Blogभाजीपाला

वाटाणा लागवड :

5/5 - (1 vote)

वाटाणा हे भाजी पिकामधील पौष्टिक पीक मानले जाते. वाटाण्याचा वापर विविध प्रकाराचे पदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. वाटाणा मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते,जो पचन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करतो आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी सुद्धा मदत करतो. त्यामुळे शरीरातील आतडे पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि पोट निरोगी राहतो. मटार मध्ये अँटिऑक्सिडेंट चे प्रमाण चांगल्या टक्केवारी मध्ये असते. मटार मध्ये विटामिन सी ,कॅरोटीनॉईड देखील असतात .जे शरीराला तणाव आणि जळजळ पासून संरक्षण करण्यासाठी मदत करतात.

मटर मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असतात त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यासाठी मदत होते. मधुमेह असलेल्या लोकांनी मटराचे सेवन रोजच्या आहारामध्ये करावे. मटार खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कारण वाटाणा मध्ये अँटिऑक्सिडंट आणि विटामिन सी चे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असते. आपण फ्रोजन करून खूप दिवसांपर्यंत टिकवू शकतो आणि दर वाढल्यानंतर त्याला विक्रीसाठी वापरू शकतो. वाटाण्यामध्ये डायरेक्टरी फायबर असल्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि त्यामुळे सारख्या खाण्याच्या सवयी सुटतात आणि वजन कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होते. वाट्याण्याची लागवडीचा शेतकऱ्याला नक्कीच फायदा होतो.

लागणारे हवामान :

वाटाण्याची पिके थंड हवामानामध्ये उत्तमरीत्या येते .वाटाण्याच्या पिकाला 16 ते 80 डिग्री सेल्सिअस तापमान चांगले मानवते.

वाटाण्याच्या झाडाला जेव्हा फुले येतात अशावेळी धुके पडल्यावर उत्पादनामध्ये मोठे नुकसान झालेले दिसते.

कोरड्या आणि उष्ण हवामानामध्ये शेंगांमध्ये बी भरत नाही. त्यामुळे शेंगा चांगल्या होत नाहीत आणि बाजारांमध्ये भावसुद्धा मिळत नाही.

तापमानामध्ये एकदम वाढ झाल्यानंतर कोवळेपणा आणि दाण्यातला गोडवा कमी होतो आणि दाणे कडक होऊन खाण्यामध्ये पिठुळ लागतात.

लागणारी जमीन :

वाटाण्याची लागवड करण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भुसभुशीत ,गाळाची जमीन निवडावी.

मध्यम ते भारी जमिनीमध्ये पिकाचे उत्पन्न चांगले येते. हलक्या जमिनीमध्ये वाटाणा लवकर पक्व होतो आणि भारी जमिनीमध्ये उशिरा येतो पण उत्पादन चांगले मिळते.

ज्या जमिनीचा सामू 5.5 ते 6.7 असतो. अशा जमिनीमध्ये वाटाण्याची लागवड उत्तम मानले जाते.

सुधारीत जाती :

1.शेतातील वाटाणा :

या जातीचे वाटाणे लागवड केल्यानंतर सरासरी 135 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होतात .ही जात लवकर परिपक्व होते .वाटाण्यामधील बिया या हलक्या हिरव्या रंगाच्या असतात आणि शेंगावर किंचित सुरकुत्या पडलेल्या दिसतात .या जातीचे सरासरी एकरी उत्पादन 27 क्विंटल पर्यंत मिळते.

2. पंजाब 89 :

या जातीचे सरासरी 60 क्विंटल एकरी उत्पादन मिळते. या जातीच्या शेंगा या जोडप्यात येतात. लागवड केल्यानंतर सरासरी 90 दिवसांनंतर पहिली काढणी होते .बिया खाण्यासाठी चवीला गोड असतात.

3. मिठी फली :

या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी पहिली काढनी 90 दिवसांनी करता येते. या जातीपासून सरासरी एक तरी 47 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते .या जातीच्या वाटाण्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते आणि शेंगा चवीला गोड असतात.

4. मटार आगेता -7 :

या जातीपासून सरासरी 32 क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन मिळते .ही जात लवकर परिपक्व होते. लागवड केल्यानंतर सरासरी 65 ते 70 दिवसांमध्ये ही जात काढण्यासाठी तयार होते.

5. ए पी 3 :

ही एक लवकर परिपक्व होणारी जात आहे .या जातीची लागवड जास्त करून ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केली जाते .त्यानंतर 70 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी येते .या जातीचे सरासरी 31 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.

6. पंजाब 88 :

वाटण्याची ही जात पंजाब एग्रीकल्चर यूनिवर्सिटी लुधियाना येथे विकसित केलेली आहे. या जातीची लागवड प्रारंभिक हंगामामध्ये केली जाते. या जातीपासून सरासरी 62 क्विंटल एकरी उत्पादन मिळते. या जातीच्या शेंगा गडद हिरव्या रंगाच्या असतात आणि लागवड केल्यानंतर सरासरी 100 दिवसांमध्ये हे काढण्यासाठी तयार होते.

7. मटार अगेटा :

वाटाण्याची ही जात देखील पंजाब एग्रीकल्चर युनिव्हर्सिटी लुधियाना येथे विकसित केलेली आहे. या जातीच्या वाटण्याच्या बिया गुळगुळीत आणि हिरव्या रंगाच्या असतात. या जातीपासून सरासरी 24 क्विंटल एकरी उत्पादन मिळते.

8. पि जी 3 :

वाटाण्याची ही जात लवकर परिपक्व होते .लागवड केल्यानंतर सरासरी 135 दिवसानंतर ही जात काढण्यासाठी तयार होते. या जातीच्या झाडांना फुले पांढऱ्या रंगाची येतात आणि दाणे पांढऱ्या रंगाचे असतात .ही जात लवकर परिपक्व होत असल्याने भुकटी बुरशी आणि शेंगा बोरचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसतो.

लागवडीसाठीचा हंगाम आणि लागवड :

वाटण्याची लागवड ही थंड हवामानामध्ये चांगली येते. त्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीमध्ये आणि नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत वाटाण्याची लागवड केली जाते.

महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामामध्ये लागवड केली जाते. सरासरी जून ते जुलै महिन्यांमध्ये वाटाण्याची लागवड केली जाते.

वाटाण्याची लागवड रब्बी हंगामामध्ये सुद्धा करतात.

लागवड करण्यासाठी सर्वप्रथम जमीन चांगली नांगरून घ्यावे आणि सर्व ढेकळे फोडून त्यामध्ये शेणखत किंवा गांडूळ खत मिसळून घ्यावे आणि कोळप्याच्या साह्याने जमीन भुसभुशीत करून सपाट करावे.

वाटण्याची लागवड सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यांमध्ये करता येते.

सरीवर आंब्यावर 30 × 15 सेंटीमीटर या अंतरावर लागवड केले जाते आणि सपाट वाफ्यांमध्ये 30 × 10 सेंटिमीटर अंतरावर वाटाण्याची लागवड केली जाते.

हेक्टरी ८० ते ९० किलो बियाणे वाटणा लागवडीसाठी पुरतात.

खत आणि पाणी व्यवस्थापण :

वाटाण्याच्या लागवडीसाठी नांगरट करताना आपण शेणखत टाकतो. त्यानंतर आपण जीवामृत किंवा गांडूळ खत सुद्धा टाकू शकतो.

सरीवरंबावर लागवड केल्यास ठिबक सिंचनाच्या सहाय्याने आपण जीवामृत सोडू शकतो.

जीवामृत मुळे जमिनीमध्ये सूक्ष्म जीवांची संख्या वाढते. त्यामुळे जमीन भुसभुशीत होते आणि उत्पन्न देखील चांगले मिळते.

या पिकाला पाण्याची जास्त गरज नसते. त्यामुळे शेंगा भरणीच्या काळामध्ये वाटाण्याला पाण्याचा ताण पडू देऊ नये.

पाण्याचा ताण पडल्यामुळे शेंगा भरत नाहीत आणि त्यामुळे उत्पन्न कमी येऊ शकतात.

आंतर मशागत : वाटण्यासाठी जमीन भुसभुशीत असणे आणि तनविरहित असणे खूप गरजेचे असते.

तणांचा प्रादुर्भाव दिसल्यानंतर खुरप्याच्या सहाय्याने सर्व तण काढून घ्यावे आणि वेलीसारख्या जातीला बांबूच्या किंवा तारेच्या साह्याने आधार द्यावा .

त्यामुळे वेलींची वाढ चांगली होते आणि उत्पन्न देखील चांगले मिळते.

महत्वाच्या कीडी आणि रोग :

1.वाटाणा शेंगा खाणारी अळी :

ही कीड वाटाणा मधील सर्वात गंभीर कीड मानली जाते .ह्या किडी किंवा अळ्या वाटाण्याच्या आतील संपूर्ण बिया खाऊन टाकतात. त्यामुळे उत्पादनामध्ये घट होते .सुरुवातीच्या काळामध्ये या आळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर फुले आणि शेंगा गळतात. या किडीचा प्रादुर्भाव नियंत्रित न केल्यामुळे दहा ते 90% पर्यंत नुकसान होऊ शकते. या कीडीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.

2. मावा :

या किडीचे प्रौढ आणि पिले दोन्ही अवस्था मोठ्या प्रमाणावर शेंगांमधून रस शोषतात. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होते. या व्हिडिओ स्वतःच्या शरीरामधून मोठ्या प्रमाणावर चिकट गोड पदार्थ स्त्रवतात. त्या चिकट गोड पदार्थावर काळी बुरशी लगेच आकर्षित होते .त्यामुळे शेंगा पूर्णपणे काळ्या पडतात. या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा.

3. लिफ मायनर :

पानांच्या मधल्या शिरांमध्ये या किडी आत शिरतात आणि पानांच्या शिरांमधून स्वतः पदार्थ खातात. या किडीमुळे दहा ते पंधरा टक्के पर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान होते .या किडी शेंगांवर हल्ला करतात. त्यामुळे शेंगांच्या वर पांढरे रेषा दिसतात .त्यामुळे शेंगांची प्रत कमी होते. या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.

रोग :

1.भुरी :

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांच्या फांद्यांवर आणि शेंगाच्या खालच्या बाजूला ठिसूळ पांढऱ्या पावडरची वाढ मोठ्या प्रमाणावर दिसून येते .ही बुरशी अन्न स्त्रोत्र म्हणून वापरून वनस्पतीला परजीवी बनवते .हा रोग वाटाण्याच्या कोणत्याही वाडीच्या अवस्थेमध्ये पडू शकतो .या रोगाचा प्रादुर्भाव करण्यासाठी कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.

2.वाटाण्यावरील गंज :

या रोगामुळे डेट, पाने, फांद्या आणि शेंगावर पिवळसर तपकिरी गोलाकार दाग दिसतात. हे दाग गंजासारखे दिसतात .या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

3.कोमेजने :

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाडांची मुळे काळी पडलेली दिसतात आणि कालांतराने पूर्ण मुळ्या कुजलेल्या दिसतात. त्यामुळे झाडांची पूर्णपणे वाढ खुंटते आणि रंग पिवळा पडायला लागतो .संपूर्ण झाड हळूहळू कोमेजून जाते आणि झाडाचे खोड पुर्णपणे सुकते .या रोगाचे प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बीज प्रक्रिया करावी आणि जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा.

काढणी आणि उत्पादन:

लागवड केल्यानंतर 60 ते 80 दिवसांमध्ये शेंगा काढणी साठी तयार होतात.

जातीनुसार प्रत्येक जातींचे काढणीचा काळ वेगवेगळा असू शकतो.

शेंगा काढण्यासाठी तयार झाल्यानंतर त्यांचा गडद हिरवा रंग बदलून त्या फिकट हिरव्या रंगाच्या झालेल्या आणि टपोऱ्या दिसायला लागतात.

शेंगांची नियमित काढणी करावी लागते .कोवळ्या शेंगा तोडल्यावर चांगला फायदा मिळतो.

शेंगा तोडताना वेलीला किंवा झाडाला इजा होणार नाही याची योग्य काळजी घ्यावी.

वाटाण्याची काढणी तीन ते चार तोड्यात पूर्ण होते. तोडणीसाठी उशीर झाल्यानंतर शेंगा जुन होतात आणि त्यांची चव बदलते.

अशा शेंगांना बाजारामध्ये कमी भाव मिळतो. वाटाण्याच्या हिरव्या शेंगांचे हेक्टरी चार ते सहा टन उत्पन्न मिळते आणि जातीनुसार उत्पादनामध्ये बदल होऊ शकतो.

वाळलेल्या दाण्यांचे हेक्टरी दीड ते दोन टन पर्यंत उत्पादन मिळू शकते.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/vegetables

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *