Blogफळ

आवळा लागवड :

5/5 - (1 vote)

आवळ्याचे उगम स्थान हे दक्षिण पूर्व आशियातील मध्य आणि दक्षिण भारतात मानले जाते. आवळ्याचा वापर च्यवनपराश, मोरावळा, आवळा कॅन्डी, आवळा सुपारी, पावडर, लोणची, जेली, कँडी, असे पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. आवळा हा महाराष्ट्र मध्ये सह्याद्री, सातपुडा, अजिंठ्याच्या डोंगरात व अकोला, बुलढाणा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, सातारा, जळगाव, यवतमाळ, या भागांमध्ये जंगलामध्ये ही सर्व ही झाडे जास्त प्रमाणामध्ये आढळतात. आवळ्यामध्ये क जीवनसत्त्वाचे भरपूर प्रमाण असते. आवळा मध्ये काही औषधी गुणधर्म आहेत जसे की मधुमेहावर, तापावर आवळ्याचा उपयोग करता येतो. आवळा आहे पचनासाठी उत्तम असते. आवळ्याच्या रसामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे पचनाच्या त्रासांपासून सुटका होते.

तसेच ऍसिडिटी आणि बद्धकोष्टता सारख्या समस्या आवळा खाल्ल्यामुळे दूर होतात. आवळा खाल्ल्यामुळे सांधेदुखी पासून शरीराची सुटका होते. कारण आवळ्यामध्ये असणाऱ्या अँटी इन्फ्लेमेटरी गुणांमुळे शरीरावर असलेली सूज कमी होते. आवळा खाल्ल्यामुळे रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रित होते. त्यामुळे आवळ्याचे सेवन मधुमेहासाठी गुणकारी असते. आवळा खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात आणि केस गळती थांबवण्यासाठी आवळा मदत करतो .आवळ्यामध्ये विटामिन `सी ‘ चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा निरोगी राहते आणि केस सुद्धा चमकदार बनतात आणि शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. आवळा खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात. त्यामुळे शरीराचे वजन वाढत नाही आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते.

लागणारी जमीन :

हलक्यापासून ते भारी जमिनीमध्ये आवळ्याची लागवड केली जाते. हलक्या जमिनीमध्ये आवळ्यांची लागवड जास्त प्रमाणामध्ये केली जाते.

आवळ्यासाठी जमिनीचा सामू 6.5 ते 9.5 असला तर आवळ्याचे उत्पन्न चांगले येते.

फक्त रेताड आणि चुनखडी युक्त असलेल्या जमिनीमध्ये आवळ्याची लागवड करू नये.

आवळ्याची लागवड अत्यंत हलक्या, भारी, मुरमाळ, गाळाची, बरड अशा सर्व जमीन मध्ये करता येते.

लागणारे हवामान :

आवळा आहे समक्षशितोषणा हवामानामधील फळझाड असून ज्या भागांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात जास्त तापमान असते आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अति थंडी असते अशा भागांमध्ये सुद्धा आवळ्याची लागण केली जाते आणि उत्पन्नही चांगले मिळते.

आवळ्याला पाण्याची गरज जास्त नसते .त्यामुळे दुष्काळी भागांमध्ये आवळ्याचे पीक घेतले जाऊ शकते.

ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो त्या ठिकाणी आवळ्याचे फळझाड हे वरदान मानले जाते.

आवळ्याच्या सुधारित जाती :

1. कृष्णा :

आवळ्याच्या ह्या जातीची फळे मध्यम ते मोठ्या आकाराची चमकदार ,पिवळ्या रंगाची साल आणि लाल छटा असलेली मऊ सालीचे असतात.

या जातीच्या आवळा पासून टिकाऊ पदार्थ तयार केले जातात. या जातीच्या एका फळाचे सरासरी वजन 35 ते 40 ग्राम पर्यंत असते. या जातीपासून मुरब्बा जास्त प्रमाणामध्ये बनवला जातो.

2.बनारसी :

या जातीच्या अवळ्या पासून लोणचे आणि मुरब्बा बनविला जातो .उत्तर प्रदेशांमध्ये या जातीच्या आवळ्याचे लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

जातीच्या फळांचे वजन सरासरी 40 ते 45 ग्रॅम पर्यंत असते आणि फळांचा आकार मोठा असून रंग पिवळा चकचकीत असतो.

3.कांचन :

या जातीच्या फळांचा आकार मध्यम आणि रंग पिवळा असतो. ही आवळ्याची भरपूर उत्पन्न देणारी जात आहे. या जातीच्या फळांचे वजन 30 ते 32 का ग्राम पर्यंत असते. या जातीचा उपयोग लोणच्यासाठी आणि पावडर तयार करण्यासाठी केला जातो.

4.हाथीझूल

आवळ्याच्या या जातीच्या फळांचे वजन सरासरी 40 ग्रॅम पर्यंत असते आणि फळे आकाराने गोल असून फळांचा रंग हिरो पिवळा असतो.

5.नरेंद्र आवळा -7 :

या जातीची फळे नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यांमध्ये तयार होतात आणि फळे ही आकाराने मोठे असतात.

फळांची सरासरी वजन 40 ते 50 ग्रॅम पर्यंत असते. या जातीची झाडे थेट सरळ वाढतात आणि फळांचा आकार हा लंबगोल असतो.

या जातीमध्ये नेक्रोसिस हा रोग नसतो. या जातीची लागवड जास्त प्रमाणामध्ये केले जाते.

6.नरेंद्र – 6 :

या जातीची फळे मध्यम गोल आकाराची असून फळांचा रंग हा पिवळसर हिरवट असतो. या जातीचे संशोधन चकीया जातीपासून केलेले आहे. या जातीच्या फळांचा रंग हा पिवळा असतो आणि पृष्ठभाग चमकदार असतो.

7.आनंद -1 :

तिच्या एका झाडाला सरासरी 75 ते 80 किलो फळे लागतात आणि फळे ही मोठे गोल पांढऱ्या रंगाची रेषा ही आणि गुलाबी छटा असलेली असतात. फळेही पारदर्शक असतात या जातीच्या झाडांची उंची मध्यम असून फांद्या पसरतात आणि खोडाची साल देखील पांढरे असते.

8.आनंद -2 :

आवळ्याच्या या जातीची झाडे मध्यम ते उंच जातीचे असतात. एका फळाचे सरासरी वजन 45 ग्राम पर्यंत असून खोडाची साल ही भुरक्या रंगाची असते आणि फळे देखील मोठे असतात.

9. चकिया :

आवळ्याची ही जात सुप्रसिद्ध जात मांडली जाते. उशिरा फळे देते पण नियमित आणि भरपूर उत्पादन देणारे अशी जात आहे.

या जातीच्या फळांचा आकार मध्यम असतो आणि फळेही रंगाने हिरवट असून चपटी असतात.

फळांचा वापर जास्त प्रमाणामध्ये टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो.

एका फळाचे सरासरी वजन 30 ते 32 ग्रॅम पर्यंत असते. या जातीच्या फळांमध्ये फळगळ होत नाही.

त्यामुळे व्यापारी उत्पादनासाठी या जातीची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते.

हे जात निक्रोसिस या रोगाला बळी पडत नाही.

अभिवृद्धी आणि लागवड :

आवळ्याची लागवड ही प्रामुख्याने बियांपासून आणि डोळे भरून केले जाते.

बियांपासून लागवड केल्यामुळे फळे उशिरा येतात आणि उत्पादन देखील कमी येते.

त्यांची प्रत देखील एकसारखी नसते .त्यामुळे फळांना आवळ्याची लागवड डोळे भरून केले जाते.

डोळे भरण्याचे काम हे जुलै किंवा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी मार्च महिन्यांमध्ये तिन्ही हंगामांमध्ये केले जाते.

डोळे भरण्यासाठी मात्र एक वर्षाचा खुंट वापरावा जर आपण जागेवरच खुंट रोपे लावून त्यावर डोळे भरले तर उत्पादनामध्ये चांगले यश मिळते.

आवळ्याच्या फांदीवर नर व मादी फुले ही वेगवेगळ्या भागांवर येतात मादी फुले फांदीच्या टोकाकडील भागातच जास्त येतात.

त्यामुळे डोळे काडी निवडताना मादी फुलांचे प्रमाण जास्त असलेली फांदी करण्यासाठी निवडावी.

शेतामध्ये लागवड करताना निवडलेली जमीन ही योग्यरीत्या नांगरून घ्यावे.

सर्व ढेकळे फोडून घ्यावे आणि पावसाळ्याच्या अगोदर खड्डे पाडून घ्यावे.

त्या खड्ड्यांमध्ये दोन ते तीन घमेली शेणखत, पोयटा माती किंवा घन जीवामृत यांचे मिश्रण भरावे आणि खड्डे पावसाच्या सुरुवातीलाच भरून घ्यावे आणि मग योग्य अंतरावर लागवड करावी.

लागवडीनंतर नंतर लगेच पाणी सोडावे. लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये आवळ्याच्या रोपांना बांबूच्या काट्यांचा आधार दिला जातो.

लागवडीसाठी हंगाम आणि लागवडीचे योग्य अंतर :

आवळ्याची लागवड ही शक्यतो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केली जाते.

कमी पावसाच्या प्रदेशांमध्ये जागेवरच बी पेरून रोपे वाढवून त्यावर एका वर्षानंतर डोळे भरले जातात.

रोपांची लागवड केल्यानंतर रोपांची पाने गळू लागतात आणि थोड्या दिवसांमध्येच नवीन पालवी फुटते.

आवळ्याची लागवड 8 ×8 मी. अंतरावर केल्यावर उत्पन्न चांगले मिळते.

आवळ्यासाठी योग्य वळण आणि छाटणी :

आवळ्याची लागवड केल्यानंतर सुरुवातीपासूनच योग्य वळण देणे गरजेचे असते.

त्यासाठी झाडावर जमिनीपासून एक मीटर उंचीवर पाच ते सहा जोरदार फांद्या योग्य अंतरावर चारही दिशांना पसरलेल्या वाढतील.

अशा ठेवाव्या आणि वारंवार खोडावर येणारी फुट काढून टाकावे आणि त्यानंतर फळांचा बहार संपल्यानंतर रोगाट, कमजोर झालेल्या, वाळलेल्या, फांद्या वेळोवेळी छाटाव्या.

खत आणि पाणी नियोजन :

जमीन नांगरत असताना त्याच वेळी जमिनीमध्ये शेणखत किंवा घन जीवामृत टाकून घ्यावे आणि झाडांना एका आठवड्यातून शंभर लिटर जीवामृत एकरी ठिबक सिंचनातून सोडावे ठिबक सिंचनाचा वापर न केल्यास जीवामृत आळे करून ओतावे .

आवळ्याचे झाड पाण्याचा ताण सहन करू शकते त्यामुळे आठ ते दहा दिवसाच्या अंतरावर आपण आवळ्याच्या झाडांना पाणी देऊ शकतो.

मात्र सुरुवातीच्या काळामध्ये झाड जमिनीमध्ये तग धरू पर्यंत आवळ्याच्या झाडांना पाण्याची सोय करावी.

आंतरपिके आणि अंतर मशागत :

जमिनीचा पोत आणि सुपीकता टिकवण्यासाठी आपण सुरुवातीच्या दोन ते तीन वर्षांमध्ये हिरवळीचे ते घेऊ शकतो जसे की चवळी, उडीद, मूग, वाटाणा, हरभरा किंवा ढेंच्या त्यामुळे आपल्याला डाळींचे उत्पन्न मिळते आणि जमिनीचा कस देखील सुधारतो.

बागेला स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी खुरपणी करावी.

ढेंच्या किंवा ताग यापैकी एका पिकाची लागवड केल्याने मोकळ्या जागेमध्ये तन वाढत नाहीत आणि तणांचे योग्य नियोजन होते.

काढणी आणि उत्पादन :

झाडांना डिसेंबर ते जानेवारीमध्ये पानगळ सुरू होते आणि मार्च- एप्रिल महिन्यांमध्ये दाट गुच्छदार फुलोरा येतो आणि पानांच्या बेचक्यांमध्ये फुलोरा बघायला मिळतो.

फुलांच्या गुच्छमध्ये नर आणि मादी ही फुलं वेगवेगळी असतात.

परागीकरण झाल्यानंतर सुरुवातीच्या काळाला फळे ही हिरवट रंगाचे दिसतात आणि जसे जसे फळ पक्व होत जाते तसे फळांचा रंग हिरवट पिवळ्या रंगाचा किंवा विटकरी होतो.

हिवाळ्यामध्ये फळे काढण्यासाठी तयार होतात ऑक्टोंबर ते नोव्हेंबर आणि फेब्रुवारी पर्यंत फळांची तोडणी केली जाते.

फळांची काढणी ही आकडी किंवा बांबूच्या सहाय्याने केली जाते. कलमी झाडांपासून आवळ्याचे सरासरी उत्पादन दीडशे किलो पर्यंत प्रत्येक वर्षी मिळते. प्र

त्येक जातीनुसार वेगवेगळे उत्पादन मिळते एका फळाचे सरासरी वजन 30 ते 40 ग्रॅम भरते आणि एका किलोमध्ये 35 ते 40 आवळे बसतात.

आवळ्याची फळे पोत्यात भरून विक्रीसाठी पाठवली जातात.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/fruits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *