Cultivation-of-Dodka-naturekrushi.jpg

Dodka Lagwad In Marathi

Blog भाजीपाला

Dodka Lagwad / दोडका लागवड

Dodka Lagwad In Marathi: दोडका हा लवकर परिपक्व होणारा भाजीपाला आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना कमी काळामध्ये जास्त उत्पन्न मिळते आणि त्यांचा नफा होतो .दोडक्याची लागवड महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये केली जाते. दोडक्याच्या कोवळ्या फळांची भाजी केली जाते. डोक्यामध्ये अ, ब आणि क ही जीवनसत्वे आणि लोह भरपूर प्रमाणामध्ये आढळते. दोडक्यामध्ये विटामिन ए चे प्रमाण चांगले असते. त्यामुळे डोळे चांगले राहण्यासाठी मदत होते. आपण आहारामध्ये दोडक्याचा समावेश केला तर डोळे नेहमी आरोग्यदायी राहतात.दोडक्यामध्ये काकडी सारखे पाण्याचे प्रमाण जास्त असते. या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण देखील जास्त जेणेकरून पोट साफ होण्यासाठी मदत होते.

वेळोवेळी पोट साफ झाल्यामुळे आरोग्य निरोगी राहते आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे लवकर पोट भरते आणि जास्त खाणाऱ्या सवयी पासून आपण लांब राहतो आणि लठ्ठपणा दूर होतो. दोडक्याच्या भाजी मध्ये ग्लासेमिक इंडेक्स कमी असते .त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण राहण्यासाठी दोडका मदत करतो. ज्या व्यक्तींना शुगर असते. अशा व्यक्तींसाठी दोडका फायदेशीर ठरतो .ज्या व्यक्तींना शरीरामध्ये रक्ताची कमतरता असते, अशा व्यक्तींनी आहारामध्ये जास्त करून खाल्ला पाहिजे. दोडक्यामध्ये लोह आणि विटामिन बी 6 असते. हा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करतो त्यामुळे रक्ताची कमतरता भरून निघते.

लागणारी जमीन :

  • दोडका लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भुसभुशीत जमीन निवडावी.
  • दोडक्याची आपण हलक्या रेताड ते मध्यम भारी जमिनीमध्ये सुद्धा करू शकतो.
  • ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ भरपूर असतात.
  • अशा जमिनीमध्ये दोडक्याचे उत्पन्न चांगले येते मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये खतांचा नियोजन करून आपण दोडक्याची लागवड घेऊ शकतो.
  • चोपन जमिनींमध्ये दोडक्याची लागवड करू नये.

लागणारे हवामान :

  • दोडका लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामान वाढीसाठी पोषक असते.
  • दोडका लागवडीसाठी 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान योग्य ठरते.
  • ज्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असते अशा भागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
  • जास्त प्रमाणामध्ये थंडी देखील दोडक्याच्या लागवडीसाठी चांगली ठरत नाही.

दोडकाच्या जाती

1. सरपुटिया :

या जातीची लागवड मैदानी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर केलेली जाते. या जातीच्या दोडके गुच्छ लागलेले दिसतात. या जातींच्या दोडक्यावर उंच पट्टे असतात. या जातीच्या दोडक्यांची साल हे इतर जातींच्या डोक्यांपेक्षा जाड आणि मजबूत असते आणि लांबी देखील इतर जाती पेक्षा मोठी असतात.

2. पुसा नसदार :

हे देखील दोडक्याची एक सुधारित जात आहे. या जातीच्या दोडक्यांपासून सरासरी 70 ते 80 क्विंटल एकरी उत्पादन मिळते.

या जातीचे दोडके बारा ते वीस सेंटीमीटर लांब असतात. या जातीच्या दोडक्यावर फुगलेल्या नसासारखा आकार असतो आणि या जातीच्या आतला भाग पांढरा आणि हिरव्या रंगाचा असतो. या जातीच्या दोडक्यांचा रंग हलका हिरवा असतो .दोडक्याच्या या जातीचे उत्पादन चांगले लक्षणीय मानले जाते.

3. घीया :

या जातीच्या दोडक्यांचा रंग हिरवा असतो. ही एक दोडक्याची सुधारित जात आहे. या जातीची लागवड भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते .या जातीच्या दोडक्यांची साल ही पातळ असते आणि जीवनसत्वाचे प्रमाण देखील चांगले असते आणि या दोडक्याचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते.

4. पी .के. एम – वन:

ही दोडक्याची सर्वात उत्तम मानली जाणारी जात म्हणजे पी के एम : वन ही जात आहे.

या जातीची दोडके दिसायला खूप आकर्षक असतात आणि चवीला देखील भरपूर चविष्ट असतात. या जातीच्या दोडक्यांपासून सरासरी 280 ते 300 क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन मिळते.

लागवड केल्यानंतर सरासरी 160 दिवसांमध्ये दोडके काढण्यासाठी तयार होतात .या दोडक्यांचा रंग गडद हिरवा असतो.

दोडक्यावर पातळ लांब पट्टेदार आणि दिसायला किंचित वाकलेले असतात.

5. नागा दोडका :

दोडक्याच्या या जातीपासून हेक्‍टरी 200 ते 220 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.

लागवड केल्यानंतर सरासरी 50 ते 55 दिवसांमध्ये हे पीक काढण्यासाठी तयार होते .या जातीचे उत्पादन क्षमता चांगली आहे.

दोडक्याच्या या जातीचा रंग हिरवा असतो आणि दोडक्याची लांबी सरासरी 20 ते 25 सेंटीमीटर असते.

6. काशी दिव्या :

काशी दिव्या या जातीची उत्पादन क्षमता चांगली आहे .हेक्टरी 130 ते 160 क्विंटल उत्पन्न मिळते.

या जातीचे वेल 4.5 मीटर उंच असतात आणि दंडगोलाकार असून फळांचा रंग हलका हिरवा असतो.

दोडक्याची लांबी सरासरी वीस ते पंचवीस सेंटीमीटर पाहायला दिसते.

लागवड केल्यानंतर सरासरी 50 दिवसांनी अंतर पीक काढण्यासाठी तयार होते.

7. पुसा स्नेहा :

पुसा स्नेहा या जातीचे दोडके लागवड केल्यानंतर सरासरी 50 ते 55 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होतात. या जातीच्या दोडक्यांचा रंग गडद हिरवा असतो आणि लांबी वीस ते पंचवीस सेंटीमीटर पर्यंत असते. या जातीपासून सरासरी 200 ते 200 क्विंटल उत्पादन हेक्टरी पर्यंत मिळते.

8. कल्याणपूर ग्रीन स्मुदी :

दोडक्याच्या या जातीचे उत्पादन क्षमता चांगली असते .या जातीपासून सरासरी 350 ते 400 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते. या जातीची फळे मध्यम आकाराची असून मांसल असतात .या जातीच्या फळांवर हलके प्रत्येक तयार होतात.

9. स्वर्ण प्रभा :

हे उशिरा परिपक्व होणारे जात आहे. लागवड केल्यानंतर सरासरी 70 ते 75 दिवसानंतर पीक काढण्यासाठी तयार होते.

उशिरा येणारे जात जरी असली तर या जाती पासून उत्पादन चांगले मिळते. हेक्टरी 200 ते 250 क्विंटल उत्पादन या जातीपासून मिळते.

लागवड आणि लागवडीचा हंगाम :

  • दोडक्याची लागवड करण्यासाठी निवडलेल्या जमिनीमध्ये खोल नांगरट करावे आणि सर्व ढेकळे फोडून घेऊन कोळप्याच्या साह्याने जमीन भुसभुशीत करून सपाट करून घ्यावे.
  • त्यानंतर 30 ×30 × 30 सेमी आकाराचे खड्डे काढावे.
  • त्या खड्ड्यांमध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत किंवा घन जीवामृत टाकून घ्यावे आणि प्रत्येक ठिकाणी तीन ते चार बिया टोकाव्यात.
  • दोडक्याची लागवड 1.5 × 1.0 मी या अंतरावर केली जाते.
  • दोडक्याची लागवड उन्हाळी आणि पावसाळी हंगामामध्ये जास्त करून केली जाते.
  • एका हेक्टर मध्ये सुमारे दोन ते अडीच किलो पर्यंत बियाणे पुरेसे ठरते.

खत व्यवस्थापन आणि पाणी नियोजन :

  • नांगरट करण्याच्या वेळेस जमिनीमध्ये शेणखत किंवा घन जीवामृत टाकले जातात.
  • दोडक्याचे नियोजन करताना जर ठिबक सिंचन केले असेल तर त्यावेळी आपण जीवामृत देखील ठिबक मधून सोडू शकतो.
  • जीवामृत सोडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि जमिनीचा ऑरगॅनिक कार्बन वाढण्यासाठी देखील मदत होते.
  • दोडक्याच्या बिया लावल्यावर लगेच पाणी द्यावे.
  • खरीप हंगामामध्ये पाणी देण्याची जास्त गरज नसते.
  • पण उन्हाळ्यामध्ये तीन ते चार दिवसाच्या अंतराने दोडक्याला पाणी द्यावे.

आंतर मशागत :

  • लागवड केल्यानंतर तणांचा प्रादुर्भाव दिसल्यास वेळोवेळी खुरपणी करून वेली शेजारील सर्व जागा पूर्णपणे स्वच्छ करावे.
  • प्रत्येक ठिकाणी दोनच रोपे ठेवावेत.
  • दोडक्याच्या वेलीला आधाराची गरज असते.
  • त्यासाठी मांडव केल्यानंतर उत्पादन देखील वाढते.
  • मांडव ऐवजी आपण तारकाठी लावून देखील दोडक्याच्या वेलींना आधार देऊ शकतो.
  • त्यामुळे फळांची प्रत सुधारते.

महत्त्वाच्या किडी आणि रोग :

1.फुल किडे :

हे दोडका पिकातील रस शोषक कीड आहे. या किडी पानातील रस मोठ्या प्रमाणावर शोषतात. त्यामुळे झाड पूर्णपणे कमकुवत होते. या किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.

2.मावा :

हे देखील एक रस शोषक कीड आहे .या किडीचे प्रौढ आणि पिले दोन्ही मोठ्या प्रमाणावर झाडाच्या वेगवेगळ्या भागातून रस शोषतात .ही कीड एक चिकट गोड पदार्थ स्त्रवते त्यामुळे पिकावर काळी बुरशी लगेच आकर्षित होते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण ची क्रिया मंदावते आणि झाड कमकुवत बनते. या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी आणि शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा.

3.पांढरी माशी :

या किडीचे देखील प्रौढ आणि दिले दोन्ही मोठ्या प्रमाणावर पानांमधून रस शोषतात. या किडीचा हल्ला समूह मध्ये होतो. त्यामुळे पूर्णपणे पान पिवळे पडते आणि मुरगळते .ही कीड विषाणूजन्य रोगांचा प्रसार करते. या किडीचा प्रादुर्भाव थांबवल्यानंतर विषाणूजन्य रोगांचा प्रसार देखील आटोक्यात आणता येतो. या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी आणि शेतामध्ये निळ्या रंगाचे चिकट सापळे लावावे .त्या सोबत पिवळ्या रंगाचे देखील चिकट सापळ्यांचा वापर आपण करू शकतो.

4.नाग अळी :

पानांच्या आत राहून पानांच्या आतील गर खातात .त्यामुळे पानावर नागमोडी वळणे दिसतात ,या किडीच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.

5.फळ माशी :

या किडीच्या अळ्या मोठ्या प्रमाणावर फळाच्या आतील गर खाऊन टाकतात .त्यामुळे फळे लवकर पक्व होतात आणि सडून गळून पडतात. या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण कामगंध सापळ्यांचा वापर करू शकतो आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जमीन खोल नांगरट करून उन्हामध्ये तापून द्यावे .जेणेकरून कोश अवस्था मधल्या अळ्या मरतील आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होईल.

रोग :

1.भुरी :

हा एक बुरशीजन्य रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानाच्या खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाची पावडर दिसायला लागते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर पाने गळून पडतात आणि झाड पूर्णपणे कमकुवत होते. या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.

काढणी आणि उत्पादन :

  • दोडक्याचे पीक लागवड केल्यानंतर सरासरी 55 ते 60 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होते.
  • दोडक्याची फळे कोवळी असताना तोडावी लागतात.
  • दोडक्याची फळे काढण्यासाठी उशीर झाल्यास दोडके हे स्पंज सारखी झालेले दिसतात.
  • त्यामुळे अशा दोडक्यांना बाजारामध्ये चांगला भाव मिळत नाही.
  • दोडक्याचे उत्पादन वेगवेगळ्या जातीनुसार वेगवेगळे होते.
  • सरासरी दोडक्यापासून वीस ते पंचवीस टन हेक्टरी उत्पादन मिळते.
  • दोडक्याच्या लागवडी वेळी हवामान आणि पावसाच्या प्रमाणावर उत्पादन अवलंबून असते.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/vegetables

5/5 - (2 votes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *