Brocoli Lagwad In Marathi naturekrushi.jpg

Brocolli lagavd in Marathi

Blog भाजीपाला

Brocolli lagavd | ब्रोकली लागवड । ब्रोकली लावण्याची पद्धती

Brocolli lagavd in Marathi : ब्रोकोली ही विदेशी भाजी आहे. ब्रोकोली शेती हा उत्पन्नाचा एक चांगला स्तोत्र आहे. कारण ब्रोकोली कशी वाढवायची आणि त्याचे विणपण ज्ञान काही शेतकऱ्यांपुरते मर्यादित आहेत. ही भाजी खायला खुसखुशीत आणि चविष्ट लागते. ब्रोकोलीच्या झाडाचा आकार फुलकोबी एवढा असतो. ही भाजी भारतामध्ये लोकप्रिय झालेली आहे आणि मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये आणि घरी याचा वापर सॅलड बनवण्यासाठी केला जातो.

ब्रोकोलीला सुरक्षित अन्न म्हणून आहार तज्ञ संबोधतात. कारण ब्रोकोली मध्ये जीवनसत्वे आणि खनिज मोठ्या प्रमाणावर आढळतात. कोबी आणि फुलकोबी यासारख्या पिकांपेक्षा सर्वाधिक प्रथिने आणि विटामिन ए आहे. ब्रोकोली चा वापर आपण भाजी, सूप किंवा सॅलड म्हणून करू शकतो. मधुमेहाच्या रुग्णांनी हिरव्या भाज्या खाव्यात.

ब्रोकोली खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रण मध्ये राहते. ब्रोकोलींमध्ये विटामिन सी आणि झिंक चांगलं प्रमाणामध्ये असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते ब्रोकोली हे फायबर, पोटॅशियम आणि प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते त्यामुळे सतत खाण्याच्या सवयी पासून आपण लांब राहतो आणि वजन कमी होण्यासाठी मदत होते.

ब्रोकोली खाल्ल्यामुळे यकृत निरोगी राहते. यामध्ये कॅन्सर विरोधी घटक असतात. जे यकृताला निरोगी बनवतात ,ब्रोकोली खाल्ल्यामुळे कॅल्शियमची कमतरता दूर होते, हाडे मजबूत करण्यासाठी ब्रोकोली चांगली ठरते.

लागणारी जमीन :

  • ब्रोकोलीची लागवड विविध प्रकारच्या जमिनीमध्ये करू शकतो.
  • वालूकामय आणि गाळयुक्त चिकन मातीमध्ये ब्रोकोलीची लागवड चांगले होते.
  • चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन ब्रोकली लागवडीसाठी निवडावी.
  • ब्रोकोली लागवडीसाठी मातीचा पीएच 5.5 ते 6.5 च्या दरम्यान असल्यावर चांगले उत्पन्न मिळते.
  • ब्रोकोली ही हलक्या जमिनीमध्ये देखील येऊ शकते.
  • मात्र त्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये शेणखत आणि इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा.

लागणारे हवामान :

  • ब्रोकोली लागवडीसाठी समक्षतोष्ण हवामान योग्य ठरते
  • ब्रोकोलीचे पीक 15 ते 25 अंश सेल्सिअस या तापमानामध्ये चांगले तयार होते.
  • थंड आणि सौम्य हवामान गड्डयच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरते.
  • पावसाळ्याच्या शेवटी किंवा हिवाळ्यामधील सुरुवातीस लागवड केल्यानंतर ब्रोकोलीचे चांगले उत्पादन मिळतात.
  • या पिकासाठी खूप उष्ण किंवा अति थंड हवामान अनुकूल ठरत नाही.
  • त्यामुळे उत्पादनामध्ये घट येऊ शकते.

ब्रोकॉलीच्या जाती :

1.कॅलेब्रिया :

ब्रोकोलीच्या या जातीमध्ये डोके गडद हिरव्या रंगाचे आणि मध्यम आकाराचे असतात. लागवड केल्यानंतर सरासरी 70 ते 80 दिवसांमध्ये ब्रोकोली काढण्यासाठी तयार होते.

2.रोमन्सको ब्रोकोली :

या जातीची लागवड उष्ण हवामानामध्ये चांगली होते. या जातीचे डोके आकर्षक असतात. ही जात फुलांच्या सरमिसळीसारखा दिसणारा प्रकार आहे.

3.ब्रोकोली राब :

ही जात ब्रोकोलीचा इतर जातीपेक्षा वेगळी आहे. ही जात कोवळ्या देठांकरिता प्रसिद्ध आहे या जातीची फक्त कोळी देठ खाल्ली जातात.

ब्रोकोलीची रोपे तयार करणे :

ब्रोकोलीची रोपे हे प्रामुख्याने दोन पद्धतीने तयार केले जातात.

1.माती विरहित माध्यम म्हणजेच प्लास्टिकच्या नर्सरी ट्रे मध्ये कोकोपीट मध्ये बिया लावल्या जातात आणि उगवल्यानंतर त्याला लागवडीच्या जमिनीमध्ये लावले जातात.

2. माती मध्ये रोपे तयार करणे :

मातीचा बेड तयार करण्यासाठी एक मीटर रुंद आणि तीन मीटर लांब 30 सेंटिमीटर रुंद मातीचा बेड तयार केला जातो. प्रत्येक वाफेमध्ये अंदाजे दहा किलो चांगले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळले जाते. त्याचप्रमाणे नंतर बेडवर दोन सेंटीमीटर खोल ओळीचा रुंदीला पाच सेंटीमीटर समांतर करा आणि ब्रोकोलीचे बी पेरले जातात. त्यानंतर बिया बारीक कंपोस्ट सामग्रीने झाकून ठेवला जातात .स्प्रिंकल च्या साह्याने हलके पाणी दिले जाते. एका हेक्टर साठी संकरित बियाणांची लागवड करण्यासाठी ब्रोकोली अंदाज 312 ग्राम पर्यंत लागते. बियाणे उगवण पाच ते सहा दिवसांनी सुरू होते आणि रोपे 35 ते 36 दिवसांमध्ये लागवडीसाठी तयार होतात. यावेळी प्रत्यारोपणासाठी ब्रोकोलीला चार ते पाच पाने आवश्यक असते. बियाणे पेरणीसाठी वर्षातील सर्वोत्तम वेळ सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा असतो. रोपाच्या वाढीच्या दरम्यान साधारणपणे 20 ते 22 अंश सेल्सिअस तापमान चांगले ठरते. रोपाच्या चांगले वाढीसाठी आदर्श दिवसाचे तापमान 20 ते 23 अंश सेल्सिअस पर्यंत असावे.

जमीनीची पूर्व मशागत :

  • लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीला ट्रॅक्टरच्या सहाय्याने उभी-आडवी नांगरणी करून घ्यावी.
  • त्यानंतर सर्व ढेकळे फोडून घ्यावे आणि जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
  • त्यानंतर कुळवाच्या पाळ्या मारून घ्यावे.
  • शेवटच्या पाळीच्या वेळी जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे आणि शेवटच्या कोळप्याच्या पाळीने सर्व जमिनीमध्ये मिसळून घेऊन जमीन लागवडीसाठी सपाट करून घ्यावे.

लागवडीचा हंगाम :

  • ब्रोकोली च्या लागवडीसाठी हिवाळा हा उत्तम हंगाम मानला जातो.
  • ब्रोकोलीला व्यवस्थित वाढीसाठी आणि गड्ड्याच्या चांगल्या पोषणसाठी 21 ते 26 डिग्री सेल्सिअस यादरम्यान तापमान असल्यास चांगले उत्पन्न मिळते.
  • उत्तर भारतामध्ये खास करून मैदानी प्रदेशात हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ब्रोकोलीचे लागवड मोठ्या प्रमाणावर केले जाते.

खत आणि पाणी व्यवस्थापन :

  • जमीन तयार करत असताना शेतामध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे आणि जमिनीमध्ये घन जीवामृत किंवा गांडूळखत देखील घालून घ्यावे.
  • वेळोवेळी जमिनीमध्ये जीवामृत सोडावे त्यामुळे जमिनीमधील सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि जमीन सुपीक बनते.
  • ब्रोकोली साठी ठिबक सिंचन हे चांगले ठरते.
  • पिकाला दररोज किती पाण्याची गरज आहे, हे जमिनीच्या मगदूराप्रमाणे आणि वातावरणानुसार ठरवावे आणि त्याच प्रमाणे दररोज पाणी द्यावे.

आंतरमशागत :

  • लागवड केल्यानंतर वाफ्यांवरील सर्व जागी मोठ्या प्रमाणावर तणांचा प्रादुर्भाव दिसायला लागतो.
  • त्यावेळी सर्व तन काढून घ्यावे आणि तीन ते चार सेंटीमीटर पर्यंत सर्व माती खुरप्याने हलवून घ्यावी.
  • रोपांना मातीची हलकी भर द्यावी. पहिला खुरपणीनंतर 20 ते 25 दिवसाच्या अंतराने दुसरी खुरपणी करून वाफे तणमुक्त आणि स्वच्छ करावेत.
  • आंतरमशागत व्यवस्थित केल्यामुळे झाडांची वाढ होते व उत्पादन चांगले मिळते आणि उत्तम प्रतीचे गड्डे मिळतात.

महत्वाच्या किडी आणि रोग :

किडी :

1. कटवर्म :

ह्या अळ्या सुमारे तीन ते चार सेंटीमीटर पर्यंत लांब असतात. अळ्यांचा रंग राखाडी किंवा तपकिरी रंगाचा असतो. ह्या अळ्या रात्रीच्या झाडावर हल्ला करतात. एका रात्रीमध्ये अनेक झाडांवर प्रादुर्भाव करतात. या आळीवर नियंत्रण करणे अवघड ठरते कारण दिवसा ह्या झाडांमध्ये लपून राहतात आणि रात्रीचा बाहेर येतात. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी फेरोमन सापळ्यांचा वापर करावा. ब्रोकोलीच्या पिकामध्ये प्रत्येक ओळींमध्ये मोहरीच्या पिकाची लागवड सापळा पीक म्हणून करावी.

2. एफिड्स :

ही एक रस शोषक कीड असून ही कीड झाडांमधून मोठ्या प्रमाणावर अन्न रस शोषते. त्यामुळे झाड पूर्णपणे कमकुवत होते. ही कीड स्वतःच्या शरीरामधून एक चिकट गोड पदार्थ उतरवते. त्या पदार्थावर काळी बुरशी आकर्षित होते. त्यामुळे ब्रोकोलीच्या गड्डे पूर्णपणे काळे पडतात आणि प्रकाश संश्लेषणची क्रिया मंदावते. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि शेतामध्ये चिकट सापळे लावावे. एकरी 25 ते 30 चिकट सापळे शेतामध्ये लावावे.

3. मस्टर्ड सॉफ्लाय :

या किडीच्या आळ्या मोठ्या प्रमाणावर पाने खातात. त्यामुळे उत्पन्नामध्ये पाच ते अठरा टक्के पर्यंत घट होते. या किडीच्या अंगावर सुरकुत्या असतात आणि ही कीड हिरवट काळ्या रंगाचे असते. या किडीचा नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.

रोग :

1. मर रोग :

हा कोबीवर्गीय पिकांमधील एक गंभीर आजार आहे. या रोगाचा प्रादुर्भाव आद्रता जास्त असल्यावर ,अतिवृष्टी ,कमी पाण्याचा निचरा करणारी माती आणि कमी तापमानामुळे मोठ्या प्रमाणावर दिसून होतो. या अवस्थांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर शेतामध्ये दिसून येतो. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी बीज प्रक्रिया करावी आणि जैविक बुरशीनाशकांची आळवणी रोपांना द्यावी.

2. केवडा :

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांवर पांढरी बुरशी दिसून येते. काळांतराने पानाच्या वरच्या पृष्ठभागावर तपकिरी दाग दिसतात. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी शेतामध्ये करावी.

3. व्हाईट रस्ट :

हा रोग बुरशीजन्य रोग असून मातीमधून पसरतो. बाहेरील पानांवर खालच्या पृष्ठभागावर हल्ला करते आणि झाडे अचानक मरतात. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकाची फवारणी झाडांवर करावे.

4. ब्लॅक रॉट :

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रथम चिन्हे पानावर दिसतात. पाने मधल्या भागामध्ये पिवळे होतात. वनस्पतीच्या शिरा तपकिरी होऊ लागतात आणि नंतर काळ्या होतात. सुरुवातीच्या काळामध्ये झाडे कोमेजून मरतात.या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी शेतामध्ये करावी आणि आळवणी देखील करावे. रोगप्रतिकारक वाणांचा वापर करावा.

5. अल्टरनेरिया पानांचे ठिपके :

ज्या प्रदेशामध्ये आद्रतेचे प्रमाण जास्त असते. अशा प्रदेशांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो. झाडाच्या पानांवर लहान गडद रंगाचे दाग दिसतात. काळांतराने हे दाग मोठे होतात आणि गोलाकार बनवून पूर्ण पिकावर पसरतात. या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

काढणी आणि उत्पादन :

  • लागवड केल्यानंतर 80 ते 90 दिवसानंतर पीक काढण्यासाठी तयार होते.
  • ब्रोकोलीचे गड्डे तीन ते सहा इंच आकाराचे झाल्यावर धारदार चाकूने कापणी केली जाते.
  • तसेच ब्रोकोलीच्या गड्ड्यावर लहान फुले येण्यापूर्वी काढणी करणे गरजेचे असते.
  • ब्रोकोलीचे उत्पन्न हे लागवडीला निवडलेली जमीन, असणारे हवामान, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, आंतरमशागत या विविध बाबींवर अवलंबून असते.
  • चांगल्या प्रतीच्या ब्रोकोलीच्या पिकाचे वजन सुमारे 250 ते 300 ग्रॅम पर्यंत असते. वेगवेगळ्या जातीनुसार आणि विविधतेनुसार उत्पादन 19 ते 24 तन पर्यंत हेक्टरी मिळते.
  • बाजारांमधील मागणीनुसार ब्रोकोली बॉक्समध्ये किंवा प्लास्टिकच्या ग्रेट मध्ये पॅक करून विकण्यासाठी पाठवल्या जातात.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/vegetables

5/5 - (2 votes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *