Blogभाजीपाला

बटाटा लागवड 🥔

5/5 - (1 vote)

बटाटा हे पीक भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहे. बटाट्याचा वापर जवळपास भारतामध्ये सर्व घरांमध्ये रोज केला जातो. बटाटा हे संपूर्ण आहार मानले जाते ,कारण त्यामध्ये सर्व पोषक द्रव्य पुरेशा प्रमाणामध्ये आढळतात. बटाटा हा पचण्यासाठी खूप हलका असतो. स्निग्ध पदार्थ कमी असल्यामुळे उकडून खाल्ल्यानंतर वजन वाढत नाही. बटाट्यामध्ये ब आणि क ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणामध्ये आढळतात. बटाट्यापासून भाजी, चिप्स, फिंगर चिप्स असे बरेच पदार्थ तयार केले जाते. बटाट्याचा वापर प्रक्रिया उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. बटाट्यामध्ये प्रथिने, लोह, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम ही खनिजे सुद्धा आढळतात. बटाटा या भाजीमध्ये खूप प्रमाणामध्ये स्टार्च असते. त्यामुळे आतड्यांसाठी स्टार्च चांगले असते. बटाट्यामुळे रक्तदाब कमी करण्यासाठी मदत होते कारण बटाट्यामध्ये पोटॅशियम सारख्या अनेक पोषक घटक असतात.

लागणारी जमीन :

बटाटा हा जमिनीच्या आत उगवतो त्यामुळे जमीन ही उत्तम पाण्याचा निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थ भरपूर असलेली निवडावी.

रेताड जमीन मध्ये बटाटा चांगला उगवतो. काळ्या भारी चिकन मातीयुक्त जमिनीमध्ये बटाट्याची लागवड चांगली होत नाही.

बटाट्यासाठी जमिनीचा सामू 6 ते 8 च्या दरम्यान असावा. रेताड जमिनीमध्ये लागवड केल्याने बटाटा रंग आणि आकार हा चांगला येतो.

लागणारे हवामान :

बटाटा हे पीक जास्त करून थंड वातावरणामध्ये चांगले उत्पन्न देते. बटाटा या पिकाला वाढीच्या काळामध्ये उष्ण वातावरण आणि जेव्हा बटाटा पोचतो तेव्हा थंड तापमान असले या पिकाला फायदेशीर ठरते बटाट्याचे पीक 15 अंश ते 24 अंश सेल्सिअस या तापमानामध्ये उत्तम उत्पन्न देते जास्त पावसाळा बटाट्याला मानवत नाही.

सुधारित जाती :

1.कुफरी नीलकंठ :

बटाट्याचे हे वाण अति थंडीमध्ये सुद्धा तग धरते आणि अँटिऑक्सिडंट चे प्रमाण बटाट्याच्या जातीमध्ये जास्त असते. या जातीचे बटाटे 90 ते 100 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होतात, उत्पादन क्षमता इतर जातीपेक्षा जास्त आहे आणि बटाटा चवीला खूप चांगला लागतो.

2. कुफरी अलंकार :

बटाट्याच्या या जातीचे पीक हे 70 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होते. हे बटाट्याची सुधारित जात आहे आणि या जातीचे उत्पादन 200 ते 250 क्विंटल पर्यंत येते.

3. कुफरी सिंदुरी :

बटाट्याच्या या जातीचे उत्पन्न 300 क्विंटल पर्यंत हेक्टरी मिळते. हा बटाटा चिप्स साठी उत्तम असतो बटाट्याचे ही जात अवघ्या 120 ते 135 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होते आणि बटाट्याचा आकार मध्यम आणि गोल असतो आणि रंग फिकट तांबडा असतो.

4. कुफरी पुखराज :

बटाट्याच्या सर्व जातींच्या तुलनेमध्ये ही जात सर्वात आधी काढण्यासाठी तयार होते. अवघ्या 100 दिवसांमध्ये ही जात काढण्यासाठी तयार होते.

5. कुफरी चिप्सोना :

ही जाती आकारामध्ये मोठी आणि उभट असते आणि नावाप्रमाणेच ही जात चिप्स बनवण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे . या जातीचे हेक्टरी उत्पादन 300 ते 350 क्विंटल पर्यंत येते आणि चिप्स बनवण्यासाठी योग्य अशी जात आहे.

6. कुफरी चंद्रमुखी :

बटाट्याच्या या जातीचे हेक्टरी उत्पादन 250 क्विंटल पर्यंत मिळते .ह्या बटाट्याचे आकार लांबट ,गोल आणि फिकट पांढरे असतात. बटाट्याची ही जात अवघ्या 90 ते 100 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होते.

लागवडीचा हंगाम आणि लागवड :

महाराष्ट्र या राज्यामध्ये बटाट्याची लागवड ही रब्बी आणि खरीप अशी दोन्ही हंगामामध्ये केली जाते.

रब्बी हंगामाची लागवड ही ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात आणि खरीप हंगामाची लागवड जून ते जुलै या महिन्यांमध्ये केली जाते.

बटाट्याच्या लागवडीसाठी बेणे उत्तम दर्जाचे शुद्ध आणि रोगमुक्त असल्यास लागवड यशस्वी होते.

बटाट्याच्या बेण्यांचे वजन 50 ते 100 ग्रॅम वजनाचे असावे आणि पूर्णपणे पक्व झालेले असावे.

बटाट्याचे साठवणूक काढणी नंतर शीतगृहामध्ये ठेवले जाते.

लागवडीसाठी एक आठवडा बेणे शीत ग्रहामधून काढून ठेवावेत आणि जेव्हा बेणे मधून कोंब दिसू लागतात.

तेव्हा त्या बेण्यांचा वापर बटाटा लागवडीसाठी करावे. हेक्टरी आठ ते पंधरा क्विंटल बेणे पुरते.

लागवडीसाठी निवडलेल्या जमिनी मध्ये खोल नांगरट करावे आणि कोळप्याच्या सहाय्याने जमीन कोळपावे.

बटाट्याच्या बेण्यांची लागवड 45 × 30 सेंटीमीटर या अंतरावर करावे.

खत व्यवस्थापन आणि पाणी नियोजन :

बटाटा उगवण्यासाठी जमीन मध्ये सूक्ष्मजीवांची संख्या जास्त असणे खूप गरजेचे आहे.

त्यासाठी जमिनीमध्ये लागवड करण्याच्या अगोदर शेतामध्ये शेणखत घन जीवामृत किंवा गांडूळ खत टाकावे.

त्यामुळे जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि बटाटा चांगला पोसवतो.

झाडाला ठराविक काळानंतर जीवामृत सोडावे. बटाट्याच्या लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. बटाट्याला वारंवार पाणी द्यावे लागते.

बटाट्याची मुळे ही उथळ असतात त्यामुळे पाण्याची कमतरता भासल्यानंतर मुलांना पोषक द्रव्य उपलब्ध होण्यासाठी अडचण येते.

पाण्याची कमतरता भासल्यामुळे बेण्याच्या उगवणीवर सुद्धा अनिष्ट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे पिकानुसार आठ ते दहा दिवसानंतर पाणी द्यावे.

आंतर मशागत :

लागवडीनंतर उगणारे सर्व तन वेळोवेळी खुरपाच्या साह्याने खुरपणी करून काढून टाकावे.

मात्र आणि खुरपणी करताना मुळ्या आणि भूमिगत असणाऱ्या खोडांना आणि कंदांना इजा होणार नाही याची दक्षता बाळगावी.

बटाटा उघडा पडल्यावर सूर्यप्रकाशामुळे त्या भागात सोलेनीन हे विषारी द्रव तयार होते.

त्यामुळे बटाटे हिरवे होतात आणि खाण्यासाठी अयोग्य बनतात .त्यासाठी बटाट्याला वेळोवेळी मातीची भर घालावी.

महत्त्वाच्या किडी आणि रोग :

किडी :

1. पाने खाणारी अळी ( स्पोडॉप्टरा ) :

या किडीची अळी दिवसा जमिनीमध्ये लपून राहते आणि रात्रीच्या वेळीच बटाट्याची पाने खाते.

जेव्हा या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. तेव्हा फक्त पानाच्या शिरा शिल्लक राहतात.

जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीत पोसणाऱ्या बटाट्यावर देखील ही आळी हल्ला करते आणि पूर्ण पोखरून टाकतो त्यामुळे बटाट्याच्या उत्पन्नामध्ये खूप घट होते.

या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करावा.

2. बटाटा पोखरणारी अळी :

या किडीचे प्रौढ हे उघड्या पडलेल्या बटाट्यावर अंडी घालतात आणि अंडी फुटल्यानंतर पिले बटाट्याच्या डोळ्यातून आत प्रवेश करतात आणि बटाटे पोखरू लागतात.

ह्या आळी पूर्णपणे बटाटा आतून पोखरून खातात बटाट्यावर आणि डोळ्यांपासून त्यामुळे बटाट्याची परत घटते आणि वजन घटते त्यामुळे बाजारामध्ये अशा बटाट्यांना खूप कमी भाव मिळतो या किडीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.

3. पांढरी माशी :

ह्या किडीचे प्रौढ आणि पिले दोन्हीही झाडावर हल्ला करतात. ही कीड बटाट्याच्या पानातून मोठ्या प्रमाणावर रस शोषते.

त्यामुळे झाड कमकुवत बनते .ही कीड चिकट गोड पदार्थाचा द्रव स्त्रवते त्या द्रवावर काळी बुरशी आकर्षित होते.

त्यामुळे पूर्ण पाने काळी पडतात आणि प्रकाश संश्लेषण ची क्रिया खंडित होते आणि अन्न निर्मिती बंद होते. त्यामुळे बटाट्याला अन्नपुरवठा होत नाही आणि उत्पादन कमी येते.

या किडीचा नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि चिकट सापळ्यांचा वापर शेतामध्ये करावा.

रोग :

1. लवकर येणारा करपा :

या रोगाचा प्रादुर्भाव लागवडीनंतर पाच ते सहा आठवड्यानंतर पीकांवर दिसतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बटाट्याच्या पानावर तांबडे गोल ठिपके पडतात आणि ते ठिपके एकत्र होऊन पूर्ण पान तांबडे पडते, परत गळून पडतात पाने पिवळे पडतात आणि त्यामुळे झाडांची वाढ खुंटते.

2. उशिरा येणारा करपा :

रोगाची लक्षणे झाडाच्या खालील पानांवर सर्वप्रथम दिसते. पानांवर तपकिरी फिकट रंगाचे वण तयार होतात.

रोगट पानांच्या खालच्या बाजूवर पांढरे बुरशी वाढते. पानांबरोबर खोड आणि बटाट्यावरही हा रोग आढळून येतो.

रोगामुळे बटाटे सढतात आणि त्यामुळे दुर्गंध येऊ लागतो.

3. बांगडी रोग :

ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाडांची वाढ खुंटते आणि कालांतराने पाने पिवळी पडून तांबूस रंगाची होतात.

पाने एकदम मरून जातात. रोग ग्रस्थ झाडांचे बटाटे कापल्यानंतर आतल्या भागात बांगडी सारखी तपकिरी काळसर सूक्ष्मजंतूंची पूर्ण वाढ झालेली दिसते.

अशा बटाट्यातून दुधीयुक्त पिवळसर द्रावण बाहेर पडतो. रोग झालेल्या बटाट्याचे डोळे काळपट पडतात.

काढणी आणि उत्पादन :

बटाट्याची वरची पाने जोपर्यंत पिवळी पडून सुकतात तोपर्यंत बटाटे जमिनीमध्ये पोहोचत असतात काढणी करायच्या अगोदर पाणी पूर्णपणे तोडावे .जमीन ओलसर असल्यानंतर बटाट्याची साल खरवडू शकते आणि त्यामध्ये रोगजंतूचा शिरकाव होऊ शकतो आणि बटाटा सडून खराब होऊ शकतो. बटाट्याची काढणी झाल्यानंतर बटाट्याचे सावलीमध्ये लहान लहान ढीग करून तसेच एका आठवडा ठेवून द्यावे. त्यानंतर खराब झालेले बटाटे काढून टाकावे आणि पोत्यात भरावे आणि शीत ग्रहांमध्ये साठवण्यासाठी पाठवावेत. सरासरी उत्पादन 20 ते 30 टन हेक्‍टरी भेटते.

बटाट्यामधील शारीरिक विकृती :

1.होलो हार्ट :

लागवडीनंतर काही बटाटे अतिरिक्त आकाराने मोठे होतात. परंतु त्याच्या आत मध्ये पोकळी तशीच तयार होते असे बटाटे लवकर आतून सढतात. ही विकृती होऊ नये म्हणून बटाट्याला योग्य प्रमाणामध्ये खते आणि पाणी द्यावे.

2. हिरवे बटाटे :

बटाटे जेव्हा जोमदार वाडीमध्ये असतात .तेव्हा ते उघडे पडतात आणि त्यावर सूर्यप्रकाश पडला की तिथे सोलेनिन नावाचे विषारी द्रव्य तयार होते.

त्यामुळे त्या जागचा बटाटा हिरवा पडतो आणि खाण्यास अयोग्य होतो .त्यामुळे बटाटा जेव्हा वाढत असतो तेव्हा दोन ते तीन वेळा बटाट्याला मातीची भर द्यावी.

3. बल्क हार्ट :

बटाट्याची काढणी केल्यानंतर बटाटे उन्हामध्ये ठीग करून ठेवले जातात. त्यामुळे काही बटाटे खराब होतात आणि चढतात त्यामुळे बटाटे शेडमध्ये सावलीत साठवावेत .

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/vegetables

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *