Blogफळ

संत्रा लागवड :

5/5 - (2 votes)

संत्र्याचे मूळ स्थान दक्षिण चीन आहे. भारतामध्ये सर्वात प्रथम दक्षिण भागामध्ये संत्र्याची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली गेलेली. संत्रा पासून लॅक्टिक ऍसिड ,पशुखाद्य, रसापासून अर्क ,सायट्रिक ऍसिड इत्यादी तयार केले जातात .बाहेरच्या देशांमध्ये संत्र्यावर प्रक्रिया करून निरनिराळे टिकाऊ पदार्थ बनवले जातात .संत्र्याची ताजी फळे खाण्यासाठी वापरली जातात आणि संत्र्यापासून सरबत ,मारमलेड ,रस ,असे पदार्थ सुद्धा तयार केले जातात .संत्र्यामध्ये शर्करा, विटामिन अ ,ब ,क आणि इतर खनिजे सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये सापडतात. महाराष्ट्र मध्ये अमरावती ,नागपूर ,अकोला ,वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये संत्र्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. संत्र्याला सुपर फूड म्हणून ओळखले जाते .संत्र्यामध्ये लोह, पोटॅशियम आणि सोडियम जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे ही शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. संत्रा मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेटेड राहते .संत्र्यामध्ये फायबरचे प्रमाण सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये असते ,त्यामुळे पचन शक्ती मजबूत राहते. संत्रा खाल्ल्यामुळे केस गळती सुद्धा थांबते आणि डोळ्यांशी संबंधित असलेल्या त्रुटींना सुद्धा संत्रा खाल्ल्याने फायदा होतो.

लागणारे हवामान :

संत्रा हे उष्णकटिबंधीय विभागातील मुख्य पीक आहे .संत्र्याच्या लागवडीसाठी जास्त पावसाचे सुद्धा गरज भासत नाही .संत्रा हे उन्हाळ्यातील जास्त तापमानाने आणि हिवाळ्यातील कडाक्याची थंडी असल्यावर सुद्धा चांगले उत्पादन देते. फुले आल्यानंतर फळधारण्याच्या काळामध्ये आद्रता मुबलक प्रमाणामध्ये असल्यावर आणि फळे पिकण्याच्या काळामध्ये कोरडी हवा असल्यामुळे संत्र्याच्या फळांची गुणवत्ता चांगली येते आणि बाजारात त्यांना चांगला दर मिळतो.

लागणारी जमीन :

चुनखडी युक्त जमीन संत्रा लागवडीसाठी अजिबात निवडू नये .संत्र्यासाठी उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी . जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणामध्ये असावे .जमिनीचा सामू 5.5 ते 8.5 दरम्यान असल्यास संत्र्याच्या उत्पन्नात भर होते .संत्र्याची लागवड करताना कमी क्षाराची जमीन निवडावी .तसेच जमिनीमध्ये वाळवीचा उपद्रव असेल तर लागवड घेऊ नये.

सुधारित जाती :

1. क्लिओपात्रा :

संत्र्याची ही जात चीनमध्ये लावली जाते. या जातीची फळे पिकल्यानंतर फळांना नारंगी लालसर रंग येतो. चीनमध्ये लावल्यानंतर या जातीचा प्रसार अख्या जगभरात झाला .चवीला ही फळे जास्त प्रमाणामध्ये आंबट असलेले दिसतात.

2. किन्नो :

या जातीच्या संत्र्याची लागवड पंजाब राज्यामध्ये जास्त केली जाते. महाराष्ट्र राज्यामध्ये या जातीची लागवड यशस्वी होत नाही .ही संत्र्याची संकरित जात आहे .या जातीच्या फळांचा रंग हा फिकट पिवळा असतो आणि साखरेचे प्रमाण 15 ते 17 टक्के पर्यंत असते.

3. कूर्ग संत्रा :

ह्या जातीच्या संत्र्याचे झाड पसरट असते .या जातीच्या फळांमध्ये रसाचे प्रमाण जास्त असते आणि फळांचा आकार मध्यम ते मोठा असतो. फळे सोलण्यासाठी सोपी असतात आणि फळांचा रंग नारंगी असून फळाला चमक असते.

4. नागपुरी संत्रा :

नागपुरी संत्रे भारतामध्ये भरपूर प्रसिद्ध आहेत.संत्र्याच्या या जातीची लागवड शेतकरी प्रामुख्याने करतात .या जातीची लागवड महाराष्ट्र मध्ये विदर्भ ,पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये केली जाते .या जातीच्या फळांची चव खूप चांगली असते.

अभिवृद्धी :

संत्र्याची लागवड ही कलमा पासून केली जाते. संत्र्याची कलमे तयार करण्यासाठी ठराविक खुंट वापरले जातात. रंगपुर लाईम किंवा जंबेरी कलम एका वर्षाच्या निरोगी रोपावर हव्या त्या जातीच्या डोळे भरून संत्र्याची अभिवृद्धी केली जाते .अभिवृद्धी केल्यानंतर कलमांना एक ते दोन वर्ष चांगले वाढविले जाते आणि त्यानंतर मुख्य लागवडीच्या जमिनीमध्ये लावले जातात.

लागवड :

लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीमध्ये खोल नांगरट करून घ्यावी आणि कोळप्याच्या मदतीने आडव्या उभ्या पाळ्या मारून घ्याव्यात .जमीन भुसभुशीत करून घ्यावी . वेगवेगळ्या विभागांमध्ये लागवडीचे अंतर निरनिराळे असतात .प्रत्येक जातीच्या वाढीनुसार योग्य अंतर निवडले जाते .सर्वसाधारणपने6×6 या अंतरावर झाडे लावली जातात. योग्य अंतर निवडून मापणी करून घ्यावी आणि 1×1×1 चौरस मीटर आकारमानाचे खड्डे पाडावे. खड्डे नेहमी पावसाळ्याच्या अगोदर पाडावे आणि खड्ड्यांमध्ये शेणखत, पोयटा माती किंवा गांडूळ खताने खड्डे अर्धे भरून घ्यावे आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर रोपांची लागवड करावी .प्रत्येक खड्यामध्ये एक एक रोप लावून लगेच पाणी द्यावे.

वळण आणि छाटणी :

सुरुवातीच्या काळामध्ये संत्र्याचे रोप सरळ वाढवून द्यावे आणि जमिनीपासून एक मीटर उंचीपर्यंत गेल्यानंतर छाटावे .तिथून पुढे झाडावर चारी बाजूंनी फांद्या राखाव्या आणि पुढे तशीच वाढ होऊन द्यावी .खोडावर येणारी फूट सतत काढून टाकावी .झाडाला डेरेदार आकार देण्यासाठी दाट झालेल्या फांद्या वेळोवेळी काढून टाकाव्यात .रोगट वाळलेल्या फांद्या या बहार धरणाच्या पूर्वीच छाटून टाकाव्या.

खत नियोजन आणि पाणी व्यवस्थापन :

संत्र्याच्या रोपांना शेणखत द्यावे लागते. झाडांना बहार धरल्यानंतर घन जीवामृत ,शेणखत किंवा गांडूळ खत ची मोठी मात्रा द्यावी आणि महिन्यातून एकदा जीवामृत सोडावे. खते झाडापासून एक मीटर लांब गोल चर खांदून द्यावी . सुरुवातीच्या काळामध्ये रोपे तग धरू पर्यंत पाण्याचे नियोजन योग्य ठेवावे. बहार धरणाच्या काळामध्ये पाण्याची टंचाई भासू देऊ नये .उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाच ते सहा दिवसानंतर आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये दहा ते बारा दिवसाच्या अंतराने झाडांना पाणी द्यावे. झाडांना एक मीटर अंतरावर आळे करून पाणी द्यावे .जेणेकरून झाडाच्या खोडांना पाणी लागणार नाही आणि झाड कुजणार नाही. लिंबूवर्गीय सर्व झाडांना पाण्याचे योग्य नियोजन करावे लागते. पाण्याची टंचाई भासल्यानंतर उत्पादनात कमी होते.

आंतरमशागत आणि आंतरपिके :

जमिनीमध्ये आळे करून पाणी दिल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव जास्त राहतो. तणांचे योग्य नियोजन नाही केल्यानंतर रोपावर अनिष्ट परिणाम होतात .वेळोवेळी झाडाच्या आळ्या भोवती सर्व तण काढून टाकावे आणि वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी. जमिनीला जास्त वेळ पर्यंत भुसभुशीत ठेवण्यासाठी वखरणी करावी .

बहार धरणे :

महाराष्ट्र मध्ये संत्रा हे आंबे बहार ,मृगबहार आणि हस्त बहार या तिनी पण बहारांमध्ये येतात. मुख्यतः विदर्भ या भागामध्ये संत्र्याचे दोन बहार घेतले जातात .आंबे बहार आणि मृग बहार फळधारणेसाठी इच्छित बहार धरण्यासाठी झाडांच्या मुळ्या उघड्या केल्या जातात आणि झाडाला पाण्याचा ताण दिला जातो. झाडाला आळे घातले जातात .झाडाची पाने पूर्णपणे गळल्यानंतर आणि नवी पालवी फुटल्यावर भरघोस प्रमाणामध्ये पाणी द्यावे आणि खते द्यावी काही दिवसांमध्ये पूर्ण झाडाला नवीन पालवी फुटते.

महत्त्वाच्या किडी आणि रोग :

किडी :

1. संत्रा वरील काळी माशी :

प्रौढ माशी आणि तिची पिल्ले दोन्हीही अवस्था संत्र्याच्या पानातून रस शोषण करतात. रस शोषण करताना या किडी त्यांच्या अंगातून एक चिकट गोड पदार्थ स्त्रवतात त्या पदार्थाला काळी बुरशी आकर्षित होते आणि झपाट्याने वाढू लागते .या बुरशीमुळे पाने पूर्ण काळे पडतात .त्यामुळे प्रकाश संश्लेषण ची क्रिया थांबते आणि अन्नपुरवठा खंडित होतो .त्यामुळे झाड कमकुवत बनते अन्नपुरवठा कमी झाल्यामुळे झाडाला फळधारणा सुद्धा कमी होते .या किडीच्या नियंत्रणासाठी निंबोळी तेलाचा वापर करावा.

2. पाने पोखरणारे अळी :

पाने पोखरणारी अळी जास्त करून रोपवाटिकेमधला लहान झाडांना उपद्रव करते आणि काही प्रमाणामध्ये मोठ्या झाडांना सुद्धा नुकसान पोहोचवते .या किडीची अंडी बाहेर निघतात .पानाच्या खालच्या बाजूला पापुदऱ्या तून पानामध्ये शिरायला लागते. परिणामी पानावर नागमोडी वलय दिसतात. कोवळी पाने आतल्या बाजूला गुंडाळतात आणि गळून पडतात. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करावा.

3. सिट्रस सायला :

ही कीड संत्रा वरील मुख्य कीड मानले जाते. प्रौढ आणि पिले दोन्ही अवस्था झाडाला नुकसान करते .या किडीचा प्रादुर्भावाने पाने वाकडी तिकडे होतात . किड्यांच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या चिकट गोड पदार्थामुळे पानावर काळ्या बुरशीची वाढ होते . काळ्या बुरशीची वाढ झाल्यामुळे अन्न निर्मिती प्रक्रिया मध्ये बाधा येते .या किडीच्या जास्त प्रादुर्भावामुळे शेंड्याकडे लहान फांद्या देखील वाळून जातात. किडीमुळे ग्रीनिंग या रोगाचा प्रसार होतो.

रोग :

1. मुळकुज :

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मुळा कुजतात आणि त्यासोबत बुंदयाची साल सुद्धा कुजते. रोग झाल्यामुळे पाने व त्यांच्या शिरा पिवळा पडतात आणि फळगळ होते .खोड आणि फांद्या यांचा भाग काळा दिसू लागतो. मोठ्या मुळ्या कुजल्यामुळे संपूर्ण झाड वाळण्याची शक्यता वाढते .या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी सडलेल्या मुळा कापून टाकाव्या . बुरशीनाशकाची आळवणी द्यावी.

2. शेंडेमर :

या रोगाचा प्रसार हवेमुळे होतो या रोगामध्ये कोवळ्या फांद्या आणि हिरव्या फांद्या शेंड्यापासून खाली हळूहळू सुकतात .त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात .फांदी वर सूक्ष्म काळे गोल लहान लहान पुटकुळ्या उटू लागतात. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी प्रादुर्भाव झालेल्या फांद्या काढून टाकाव्या आणि जाळून टाकावे. कापून टाकलेल्या भागावर जैविक बुरशीनाशक लावावे.

3. डिंक्या रोग :

डिंक या रोगामुळे झाडाच्या साली मधून एक डिंकासारखा पदार्थ उगवताना दिसू लागतो. झाडाच्या सालींचा रंग लाल रंगाचा होऊन शेवटी काळा होतो .साल वाळू लागते आणि साडीला उभा भेगा पडतात. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी करावा .झाडाच्या बुंध्या भोवती पाणी साठून देऊ नये .पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी साठू न देण्यासाठी चर खंदून पाण्याचे योग्य नियोजन करावे .झाडावर बुरशीनाशकाची फवारणी करावी.

काढणी आणि उत्पादन :

फळ तयार झाल्यानंतर फळाचा रंग हा फिकट नारंगी किंवा हिरवा होतो आणि साल थोडी धीली होते. फळाच्या सालीवर चकाकी येते आणि तेल ग्रंथी स्पष्ट डोळ्याने दिसू लागतात अशी लक्षणे दिसल्यानंतरच फळांची काढणी करावी. संत्र्याची झाडे लागवडीनंतर पाचव्या ते सहाव्या वर्षी फळे द्यायला सुरुवात करते. पहिले दोन ते तीन वर्ष झाडा मधून कमी उत्पन्न निघते. दहा ते वीस वर्षांपर्यंत एका झाडापासून 800 ते 1000 फळे मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *