बीट लागवड
बीट हे एक मूळवर्गीय भाजीपाला पीक आहे. मुळा आणि गाजर या पिकांप्रमाणे बीट सुद्धा अन्न साठवून ठेवणारे भूमिगत मूळ आहे. बीटाची लागवड ही उत्तर भारतामध्ये जास्त केली जाते .शहरी भागातल्या हॉटेलमध्ये बीटाची मागणी जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे बीटाच्या लागवडीसाठी वाव आहे. बीटा पासून कोशिंबीर, लोणचे, चटणी, बनवले जाते. तसेच बीटाचा वापर जास्त करून सॅलडमध्ये केला जातो. बीटामध्ये प्रोटीन्स, कार्बोहाइड्रस तसेच कॅल्शियम, खनिजे आणि जीवनसत्वे असतात.
बीटा मध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारे सारख्या फुफ्फुसाच्या आरोग्याला प्रोत्साहन देणारे जीवनसत्वे आणि पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे बीटाच्या नियमित सेवन फुफुसाच्या आरोग्याला चांगले असते. कच्च्या बीटाचा वापर आहारामध्ये केल्यावर महिलांना मासिक पाळी संबंधित तक्रारी दूर होण्यास मदत होते.
बीट खाल्ल्यामुळे रक्त व हिमोग्लोबिन वाढते. बीट मध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते आणि फॅटचे प्रमाण शून्य असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी बीटाचा चांगला उपयोग होतो. बीटामध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि शरीर निरोगी राहते.
बीटा मध्ये कॅल्शियमचे प्रमाण देखील मुबलक प्रमाणात असते आणि कॅल्शियम हे आपल्या हाडांसाठी जास्त फायदेशीर असते. बीट खाल्ल्याने दात व हिरड्या मजबूत होण्यास मदत होते. या फळांमध्ये फायबरचे प्रमाण पुरेशा प्रमाणात असल्यामुळे पचन चांगले होते. त्यामुळे गॅस ची समस्या असल्यास बिटाचा वापर आहारामध्ये करावा. बीटा मध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्त वाढीसाठी बीट उपयोगी असते. बीटा मध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस आणि इतर पोषक द्रव्य असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हे सर्व पोषक घटक त्वचेसाठी चांगले असतात. बीटा मध्ये ‘क ‘जीवनसत्त्व जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे रक्त गोठण्याची क्रिया चांगली होते.
लागणारे हवामान :
बीट हे पीक थंड हवामानामध्ये चांगले येते. थंड हवामान असल्यामुळे बीट रूट ची चव प्रत रंग आणि उत्पादन चांगले मिळते.
लागवडीमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास बीट रूटाच्या मुळांची वाढ पूर्ण होत नाही आणि पीक लवकर फुलावर येते. जास्त तापमानामध्ये बीटरूट ला चांगला रंग येत नाही. त्यामुळे बाजारामध्ये बीट रूट ची किंमत कमी होते.
थंड वातावरणामध्ये बीटरूट मधील साखरेचे प्रमाण वाढते आणि चव देखील चांगली होते.
लागणारी जमीन :
बिटाची लागवड आपण निरनिराळ्या पद्धतीच्या जमिनीमध्ये करू शकतो. परंतु बीटरूट हे जमिनीच्या आत वाढणारे कंदमूळ असल्यामुळे बीटरूट साठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी भुसभुशीत जमीन निवडावी.
बीटरुटच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू 5 – 6.5 असल्यास उत्पन्न चांगले मिळते.
काळ्या भारी जमिनीमध्ये बीट रूट ची लागवड करू नये कारण काळ्या जमिनीमध्ये मुळाचा आकार वेडा वाकडा होतो. त्यामुळे मुळाची प्रत बिघडते.
ज्या जमिनींचा सामू 9-10 पर्यंत असतो अशा जमिनी खारवट, क्षारयुक्त जमिनी असतात. अशा जमिनीमध्ये बीट रूट चे पीक उत्तम प्रकारे येते आणि उत्पन्नही जास्त मिळते.
सुधारीत जाती :
1.क्रीमसन ग्लोब :
बीट रूटच्या या जातीचे उत्पादन जास्त असते या जातीचे बीट हे सपाट आणि बीटाचा रंग हा गडद लाल असतो.
बीटाची पाने हिरव्या रंगाची असून त्यात काही ठिकाणी लाल रंग असतो आणि या जातीच्या बीटाच्या आतील भाग गडद लाल असतो.
या जातीचे उत्पन्न जास्त असल्यामुळे शेतकरी या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात.
मुळा कापल्यानंतर त्यामध्ये रंगाच्या स्तरांची रचना दिसून येत नाही पानेही खूप मोठे असतात आणि गर्द हिरव्या रंगाचे असतात.
2.अर्ली वंडर :
बीट रूट च्या या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 55 ते 60 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते.
बीटाच्या वरचा भाग हिरव्या पानांनी आणि लाल देठाने झाकलेला दिसतो या जातीच्या बीटाचा आकार गुळगुळीत आणि सपाट असतो.
ही बीटाची लवकर तयार होणारे जात आहे .
3.इजिप्शियन क्रॉस्बी :
बीट रूट च्या या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 55 ते 60 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीच्या फळांचा रंग जांभळा ते गडद लाल असतो. उन्हाळ्यामध्ये लागवड केल्या नंतर या जातीच्या फळांमध्ये आतला भाग थोडासा पांढरा दिसून येतो.
4.डेट्राइट डार्क रेड :
जातीच्या बीटरूट चे उत्पन्न दुसऱ्या जातीच्या तुलनेमध्ये जास्त असते. या जातीचे बीट रूट आकाराने सुद्धा मोठे असतात आणि बीट रूट चा रंग गडद लाल असतो. या जातीच्या झाडांची पाने हिरवे असतात आणि आकाराने लांबट असतात. या जातीच्या बीटरूटची लागवड करून शेतकरी भरघोस उत्पन्न मिळवू शकतात. या जातीच्या बीट लागवड केल्यानंतर सरासरी 80 ते 100 दिवसांमध्ये तयार होतो.
5.रुबी क्विन :
जातींचे बीट लागवड केल्यानंतर सरासरी 60 दिवसांमध्ये तयार होतात. या जातीच्या एका बीटाचे वजन 100 ते 125 ग्राम पर्यंत असते.
या जातीच्या बीटांचा रंग गडद लाल असतो आणि बीटाची गुणवत्ता उत्तम असल्यामुळे या जातीचे उत्पन्न जास्त प्रमाणामध्ये घेतले जाते. या जातीचा वापर जास्त करून सॅलड बनवण्यासाठी केला जातो.
लागवड :
बीटा ची लागवड रब्बी हंगामामध्ये केली जाते. त्यासाठी बियांची पेरणी ऑक्टोबर मध्ये करावी. महाराष्ट्र मध्ये हवामानानुसार बीट रूटचे उत्पादन खरीप हंगामामध्ये घेतले जाते.
त्यासाठी बियाण्यांची पेरणी ही जून ते जुलै महिन्यांमध्ये केली जाते. एक हेक्टर लागवडीसाठी सरासरी आठ ते दहा किलो बीट रूट चे बियाणे लागतात.
म्हणजे दोन किंवा जास्त बियांचा समूह असतो. लागवड करण्यासाठी निवडलेली जमीन नांगरून घ्यावी आणि ढेकळे फोडून कोळप्याच्या पाळ्या माराव्या आणि जमीन एकसार करून घ्यावी.
त्यानंतर 45 सेंटीमीटर या अंतरावर सर्या कराव्या आणि वरंब्यावर पंधरा ते वीस सेंटीमीटर या अंतरावर बिया टोकून लागवड करावी आणि पाणी सोडावे.
खत नियोजन आणि पाणी व्यवस्थापन :
जमीनीची मशागत करत असताना जमिनीमध्ये शेणखत किंवा घन जीवामृत मिसळून घ्यावे आणि ठिबक सिंचनाचा वापर केल्यास आठवड्यातून एकदा जीवामृत सोडावे. 200 लिटर जीवामृत प्रति एकरी आठवड्याला सोडावे. त्यामुळे उत्पन्न वाढते.
पाण्याचे नियोजन जमिनीचे मगदूराप्रमाणे करावे. रब्बी हंगामामध्ये पिकाला आठ ते दहा दिवसाच्या अंतराने नियमित पाण्याच्या पाळ्या द्याव्या आणि पीक लागवडीच्या काळामध्ये पाण्याची कमतरता होणार नाही याची काळजी घ्यावी नाहीतर उत्पन्न कमी मिळते.
आंतरपीके आणि आंतरमशागत :
बियाण्यांची उगवण झाल्यानंतर त्यांची विरळणी करणे आवश्यक असते. बीट रुटच्या एका बिया मध्ये दोन ते सहा बिया असू शकतात.
त्यातील प्रत्येक बी उगवू शकते म्हणून बीट रुट मध्ये विरळणी केली जाते. विरळणी करताना एका ठिकाणी फक्त एकच रोप ठेवावे आणि बाकीचे रोपे काढून टाकावे.
ही पीक आपण आंतर पीक म्हणून मोठ्या फळबागांमध्ये घेऊ शकतो. मिरची सारख्या आधीक कालावधीच्या पिकांमध्ये वाफ्याच्या सऱ्यावर बेडरूडची लागवड करून आपण उत्पन्न घेऊ शकतो.
महत्वाच्या किडी आणि रोग :
किडी :
1. तुडतुडे :
ही कीड बीटाच्या पानांमध्ये सर्व रस शोषून घेते. यामुळे पीक कमजोर होऊन पूर्णपणे खराब होते आणि रस शोषून घेतल्यामुळे कंदांची वाढ खुंटते आणि कंद लहान राहतात .
या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.
2. मावा :
ही एक रस शोषक कीड आहे आणि ही कीड पाण्यातील सर्व रस शोषून घेते. या किडी स्वतःच्या शरीरामधून एक चिकट गोड पदार्थ स्त्रावतात त्या चिकट गोड पदार्थावर काळी बुरशी आकर्षित होते.
त्यामुळे पूर्ण पाने काळी पडतात आणि निस्तेज होऊन गळतात आणि प्रकाश संश्लेषण ची क्रिया मंदावते.
त्यामुळे उत्पादन कमी येते. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि चिकट सापळ्यांचा वापर करावा.
3. पाने खाणारी आणि फळातील अळी :
ही अळी बीट रूट ची पाने खाते आणि फळाच्या आत मध्ये अळी तयार होते. त्यामुळे फळे वाकडेतिकडे होतात आणि अशा फळांची मागणी बाजारामध्ये नसते.
त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होते. या किडीचे नियंत्रण करण्यासाठी निमार्क ची फवारणी करावी आणि किडलेली सर्व पाने आणि फळे काढून टाकावी.
4. पांढरी माशी :
ही एक रस शोषक कीड आहे .या किडी बीटाच्या पानातील सर्व रस शोषून घेतात. त्यामुळे पाणी पिवळी पडतात आणि निसतेच होऊन गळतात.
पाणी गळून पडल्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या किडीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.
रोग :
1. मर रोग :
या रोगाचा प्रादुर्भाव वातावरणातील बदल आणि पाणी जास्त दिल्यामुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव हा रोपांमध्ये होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कोवळी रोपे पिवळी पडतात आणि मरण पावतात.या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची ड्रेंचींग रोपांच्या बुडाजवळ करावी. बीटाच्या बियांना पेरणीपूर्वी बीजामृताची बीज प्रक्रिया करावी.
काढणी आणि उत्पादन :
बीटाची लागवड केल्यानंतर 70 ते 75 दिवसांमध्ये बीट रूट काढण्यासाठी तयार होते. ही वेगवेगळ्या जातीनुसार भिन्न असते. बीटच्या कंदांची वाढ तीन ते पाच सेंटीमीटर झाल्यावर काढणी करावी. काढणी करताना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
काढणीनंतर कंदांची प्रतवारी करावी आणि विक्रीला पाठवताना त्याची पाने पूर्णपणे काढावी आणि स्वच्छ धुऊन प्लास्टिकच्या पिशवीत पॅकिंग केल्यास कंद जास्त काळ टिकतात. वेगवेगळ्या जातीनुसार कंदांचे उत्पन्न वेगवेगळे येते सरासरी हेक्टरी 20 ते 25 टन इतके उत्पन्न मिळते.
Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi