Blogफळ

Anjeer Lagwad In Marathi

Anjeer Lagwad /अंजीर लागवड

Anjeer Lagwad In Marathi: अंजीर हे आंबट गोड फळ आहे. अंजिरच्या फळझाडाचे उगमस्थान दक्षिण अरबस्थान इथे मानले जाते. दक्षिण आरक्षण मधून अंजीर च्या फळझाडांचा प्रसार दुसऱ्या देशांमध्ये झाला. महाराष्ट्र मध्ये पुणे जिल्ह्यातील नीरा नदीच्या खोऱ्यातील खेड पासून ते जेजुरी पर्यंत चा भाग तसेच पुरंदर सासवड तालुक्याचा भाग आणि दौलताबादच्या भागात अंजिरांची लागवड केली जाते. अंजीर ताजे आणि सुकवून सुद्धा खाल्ले जाते. अंजीर या फळांमध्ये 10 ते 28 टक्क्यांपर्यंत साखर असते. अंजीर या फळांमध्ये इतर फळांच्या तुलनेत जास्त प्रमाणामध्ये खनिज आढळतात. अंजिराचे फळ त्याच्या औषधी गुणधर्मासाठी ओळखले जाते. अंजिराचे फळ पित्तनाशक, रक्त शुद्धी करणारे, सौम्यरचक, शक्तिवर्धक फळ मानले जाते. अंजीर मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.

अंजीर मध्ये विटामिन ए, बी वन, बी टू, सी कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, आढळतात. अंजिराचा वापर खाण्यास केला तर अधिक तेजस्वी आणि तरूण दिसण्यास मदत होते. अंजीरामध्ये पोटॅशियम चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी फायदेमंद असते. अंजीर मध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रण होते, पोटॅशियम असल्यामुळे शरीरातील ब्लड लेवल सुरक्षित आणि कमी राहते. अंजिरामध्ये खनिजांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना होणारा समस्यांमध्ये अंजीर खूप चांगले ठरते. फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा म्हणजे लाभदायक ठरते.

लागणारी जमीन :

  • अंजीर लागवड ही वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये होऊ शकते.
  • अंजीर लागवडीसाठी एक मीटरच्या खाली मुरमाचा थर असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम खोलीची तांबूस रंगाची जमीन योग्य ठरते.
  • अंजीरांच्या झाडांच्या मुळा एक मीटर खोल जातात.
  • अंजीरच्या चांगल्या लागवडीसाठी मध्यम खोलची जमीन ही उत्तम ठरते.

लागणारे हवामान :

  • अंजीर हे उष्ण कटिबंधीय फळझाड आहे.
  • अंजिरासाठी उष्ण आणि कोरडे हवामान पोषक आहे.
  • उष्णता मध्ये कमी झाल्यास अंजिराच्या पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते.
  • हवेतील जास्त ओलसर दमट हवामान आणि आद्रता अंजीर पिकाला भरपूर घातक असते.
  • त्यासाठी 600 ते 650 मिलिमीटर पाऊस चांगला राहतो.
  • ज्या ठिकाणी पाऊस पडतो आणि सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस थांबतो.
  • अशा ठिकाणी अंजिराची लागवड यशस्वीरित्या चांगली होते.
  • महाराष्ट्र मध्ये अंजीराच्या झाडांची ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये पानवळ होते आणि झाड त्यामुळे विश्रांती घेते.
  • ऑक्टोबर महिन्यामध्ये नवीन फुट फुटते आणि फळधारणा होते.
  • फळे फेब्रुवारी ते एप्रिल या काळामध्ये तयार होतात, फळांच्या वाढीसाठी मात्र वातावरण कोरडे असावे.

सुधारित जाती :

1.पुणे अंजीर :

या जातीच्या झाडांपासून सरासरी 25 ते 30 किलोपर्यंत उत्पादन मिळते. एका फळाचे सरासरी वजन 30 ते 60 ग्रॅम पर्यंत असते. या जातीच्या अंजिरांचा फळांचा रंग गडद लाल रंगाचा असतो. या फळांमध्ये 18 ते 20 ब्रिक्स पर्यंत साखर मिळते.

2.दिनकर :

या जातीच्या फळांचे सरासरी वजन 40 ते 70 ग्रॅम पर्यंत असते आणि या जातीची निवड पुना अंजीर या जातीपासून केलेली आहे. या जातीच्या फळांचा रंग गिरणीची लाल रंगाचा असतो.

अंजिराच्या दीयेंना, एक्सेल, कोनाद्रिया, अशा विकसित केलेल्या खूप जाती आहेत.

अभिवृद्धी आणि लागवड पद्धती :

  • लागवडीसाठी निवडलेली जमीन चांगली नांगरून घ्यावी आणि ढेकळे फोडून घ्यावी. अंजिराच्या झाडांची अभिरुद्धीही गुटी कलम तयार करून केली जाते.
  • पावसाळ्याच्या सुरुवातीलाच गड्डे पाडून घ्यावे आणि त्या गड्ड्यांमध्ये चांगले शेणखत, घन जीवामृत किंवा गांडूळ खत मिसळून घ्यावे.
  • लागवड मात्र जून- जुलै महिन्यात तयार कलमे लावून करावे. लागवड केल्यानंतर साधारणपणे तीन ते चार दिवसाच्या अंतराने कलमांना पाणी द्यावे आणि आधारासाठी प्रत्येक एका कलमाला एका बांबूने आधार द्यावा.
  • अंजिराची लागवड काळा जमिनीमध्ये 5×5 मीटर अंतरावर केली जाते आणि हलक्या जमिनीमध्य 4.5 × 3.0 मीटर अंतरावर केली जाते.
  • खड्ड्यांचा आकार 60×60×60 सेंटिमीटर एवढा असतो. ज्या भागामध्ये अधिक पाऊस असतो अशा भागांमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये लागवड केली जाते.

अंजिराची छाटणी आणि वळण पद्धती :

  • अंजीरा चे झाड वेडेवाकडे वाढू नये म्हणून छाटणी करणे महत्त्वाचे असते.
  • छाटणी केल्यानंतर झाडाला व्यवस्थित आकार देता येतो आणि शेतामध्ये मशागत व्यवस्थित करता येते.
  • छाटणी केल्यामुळे झाडांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी पडतो.
  • अंजीरच्या झाडांची छाटणी केल्यानंतर फुटवे जास्त येतात. न
  • वीन फुटीवर फळधारणा जास्त होते.
  • ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील पाठच्या वर्षीच्या फांद्यांची छाटणी केली जाते.
  • छाटणी केल्यामुळे फांदीच्या राहिलेल्या भागावर डोळे फुटतात आणि नवीन फूट येते आणि त्या फुटी वरच फळे येतात.

खाचा पाडणे (नॉचिंग) :

  • उत्पादन वाढवण्यासाठी अंजीरामध्ये फांद्यावर खाचा पाडल्या जातात.
  • च्या फांदीवरील डोळ्याचा वर 2.5 सेंटीमीटर लांब आणि एक सेंटीमीटर रुंद तिरकस काप घेतला जातो आणि खाचा पाडतात.
  • खाच पडताना साल आणि अल्प प्रमाणामध्ये खोडाचा भाग काढला जातो.
  • साधारणपणे जुलै महिन्यामध्ये आठ ते नऊ महिने वयाच्या फांदीवर नॉचिंग केले जाते.
  • नॉचिंग केल्यामुळे फांदीवरील सूक्त डोळे जागृत होऊन नवीन फुटवे वाढले जातात.
  • एका फांदीवरील छाटणीच्या भागातील तीन ते चार डोळे सोडावे आणि मग खाचा पाडाव्या.

खत पुरवठा आणि पाणी व्यवस्थापन :

  • अंजिराची चांगली वाढ होण्यासाठी खतपुरवठा चांगला करावा.
  • झाडांना घन जीवामृत किंवा गांडूळ खत सुद्धा द्यावे. ठिबक सिंचन चा वापर केल्यास जीवामृत सोडावे.
  • महिन्यातून दोन वेळा 200 लिटर जीवामृत सोडावे.
  • अंजीर हे कमी पाण्यामध्ये खूप दिवस तग धरू शकते त्यामुळे गरजेनुसार अंजीरच्या झाडांना पाणी द्यावे हिवाळ्यामध्ये दहा दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चार ते पाच दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
  • पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अंजिराच्या झाडांना जास्त पाण्याची गरज नसते.

बहार धरणे :

  • अंजीरच्या झाडाला वर्षातून दोन वेळा बाहर येतो. पावसाळ्यामध्ये येणाऱ्या बहाराला खट्टा बहार असे म्हटले जाते आणि उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या बहाराला मिठा बहार असे म्हटले जाते.
  • मिठा बहाराची फळे ही चवीला गोड असतात. मिठा बहाराची फळे मार्च ते एप्रिल महिन्याच्या मध्ये तयार होतात.
  • या फळांचा दर्जा आणि उत्पन्न चांगले असते .खट्टा बहाराची फळे जुलै ते ऑगस्ट महिन्यांमध्ये तयार होतात परंतु ही फळे चांगली प्रतीचे नसतात आणि या फळांची गोडी खूप कमी असते आणि फळे चवीला आंबट असतात.
  • अंजीर मध्ये शक्यतो प्रामुख्याने मिठाबहार घेतला जातो. मिठाबहार घेण्यासाठी सर्वप्रथम सप्टेंबर ते ऑगस्ट महिन्यामध्ये हलकी नांगरट केली जाते.
  • दोन आठवडे झाडांना पाण्याचा ताण दिला जातो, नंतर छाटणी करून सांगितल्याप्रमाणे खते घातले जाते.
  • त्यानंतर वाफे बांधून बागेला पाणी द्यायला सुरू करावे. असे केल्यामुळे झाडावरून नवीन फुटी बाहेर पडतात आणि ऑक्टोंबर ते डिसेंबर च्या दरम्यान झाडावर नवीन फुटी घेऊन फळे येतात.
  • त्यानंतर आणि एकदा झाडाला खते द्यावी आणि शेवटला फळे चांगली पक्व होईपर्यंत व्यवस्थित पाण्याच्या पाळ्या द्याव्या.

अंतर पिके आणि अंतर मशागत :

  • अंजीर लागवड केल्यानंतर पहिले दोन ते तीन वर्ष अंजिराच्या मधील जागा पूर्णपणे मोकळी राहते.
  • त्या जागेचा वापर आपण जास्त नफा मिळवण्यासाठी करू शकतो. त्या मोकळ्या जागेमध्ये आपण चवळी, तसेच ताग हिरवळीची पिके, कमी कालावधीची पिके घेऊन नफा मिळू शकतो.
  • हिरवळीच्या पिकांचे अंतर पीक म्हणून ढेंच्या, ताग असे घेतले तर त्यामुळे बागेची चांगली मशागत होते आणि जमिनीची सुपीकता देखील वाढते.
  • जमिनीचा मगदूराप्रमाणे पाणीपुरवठा लक्षात घेऊन अंजिराच्या बागेमध्ये एक किंवा अधिक हंगामांमध्ये आंतरपिके घेऊन शेतकरी नफा मिळवू शकतात.
  • सुरुवातीच्या काळामध्ये तन नष्ट करण्यासाठी बागेमध्ये हलक्या कुळवणी कराव्या.
  • बाग नेहमी स्वच्छ ठेवावे बागेमध्ये जर तणांचा प्रादुर्भाव जास्त वाढला तर रोग आणि किडी हल्ला करतात.
  • झाडाच्या आळ्यामध्ये गवत खुरपाच्या साह्याने व्यवस्थित काढून घ्यावे.

महत्त्वाच्या किडी आणि रोग :

किडी

खवले कीड, तुडतुडे, पीठा कीड, कोळी, साल व बुंदा पोखरणारी आळी अंजीर मधील प्रमुख किडी आहेत.

या किडींवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि रस शोषक किडींसाठी चिकट सापळ्यांचा वापर शेतामध्ये करावा.

रोग :

अंजीरावर मुख्य गेरवा किंवा तांबेरा हे रोग पडतात. या रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी अंजिराच्या झाडावर करावे आणि तांबेरा पडलेली पाने काढून टाकावे.

काढणी आणि उत्पादन :

  • अंजिरची पिके फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंत येतात.
  • फळांना फीकट हिरवा मिटकरी, लालसर, जांभळा रंग आल्यावर फळे पक्व झालेले आहेत असे समजावे आणि अशी पक्व झालेली फळे डेट पिरघळून देटा सोबतच काढावीत.
  • अंजिराच्या झाडाला पहिला दोन वर्षानंतर तुरळक फळे येऊ लागतात.
  • ती फळे सर्व काढून टाकावे आणि पहिले दोन ते चार वर्ष अंजिराचे उत्पादन घेणे टाळावे.
  • लागवडीनंतर सातव्या ते आठव्या वर्षी अंजिराचे भरघोस उत्पन्न मिळते.
  • अंजीरचे झाड 30 ते 35 वर्षापर्यंत उत्पादन देते. जर आपण योग्य नियोजन केले आणि मशागत व्यवस्थित केली तर आपण सरासरी 15 ते 20 किलो फळे मिळू शकतो.
  • अंजिराचे उत्पादन वेगवेगळ्या जातीनुसार वेगवेगळे होते.
  • फळ धारणेच्या वेळी हवामानावर सुद्धा अंजिराचे उत्पादन अवलंबून असते.
  • अंजिराचे सर्वसाधारणपणे दहा ते बारा हजार किलोपर्यंत हेक्टरी उत्पन्न मिळते.
  • काढणी केल्यानंतर फळे बाजारामध्ये विकण्यासाठी पाठवावे अंजीरांचा वापर फळ प्रक्रिया मध्ये सुद्धा केला जातो आणि वाळलेले अंजीर बाजारामध्ये विकले जातात.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/fruits

5/5 - (1 vote)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *