Chinch lagwad in marathi

Chinch lagvad in Marathi

Blog फळ

Chinch lagvad

Chinch lagvad in Marathi : चिंच हे महाराष्ट्र मधील एक महत्त्वाचे कोरडवाहू पीक असून भारतातून एकूण निर्यात होणाऱ्या मसाल्यांपैकी चिंचेचा सहावा क्रमांक लागतो. चिंचेला उत्तम भाव मिळत असल्यामुळे हे कोरडवाहू क्षेत्रातील नगदी पीक म्हणून संबोधले जाते. चिंच हे कोणत्याही प्रकारच्या हवामानामध्ये चांगले वाढते. अत्यंत हलक्या जमिनीमध्ये माळरान मध्ये डोंगर उतारावर चांगले वाढते. चिंचेचे झाड हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. अनेक पदार्थांमध्ये चिंच वापरले जाते. आहारामध्ये पदार्थ सोबतच मुलांना आवडणारा चटपटीत पदार्थांमध्ये ही चिंच वापरले जाते. चिंचेला फार मेहनत घ्यावी लागत नाही.

त्यामुळे चिंचेचे उत्पादन घेणे हितावह आहे. भारतामधील चिंच प्रामुख्याने कॅनडा, स्वित्झर्लंड, ब्रिटन, अमेरिका, फ्रान्ससाठी देशांमध्ये पाठवले जाते. चिंच विविध प्रकारांमध्ये निर्यात केले जाते. त्यामध्ये अख्खे चिंच, फोडलेले चिंच, गाभा, बियांची भुकटी, यांचा प्रामुख्याने समावेश येतो. औषधी गुणांमुळे चिंचेला अरबी लोक “भारतीय खजूर” असे देखील म्हणतात. ग्रामीण भागामध्ये चिंचेच्या कोवळ्या फांद्या शेळ्यांना चारा म्हणून देखील घातल्या जातात. चिंचेचे लाकूड बैलगाडीची चाके बनवण्यासाठी, तेल घानाच्या, उकळी बनवण्यासाठी वापरले जाते. दक्षिण भारतामध्ये आहारात चिंच दररोज वापरले जाते. प्रक्रिया उद्योगांमध्ये चिंच उपयुक्त मानले जाते. पिकवलेल्या चिंचा त्यातील चिंचोके काढून मीठ लावून चांगल्या वाळूवून काही महिन्यासाठी ठेवल्या जातात.

मैसूर येथे सेंट्रल फूड टेक्नॉलॉजीकल रिसर्च 🔍 इन्स्टिट्यूट चिंचेच्या रसाचे घट्ट द्रावण टिकवून ठेवण्यासाठी प्रक्रिया प्रमाणात केलेली आहे. त्यावर बरेच उद्योग आधारित आहेत. भारतामध्ये रोजच्या आहारामध्ये चिंचेचा वापर केला जातो. चिंच गुळाची आमटी, चिंचेचे सार, चिंचेची चटणी, चिंचेचा कोळ, अर्क इत्यादी रूपांमध्ये चिंच वापरली जाते. अलीकडे चिंचापासून पावडर देखील तयार केली जाते. उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी चिंचेच्या घराचा सरबत केला जातो. औषधी म्हणून जुना चिंच गर जास्त चांगला समजला जातो. चिंचेचा गर काढून राहिलेला चिंचुक्यांचा वापर भोंगळ्यांना खळ करण्यासाठी केला जातो. भारतामध्ये सर्वसाधारणपणे चिंचेची लागवड ही शेताच्या बांधावर ,रस्त्यावर आणि नदीच्या कडेला किंवा डोंगरावर केली जाते. चिंचेची शास्त्रीय पद्धतीने स्वतंत्रपणे केलेला लागवड कमी प्रमाणामध्ये दिसते.

लागणारी जमीन :

  • चिंचेचे झाड हे अनेक प्रकारच्या जमिनीमध्ये उगवू शकते.
  • चिंचेचे झाड काळ्या मातीत, भुसभुशीत मातीत आणि दगड धोंडे असलेल्या मातीत देखील उगवतो.
  • वाळू मिश्रित जमिनीमध्ये देखील चिंचेची लागवड चांगली होते.
  • ज्या जमिनी डोंगर उतारावर असतात अशा जमिनीमध्ये चांगली.
  • लागवड होते क्षारयुक्त जमिनीमध्ये देखील चिंचेचे झाड चांगले वाढते.
  • कोरड्या जमिनीमध्ये चिंचेला राजे वृक्ष म्हटले जाते.
  • ज्या जमिनीमध्ये पाण्याची कमी असते, अशा जमिनीमध्ये देखील चिंचेचे झाड चांगले येते.

लागणारे हवामान :

  • चिंचेचे झाड कमी पाण्याच्या प्रदेशांमध्ये देखील येऊ शकते.
  • चिंचेच्या झाडाला जास्त पाण्याची गरज नसते.
  • जमिनीमध्ये साठलेले पाणी हे सर्व मुळ्या शोषून घेतात.
  • त्यामुळे पावसाच्या पाण्यावरच हे झाड चांगले तग धरते.
  • समुद्रसपाटीपासून 600 मीटर पर्यंतच्या उंची प्रदेशांमध्ये चिंच वृक्षाची लागवड चांगली होते.
  • ज्या प्रदेशांमध्ये 45 डिग्री अंश सेल्सिअसच्या वरती तापमान असते, अशा तापमानामध्ये देखील चिंच तग धरू शकते.
  • चिंचेच्या झाडाला 750 ते 1250 मिमी पर्यंत पाऊस पुरेसा ठरतो.

सुधारीत जाती :

1. पी. के. एम – 1 :

लागवडीनंतर दुसऱ्या वर्षी या झाडाला फुले लागतात. मात्र दुसऱ्या वर्षीचा मोहर झाडावा. तिसऱ्या वर्षे झाडाला फांद्या उपफांद्या भरपूर फुटलेला दिसतात. झाडाचा विस्तार वाढतो ,म्हणून दुसऱ्या वर्षापासून फळे घ्यावेत. ही जात 270 ते 300 किलो पर्यंत शेंगा देते आणि त्यामध्ये गराचे प्रमाण 40% पर्यंत असते. या जातीपासून एकरी सरासरी 15 टन शेंगा मिळतात.

2. उरिगम :

हा एक लोकप्रिय वाण आहे. या जातीच्या शेंगा लांबीला असतात आणि चवीला देखील भरपूर गोड असतात.

3. प्रतिष्ठान :

या जातीच्या फळांचा रंग तांबूस तपकिरी असून आकार सरळ ,गराचा रंग पिवळसर, तांबडा सरासरी लांबी 7.5 सेंटीमीटर आणि रुंदी 2.5 cm पर्यंत असते. एका किलो कच्चा चिंच पासून 600 ग्रॅम गर आणि 156g चिंचोके मिळतात आणि या जातीच्या चिंचेमध्ये 9.21% आम्लता असते.

4. योगेश्वरी (नंबर 263 ) :

या जातीच्या फळांची सरासरी सात सेंटीमीटर लांबीची असते. या जातीच्या शेंगांमधील गर कमी आंबट आणि जास्त गोड असतो. एका किलो कच्चा चिंचेमधून 60% इतका गर मिळतो आणि 43 ते 45 टक्के इतक्या चिंचोळ्याचे प्रमाण असते.

5.अकोला स्मृती :

चिंचेची ही जात दरवर्षी उत्पादन देते. फळाचा आकार तिरपा सरासरी वजन 18 ग्रॅम पर्यंत असते. या जातीच्या चिंचेमध्ये 14% पर्यंत आम्लता असते. या जातीपासून सरासरी 1.6 क्विंटल प्रति झाड उत्पन्न मिळते.

6. चिंचेच्या इतर जाती :.अजिंठा गोड चिंच, जगदीश .

चिंचेसाठी लागणारे आवश्यक हवामान : चिंच ही वनस्पती कोणत्याही प्रकारच्या हवामानामध्ये तग धरू शकते आणि वाढू देखील शकते. चिंच ही शून्य ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत कोणत्याही तापमानामध्ये चांगली तग धरते.

लागवड :

  • चिंचेच्या रोपांची निर्मिती बियांपासून केली जाते.
  • तसेच कलम आणि कळ्या यांच्याद्वारे ही केले जाऊ शकते.
  • बियांना उगवण्यासाठी सुमारे एक आठवडा ते दहा दिवस पर्यंत लागतात.
  • या रोपांना तीन ते चार महिन्यांपर्यंत वाढवून दिले जाते आणि नंतर त्यांचे रोपण मुख्य जागेमध्ये केले जाते.
  • अलीकडच्या काळामध्ये सॉफ्टवुड कलम खूप यशस्वी ठरले आहे आणि यामधून उत्कृष्ट उत्पादन देखील मिळते.
  • चिंचेचा वृक्ष हा खूप मोठा होतो.
  • त्यामुळे चिंचेची लागवड करताना दोन झाडांमधील अंतर हे दहा मीटर आणि दोन ओळींमध्ये अंतर देखील दहा मीटर इतके ठेवले जाते
  • लागवड करत असताना उन्हाळ्यामध्येच 1×1×1 मीटर आकाराचे खड्डे तयार करून घ्यावे.
  • दीर्घ काळ टिकते. मंद गतीने वाढणारा चींच वृक्ष दीर्घायुष्य आहे.
  • शेतामध्ये रोपे लावल्यानंतर लागवड केल्याने लोकांना वेळोवेळी लगेच सिंचन करावे.

वळण आणि छाटणी :

  • चिंचवडला सुरुवातीला वळण देण्यासाठी तीन साडेतीन फूट उंचीचे झाल्यावर त्याचा शेंडा छाटून घ्यावा आणि त्यानंतर चारही दिशांना विखवलेल्या चार फांद्या दिसतील अशा ठेवाव्यात.
  • चिंचेचे झाड वाढत असताना त्याची हलकी छाटणी केल्यानंतर झाडाची वाढ चांगली होते चिंचेच्या झाडाला येणाऱ्या आडव्या फांद्या आणि कलम वरील फुटवे सतत काढावे.
  • दरवर्षी चिंचेची फळे काढून झाल्यानंतर झाडाच्या वाढलेल्या फांद्या कापून टाकावेत.

आंतर मशागत आणि आंतरपिके :

  • चिंचेची लागवड ही 10×10 मीटर या अंतरावर केली जाते.
  • चिंच हे अतिशय हळूहळू वाढणारे फळझाड असल्यामुळे त्यामध्ये आपण अंतरपीके घेऊ शकतो
  • आंतरपीक म्हणून आपण कमी कालावधीची पिके जसे मूग, उडीद, भईमूग, तूर, सोयाबीन अशी कडधान्य पिके घेऊ शकतो.
  • या पिकांच्या मुळ्याना गाठी असतात. त्या गाठी रायझोबियमचे असतात.
  • या गाठी हवेतील नत्र जमिनीमध्ये सोडतात.
  • त्यामुळे जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण वाढते.
  • नैसर्गिकरीत्या चिंचेला देखील नत्र मिळते, कमी कालावधीची फळभाज्या जसे मिरची, वांगी, टोमॅटो, बटाटा, पालेभाज्या मेथी पालक कोथिंबीर अशा भाजपाला घेऊन आपण नफा मिळवू शकतो चिंचेच्या बागेमध्ये आपण हिरवळीचे खते लावू शकतो त्यामुळे देखील जमिनीची सुपीकता वाढते.

खत आणि पाणी व्यवस्थापन :

  • चिंचेच्या झाडांची लागवड नंतर वाढ होण्यासाठी लवकरात लवकर फळावर येण्यासाठी त्यांना पूर्णपणे कुजलेले शेणखत घालावे.
  • गांडूळ खत किंवा घन जीवामृत घालू शकतो.
  • रोपे आणि कलमे एका वर्षाचे झाल्यानंतर त्यांना खते देण्यासाठी सुरुवात केली जाते
  • दरवर्षी झाडाचा कडेने पावसाळ्या पूर्व कुदळीने खोदून चर तयार करुन घ्यावे व त्यानंतर झाडांना खते द्यावी.
  • पूर्ण शेणखत पावसाच्या सुरुवातीला तर द्यावे.
  • उन्हाळ्यामध्ये चिंचेला वारंवार सिंचनाची आवश्यकता असते.
  • परंतु पावसाळ्यामध्ये पाण्याची जास्त गरज भासत नाही शेतात कुठेही पाणी साचून राहणार नाही याची योग्य काळजी घ्यावी.
  • पहिले दोन वर्षात उन्हाळ्यामध्ये झाडावरती आच्छादन करावे आणि प्रत्येक झाडाला दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरानंतर पाणी द्यावे.
  • झाडे एकदम मोठे झाल्यानंतर शक्य असल्यास झाडे फुलावर असताना आणि फळे लागल्यानंतर पाणी द्यावे.
  • त्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते.

.

चिंचेची काढणी कशी करावी आणि उतपन्न :

  • चिंच हे अतिशय हळू वाढते.
  • बियांपासून तयार केलेल्या रोपांपासून लागवड केल्यानंतर झाडांना लागवडीनंतर दहा ते बारा वर्षांनंतर फळे यायला सुरुवात होते.
  • मात्र कलमा द्वारे लागवड केल्यानंतर चार ते पाच वर्षानंतर फळधारणा व्हायला सुरुवात होते.
  • जून ते जुलै महिन्याच्या झाडांना फुलवरा येतो आणि मार्च ते एप्रिल महिन्याच्या वेळी चिंचा काढण्यासाठी तयार होतात.
  • चिंचा पिकण्यासाठी सुरुवात झाल्यानंतर टरफळाचा हिरवा रंग बदलून तपकिरी होतो, पिकलेला चिंचेची साल पूर्णपणे वाळून गरापासून वेगळे होते, पूर्णपणे पिकलेल्या ज्यांना गोड आणि आंबट चव असते, अशा चिंचांना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मागणी असते.
  • कारण त्यांची पेस्ट करून इतर देशांमध्ये पाठवले जाते.
  • केवळ फळ नाही तर नवीन पाण्याने बियांसोबत लाकडाला पण बाजारात जास्त मागणी असते.
  • चिंचेची उत्पादक अनेक कारणांसाठी वापरले जातात.
  • चिंचेची काढणी हाताने तोडून केली जाते किंवा काटीच्या सहाय्याने झाडल्या जातात.
  • सरासरी एका झाडापासून दीड ते दोन क्विंटल एवढा चिंचा मिळतात.
  • एका एकर मधून सरासरी सहा ते आठ टन पर्यंत उत्पन्न मिळते.
  • जर एकरी चांगल्या शेती पद्धतीचा अवलंब केल्यानंतर प्रति झाड सुमारे 180 ते 200 किलो पर्यंत उत्पादन मिळू शकते.

👉 Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

👉 https://naturekrushi.com/category/fruits

5/5 - (4 votes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *