Blogफूल

shevanti lagwad in marathi

5/5 - (1 vote)

Shevanti Lagwad: शेवंती या फुलाला फुलांची राणी असे म्हटले जाते. कारण या फुलाचा आकार, उमलण्याची पद्धत, फुलाचा रंग इतर फुलांपेक्षा वेगळा असतो. शेवंतीचा उगम स्थान चीन असेल तरी तिचा जगभर प्रसार हा जपान मधून झालेला आहे. शेवंती हे फुल गुलाब नंतर सगळ्यात महत्त्वाचे फुल मानले जाते. फुलाची शेती ही शेतकऱ्याला नेहमी परवडणारी असते.कारण पिकाचा कालावधी कमी असतो आणि योग्य वेळी योग्य नियोजन केल्यावर चांगले उत्पन्न मिळते आणि बाजारभाव देखील चांगला मिळतो. त्यामुळे लागवड ही फायद्याची ठरते.

लागणारी जमीन :

  • शेवंतीच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम गाळाची जमीन निवडावी.
  • ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नाही अशा जमिनीमध्ये शेवंतीच्या पिकाचे नुकसान होऊ शकते, म्हणून पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीनच शेवंती लागवडीसाठी वापरावी.
  • जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असते.
  • अशा जमिनीमध्ये लागवड केल्यावर चांगले उत्पन्न मिळते.
  • शेवंती लागवडीसाठी जमिनीचा सामान 6.5 ते 7 च्या दरम्यान असल्यास उत्पन्न चांगले येते.

लागणारे हवामान :

  • शेवंती या पिकासाठी लहान दिवस व कमी तापमानाची गरज असते. कारण शेवंती हे लहान दिवसाचे पीक आहे.
  • सुरुवातीच्या काळामध्ये भरपूर सूर्यप्रकाश व मोठा दिवस असणे गरजेचे असते.
  • शेवंतीच्या वाढीसाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते आणि फुले येण्यासाठी दहा ते पंधरा अंश सेल्सियस या तापमानाची गरज असते.
  • शेवंती या पिकाला अती प्रमाणामध्ये झालेला पाऊस आणि आद्रता मानवत नाही. त्यामुळे शेवंतीच्या पिकाचे भरपूर नुकसान होते.

सुधारीत जाती :

1. सोनाली तारा :

या जातीचे उत्पन्न पॉलिहाऊस मध्ये मोकळ्या शेतीतील उत्पादनाच्या तुलनेमध्ये जास्त मिळते. या जातीपासून सरासरी हेक्‍टरी 10 ते 12 टन इतके उत्पन्न मिळते. या जातीच्या फुलांचा रंग सोनेरी पिवळा असतो आणि आकाराने देखील फुले मोठे असतात. फुलांचे वजन देखील इतर जातीच्या फुलांपेक्षा जास्त भरते.

2. IIHR सलेक्शन 4 :

या जातीच्या फुलांचे सरासरी 12 ते 13 टन हेक्टरी उत्पन्न मिळते. या जातीच्या फुलांचा रंग पिवळा असून फुले मध्यम आकाराचे असतात. या जातीच्या फुलांमध्ये पाकळ्यांची संख्या भरपूर असते आणि फुलांना बाजारामध्ये चांगला भाव मिळतो. ही जात पानावरील ठिपके या रोगासाठी प्रतिकारक आहे.

3. शरद माला :

या जातीपासून हेक्‍टरी 12 ते 13 टन इथे उत्पन्न मिळते .ही जात बुटकी असून या जातीला लवकर फुले येतात. या जातीच्या फुलांचा आकार मध्यम असून रंग फिकट पांढरा असतो.

4. बग्गी :

शेवंतीची ही जात रोगांना कमी प्रमाणामध्ये बळी पडते. या जातीचे उत्पन्न चांगले मिळते सरासरी 10 ते 11 टन इतके उत्पन्न या जातीची लागवड केल्यानंतर हेक्टरी मिळते. या जातीची फुले पांढऱ्या रंगाची असून आकाराने मध्यम असतात.

5. राजा :

या जातीची फुले पांढऱ्या रंगाची असून या जातीपासून हेक्‍टरी सात ते आठ टन उत्पन्न मिळते. या जातीची फुले आकाराने मध्यम असतात.

लागवड :

  • शेवंतीची लागवड ही महाराष्ट्र मध्ये एप्रिल ते मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते.
  • यावेळी लागवड केल्यामुळे सनाला फुले उपलब्ध होतात आणि त्यांना बाजार भाव चांगला मिळतो.
  • लागवडीसाठी सुरुवातीच्या काळामध्ये पाणी उपलब्ध असल्यास लागवड चांगली होते.
  • ज्यावेळी पाणी उपलब्ध नसते अशावेळी जून आणि जुलैमध्ये लागवड केली जाते .
  • पावसाळा सुरू झाल्यावर केलेल्या लागवडी ची फुले डिसेंबर पासून पुढे उपयोगात येतात.
  • लागवडीसाठी सर्वप्रथम सर्व जमीन नांगरून घ्यावी. सर्व ढेकळे फोडून घ्यावे, कोळप्याच्या पाळ्या मारून जमीन भुसभुशीत केल्यानंतर त्याच्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
  • ६० सेंटिमीटर अंतरावर सऱ्या सोडून वाफे तयार करावेत. शेवंतीची लागवड काश्या पासून केली जाते.
  • लागवड नेहमी कमी ऊन असल्यावर करावे त्यामुळे रोपांची मर होत नाही.

आंतर मशागत :

  • लागवड झाल्यानंतर जमीन तन मुक्त ठेवणे खूप गरजेचे असते.
  • वेळोवेळी निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावे. खुरपणी केल्यामुळे जमीन भुसभुशीत राहते.
  • त्यामुळे पोषक वातावरण तयार होऊन पिकाची वाढ चांगली होते.
  • लागवड केलेल्या शेवंतीच्या रोपांना मातीची भर देणे गरजेचे असते.
  • शेवंतीची रोपे ढिसूळ असतात. त्यामुळे जोराचा वारा अथवा जास्त पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी मातीची भर देणे गरजेचे आहे.
  • जोराचे वारे थांबवण्यासाठी शेताच्या कडेला वारा रोधक झाडांची लागवड करावी.
  • झाडाची वाढ मर्यादित राहण्यासाठी आणि जास्त उत्पादनासाठी झाडाचा शेंडा खुडने गरजेचे असते.
  • चौथ्या आठवड्यानंतर शेंडा खुडण्याचे काम चालू केले जाते. साधारणपणे दहा सेंटिमीटर भाग खुडावा.
  • त्यामुळे झाडावर तीन ते चार फांद्या चारी दिशेने वाढतात आणि झाडाची सारखी वाढ होते.
  • झाडे एकसारखी उंच न वाढता पसरट पद्धतीने वाढतात.
  • त्यामुळे जास्त फांद्या फुटतात आणि कळ्या जास्त लागून फुलांचे उत्पन्न जास्त मिळते.
  • शेवंतीच्या झाडाला वळण देत असताना रोगट पाने, कमकुवत फांद्या आणि रोगट फांद्या काढून टाकावे.

महत्वाच्या किडी आणि रोग :

शेवंतीवरील किडी :

1.फुलकिडे :

  • या किडीचा प्रादुर्भाव पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
  • या किडी शेवंतीच्या कळ्या आणि फुलांमधून अन्न रस शोषतात. त्यामुळे पाने वेडी वाकडे होतात आणि झाडे पूर्णपणे पिवळी पडतात.
  • याचा परिणाम उत्पादनावर होतो. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी निळ्या चिकट सापळ्यांचा वापर शेतामध्ये करावा आणि जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.

2. मावा :

  • मावा ही रस शोषक कीड आहे. ही कीड शेवंतीच्या पानांवर, शेंड्यांवर, कोवळ्या फांद्यावर, कळीवर, दांड्यावर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव करून त्यातील अन्न रस शोषते.
  • त्यामुळे शेडयांची वाढ थांबते, कळ्या अर्धवट उमलतात, त्यामुळे फुलाच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर दोन्हीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होते.
  • या किडीतवर नियंत्रण करण्यासाठी शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा आणि जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.

3. पाने खाणारी अळी :

  • ही अळी शेवंतीच्या झाडाची सर्व पाने खाऊन टाकते. त्यामुळे फक्त झाडाचा सांगाडा शिल्लक राहतो.
  • झाडाला फुले लागल्यानंतर आणि कळ्या लागल्यानंतर सुद्धा या अळीचा उपद्रव दिसून येतो.
  • त्यामुळे नवीन कळ्या येण्याचे प्रमाण पूर्णपणे कमी होते.
  • पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही आळी मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव करते.
  • या किडीवर नियंत्रण करण्यासाठी दिसणाऱ्या सर्व आळ्या वेचून नष्ट कराव्या आणि जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.

4. लाल कोळी :

  • ही कीड लहान आकाराची असून पानाच्या खालच्या बाजूस राहते आणि जाळे तयार करते आणि तिथे राहून पानांमधील सर्व अन्नरस शोषते.
  • त्यामुळे पाने पूर्णपणे पिवळे पडतात. झाड सुकण्याला सुरुवात होते पानांची आणि कळ्यांची वाढ खुंटते.
  • कळ्या अर्धवट उमलतात आणि फुलांची प्रत कमी होऊन उत्पादनामध्ये देखील घट होते.
  • या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.

5. पाने पोखारणारी अळी ( लिफ मायनर ) :

ही अळी पानांच्या कडा एकत्र आणून गुंडाळ करते व त्याच्यात राहून पानांमधील रस शोषते.त्यामुळे पानांवर नागमोडी आकाराचे पट्टे दिसतात. या किडीचे नियंत्रण करण्यासाठी रोगट , किडलेली पाने गोळा करून नष्ट करावी आणि जैविक कीटकनाशकांची फवारणी घेऊन कीड आटोक्यामध्ये आणावी.

शेवंतीवरील रोग :

1. पानावरील ठिपके :

  • रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीलगतच्या सर्व पानांवर काळपट तपकिरी रंगाचे आणि गोल आकाराचे ठिपके पडलेले दिसतात.
  • हे ठिपके वेळेनुसार आकाराने मोठे होतात आणि एकमेकात मिसळतात .त्यामुळे संपूर्ण पान करपल्यासारखे दिसते.
  • या रोगाचा प्रादुर्भाव बुंध्यापासून सुरू होतो आणि हळूहळू झाडाच्या शेंड्याकडे पसरत जातो.
  • फांद्यांची संख्या कमी होते आणि फुलांच्या उत्पादनावर या रोगाचा अनिष्ट परिणाम होतो.
  • हा बुरशीजन्य रोग असून पावसाळी आणि दमट हवामानामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढतो.
  • या रोगाच्या नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी शेवंतीच्या झाडांवर करावे.

2. खोडकुज :

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे जमीन लगत असलेले खोड काळसर पडून पाने खालून वर पर्यंत सुकतात.

या रोगाचा प्रादुर्भाव जमिनीत वाढणाऱ्या बुर्शीपासुन झाल्यामुळे काही दिवसांनी संपूर्णपणे सर्व झाड पूर्णपणे मरून जाते. या रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी आणि रोगमुक्त रोपे लागवडीसाठी वापरावी.

3. भुरी :

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानावर पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसतात .या रोगामुळे पांढरी बुरशी मोठ्या प्रमाणावर वाढते. रोगाचे नियंत्रण न केल्यामुळे पानगळ मोठ्या प्रमाणावर होते .त्यामुळे अशा झाडांना कळ्या लागत नाहीत, लागलेल्या कळ्या पूर्णपणे उमलत नाहीत ,फुलाच्या खालच्या बाजूस देठाजवळ रोग पसरल्यामुळे फुले माना टाकतात आणि सर्व फुले सुकून वाळून जातात. त्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होते. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी शेवंतीच्या झाडावर करावी.

4. तांबेरा :

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शेवंतीच्या पानावर विटकरी रंगाचे ठिपके दिसतात. या ठिपक्यांचा आकार हळूहळू वाढत जातो आणि पूर्ण पान तांबरलेले सारखे दिसते.

काही काळानंतर पान काळपट होते आणि पूर्णपणे गळून पडते. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नवीन कळ्या येत नाहीत ,नवीन पालवी कमी प्रमाणामध्ये येते.

मुळे फुल लागण्याचे प्रमाण कमी होते आणि उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होते. या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

फुलांची काढणी आणि उत्पादन :

  • शेवंतीची फुले ही तीन ते पाच महिन्यानंतर काढण्यासाठी येते.
  • शेवंतीच्या फुले उमलण्याचा काळ हा प्रत्येक जातीनुसार वेगवेगळे असतो.
  • पूर्ण फुल उमरल्यानंतर शेवंतीच्या फुलांची काढणी करावी.
  • काढणी नेहमी सकाळच्या वेळी करावी.
  • उन्हामध्ये काढणी केल्यानंतर फुलांचा रंग फिका पडतो आणि वजन देखील कमी भरते.
  • शेवंती पासून सरासरी 7 ते 13 टनापर्यंत सुट्ट्या फुलाचे उत्पादन मिळते.
  • फुलांची काढणी केल्यानंतर फुले पॅकिंग बांबूच्या टोपल्यांमध्ये किंवा पोत्यांमध्ये भरावे आणि बाजारपेठ मध्ये पाठवावे.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/flower

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *