मुळा लागवड
मुळा हे कमी कालावधीमध्ये येणारे मूळवर्गीय पीक आहे. या पिकाची लागवड भाजीसाठी आणि मुळ्यासाठी केली जाते. मुळांमध्ये अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे आढळतात. मुळांच्या शेंगांची भाजी केली जाते. मुळांच्या शेंगांमध्ये औषधी गुण असतात. मुळ्याची लागवड कमी जागेत किंवा परसबागेत करता येते. मुळा खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. पित्ताचा त्रास, मूळव्याध, कावीळ, याचा त्रास असणाऱ्यांना मुळा उपयुक्त ठरतो.
फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे पचनक्रियेला मुळा चांगला राहतो. तसेच मुळामध्ये क जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगले होते. मुळ्यामुळे लाल रक्तपेशी वाढण्याला मदत होते आणि रक्तामधील ऑक्सिजनचे प्रमाण वाढले जाते. मुळामध्ये अँथोसायनीन याचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे हृदयविकारांपासून शरीर लांब राहते.
फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते आणि आहारात वापर केल्याने बराच काळ पोट भरून राहते त्यामुळे वेळोवेळी खायची सवय दूर होते. मुळामध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे उच्च रक्तदाब यासारख्या समस्या लांब राहतात. मुळा खाल्ल्याने रक्तामध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते आणि मधुमेह नियंत्रण मध्ये राहतो.
यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीर बराच वेळ हायड्रेट राहते आणि शरीरामध्ये पाण्याची कमी होत नाही त्यामुळे त्वचा चांगली राहते. मुळा हे कॅलरीज मध्ये खूप कमी असते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मुळा हा योग्य ठरतो. मुळामध्ये कंजस्टिव गुणधर्म असतात, त्यामुळे सर्दींच्या दिवसांमध्ये घशातील श्लेष्म साफ करण्याचे काम मुळा करते. हिवाळ्यामध्ये होणारा सर्दी पासून मुळा खाल्ल्याने फायदा होतो.
लागणारी जमीन :
मुळा हा मूळ वर्गीय भाजी ह्या गटात येतो. याची वाढ जमिनीच्या खाली होते त्यामुळे लागवडीसाठी मध्यम प्रकारची भुसभुशीत भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, जमीन योग्य ठरते.
जमीन भारी असल्यास मुळ्याची वाढ चांगली होत नाही आणि अशा जमिनीमध्ये पाणी साचून राहते त्यामुळे मुळ्याचे पीक सडण्याची शक्यता असते.
त्यामुळे भुसभुशीत, खोल जमीन मुळ्याच्या लागवडीसाठी निवडावी. मुळ्याच्या लागवडीसाठी जमिनीचा सामान 5 ते 7 मध्ये असल्यास वयाचे उत्पन्न वाढते.
लागणारे हवामान :
मुळा हे थंड हवामानामध्ये येणारे पीक मानले जाते. मुळासाठी 15 अंश सेल्सिअस 23 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत चांगले राहते.
मुळ्याच्या वाढीच्या काळामध्ये जर तापमान जास्त झाले तर मुळा लवकर जुन होतो आणि मुळाचा तिखटपणा वाढतो.
त्यामुळे अशा उत्पादनाला बाजारामध्ये भाव मिळत नाही. जास्त प्रमाणामध्ये थंडी आणि आद्रतेचे प्रमाण वाढल्यानंतर रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो.
मुळ्याचा वेगवेगळ्या जाति
1.पुसा रेशमी :
या जातींचे मुळे जाडीला जास्त असतात आणि गुळगुळीत असतात. लागवड केल्यानंतर सर्वसाधारणपणे पन्नास ते साठ दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते.
या जातीपासून सरासरी उत्पन्न 320 ते 350 क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
2.जपानी पांढरा :
या जातीच्या मुळा मऊ, गुळगुळीत असतात. लागवड केल्यानंतर सर्वसाधारणपणे 50 ते 55 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते आणि या जातीच्या मुळांचे उत्पन्न 250 ते 300 क्विंटल हेक्टरी मिळते.
3.पुसा हिमानी :
हा मुळा त्याच्या मजबूतपणासाठी ओळखला जातो. मुळ्याची लांबी सरासरी 30 ते 35 सेंटीमीटर पर्यंत असते आणि रुंदी जाड असते.
लागवड केल्यानंतर सर्वसाधारणपणे 50 ते 60 दिवसांमध्ये ती काढण्यासाठी तयार होते आणि या जातीपासून प्रतिहेक्टरी 350 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
4.व्हाईट आयसिकल :
या जातीच्या मुळ्याची लागवड केल्यानंतर 28 ते 30 दिवसांमध्ये पीक काढणीला तयार होते.
जातीच्या मुळ्याचा रंग पांढरा असून ,मुळा सड पातळ लांबी 12 ते 15 सेंटीमीटर आणि दोन ते तीन सेंटीमीटर व्यासाचा चवीला कमी तिखट असतो.
5.रॅपिड रेड व्हाईट टिप्ड :
या मुळ्याचा रंग पांढरा असतो. मुळा खाण्यासाठी कमी तिखट असतो.
जातीच्या मुळांचा आकार हा गोल असतो आणि वरून लाल रंगाचा दिसतो. लागवड केल्यानंतर 26 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होतो.
ही मुळ्याची लवकर परिपक्व होणारे जात आहे.
6.पुसा देशी :
या जातीच्या मुळांचा रंग पांढरा असून तीस ते पस्तीस सेंटीमीटर लांब मुळा असतात.
मुळ्याचा आकार मध्यम जाड असून खाण्यासाठी तिखट असतो.
लागवड केल्यानंतर सरासरी 50 ते 60 दिवसांमध्ये हे पीक काढण्यासाठी तयार होते.
या जातीचे सरासरी उत्पन्न 30 ते 35 टन प्रती हेक्टरी पर्यंत मिळते. या जातीची लागवड ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दरम्यान केली जाते.
कारण जास्त तापमान या जातीला मानवत नाही.
7. पुसा चेतकी :
या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 40 ते 45 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते.
मुळाचा रंग पांढरा शुभ्र असून मुळा मुलायम आणि खाण्यासाठी कमी तिखट असतो.
जातीची लागवड आपण जास्त तापमान असलेल्या भागात करू शकतो.
या जातीची लागवड आपण मार्च ते ऑगस्टपर्यंत आणि ऑगस्ट ते ऑक्टोंबर महिन्यांमध्ये करू शकतो.
8.गणेश सिंथेटिक :
या जातीची लागवड रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामांमध्ये केली जाते. या जातीच्या मुलांची सरासरी लांबी 25 ते 30 सेंटीमीटर पर्यंत असून या जातीच्या मुळांचा रंग पांढरा असतो आणि मुळे ही तंतू मुळे विरहित असतात.
मुळ्यांच्या तंतूमुळे नसल्यामुळे एकदम गुळगुळीत असतात आणि मुळे चवीला तिखट असतात. या जातीचे सरासरी उत्पन्न 0 ते 55 टन हेक्टरी मिळते.
9. जेपनिज व्हाईट :
या जातीची लागवड ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यांमध्ये केली जाते.
जातीपासून सरासरी उत्पन्न 15 ते 30 जून पर्यंत मिळते. या जातीची मुळ्यांचा रंग पांढरा असतो आणि मुळ्याची लांबी वीस ते तीस सेंटीमीटर असते.
मुळ्याचा आकार हा बेलन आकार असतो आणि खाण्यासाठी मुळा तिखट कुरकुरीत असतो.
लागवड :
मुळ्याची लागवड महाराष्ट्र मध्ये वर्षभर घेतले जाते. पण व्यापारी दृष्ट्या मुळ्याची लागवड ही सप्टेंबर ते नोव्हेंबर या हंगामामध्ये केली जाते.
लागवड करण्यासाठी निवडलेली जमीन नांगरून घ्यावी आणि कोळप्याच्या सहाय्याने एकसार करून घ्यावे. सर्व ढेकळे फोडून घ्यावे आणि सरीवरंबे किंवा गादीवाफे तयार करावेत.
मुळ्याची पेरणी ही बिया टाकून केली जाते. मुळ्याची लागवड 30 × 10 सेंटिमीटर या अंतरावर करावे. एका छिद्रामध्ये दोन ते तीन बिया टाकाव्या आणि लगेच पाणी द्यावे .
मुळाचे दोन ते तीन बी उगवल्यानंतर त्यातील उत्तम प्रतीचे एक रोप ठेवून बाकीचे रोपे दुसरीकडे लावावी.
खत आणि पाणी व्यवस्थापन :
मुळ्यासाठी चांगले कुजलेले शेणखत टाकावे आणि घनजीवमृत टाकावे. ठिबक सिंचनाचा वापर केल्यास आठवड्यातून एकदा मुळ्याला 100 लिटर एकरी जीवामृत सोडावे पाणी देण्यासाठी आपण पाठ पाणी ही पद्धत किंवा ठिबक सिंचन ही पद्धत अवलंबू शकतो.
पाठ पाण्याचा पद्धती वापरल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो .त्यामुळे ठिबक सिंचन पद्धती वापरावी.
ठिबक सिंचनाने पाणी नियोजन केल्यास पाण्याची बचत होते आणि खते सोडायला सुद्धा ठिबक सिंचनाचा वापर चांगला होतो.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तीन ते चार दिवसांनी आणि हिवाळ्यामध्ये दहा ते बारा दिवसांनी मुळ्याला पाणी द्यावे.
मुळांना पाण्याचा ताण पडणार नाही याची योग्य काळजी घ्यावी. शेतामध्ये जास्त पाणी झाल्यानंतर चर खणून पाणी काढावे.
आंतरमशागत :
तन नियंत्रण करण्यासाठी वेळोवेळी खुरप्याच्या सहाय्याने खुरपणी करावी आणि खुरपणी करताना जमीन थोडी भुसभुशीत करावी.
पण त्यावेळी मुळांना त्रास होणार नाही याची योग्य काळजी घ्यावी आणि त्याचवेळी मातीला मातीने मुलांना भर द्यावी.
महत्त्वाच्या किडी आणि रोग :
किडी :
1.काळी अळी :
काळी आली ही मुळा या पिकातील सर्वात मुख्य पीक आहे .ही कीड मुळ्याचे उत्पादन कमी करते या कीडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये ह्या आळ्या पाने खातात.
त्यामुळे पानावर छिद्र पडते आणि परिणामी मुळ्याचे उत्पन्न कमी येते. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.
2.मावा :
ढगाळ वातावरणामध्ये या किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो. ह्या किडींचे प्रौढ आणि पिल्ले दोन्ही पानातून अन्न रस मोठ्या प्रमाणावर शोषून घेतात.
त्यामुळे पीक कमकुवत होते आणि पाने गुंडाळले जातात आणि रोप पिवळे पडून मरते आणि ही कीड मोठ्या प्रमाणावर चिकट गोड पदार्थ स्त्रवते त्या पदार्थावर काळे बुरशी आकर्षित होते.
त्यामुळे पूर्ण पान काळे पडते आणि प्रकाश संश्लेषणची क्रिया मंदावते आणि परिणामी पीक मरते.
या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा.
रोग
1. करपा :
या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळी दिवसांमध्ये जास्त प्रमाणावर होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानावर पिवळे फुगीरदार आणि चट्टे पडले जातात.
नंतर हे चट्टे हळूहळू खोडावर आणि शेंगावर सुद्धा येतात हा एक बुरशीजन्य रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.
काढणी आणि उत्पादन :
मुळ्याची काढणी ही भाजीसाठी आणि कंदांसाठी दोन्हीसाठी केली जाते.
भाजीसाठी काढणी करताना पाने कोवळी असतानाच काढून जोडी बनवून विकली जाते आणि मुळ्यासाठी जेव्हा कंद पूर्णपणे तयार होतात तेव्हा ते पानासोबत उकडून त्याला स्वच्छ करून विक्रीसाठी पाठवले जाते.
सर्वसाधारणपणे मुळ्याचे हेक्टरी 15 ते 20 टन पर्यंत उत्पन्न भेटते.
वेगवेगळ्या जातीनुसार उत्पन्न वेगवेगळे येते आणि लागवडीच्या वेळी आणि वाढीच्या वेळी असलेल्या वातावरणात सुद्धा उत्पन्नावर परिणाम होतो.
Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi