Blogमसाले

सुपारी लागवड

5/5 - (1 vote)

सुपारी या पिकाची लागवड कोकण किनारपट्टी या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येते. सुपारीचा वापर सत्यनारायण पूजा, लग्न समारंभ, वास्तुशांती, वगैरे अशा धार्मिक गोष्टींसाठी केला जातो. सुपरीचा उपयोग खाण्यासाठी, तसेच मसाला सुपारीसाठी केला जातो. सुपारी शिजवल्यानंतर येणाऱ्या तवंगाचा वापर होडींना वंगण म्हणून लावला जातो. त्यामुळे खाऱ्या पाण्याचा परिणाम होडीच्या लाकडावर होत नाही. किनारपट्टीच्या किनारी मोठ्या प्रमाणावर सुपारी लागवड केली जाते. सुपारीची फळे ही खोडाला लागतात. आणि जावळ्या शेंड्याला असतात. सुपारीचा रंग कोवळी असताना हिरवा असतो आणि पिकल्यावर केशरी रंगाची असते. सुपारी खाल्ल्याने पाचन तंत्र चांगले होते. दररोज सुपारी खाल्ल्यामुळे पोटाच्या समस्या दूर व्हायला सुरुवात होतात.

ज्या व्यक्तींना अल्सर ची समस्या असते त्यांनी सुपारीचे सेवन केल्यानंतर ती समस्या दूर होते. सुपारी मध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराला होणाऱ्या डोकेदुखी, सांधेदुखी आणि पाठीचा त्रास कमी होतो आणि आपल्या स्नायूंना वेदनापासून मुक्ती मिळते. सुपारी खाल्ल्याने शरीराची ऊर्जा वाढते आणि एकाग्रता सुद्धा वाढते. अतिसार च्या समस्या आणि बद्धकोष्ठताच्या समस्या साठी सुपारी आरोग्यदायी ठरते. अशक्तपणाचा त्रास असल्यास सुपारीचे सेवन केले तर चांगला फायदा मिळतो. सुपारी चा वापर आपण माउथ फ्रेशनर म्हणून करू शकतो. श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी सुपारीचा चांगला फायदा होतो. सुपारी मुळे पित्ताचा त्रास देखील कमी होतो. सुपारीची लागवड ही जगामध्ये बांगलादेश, आफ्रिका, ईस्ट इंडीज, भारत, चीन, जपान, फिलिपाईन्स या प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते.

लागणारी जमीन :

सुपारी साठी जांभी मृदा उत्तम ठरते. ज्या जमिनीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा होतो आणि समुद्रकाठच्या गाळाच्या पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या वाळूच्या बारामाहीत पाण्याच्या जमिनी सुपारीसाठी अतिउत्तम ठरतात.

ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ जास्त प्रमाणामध्ये असतात.

अशा जमिनीमध्ये सुपारीची लागवड उत्तम होते.

ज्या जमिनीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा होत नाही, अशा जमिनींमध्ये सुपारीची लागवड करू नये.

तसे केल्यास सुपारीच्या झाडांना मूळ कुज हा रोग होतो.

लागणारे हवामान :

सुपारीच्या लागवडीसाठी दमट वातावरणाची गरज असते.

महाराष्ट्र मधील कोकण हा विभाग सुपारी लागवडीसाठी हवामानाच्या दृष्टीने चांगला ठरतो.

सुपारीच्या लागवडीसाठी पाण्याची गरज असते.

कोकण या विभागांमध्ये पाऊस जास्त प्रमाणामध्ये पडतो, अशा ठिकाणी सुपारीची लागवड चांगली होते.

या पिकासाठी वीस ते पस्तीस अंश सेल्सिअस तापमान चांगले मानवते.

ज्या वातावरणामध्ये आद्रतेचे प्रमाण जास्त असते.

अशा वातावरणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव जास्त झालेला दिसतो.

सुधारित जाती :

श्रीवर्धनी :

सुपारीची ही जात डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या विद्यापीठाने विकसित केलेली आहे.

या जातीच्या सुपार्‍या मोठ्या आकाराच्या असतात.

सुपारी मध्ये पांढऱ्या गराचे प्रमाण अधिक असते आणि सुपारी आतून नरम असते.

या जातीच्या सुपाऱ्यांचा आकार आकर्षक असल्याने या जातीच्या सुपाऱ्यांना चांगला दर मिळतो.

या जातीच्या झाडांपासून प्रतिवर्षी सुमारे दोन किलो सोललेल्या सुपारी मिळतात.

रोपांची निवड आणि लागवड:

सुपारी या पिकाची लागवड ही रोपां पासूनच करता येते.

लागवड करण्यासाठी कमी उंचीची, जास्त पाने असलेले जाड बुंद्याची, एक वर्षापेक्षा मोठी वयाने रोपे असलेली निवडावे.

निवडलेला रोपांमध्ये कमीत कमी चार ते पाच पाने असावेत आणि बुंदा आखूड आणि जाड असल्यावर रोपांची लागवड करण्यासाठी घ्यावे .ज्या रोपांची वाढ सावली मध्ये होते आणि झाडाची उंची जास्त असते.

अशा रोपांची निवड लागवडीसाठी करू नये. लागवड करण्यासाठी लागवडीसाठी निवडलेली जागा पूर्णपणे स्वच्छ करावी.

झाडे झुडपे तोडून टाकावे आणि जमीन सपाट करून लागवडी साठी 60× 60 ×60 सेंटीमीटर च्या आकाराचे खड्डे पाडले जातात.

खड्ड्यांचे अंतर दोन ते तीन मीटर या अंतरावर केली जाते.

लागवड करण्याच्या अगोदर जमिनीमध्ये किंवा खड्ड्यांमध्ये शेणखत, चांगली माती किंवा गांडूळ खत भरले जाते आणि मग लागवड केली जाते.

रोपांची लागवड ही जून महिन्यांमध्ये केली जाते. ज्या ठिकाणी पाणी साचून राहण्याची शक्यता असते.

अशा ठिकाणी ऑक्टोंबर ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सुपारीची लागवड केली जाते.

लागवड केल्यानंतर रोपांची चांगली वाढ होईपर्यंत कुंपण घातले जाते.

दक्षिणेकडील तीव्र सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये झाड शेडनेट ने झाकली जातात आणि दक्षिणेच्या बाजूला मोठ्या झाडांची लागवड केली जाते.

जेणेकरून सरळ सूर्यप्रकाश सुपारीच्या झाडावर पडणार नाही.

निलगिरीच्या झाडांचा वापर बागेभोवती लावण्यासाठी केला जातो. त्यामुळे झाडांचे वाऱ्यांपासून संरक्षण होते.

खत आणि पाणी व्यवस्थापन :

खड्डे काढताना त्यामध्ये आपण शेणखत किंवा घन जीवामृत किंवा गांडूळ खत आणि चांगली माती टाकतो.

त्यानंतर सुपारीच्या झाडांना प्रत्येक वर्षी खत घालावे लागते.

खत घालण्यासाठी पहिल्या वर्षी दोन घमेले शेणखत आणि जीवामृत सोडावे.

आठवड्यातून एकदा झाडाच्या वयानुसार जीवामृत झाडांना द्यावे.

त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि उत्पन्न वाढते.

जीवामृत हे झाडाला आळी करून त्यामध्ये ओतावे.

झाडापासून एक मीटरच्या लांबीवर आळे करावे.

त्यामुळे झाडाची मुळे लगेच जीवामृत किंवा पाणी शोषून घेतात.

पाण्याचे व्यवस्थापन जमीन आणि हवामानाच्या नुसार केले जाते.

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सात ते आठ दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चार ते पाच दिवसाच्या अंतराने सुपारीला पाणी दिले जाते.

पावसाळ्यामध्ये सुपारीला पाणी देण्याची गरज नसते.

त्यावेळी झाडांना पानाचा ताण पडतो.

त्यावेळी फळे फुटून मोठ्या प्रमाणामध्ये फळगळ होते अशावेळी बागेला पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात.

म्हणजे ओलावा राहतो आणि फळे फुटत नाही.

अंतर मशागत आणि आंतरपिके :

लागवड केल्यानंतर झाडाच्या आळ्या मधील सर्व गवत खुरप्याच्या सहाय्याने काढून घ्यावे.

सुपारीच्या बागेमध्ये हळद, सेलम किंवा सुरण, बटाटा अद्रक, या कमी कालावधीच्या पिकांची लागवड केली जाते.

सुपारी हे सुद्धा नारळ बागेमध्ये आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

बागेमध्ये आपण हिरवळीच्या खतांची देखील आंतरपीक म्हणून लागण करू शकतो.

त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि जमिनीमध्ये सूक्ष्म किड्यांची आणि सूक्ष्म द्रव्यांचे कमतरता भरून निघते.

जमिनीमध्ये ऑरगॅनिक कार्बनचे प्रमाण देखील वाढते.

महत्वाच्या किडी आणि रोग

1. खवले कीड :

ही एक रस शोषक कीड आहे हे कीड फळांच्या साली मधून मोठ्या प्रमाणावर रस शोषते त्यामुळे फळांचा आकार वाढत नाही आणि फळे सुरकुतलेली दिसतात .या किडीच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर सुद्धा कधीकधी दिसून येतो .जर प्रभाव तीव्र असला तर फळे गळून पडतात. या किडीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.

रोग

1. कोळे रोग :

या रोगाचा प्रादुर्भाव सुपारीच्या देठावर होतो .त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सुपारींची गळ होते . कोळे रोग हा बुरशीजन्य रोग आहे. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर झाडावरच्या वाळलेल्या झावळ्या काढून टाकावे आणि त्यानंतर जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.

2. खोड भाजणे :

झाडाच्या पश्चिम आणि दक्षिण दिशेवर खोडावर सतत पडणाऱ्या सूर्यकिरणामुळे ठराविक भागातील खोड भाजल्यासारखी दिसतात आणि खोलगट आणि काळे पडते .काही काळ गेल्यानंतर ते झाड वाऱ्यामुळे तुटून पडते .या नुकसानी पासून वाचण्यासाठी दक्षिणेच्या आणि पश्चिमेच्या बाजूला उंच वाढणारे झाडे लावावी. तसेच ज्या खोडांवर दाग दिसत आहेत ,अशा खोडावर गवताचा पिंडा किंवा सुपारीची जांभळी बांधावी.

3. फळे फुटणे :

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडल्यानंतर आठ ते पंधरा दिवसांचा खंड पडतो .त्यामुळे पाण्याच्या कमीमुळे सुपारीची फळे मोठ्या प्रमाणावर गळतात. अशावेळी कृत्रिम रित्या सुपारीच्या झाडांना आळे करून पाणी द्यावे .पाण्याचा ताण पडू नये याची योग्य काळजी घ्यावी.

4. मूळ कुजणे :

ज्या जमिनीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा होत नाही, अशा जमिनीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो .या रोगाची लागण झाल्यानंतर सुपारीच्या झाडाचा शेंडा फिकट पिवळा होतो. आणि सर्व पाने खाली वाकलेली दिसतात. पोफळीच्या बुंध्यातून चिकट तांबड्या रंगाचा पदार्थ बाहेर आलेला दिसतो . पाने खाली आल्यामुळे त्यावर बुरशीची वाढ झालेली सुद्धा दिसते. प्रादुर्भाव वाढल्यानंतर कमी काळामध्येच झाडाचा शेंडा सुटतो आणि झाड पूर्णपणे मरते. या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बुरशीनाशकांची फवारणी करावी आणि बागेमध्ये स्वच्छता ठेवावी.

5. बांड रोग :

या रोगाचा प्रादुर्भाव प्रमाणापेक्षा जास्त खतांचा वापर आणि पाण्याचा पुरवठा कमी पडल्यानंतर होतो. ज्या बागे मध्ये अंतर मशागतीचा अभाव असतो आणि पाण्याचा निचरा होत नाही. त्या भागांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पाणी कमी लांबीची येतात आणि शेंड्याजवळ पानांचा गुच्छ तयार झालेला दिसतो. पानांचा रंग गडद हिरवा होऊन पाणी हाताने कुस्करले असता, कडकड असा आवाज येतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर काहीच दिवसांमध्ये झाडाला फळधारणा होणे बंद होते. या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी बागेमध्ये चर काढून पाण्याचा व्यवस्थित निचरा करावा. तसेच कमी खोलीच्या खडकाळ जमिनीमध्ये लागवड करू नये.

काढणी आणि उत्पादन :

सुपारीची फळे तयार झाल्यानंतर त्यांचा रंग हिरव्या पासून नारंगी मध्ये होतो.

फळे तयार झाल्यानंतर संपूर्ण घडे खाली काढली जातात.

त्यानंतर फळावरील सालीचे पट्टे काढतात आणि उन्हामध्ये 40 ते 45 दिवसांपर्यंत पण फळे सुकवली जातात.

झाडाच्या वयानुसार दरवर्षी सरासरी एका झाडापासून तीन घड मिळू शकतात.

त्यापासून दीड ते अडीच किलो सुखलेली सुपारी मिळते.

सुमारे 90% सुपारी ऑक्टोबर पासून जानेवारी या महिन्यांमध्ये काढण्यासाठी तयार होते.

सुपारीवर प्रक्रिया करून त्यानंतर सुपारी मार्केटमध्ये विकली जाते.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/fruits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *