सीताफळ लागवड
दक्षिण व मध्य अमेरिका मध्ये सिताफळाचे उगम स्थान मानले जाते. त्यामध्ये विदर्भ भागातील भंडारा गोंदिया, पवनी, वाशिम, माहूर आणि मराठवाडा विभागातील धार आणि बालाघाट ही गावे सीताफळ लागवडीसाठी प्रसिद्ध मानली जातात. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये जसे जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, सोलापूर, नाशिक, पुणे आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा सीताफळांची मोठी लागवड दिसून येते.
सिताफळाची ताजी फळे खाण्यासाठी वापरले जातात. सीताफळ मधील पांढऱ्या रंगाच्या गराचा उपयोग आईस्क्रीम बनवण्यासाठी केला जातो. सिताफळामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि प्रथिने लोह भरपूर प्रमाणामध्ये आढळतात.
सीताफळाच्या पानांमध्ये अल्कलाईड द्रव्य सापडतात ज्याचा उपयोग कीटकनाशक म्हणून होऊ शकतो आणि सीताफळाच्या झाडाच्या अवयवात हायड्रोसायनिक आम्ल असते, त्यामुळे सीताफळाच्या झाडाला वाळवी ही कीड लागत नाही. सीताफळामध्ये कॅल्शियम आणि लोह चे प्रमाण मुबलक असते.
त्यामुळे वाढत्या वयातील मुलांना सिताफळ चांगले ठरते. स्त्रियांसाठी सुद्धा सिताफळा चा आहारामध्ये उपयोग योग्य ठरतो. कारण बाळ झाल्यानंतर आणि चाळीस वय झाल्यानंतर बऱ्याच स्त्रियांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण आणि रक्ताचे प्रमाण कमी होते.
त्यासाठी सीताफळ खाल्ल्याने शरीराची झीज भरून येते. शरीरामध्ये उष्णता जाणवणे, आम्लपित्त, छातीत व पोटात जळजळ होणे याची लक्षणे असल्यावर सिताफळा खावावे. त्याच्या सेवनाने शरीरात लगेच फरक पडतो .सीताफळाच्या घरापासून सरबत देखील बनवता येते.
लागणारी जमीन :
सीताफळ हे उष्णकटिबंधीय भागातील झाड आहे. त्यामुळे या झाडाची लागवड आपण खडकाळ, रेताळ, वाळूमुळे, डोंगर उताराची मध्यमखोल, जमिनीमध्ये करू शकतो. जमीन फक्त पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. भारी काळी आणि पाणी साठवून होणाऱ्या जमिनीमध्ये सीताफळाची लागवड करू नये.
त्यामुळे झाडांच्या मुळा कूजण्याची शक्यता जास्त असते .सीताफळाच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू 5 ते 7 या दरम्यान असावा .अल्कलीयुक्त जमिनीमध्ये सीताफळाची लागवड करू नये.
लागणार हवामान :
सीताफळाला उष्ण आणि कोरडे हवामान चांगले मानवते .दमट हवामानामध्ये झाडांची पानगळ होत नाही. कडक थंडी आणि धुके सिताफळाच्या झाडाला अजिबात मानवत नाही.
अशा काळामध्ये रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढतो आणि उत्पन्न देखील कमी होते.
सीताफळाच्या झाडाला फुले येण्याच्या काळामध्ये कोरडी हवा आवश्यक असते. सीताफळाला कमी हिवाळा चांगला मानवतो.
सीताफळाच्या सुधारित जाती :
1.धारूर-6 :
सिताफळाची ही जात महाराष्ट्र मराठवाडा कृषी महाविद्यापीठाने मराठवाडा या विभागामध्ये लागवडीसाठी विकसित केलेली आहे. या जातीच्या फळांची गोडी जास्त असते आणि फळांमध्ये साखरेचे प्रमाण सुद्धा जास्त असते.
या जातीची फळे आकाराने मोठे असतात आणि फळांमध्ये गराचे प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असते. त्याचबरोबर विद्राव्य घटकांचे प्रमाण देखील या जातीच्या फळांमध्ये जास्त आढळते.
2.बाळानगर :
सीताफळाची ही जात आंध्र प्रदेश मध्ये विकसित केलेली आहे आणि महाराष्ट्र मध्ये ही जात अत्यंत प्रसिद्ध आहे .या जातीच्या फळांचा सरासरी वजन 250 ग्रॅम पर्यंत असते आणि 48% गराचे प्रमाण असते .एका झाडापासून सरासरी 50 ते 60 फळे मिळतात.
या जातीच्या फळांमध्ये बियांचे प्रमाण हे तीन टक्के असते आणि विद्राव्य घटकांचे प्रमाण 27 टक्के पर्यंत असते.
3.अर्का सहान :
सीताफळाची फळाची ही जात भारतीय बागवानी संस्था बेंगलोर येथे विकसित केलेली आहे. या जातीच्या फळांचे वजन 400 ते 500 ग्रॅम असते आणि गराचे प्रमाण 48 टक्के पर्यंत असते.
या जातीच्या फळांचा रंग फिकट हिरवा असतो आणि आकार गोलाकार असतो. या जातीचे फळांमध्ये बियांचे प्रमाण खूप कमी असून आकाराने लहान असतात.
फळांवरील डोळ्या मधील अंतर कमी असल्यामुळे पिठ्ठ्या ढेकूण या किडीचे प्रमाण या जातीच्या फळांवर कमी दिसते.
4.फुले पुरंदर :
सीताफळाची ही जात महाराष्ट्र विभागासाठी 2014 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाने शिफारस केलेली आहे. या जातीच्या फळांचे वजन सरासरी 350 ते 380 ग्रॅम पर्यंत असते आणि 45 ते 48 टक्के पर्यंत घराचे प्रमाण असते या जातीच्या फळांचा रंग आकर्षक असून फळे आकाराने मोठे असतात.
गराच्या पाकळ्या पांढऱ्या शुभ्र असून संख्या देखील जास्त असते .या जातीच्या फळांची मागणी रबडी साठी जास्त असते.
अभिवृद्धी आणि लागवड :
सीताफळाची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून त्यावर भेटकलम डोळे भरून करता येते. डोळे भरण्यासाठी देशी सीताफळांचा खुंट वापरला जातो आणि भेट कलम करण्यासाठी रामफळ हा खुंट वापरला जातो.
मात्र बियांपासून लागवड करत असताना मोठ्या आकाराचे आणि उत्कृष्ट दर्जाची फळे देणारी मातृवृक्ष झाडे निवडावे. अशा झाडांची फळे निवडल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्यांचे बी काढून पेरणी करावी.
पेरणी करण्याच्या अगोदर बिया तीन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवावे. त्यामुळे बी लवकर उगवण्यास मदत होते. प्रत्येक खड्ड्यामध्ये 10 सेंटिमीटर अंतरावर तीन ते चार बिया लावाव्यात आणि पाणी सोडावे.
बी उगवल्यानंतर आणि रोपे मोठी झाल्यानंतर प्रत्येक खड्ड्यांमध्ये चांगले जोमदार रोप बघून ठेवावे आणि बाकी राहिलेली रोपे उपडून टाकावीत.
वर्तमान काळामध्ये पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये बिया टाकून रोपे तयार करण्याची पद्धत प्रचलित आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुरुवातीलाच अशा रोपांची लागवड केली जाते.
लागवडीचे अंतर आणि हंगाम :
फळाची लागवड करण्यासाठी पावसाळ्यापूर्वीच खड्डे काढून घ्यावेत. खड्ड्याचे आकार 45 ×45 × 45 सेमी इतका असावा .सिताफळाची लागवड मुरमाड जमिनीमध्ये 4×4 मीटर अंतरावर आणि मध्यम जमिनीमध्ये 5×5 मीटर या अंतरावर शक्यतो केली जाते.
खड्ड्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत घालावे किंवा घन जीवामृत घालावे आणि चांगल्या मातीचे मिश्रणाने मिसळून खड्डे व्यवस्थित अर्धे भरून घ्यावे. एकदा पाऊस पडून गेल्यानंतर रोपांची लागवड करावी आणि सुरुवातीच्या काळामध्ये काट्याने रोपांना आधार द्यावा आणि पाणी द्यावे.
सीताफळाची छाटणी आणि वळण पद्धती :
सीताफळाच्या झाडाला सुरुवातीच्या काळामध्ये फक्त काही प्रमाणामध्ये छाटणीची गरज असते. योग्य वळण देण्यासाठी पहिल्यांदा जमिनीपासून एक मीटर उंचीपर्यंत खोडावरील सर्व फुटवे काढून घ्यावे आणि चार दिशेला फांद्या व्यवस्थित पसरतील अशा ठेवाव्यात.
त्यानंतर दाटी करणाऱ्या फांद्या, जुन्या, वाळलेल्या ,रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात .खत नियोजन आणि पाणी व्यवस्थापन : सीताफळाच्या झाडाला नियमितपणे खते दिली जात नाहीत.
परंतु व्यापारी दृष्ट्या चांगले उत्पन्न घेण्यासाठी आणि मोठ्या प्रकारची फळे घेण्यासाठी सिताफळाच्या झाडांना शेणखत किंवा घन जीवामृत द्यावे आणि ठिबक सिंचनाचा वापर केल्यास झाडाला जीवामृत सोडावे.
ठिबक 💦 सिंचनाचा वापर केला नसेल तर झाडाच्या एक मीटर अंतरावर आळे तयार करावे आणि त्यामध्ये जीवामृत ओतावे. त्यामुळे चांगले उत्पन्न येते.
सीताफळाच्या झाडांना लागवड केल्यानंतर सरासरी फक्त तीन ते चार वर्ष उन्हाळ्यामध्ये पाणी द्यायची गरज असते. त्यानंतर सीताफळाच्या झाडांना पाणी देण्याची गरज नसते.
पाण्याची सोय असल्यास सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यांमध्ये फळधारणेनंतर फळांची वाढ चांगली व्हावी म्हणून एक ते दोन वेळा पाणी दिल्यास चांगले उत्पन्न मिळते.
आंतरमशागत आणि आंतर पिके :
सिताफळाच्या झाडांची लागवड केल्यानंतर भरघोस उत्पन्न चार ते पाच वर्षानंतर येते.
तो पर्यंत खरीप हंगामा मध्ये पावसाच्या पाण्यावर जवस, हरभरा, कुळीथ, सोयाबीन, चवळी, भुईमूग, तूर असे कमी कालावधीची पिके घेऊन नफा मिळवू शकतो.
बागेमध्ये येणारे तण आंतरपीके घेतल्यामुळे कमी होतात आणि गरज पडल्यावर खुरपणी आणि निंदणी करून तनांचा प्रादुर्भाव कमी करावे.
आपण आंतरपीके म्हणून हिरवळीची पिके सुद्धा घेऊ शकतो. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि सुपीकता वाढते.
किडी आणि रोग :
किडी :
1.पिठ्या ढेकूण :
सीताफळाच्या झाडावर मुख्यतः पिठ्या ढेकूण ही कीड जास्त प्रादुर्भाव करते.
या किड्यांची पिल्ले आणि प्रौढ दोन्ही मोठ्या प्रमाणावर फळांमधून आणि कोवळ्या फांद्यांमधून रस शोषतात.
त्यामुळे फळे कमजोर आणि लहान राहतात आणि गळून पडतात. त्यामुळे उत्पन्नामध्ये घट होते.
या किडीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.
2.फळमाशी :
फळमाशी ही सीताफळाच्या सालीखाली अंडी देते. योग्य वातावरण मिळाल्यानंतर अंडी फुटतात आणि अंड्यातील फळाच्या आतील गर खाऊ लागतात.
आणि काही दिवसात फळे पूर्णपणे आतून सढतात आणि त्यांची प्रत कमी होते.
ह्या अळ्या पूर्णपणे वाढल्यानंतर फळाला पोखरून खाली जमिनीमध्ये पडतात आणि कोषा अवस्थेमध्ये जातात.
त्यामुळे या किडीवर नियंत्रण आणणे थोडे अवघड जाते.
या किडीचे नियंत्रण करण्यासाठी रक्षक सापळ्यांचा वापर करावा. आणि उन्हाळ्यामध्ये झाडाखालील माती भुसभुशीत करावी.
त्यामुळे अश्या अवस्थेमध्ये गेलेल्या आळ्या ऊन लागल्यामुळे तिथेच मरतात.
रोग :
1.फळे काळे पडणे :
सीताफळाच्या पिकांमध्ये फळे काळे पडणे हा रोग दिसून येतो.
या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर फळे लहान असतानाच ती काळी पडतात आणि गळून जातात.
काही फळे पिकण्याच्या वेळी काळी पडतात आणि गळून जातात.
हा एक बुरशीजन्य रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फळे वाढीच्या काळामध्ये जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.
काढणी आणि उत्पादन :
सिताफळाच्या बियांपासून अभिवृद्धी केलेल्या झाडांना लागवडीनंतर सहा वर्षांनी फळे यायला सुरुवात होते आणि कलमे झाडांना चौथ्या वर्षी फळे लागतात. सीताफळाच्या झाडांना जून ते जुलैमध्ये फुले येण्यासाठी तयार होते.
आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये फळे काढण्यासाठी तयार होतात.
फळांच्या डोळे उघडून दोन डोळ्यांतील भाग पिवळसर रंगाचा दिसू लागल्यावर फळे काढण्यासाठी तयार झालेली आहेत असे समजावे.
वेगवेगळ्या जातीनुसार सीताफळाचे उत्पादन वेगवेगळे येते. सर्वसाधारणपणे एका झाडापासून सरासरी 50 ते 100 फळे मिळतात.
फळांचे उत्पादन हे फळधारणेच्या वेळी आणि फळवाडीच्या वेळी असलेल्या हवामानावर सुध्दा अवलंबून असते.
Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi