्रमाणावर शोषतात. त्यामुळे प्रकाश संश्लेषण ची क्रिया मंदावते आणि पाने पिवळी पडतात.

मावा ही कीड स्वतःच्या शरीरामधून एक चिकट गोड पदार्थ स्त्रवते.

त्या चिकट गोड पदार्थावर काळी बुरशी आकर्षित होते त्यामुळे पूर्ण पान काळे पडते आणि प्रकाश संश्लेषण ची क्रिया बंद होते.

त्यामुळे झाड पूर्णपणे कमजोर होते आणि उत्पादन देखील कमी होते. या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी आणि शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा. एकरी वीस ते पंचवीस चिकट सापळे लावावे.

रोग :

करपा :

करपा हा एक बुरशीजन्य रोग आहे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर दुधी भोपळ्याच्या वेलाची पाने करपल्यासारखे दिसते.

सर्वप्रथम लहान काळपट रंगाची ठिपके पडलेल्या आपल्याला पानावर दिसतात त्यानंतर ते ठिपके वेळेनुसार मोठे होतात आणि पूर्ण पान करपलेले दिसते.

या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

काढणी आणि उत्पादन :

  • दुधी भोपळ्याची पूर्ण वाढलेली कोवळी फळे काढण्यासाठी तयार झालेली असतात.
  • सर्व साधारणपणे फळांना नखाने दाबल्यानंतर वर्ण दिसतात आणि फळांवर लव असताना फळे काढण्यासाठी तयार आहेत असे समजावे .
  • फळे देटा सहित वेगळी करून काढावी. काढणी उशिरा केल्यामुळे दुधी भोपळ्या मधील गर कोरडा होतो आणि बिया टनक होतात.
  • अशा दुधी भोपळ्यांना बाजारामध्ये कमी मागणी असते.
  • त्यामुळे वेळोवेळी दुधी भोपळ्याची काढणी करावी. वेगवेगळ्या जातीनुसार दुधी भोपळ्याचे उत्पन्न बदलते.
  • सरासरी दुधी भोपळ्याचे उत्पादन 40 ते 50 टन प्रती हेक्‍टरी पर्यंत मिळते.
  • दुधी भोपळ्याचे उत्पादन लागवडीच्या वेळी असलेल्या हवामान आणि होणाऱ्या वातावरणामध्ये बदल यावर सुद्धा दुधी भोपळ्याचे उत्पन्न अवलंबून असते.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/vegetables

5/5 - (2 votes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *