रताळी लागवड
रताळी हे कंदमूळ आहे, रताळीला आयुर्वेदिक वनस्पती सुद्धा म्हणले जाते. महाराष्ट्रामध्ये रताळ्याची लागवड काही विभागांमध्ये कमी प्रमाणामध्ये तर काही विभागांमध्ये जास्त प्रमाणामध्ये केली जाते. रताळ्याचा उपयोग उपवासा दिवशी आहारात केला जातो. रताळ्यापासून स्टार्च, अल्कोहोल बनवले जाते. रताळ कच्चे, भाजून किंवा उकडून खाल्ली जातात. रताळी मध्ये अ, ब आणि क जीवनसत्वे आढळतात. रताळ्यामध्ये प्रथिने, फॉस्फरस, लोह, चुना असे भरपूर खनिजे मिळतात. रताळ्यामध्ये 16% स्टार्च आणि चार टक्के साखर असते.
रताळ्या मध्ये फायबरचे प्रमाण मुबलक प्रमाणामध्ये असते त्यामुळे याचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते. रताळे खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या पोटांच्या समस्यांपासून शरीराला आराम मिळतो. रताळ्यामध्ये उष्मांक कमी असतो आणि फायबर जास्त असल्यामुळे त्याचा समावेश आहारामध्ये केल्याने पोट खूप जास्त वेळ भरल्यासारखे वाटते त्यामुळे जास्त खाण्याचा सवयीपासून आपण दूर राहतो ,त्यामुळे हळूहळू वजन कमी होते. रताळ्यामध्ये पोटॅशियम चे प्रमाण मुबलक प्रमाणामध्ये असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते त्यामूळे हृदयाविकाराचा धोका सुद्धा कमी राहतो.
लागणारी जमीन :
लागवड वेगवेगळ्या जमिनी मध्ये होऊ शकते. जांभ्या खडकाच्या खोल जमिनीमध्ये रताळ्याची लागवड खूप चांगले होते.
जास्त प्रमाणामध्ये सेंद्रिय खत असलेले, खोल आणि भुसभुशीत जमिनीमध्ये रताळ्याची लागवड चांगली होते.
भारी जमिनीमध्ये वेलींची लागवड खूप जास्त प्रमाणामध्ये होते त्यामुळे खूप छोटे लहान कंद वेलाला तयार होतात, त्यामूळे उत्पादन कमी मिळते.
अशा जमिनीमध्ये पाण्याचे ताण पडल्यानंतर जमिनी भेगाळतात आणि कंदांची वाढ योग्य होत नाही.
म्हणून हलक्या, भुसभुशीत जमिनी रताळ्याच्या लागवडीसाठी निवडाव्या.
जमिनीचा सामू 5 .8 ते 6.7 दरम्यान असला तर रताळ्याची लागवड चांगली होते.
लागणारे हवामान :
रताळी साठी उबदार आणि दमट वातावरण चांगले मानवते.
रताळे हे उष्ण समशितोष्न कटिबंधातील पीक आहे.
त्यामुळे धुक्याचा आणि कडाक्याच्या थंडीचा रताळ्या पिकावर अनिष्ट परिणाम दिसून येतात.
सरासरी 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमानामध्ये रताळी या पिकाची लागवड यशस्वी राहते.
रताळी साठी भरपूर सूर्यप्रकाश, मध्यम पाऊस आणि दिवसाचे तापमान मध्ये कमी फरक असल्यास अशा ठिकाणचे वातावरण योग्य ठरते.
रताळी सुधारित जाती
1. सम्राट :
ही जात रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामांसाठी लावली जाते. लागवड केल्यानंतर 90 ते 105 दिवसांमध्ये ही काढण्यासाठी तयार होते आणि या जातीचे सरासरी उत्पन्न 10 टन प्रती हेक्टर पर्यंत मिळते.
2. व्ही-35 :
या जातीच्या रताळ्याचा रंग पांढरा असतो आणि आकार गोलसर असतो. लागवड केल्यानंतर चार ते पाच महिन्यानंतर रताळी काढण्यासाठी तयार होतात. या जातीची लागवड उन्हाळी किंवा हवी रब्बी हंगामामध्ये केली जाते. या जातीचे सरासरी उत्पादन 13 टन पर्यंत मिळते.
3. कालमेघ :
या जातीच्या रताळ्याची लागवड केल्यानंतर सरासरी 90 ते 105 दिवसांमध्ये कंद काढण्यासाठी तयार होतात .कंदांचा रंग गव्हाळ असून कंद आकाराने गोल असतात. या जातीची शिफारस भारतीय कृषी अनुसंधान संस्था ने केलेली आहे .या जातीची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये केली जाते. दुसऱ्या जातींच्या तुलनेमध्ये ही जात लवकर तयार होते.
4. पुसा सफेद :
या जातीचे उत्पन्न लागवड केल्यानंतर 120 ते 135 दिवसांमध्ये मिळते. रताळ्यांचा आकार मध्यम असतो. या जातीचे सरासरी उत्पन्न 23 ते 26 टन हेक्टरी पर्यंत मिळते.
5. वर्षा :
या जातीची लागवड खरीप हंगामामध्ये केली जाते. लागवड केल्यानंतर सरासरी चार महिन्यांमध्ये कंद काढण्यासाठी तयार होतात. ज्या ठिकाणी पाण्याचा ताण पडतो अशा ठिकाणी या जातीची लागवड आपण करू शकतो. या जातीपासून सरासरी उत्पादन 20 ते 25 ते पर्यंत मिळते .कंदांचा आकार मोठा लांबट आणि रंग लाल असतो.
6.कोंकण अश्विनी :
रताळ्याची ही जात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या विद्यापीठांनी विकसित केलेली आहे .या जातीची लागवड महाराष्ट्र मध्ये केली जाते .या जातीचे लागवड केल्याने कमी कालावधीमध्ये कंद काढण्यासाठी तयार होते आणि भरघोस उत्पन्न मिळते.
7. श्री अरुण :
ही जात सेंट्रल ट्यूबर क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी विकसित केलेली आहे. या जातीच्या कंदांचा रंग गुलाबी असतो आणि ही एक लवकर परिपक्व होणारी जात आहे .या जातीपासून सरासरी उत्पन्न 80 ते 110 क्विंटल एकरी मिळते.
8. श्री कनका :
रताळ्याची ही जात सुद्धा सेंट्रल ट्युब वर क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट इथे विकसित केलेली आहे. या जातीचे सरासरी उत्पन्न 40 ते 60 क्विंटल एकरी मिळते. या जातीच्या कंदांचा रंग गडद केसरी असतो आणि आतील गर क्रीम रंगाचा असतो.
9. श्री वरून :
या जातीची लागवड केल्यानंतर 90 ते 100 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीचे सरासरी उत्पन्न 80 ते 110 एकर उत्पन्न मिळते . रताळ्याची ही जात सेंट्रल कंद पीक संशोधन संस्था इथे विकसित केलेली आहे.
लागवड :
लागवडीसाठी सर्वप्रथम निवडलेली जमीन चांगली नांगरन करून घ्यावी आणि कोळपाच्या साह्याने जमीन चांगली भुसभुशीत करावी.
त्याचबरोबर 20 टन शेणखत जमिनीमध्ये व्यवस्थित मिसळावे.
रताळी लागवडीसाठी सात ते आठ महिन्यापूर्वीचे चांगले चार डोळे असणारे आणि 30 सेंटीमीटर लांबीचे वेलीचे तुकडे घ्यावे.
वेलीच्या टोकाकडील भाग घ्यावा आणि बुडाखडील 35 ते 40 सेंटीमीटर भाग चाकूच्या साह्याने कापून टाकावा.
कारण या भागाला फुटवे फुटण्याची प्रवृत्ती कमी असते .रताळ्याच्या लागवडीसाठी हेक्टरी 40 ते 50 हजार वेलीचे तुकडे लागतात.
महाराष्ट्र मध्ये रताळ्याची लागवड रब्बी आणि खरीप हंगामांमध्ये केली जाते.
बेण्याचा मध्य भाग जमिनीमध्ये जाऊन टोकाकडील दोन्ही डोळे जमिनीमध्ये राहतील अशा रीतीने आकारात वाकून लागवड करावी.
लावलेल्या वेली मातीच्या साह्याने घट्ट दाबून घ्यावा.
रताळ्याची लागवड सरीवरंबावर 60 × 30 सेंटिमीटर अंतरावर केली जाते.
खत व्यवस्थापन आणि पाणी नियोजन :
जमीन लागवडीसाठी जमीन तयार करत असताना 20 तर शेणखत किंवा घन जीवामृत टाकावे.
ठिबक सिंचनाने पाणी नियोजन केल्यास जीवामृत सोडावी आणि पाठ पाणी देत असताना त्यातून जीवामृत सोडावे, एका आठवड्यातून शंभर लिटर जीवामृत एकरी सोडावे.
रताळी हे जमिनीच्या आत येणारे पीक आहे. त्यामुळे पाणी साचून राहणार नाही याची योग्य काळजी घ्यावी.
हिवाळ्यामध्ये दहा ते बारा दिवसांनी आणि उन्हाळ्यामध्ये सात ते आठ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
पाणीपुरवठा नियमित करावा .पाणीपुरवठा कमी पडल्यावर उत्पादनामध्ये घट येऊ शकते.
अंतरमशागत :
जमिनीला टेकलेल्या वेलांच्या डोळ्यातून मुळा बाहेर पडतात .त्यासाठी वेली पालटणे योग्य राहते.
लागवड केल्यानंतर सुरुवातीला तणांचा बंदोबस्त हलक्या खुरपणी करून करावा.
त्याच वेळी वेलींना मातीची भर द्यावे. मुळाभर पडल्यानंतर मात्र वेली कापू नयेत.
महत्त्वाच्या किडी आणि रोग :
किडी:
1. कंद पतंग :
ही कीड रताळ्या मधील प्रमुख कीड आहे. कंदामध्ये बोगदा बनवून त्याच्या आतील गर खाऊन टाकते.
या किडीचे नियंत्रण करण्यासाठी पेरणी करताना निरोगी बियाणे वापरावे आणि शेतामध्ये फक्त चांगले कुजलेले शेणखत वापरावे.
2.मावा :
या किडीचे प्रौढ आणि पिले दोन्हीही रताळ्याच्या वेलांच्या कोवळ्या भागातून रस शोषतात आणि ही किडे चिकट गोड पदार्थ स्त्रवता.
त्यामुळे त्या पदार्थावर काळे बुरशी आकर्षित होते आणि पूर्ण पान काळे पडते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण ची क्रिया मंदावते आणि परिणामी उत्पन्न कमी येते.
या किडीचे नियंत्रण करण्यासाठी शेतामध्ये जैविक कीटकनाशकाची फवारणी करावी आणि चिकट सापळ्यांचा वापर करावा.
रोग :
1. स्कॅब :
याच रोगाचा प्रादुर्भाव साठवणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कंदांवर हलक्या तपकिरी ते काळ्या रंगाचे घाव दिसतात.
या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कुजलेले शेण खत वापरावे आणि रोगमुक्त बियांचा वापर करण्यासाठी करावा.
रोग झाल्यावर जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.
2. ब्लॅक स्कर्फ :
रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर रताळीच्या कंदावर काळ्या रंगाचा ठिपका दिसून येतो.
प्रभावी झाडे सुकतात. प्रादुर्भाव झालेल्या कंदांना डोळा फुटण्याच्या वेळी त्यावर काळा तपकिरी रंग येतो.
या रोगावर नियंत्रण करण्यासाठी लागवडीसाठी रोगमुक्त कंदांचा वापर करावा.
कंदांना बीज प्रक्रिया द्यावी आणि नंतर लागवड करावे आणि जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.
3. करपा :
या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांच्या खालच्या बाजूला नेकरोटीक डाग पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव मातीमध्ये असलेल्या कवकांमुळे होतो.
कमी तापमान आणि आद्रतेमुळे या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी पिकांची फेरपालट करावे आणि जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.
काढणी आणि उत्पादन :
रताळी काढण्यासाठी तयार झाल्यावर सर्व वेली सुकून पिवळा पडतात.
पूर्ण तयार झालेला रताळ्याची साल नखांनी काढली तर ती लगेच सुकते आणि कोवळ्या रताळ्याची साल तशीच राहून त्यानंतर त्याच्यावर काळपट डाग पडतात.
त्यासाठी पूर्णपणे तयार झालेली रताळी काढावीत. लागवड केल्यानंतर सरासरी 110 ते 150 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते.
सर्वप्रथम काढणी करताना पिवळे पडलेले सर्व वेल खुरप्याच्या सहाय्याने कापून टाकावेत आणि कुदळीच्या साह्याने रताळे बाहेर खणून काढावे.
काढलेल्या रताळ्यांना स्वच्छ करावे आणि प्रतवारी लावून बाजाराला पाठवावे.
रताळ्याचे उत्पादन जातीनुसार वेगवेगळे येते.
रताळी चे उत्पादन जमीन आणि हवामान यावर सुद्धा अवलंबून असते.सरासरी 15 ते 20 टन पर्यंत उत्पादन रताळ्यापासून मिळते.
Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi