अननस लागवड
अननस हे फळ पिकातील खूप रसाळ फळ आहे. या फळाची चव आंबट-गोड असते .हे एक आरोग्यदायी फळ आहे. अननस मध्ये विटामिन सी, विटामिन बी 6 मॅग्नेशियम, तांबे, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी अननस आहारामध्ये घ्यावे.अननस मध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म आढळतात. त्याचा आहारात वापर केल्यामुळे सांधेदुखी पासून मुक्ती मिळते. अननस मुळे जळल्यानंतर किंवा दुखापत झाल्यानंतर होणाऱ्या संक्रमण टाळले जातात.अननस मध्ये फिनोलिक ऍसिड हे अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे पेशींना फ्री रॅडिकल्स च्या नुकसानी पासून वाचवण्यासाठी मदत करतात. अननस व्यायामानंतर आहारामध्ये घेतल्यामुळे स्नायूंच्या वेदना कमी होण्यासाठी मदत होते आणि स्नायू लवकर बरे होतात. अननस खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
निरोगी राहण्यासाठी मदत होते. ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे असेल त्यांनी उन्हाळ्यामध्ये मर्यादित प्रमाणामध्ये अननस खाल्ल्याने पोटाची चरबी झपाट्याने कमी होते आणि शरीर हायड्रेटरी ठेवण्यासोबतच शरीराचे मेटाबोलिस्म वाढते .त्यामुळे वजन आपोआप कमी होण्यासाठी मदत होते.अननस मध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर असते .त्यामुळे शरीरामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील कमी होते आणि लठ्ठपणापासून आराम मिळतो. हृदयाशी संबंधित असलेले आजारांपासून धोका कमी होतो. अननस मध्ये कॅल्शियमचे प्रमाण असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी आणि शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते.
अननस आपण कॅनिंग करून विदेशामध्ये पाठवू शकतो या व्यवसायाला खूप मागणी आहे. 50 खाल्ल्यामुळे कर्करोगापासून बचाव होतो आणि शरीरातून देखील आणि मग खाल्ल्यामुळे वेगवेगळ्या इन्फेक्शन पासून आपल्या शरीराचे संरक्षण होते जे लोक माउस खातात अशा लोकांना अननस खाल्ल्यानंतर माऊस पचवण्यासाठी मदत होते. अननस खाल्ल्यामुळे शरीरामधील कॉलेज संश्लेषण करण्यामध्ये मदत करते त्यामुळे त्याच्या मजबूत राहते. अननस या पिकाची लागवड करून शेतकरी एक्सपोर्ट करू शकतात त्यामुळे त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
लागणारी जमीन :
अननस लागवड योग्य निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये चांगली होते. ज्या जमिनींचा सामू 6 पेक्षा जास्त असतो,अशा जमिनींमध्ये अननस ची लागवड करावी.
दलदली युक्त आणि पाणी साचणारा जमिनीमध्ये अननसची लागवड करणे टाळावे.
ज्या जमिनीमध्ये अमयुक्त पदार्थ किंचित जास्त असतात अशा जमिनींमध्ये अननस ची लागवड योग्य होते.
ज्या जमिनी मध्ये सेंद्रिय पदार्थ भरपूर असतात अश्या जमिनी मध्ये लागवड चांगली ठरते.
लागणारे हवामान :
अननस साठी उष्ण आणि दमट हवामान चांगले मानले जाते.
अन्ननास हे पीक 15 ते 30 डिग्री अंश सेल्सिअस हे तापमान मध्ये चांगले येते.
पाणी साठवून करण्याचा क्षमतेमुळे अननस जास्त प्रमाणामध्ये दुष्काळ सहन करू शकते.
ज्या भागांमध्ये 35 डिग्री सेल्सियस पेक्षा तापमान जास्त असते, अशा भागांमध्ये अननस या पिकावर विपरीत परिणाम होतात.
अननस या पिकाला 100 ते 200 सेंटीमीटर पर्यंत पावसाचे गरज असते एवढ्या प्रमाणाच्या पावसामध्ये आणून असते ते चांगले येऊ शकते.
सुधारीत जाती :
1.क्वीन :
या जातीच्या फळांचे वजन एक ते दीड किलोपर्यंत भरते आणि या जातीच्या पानांना अनुकुचीदार दाते असलेली दिसतात.
फळे ही खायला खुसखुशीत आणि गोडीला चांगली असतात .या फळांचा वापर कापून खाण्यासाठी केला जातो आणि फळ्यांची डोळे आत असल्यामुळे ही जात केनींग साठी अयोग्य असते. फळांचा दर्जा उत्तम मानला जातो.
2.मॉरिशियस :
क्वीन जाती सारखीच ही जात देखील काटेरी आणि फळांवरील डोळे खोलगट गेलेले असते. या जातीच्या फळांचे वजन एक ते दीड किलो पर्यंत भरतात आणि खाण्यासाठी उत्तम मानली जाते .फळांच्या रंगावरून या जातीमध्ये मॉरिशस रेड आणि मॉरिशस येलो असे दोन प्रकार पडलेले आपल्याला दिसतात.
3.क्यू :
अन्ननास ची ही जात कॅनिंग साठी अतिउत्तम मानली जाते .या जातीच्या फळांचे वजन सरासरी दीड ते अडीच किलो पर्यंत असते आणि पानांना काटे टोकाकडे सोडल्यास इतरत्र नसतात .या फळांचा वापर विशेष करून चकत्या डब्यात बंद करून कॅनिंग साठी केला जातो.
4.जायंट क्यू :
ही जात क्यू जाती सारखी दिसायला असते .या जातीची फळे मोठे असून वजनाने 2.5 ते 3.5 किलो पर्यंत भरतात आणि या जातीचा वापर देखील काम करून हवाबंद डब्यामध्ये ठेवून कॅनिंग साठी वापरली जाते.
अभिवृध्दी :
अननस ची अभिवृद्धी ही शाखीय पद्धतीने केली जाते. अननस ची अभिवृद्धी जमिनीपासून येणाऱ्या फुटव्यांना, फळा खालचा मूळ दांडा व पाने यामध्ये वाढणाऱ्या फळाखालील कोंब आणि फळावरील शेंडे या सगळ्यांपासून केली जाऊ शकते.
सुमारे 450 ग्रॅम वजनाचे फुटवे लागवडीसाठी वापरले जातात. फुटवे वापरून लागवड केली तर 18 ते 22 महिन्यांनी फळ तयार होते.
फळाखाली येणाऱ्या कोंबांचा आणि फळावरील पानांच्या शेंड्यांचा उपयोग जर आपण लागवडीसाठी केला तर अशा परिस्थितीमध्ये 22 ते 24 महिन्यांमध्ये फळे काढण्यासाठी तयार होतात.
मुळा फुटण्यासाठी लागवडी पूर्वी तळाची पाने काढावीत आणि फुटवे दहा ते बारा दिवस सावलीमध्ये साठवावे.
अशावेळी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी अति पावसाळ्यामध्ये लागवड करू नये.
कोकणामध्ये ऑगस्ट सप्टेंबर महिन्यांमध्ये लागवड केली जाते.
लागवड :
लागवडीसाठी निवडलेली जमीन चांगली नांगरून घ्यावी आणि सर्व ढेकळे फोडून तीस ते चाळीस सेंटीमीटर खोलीपर्यंत कुळवून भुसभुशीत करावे.
सर्वजण सपाट करून एकसारखे करून घ्यावे. नांगरट करत असतानाच हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत टाकून घ्यावे.
खत टाकल्यानंतर कोळप्याच्या सहाय्याने सर्व खत मातीमध्ये मिसळून घ्यावे.
या पिकाचे लागवड ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये केली जाते.
लागवड करण्यासाठी 30 ते 40 सेमी खोलीचे तीन ते चार मीटर लांबीपर्यंत सर तयार करून घ्यावेत आणि दोन सरांमधील अंतर 90 सेंटीमीटर ठेवावे आणि दोन रांगेमधील अंतर 60 सेंटीमीटर ठेवून दोन झाडांमधील अंतर 15 सेंटीमीटर पर्यंत असावे.
ज्यावेळी आपण विरळ लागवड करतो अशा लागवडीमध्ये दोन झाडांमधील अंतर तीस सेंटीमीटर ते 45 सेंटीमीटर पर्यंत ठेवू शकतो.
अशा पद्धतीने लागवड केल्याने हेक्टरी जास्त झाडे मिळतात आणि उत्पन्न देखील जास्त मिळते.
अननस ची लागवड जवळजवळ करू नये, त्यामुळे फळांचे वजन कमी भरू शकते आणि उत्पन्न देखील कमी येते.
अन्ननास ची लागवड नारळाच्या भागांमध्ये मिश्र पीक म्हणून सुद्धा केली जाते.
लागवड करताना झाडांच्या आतील पोंग्यांमध्ये माती जाणार नाही याची योग्य काळजी घ्यावी.
खत आणि पाणीपुरवठा :
अननसची लागवड करण्याच्या अगोदर नांगरट करता वेळी जमिनीमध्ये चांगल्या प्रमाणात कुजलेले शेणखत घन जीवामृत किंवा गांडूळ खत टाकून घ्यावे आणि ज्या ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे.
अशा ठिकाणी जीवामृत ठिबक सिंचनाद्वारे सोडावे आणि ज्या ठिकाणी पाठ पाण्याचा वापर केला जातो.
अशा ठिकाणी पाठ पाण्यामधून सुद्धा आपण जीवामृत सोडू शकतो.
जीवामृत सोडल्यामुळे फळांचे आकार वाढण्यासाठी मदत होतो आणि जमीन भुसभुशीत राहते.
त्यामुळे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होते. पाण्याचे नियोजन जमिनीच्या मगदूराप्रमाणे करावे सर्वसाधारणपणे हिवाळ्यामध्ये आठ ते दहा दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यामध्ये सहा ते आठ दिवसाच्या अंतराने अन्ननासला पाणी द्यावे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचा निचरा होणे हे गरजेचे असते.
त्यासाठी योग्य अंतरावर अन्ननास काढावेत.
आंतर मशागत :
अननसच्या पिकाला मातीची भर देणे गरजेचे असते. कारण अननस जमिनीवर लोळते. खते दिल्यानंतर जास्त करून लगेच मातीची भर द्यावी.
अननस लागवड केल्यानंतर राहिलेल्या जमिनीवर गवताचे आच्छादन करावे .त्यामुळे त्यांची वाढ होत नाही आणि जमिनीमध्ये ओलावा देखील टिकून राहतो आणि पाण्याची सुद्धा बचत होते.
काही जागी मल्चिंग पेपरचा सुद्धा वापर केला जातो. असे करून देखील तणांचा प्रादुर्भाव जास्त दिसत असेल तर खुरप्याच्या साह्याने वेळोवेळी खुरपणी करून घ्यावे.
ज्या ठिकाणी रोपांची गर्दी झाली असेल अशा ठिकाणी रोपांची विरळणी करावी आणि योग्य अंतरावर लावावे.
खोडवा पीक :
26 ते 30 महिन्यांमध्ये आपण या फळाचे दोन पिके घेऊ शकतो.
अननसाचे फक्त आपण एक खोडवा पीक घेऊ शकतो. मुख्य पीक तयार होण्यासाठी सर्वसाधारणपणे 16 ते 18 महिन्यांचा कालावधी जातो आणि खोडवा पीक तयार होण्यासाठी 12 ते 13 महिन्यांचा कालावधी आपल्याला लागतो.
खोडवा पीक घेतल्यानंतर सर्वसाधारणपणे निम्मे उत्पन्न आपल्याला मिळते.
पहिला हंगाम झाल्यानंतर फळाच्या काढणीनंतर एकच जोमदार फुटवा ठेवावा आणि बाकीचे राहिलेले फुटवे आणि मूळ झाड कापून टाकावे आणि ते फुटवे आपण नवीन लागवडीसाठी वापरू शकतो.
खोडवा पिकाला सुद्धा मुख्य पिका सारखे खते आणि पाण्याचा पुरवठा करावा.
कीड आणि रोग :
या पिकावर विशेष असे किडे आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत नाही.
फळांची काढणी आणि उत्पादन :
फळे तयार झाल्यानंतर फळाच्या खालचे एक ते दोन ओळीतील डोळे पिवळे झालेले दिसतात असे लक्षण दिसल्यानंतर फळ काढण्यासाठी तयार झालेले आहे असे समजावे.
फळ दांड्यासह कापून काढावे. फळाला कोणत्या इजा होणार नाही याची योग्य काळजी घ्यावी.
अन्यथा त्यातून रस पाजळतो आणि फळे कुजतात.
त्यामुळे उत्पन्नामध्ये घट येते लागवडीच्या अंतरानुसार प्रतिहेक्टरी 36 ते 67 पर्यंत उत्पादन मिळू शकते आणि खोडवा पिकापासून मुख्य पिकाच्या निम्मे उत्पन्न आपल्याला मिळते.
अशा प्रकारे आपण अननसाचे तीन वर्षांमध्ये दोन पिके घेऊ शकतो.
अननस चे उत्पादन लागवडीच्या वेळी केलेले योग्य नियोजन आणि वातावरण यावर देखील अवलंबून असते.
Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi