टॉमॅटो लागवड :
टोमॅटो हे वर्षभर पिकवले जाणारे आणि अधिक मागणी असलेले पीक आहे .टोमॅटोचे मूळ स्थान दक्षिण अमेरिका, मेक्सिको मधील आहे .टोमॅटोच्या पौष्टिक गुणांमुळे सर्व स्तरावरील लोकांच्या आहारात टोमॅटो चा वापर केला जातो . ही खूप लोकप्रिय भाजी आहे .टोमॅटोमध्ये अ , ब, क ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्याचबरोबर टोमॅटोमध्ये लोह ,चुना ही पोषक द्रव्य सुद्धा आढळतात .टोमॅटो पासून चटणी ,पुरी, केचप , ,सॉस अशी टिकाऊ पदार्थ तयार करून विकले जातात. टोमॅटो मुळे यकृताचे विकार ,संधिवात, कावीळ ,डोकेदुखी ,डोळ्यांचे रोग इत्यादी बरे होतात. फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे हे आतडे निरोगी ठेवण्याचे काम खूप चांगले करते .टोमॅटोमध्ये बीटा कॅरोटीन आणि लायकोपिन आढळतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते टोमॅटो या भाजीला आहारात घेतल्याने रक्तदाब या रोगाचा त्रास कमी होतात.
लागणारी जमीन :
टोमॅटो लागवडीसाठी मध्यम काळी किंवा भारी जमीन सुद्धा उत्तम ठरते.
लागवडीसाठी जमिनीचे सामू 6 ते 7 दरम्यान असल्यास पण चांगले मिळते.
निवडलेली जमीन ही सेंद्रिय खताने भरपूर आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी.
हलक्या जमिनीमध्ये टोमॅटोचे उत्पन्न लवकर येते आणि भारी जमिनीमध्ये उशिरा येते पण भरघोस उत्पन्न मिळते.
लागणारे हवामान :
टोमॅटो या पिकाला मध्यम उष्ण वातावरण पोषक ठरते. टोमॅटोला अती कडाक्याची थंडी चांगली ठरत नाही.
38 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेल्यास फळधारणेवर सुद्धा वाईट परिणाम होतात. अधिक तापमानांमध्ये फळाला लाल रंग येत नाही.
फळावर पांढरे चट्टे देखील पडतात अधिक तापमानामुळे लायकोपिन ही रंग सूत्रे तयार व्हायची थांबली जातात.
फळांना लाल रंग येण्यासाठी 24 ते 26 डिग्री अंश सेल्सिअस तापमान टोमॅटोसाठी चांगले राहते.
टोमॅटोला वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगळे तापमान लागते.
1.बी उगवण्यासाठी :26 ते 32 डिग्री सेल्सिअस.
2.रोपांच्या वाढीसाठी :23 ते 26 डिग्री सेल्सिअस.
3.फुले येण्यासाठी :13 ते 14 डिग्री सेल्सिअस.
4.परागणाच्या वाढीसाठी :20 ते 27 डिग्री सेल्सिअस.
5.फळधारणेसाठी :18 ते 20 डिग्री सेल्सिअस.
6.फळ परिपक्व होण्यासाठी :24 ते 26 डिग्री सेल्सिअस.
टोमॅटोच्या सुधारित जाती :
धनश्री ,अर्का सौरभ, अर्का विकास ,भाग्यश्री ,पुसा गौरव, पुसा बी ,पुसा शितल ,पुसा 120 ,पुसा अर्ली डवार्फ.
टोमॅटोच्या संकरित जाती :
राजश्री ,रूपाली, वैशाली, रश्मी, शितल, मंगल ,फुले राजा.
टोमॅटो लागवड :
निवडलेल्या जमिनीला आडवे उभे नांगरून घ्यावे आणि कुळवून सर्व ढेकळे फोडून घ्यावीत.
जमिनीमध्ये कुजलेले शेणखत मिसळावे. लागवडीसाठी सरी वरंभे तयार करून घ्यावे.
टोमॅटो लागवड साठी 90×30 सेमी अंतर योग्य ठरते . महाराष्ट्र मध्ये टोमॅटोची लागवड जवळपास वर्षभर केली जाते उन्हाळी हंगामासाठी डिसेंबर जानेवारी मध्ये ,खरीप हंगामासाठी जून किंवा जुलैमध्ये आणि हिवाळी हंगामासाठी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये बियांची पेरणी केली जाते.
संकरित टोमॅटोचे 150 ग्राम बियाणे प्रति हेक्टर पुरते. आणि सुधारित जातींसाठी 400 ग्राम बी प्रती हेक्टर पुरतात.
बियांची पेरणी करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये सपाट वाफेवर आणि पावसाळी हंगामामध्ये गादीवाफ्यावर बियांची पेरणी करावी.
रोपे तीन ते चार आठवडे नंतर तयार होतात. तयार झालेल्या रोपांची उंची 12 ते 15 सेंटीमीटर असल्यावरच रोपांचे स्थलांतर करणे योग्य ठरते.
टोमॅटो साठी खत आणि पाणी व्यवस्थापन :
टोमॅटोला चांगली खते घातल्यानंतर टोमॅटोचे उत्पादन खूप वाढते. उत्तम प्रतीची फळे तयार होतात.
टोमॅटो पेरणीच्या वेळी घन जीवामृत घालावे आणि प्रत्येक आठवड्याला प्रति एकर 200 लिटर जीवामृत सोडावे.
टोमॅटोला नियमित पाणीपुरवठा करावा लागतो. कारण टोमॅटो हे जमिनीच्या ओलाव्याला अतिशय संवेदनशील पीक आहे.
टोमॅटोला पाण्याचे प्रमाण अधिक किंवा कमी दोन्ही हानिकारक ठरते.
टोमॅटोच्या पिकाला उन्हाळ्यामध्ये पाच ते सहा दिवसांनी आणि हिवाळ्यामध्ये आठ ते दहा दिवसांनी पाणी सोडावे.
टोमॅटोला पाण्याचा ताण पडल्यानंतर अधिक पाणी जर दिले तर टोमॅटोची फळे तडकली जातात आणि उत्पादनांमध्ये घट होते.
आंतरमशागत आणि आधार देणे :
टोमॅटो चांगली उत्पन्न घेण्यासाठी त्यांची नियोजन करणे खूप गरजेचे आहे. वेळोवेळी खुरपणी करून त्यांची विल्हेवाट लावावी मात्र मुळाना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
टोमॅटोच्या वेलीसारखी वाढणाऱ्या जातील व्यवस्थित आधार दिल्यानंतर फळांची गुणवत्ता चांगली राहते आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांना आधार दिल्यानंतर रोगांचा उपद्रव आणि फळे नासणे हा त्रास कमी होतो .
टोमॅटोच्या संकरित जातीला आधार देणे खूप गरजेचे असते .नाहीतर अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.
आधारासाठी तीन ते चार सेंटीमीटर जाड आणि दोन मीटर लांबीचे बांबू किंवा काठ्यांचा आधार देऊन टोमॅटोची झाडे वाढवली जातात .
जमिनी जवळच्या एक ते दोन फांद्या छाटून टाकतात आणि मुख्य खोड बांबूच्या आधाराने ठराविक अंतरावर सुतळीने बांधावे लागते .
प्रत्येक झाडासाठी काटे वापरणे शेतकऱ्याला खूप खर्चिक ठरते .त्यामुळे आधार देण्यासाठी सरीच्या दोन्ही बाजूला डांब लावून या डांबावर तारा ओढल्या जातात.
त्यासाठी 18 गेटच्या वायरचा वापर करतात .कारण तांडा म्हणून मध्यभागी वेगवेगळ्या अंतरावर खांब रोवतात आणि तारा ओढून घेतल्या जातात .
झाडांची उंची जशी वाढत असते तसा त्याला आधार देता येतो . यासाठी डांबावर 30 सेंटीमीटर, 75 सेंटीमीटर व 90 सेंटीमीटर तारा उडून झाडांना आधार दिला जातो.झाडांना
वळण देणे :
टोमॅटोच्या झाडांना वळण देण्यासाठी जमिनीपासून 20 ते 30 सेंटीमीटर पर्यंत येणारे फूट कात्रीने खोडून टाका .
झाडाची पाने काढू नयेत लागवडीनंतर पंधरा दिवसांनी प्रत्येक तीन रोपयांच्या दरम्यान दीडशे ते 180 सेमी अंतरावर 180 सेंटीमीटर उंच तीन ते चार सेंटीमीटर जाडीचे दणकट बांबू किंवा कारवीच्या काठ्या रोपांच्या रांगेत घट्ट रोवाव्यात.
तसेच 25 ते 30 मीटर अंतरा वर रोपांच्या ओळीतून जाड दणकट 200 ते 220 सेंटीमीटर उंच वासे खोलवर रोवावेत.
या वर्षाला 16 गिरच्या जीआय तारा बांधून त्या ओळीतील काठ्यांना आडव्या बांधाव्यात.
त्यामुळे फवारणी करणे फळांची तोडणी रोपांना भर देणे पाणी देणे इत्यादी कामे व्यवस्थित होतात.
एक हेक्टर टोमॅटो लागवडीसाठी सहा ते सात हजार बांबू किंवा कारवीच्या काठ्या आणि 400 वासे लागतात.
महत्त्वाच्या किडी आणि रोग :
कीड :
1.टोमॅटो वरील फुलकीड मावा आणि तुडतुडे :
या किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर टोमॅटोच्या पानांच्या कडा वरील बाजूस वळू लागतात. ह्या किडी मोठ्या प्रमाणात मध्ये झाडातून रस शोषतात .त्यामुळे झाडे कमकुवत बनतात आणि ह्या किडींमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो. या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा आणि जैविक कीटकनाशकांचा सुद्धा वापर करावा.
2. फळ पोखरणारी अळी :
टोमॅटोमधील ही आली शेंडा वरील कोळी पाने खाते आणि जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर पिकलेल्या फळांना पोखरते. ही कीड फळाच्या आत जाऊन त्याच्यामध्ये स्वतःची विष्ठा टाकते. त्यामुळे फळे खराब होतात आणि सडू लागतात. त्यामुळे उत्पादनामध्ये घट होते . या किडी वर नियंत्रण करण्यासाठी प्रादुर्भाव फळांसह अळ्या गोळा कराव्यात आणि नष्ट करून टाकाव्यात .ह्या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मूळ पिकासोबत झेंडूच्या सापळा पिकाची लागवड करावी .प्रकाश सापळा आणि गंध सापळा वापरल्याने या अळीचा प्रादुर्भाव शेतामध्ये कमी राहतो.
रोग :
1. पर्णगुच्छ :
या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशी मुळे होतो. या रोगाचे लक्षणे म्हणजे झाडाची पाने हे वरचा बाजूला वळलेली असतात. झाडे बुटकी राहतात आणि पानांचा गुच्छ असल्यासारखी दिसतात. या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निळ्या रंगाचे चिकट सापळ्यांचा वापर शेतामध्ये करावा.
2. पानावरील करपा :
पानावर तपकिरी एककेंद्रीय अनियमित आकारांचे करपल्यासारखे ठिपके दिसू लागतात. या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकावर जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा.
3. मर रोग :
या रोगामध्ये पानांच्या शिरांचा रंगहीन होतो आणि हळूहळू पाणी पिवळी पडू लागतात. झाडांच्या पेशी लाल तपकिरी रंगाच्या होऊन पुस्तक त्यामुळे झाडाला अन्नपुरवठा कमी प्रमाणामध्ये होतो आणि परिणामी झाडांची वाढ पूर्णपणे खुडते आणि झाड मरते ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा.
टोमॅटोची काढणी :
लागवड केल्यानंतर टोमॅटोचे फळ पण 75 ते 90 दिवसांमध्ये तयार होते बाजारपेठाचे अंतर आणि वाहतुकीचे साधन लक्षात घेऊन टोमॅटोची काढणे वेगवेगळ्या अवस्थेमध्ये केली जाते.
1. हिरवी पक्व अवस्था : फळेही दूरच्या बाजारपेठेमध्ये पाठवायचे असल्यास ती पूर्ण वाढलेली पण हिरवी असताना काढली जातात आणि पाठवली जातात.
2 . गुलाबी अवस्था : फळांचा रंग हिरवा बदलून त्यावर गुलाबी छटा दिसू लागल्या की ती फळे काढली जातात आणि बाजारला पाठवली जातात अशा प्रकारची फळे जवळपासच्या बाजारपेठेमध्ये पाठवण्यासाठी योग्य असतात.
3. पक्व अवस्था : स्थानिक बाजारपेठांसाठी किंवा संपूर्ण लाल परंतु कडक असलेली फळे काढावीत.
4. पूर्ण पक्व अवस्था : टोमॅटोची प्रक्रिया करण्यासाठी टोमॅटोची काढणे पूर्ण पिकल्यानंतर आणि किंचित मोह असताना केली जाते या फळांपासून टोमॅटो केचप चटणी सूट सॉस यासारखे पदार्थ तयार केले जातात.
फळांची काढनी ही नेहमी तापमान कमी असताना म्हणजेच सकाळी किंवा संध्याकाळी करावी. काढणी केल्यानंतर रंगानुसार आणि आकारानुसार प्रतवारी करावी .नंतर पसरट पाट्यातून खोके किंवा करड्यातून फळे बाजार आत विकण्यासाठी पाठवावे. पॅकिंग करताना हवा खेळती राहील याची संपूर्णपणे काळजी घ्यावी आणि वाहतुकीमध्ये फळे चिरडणार नाहीत ,दबणार नाहीत याची विशेषता काळजी घ्यावी. त्यासाठी प्लास्टिक कॅरेटचा आपण वापर करू शकतो .
टोमॅटोचे उत्पादन :
टोमॅटोचे सरासरी हेक्टरी उत्पादन हे १५ ते ३० टन पर्यंत मिळते आणि जातीनुसार टोमॅटोचे उत्पादन हे बदलत राहते वेगवेगळ्या जातींचे उत्पादन हे वेगवेगळे राहते.
Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi