Blogभाजीपाला

कांदा लागवड :

5/5 - (1 vote)

कांदा हे कंद वर्गातील मुख्य पीक आहे. भाज्यांमध्ये व्यापारी दृष्ट्या कांदा हे सर्वात महत्त्वाचे पीक असून टोमॅटो नंतर जगा मध्ये उत्पादनात कांद्याचा दुसरा नंबर लागतो .महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये कांदा हे तिन्ही हंगामात उत्पादन देणारे पीक म्हणून ओळखले जाते .महाराष्ट्रामध्ये कांद्याची लागवड सर्वात जास्त प्रमाणात केली जाते. कांद्याच्या पातीचाही भाजीसाठी उपयोग करतात आणि त्याचीही बाजारात खूप मागणी असते. कांद्याचा कोशिंबीर, चटणी ,लोणचे आणि मसाल्यामध्ये सर्रास वापर केला जातो. कांद्यामध्ये खूप प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म असतात ,जसे की उष्माघात, मूळव्याध, कावीळ ,कांदा बुद्धीवर्धक आणि शक्तिवर्धक असतो. कांद्यामध्ये क आणि ब हे जीवनसत्वे जास्त प्रमाणात आढळतात. तसेच चुना, लोह, फॉस्फरस खनिजे आणि प्रथिने कांदा मध्ये मोठ्या प्रमाणात असतात. वर्तमान काळामध्ये कांद्यांना निर्जलीकरण करून त्याची पावडर बनवली जाते आणि त्याची निर्यात केली जाते. विदेशात कांद्याच्या पावडरची खूप प्रमाणात मागणी आहे. कांद्याची पावडर बऱ्याच मसाल्यांमध्ये सॉसेस मध्ये आणि सिझनिंग मध्ये वापरली जाते.

कांद्याला लागणारी जमीन:

भारी चिकन माती कांद्यासाठी निवडू नये. भुसभुशीत असलेली मुळाभोवती भरपूर ओलावा राखून धरणारी जमीन कांद्यासाठी योग्य ठरते.

जमिनीचा सामू 5.8 ते 7 या दरम्यान असावा. जमिनीत सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात असल्यास कांदा चांगला पोसवतो.

कसदार ते मध्यम जमीन कांद्याला चांगली मानवते. खरीप हंगामात लागवडीसाठी भारी जमीन निवडू नये.

हलक्या मुरमाड जमीन सेंद्रिय खतांचा वापर जर केला तर कांद्याचे भरघोस उत्पादन मिळते.

लागणारे हवामान:

कांदा हे मुख्य रब्बी हंगामात लावले जाणारे पीक आहे. कांद्याच्या सुरुवातीच्या वाढीला 12 डिग्री सेल्सिअस ते 23 डिग्री सेल्सियस तापमान मानवते .

70 टक्के आद्रता कांद्याला पोसायला चांगली मदत करते.

कांदा हा प्रत्येक हंगामात येऊ शकतो पण अति थंडी आणि तीव्र उन्हाळा असल्यास कांद्याची लागवड करू नये, आपल्याला नुकसान होऊ शकते.

वातावरण उष्ण व दमट असले तर कांद्यांवर करपा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो.

कांद्याच्या सुधारित जाती :

१.बसवंत 780 :

कांद्याची ही जात 100 ते 10 दिवसात तयार होते. ह्या कांद्याचे 250 ते 300 क्विंटल उत्पादन हेक्‍टरी भेटते .खरीप व रब्बी हंगामासाठी ही जात योग्य मानली जाते. ह्या जातीचा रंग हा गडद लाल असतो. सर्वसाधारणपणे कांद्याचे आकार मध्यम ते मोठा असतो .

२.एन -2-४-1 :

कांद्याची ही जात 120 ते 130 दिवसात पूर्णपणे तयार होते .या कांद्याचे हेक्टरी उत्पादन 300 ते 350 क्विंटल मिळते .कांदा हा आकाराने मध्यम गोल असतो .ही जात रब्बी हंगामासाठी योग्य असून या जातीचा रंग हा भगवा व विटकरी आहे. हा कांदा साठवणुकीसाठी अत्यंत चांगल्या प्रकारचा मानला जातो.

३.एन 53 :

कांद्याच्या या जातीची लागवड खरीप हंगामा मध्ये केली जाते हे. उत्तर प्रदेश मधले खूप लोकप्रिय जात आहे. ह्या जातीच्या कांद्याचे सरासरी उत्पन्न 25 ते 30 टन हेक्‍टरी मिळते .या जातीचे कांदे गोलाकार आणि चपटे असतात .कांद्यांचा रंग जांभळत लाल आणि चवीला तिखट असतात. ही जात नाशिक मधील स्थानिक जात आहे.

४.फुले समर्थ:

कांद्याची ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरीप आणि रांगडा हंगामासाठी विकसित केलेले आहे .या जातीचे कांदे हे उभट गोल असतात आणि कांद्याचा रंग हा लालसर असतो. लागवड केल्यानंतर साधारणता 80 ते 90 दिवसांमध्ये कांदे तयार होतात .खरीप हंगामात सरासरी 25 टन हेक्टरी उत्पादन निघते आणि रांगडा हंगामात हेक्टरी तीस ते पस्तीस टन उत्पन्न कांद्याचे निघते. या कांद्याचे साठवून क्षमता दोन ते तीन महिने असते.

५. फुले सुवर्णा :

ही कांद्याची जात देखील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे ही जात तिन्ही हंगामात आपण लावू शकतो. हा कांदा लागवडीपासून 110 दिवसांमध्ये तयार होतो सरासरी हेक्टरी उत्पादन 23 ते 24 तास असते .या कांद्याचा रंग पिवळा किंचित विटकरी रंगाचा आणि कांदा हा गोलाकार घट्ट आणि मध्यम तिखट चवीला असतो .हा कांदा निर्यातीसाठी आणि साठवणीसाठी योग्य आहे.

६. अर्का निकेतन:

कांद्याचा हा वाण भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था बेंगलोर येथे नाशिक भागातील वाहनातून विकसित केलेला आहे .या जातीचे सरासरी उत्पादन 25 ते 30 टन प्रती हेक्टर भेटते .या जातीचे कांदे गोलाकार असतात ,रंगाने गुलाबी आणि चवीला तिखट असतात .या कांद्याची साठवण क्षमता पाच ते सहा महिने असते.

७. भीमा शक्ती :

कांद्याची ही जात पंजाब ,हरियाणा ,दिल्ली ,बिहार ,उत्तर प्रदेश ,ओडीसा ,गुजरात, राजस्थान, छत्तीसगड ,मध्य प्रदेश ,आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात रब्बी हंगामासाठी प्रसारित आणि महाराष्ट्र ,गुजरात ,कर्नाटक हा राज्यांमध्ये रांगडा हंगामासाठी खूप प्रसारित आहे . कांद्याच्या या जातीचे सरासरी उत्पादन रांगडा मध्ये हेक्‍टरी 35 ते 40 टन आणि रब्बी हंगामामध्ये हेक्टरी 25 ते 30 टन मिळते .या कांद्याचे साठवण क्षमता पाच ते सहा महिन्याची असते . ही जात फुलकिडी व बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणात सहनशील आहे .लागवडीनंतर रांगडा व रब्बी हंगामामध्ये 125 ते 135 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होते.

८: अर्का कल्याण :

कांद्याची ही जात भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था बंगळूर इथून कळवण भागातील स्थानिक वाणा पासून विकसित केलेली आहे. या जातीचे सरासरी उत्पादन 25 ते 30 टन मिळते .लागवड केल्या नंतर 100 ते 110 दिवसांमध्ये कांदा काढनी साठी तयार होतो .या जातीचे कांदे गोलाकार ,रंगाने गर्द लाल आणि चवी मध्ये तिखट असतात.

लागवड :

महाराष्ट्र मध्ये कांद्याची लागवड ही खरीप,रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात केली जाते.

कांद्याची रोपे तयार करण्यासाठी खोल नांगरट करावी आणि गादीवाफे तयार करून घ्यावेत.

गादीवाफा एक मीटर रुंद ,तीन मीटर लांब आणि पंधरा सेंटीमीटर उंच करावा.

वाफ्यातील ढेकळे हे निवडून बाजूला करावी. वाफ्याच्या रुंदीला समांतर अशा पाच – पाच सेंटीमीटर च्या रेषा बोटाने पाडून घ्याव्यात.

त्यानंतर कांद्याचे बी त्या ओळींमध्ये पातळ पेरावे आणि मातीने झाकून घ्यावे.

नंतर झारीने पाणी घालावे जोपर्यंत बी उगवूण येत नाही तोपर्यंत झाऱ्यानेच पाणी घालावे.

रोपांना जेव्हा गाठ तयार होते तेव्हा रोप लागवडीसाठी योग्य आहे असे समजावे.

रोपे काढण्यापूर्वी 24 तास अगोदर गादीवाफ्याला पुरेसे असे पाणी द्यावे.

जेणेकरून रोपे अलगदपणे उपडून येतील. लागवड दोन प्रकारे केली जाते एक गादीवाफ्यावर आणि एक सरीवर वरंब्यावर.

रोपांची लागवड नेहमी सकाळी अथवा संध्याकाळी करावी. रोपांची लागवड ही 12.5 × 7.5 सेंटीमीटर या अंतरावर करावी.

खत आणि पाणी व्यवस्थापन :

जमीन तयार करताना जमिनीमध्ये घन जीवामृत घालावे.

सरीवरंभा पद्धतीने कांदा लावल्यानंतर पाण्यामधून कांद्याला जीवामृत सोडावे.

जमीन आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार कांद्याला पाणी द्यावे.

खरीप हंगामात दहा ते बारा दिवसांनी आणि रब्बी व उन्हाळ्यात सहा ते आठ दिवसांनी कांद्याला पाणी द्यावे.

सुरुवातीला कांदा पोसवण्यासाठी त्या काळात पाणी द्यावे.

कांदा पोसवण्याच्या काळामध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी नाहीतर उत्पादनात घट होते.

अंतर मशागत : रोपांच्या लागवडीनंतर शेतात तण दिसल्यानंतर खुरप्याच्या च्या साह्याने हलकी खुरपणी करावी.

कांद्यावरील रोगांचे व्यवस्थापन :

१.रोपवाटिकेतील मर :

फ्युजेरियम बुरशीमुळे हा रोग रोपवाटिकेत कांदा या पिकावर होतो रोपांची मान जमिनीलगत कुजून ती कोलमडलेली दिसते. त्याचप्रमाणे बुरशीमुळे लागवडीनंतर ही प्रादुर्भाव होऊन कांद्याच्या रोपांची मर आणि सड होते.

उपाय योजना : रोपे नेहमी गादी वाफ्यावरच तयार करावी. रोपवाटिकेची जागा दरवर्षी बदलावी.कांद्याच्या रोपवाटिकेसाठी मध्यम प्रतीची उत्तम निचरा होणारी जमीन असावी. बियाणे हे निरोगी आणि स्वच्छ आहेत याची खात्री करावी. जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा.

.कांद्यावरील करपा :

कांदा या पिकावर काळा करपा आणि जांभळा करपा आणि तपकिरी करपा यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो .जांभळा करपा मुख्यतः खरीप हंगामात काळा कर्पा चा प्रादुर्भाव, भारी जमिनीत पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत दिसून येतो आणि रब्बी हंगामामध्ये तपकीरी करप्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. तपकिरी करप्या मध्ये सुरुवातीला पिवळसर ते तपकिरी चट्टे पडतात आणि चट्ट्यांचे प्रमाण बुंद्याकडून करून शेंड्यापर्यंत वाढत जाते. पाती आणि शेंडे सुखल्यासारखे दिसायला सुरुवात होते.

उपाययोजना : एकाच जमिनीत सतत कांदा हे पीक घेतल्याने या पिकाचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. त्यामुळे पिकांची फेरपालट करावी. जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा.

काढणी व उत्पादन :

कांद्याचे पीक हे लागवडीनंतर तीन ते साडेचार महिन्यांमध्ये काढण्यासाठी तयार होते.

काढणीचा कालावधी हा प्रत्येक जातींचा वेगवेगळ्या असतो.

कांद्या तयार झालेला आहे हे ओळखण्यासाठी कांद्याची पात पिवळी पडून कांदा मानेत पिवळा पडतो.

पात आडवी पडते यालाच मान मोडणे असे म्हणतात. थ रालागवडीमधील 60 ते 75 टक्के माना मोडल्यानंतर कांदा काढण्यासाठी परिपक्व झालेला आहे असे समजावे कांदा काढण्यासाठी कुदळीच्या साह्याने आजूबाजूची माती सर्वप्रथम साइड करून घ्यावी आणि मग कांदे उपडावेत.

काढणीनंतर चार ते पाच दिवसांनी कांदा पाती सकट शेतात लहान लहान ढिगारांच्या स्वरूपात तसाच ठेवावा.

नंतर कांद्याची पात आणि मुळे कापून घ्यावे. पात कापल्यानंतर कांदा चार ते पाच दिवस तसाच सावली मध्ये सुखवावा.

खरीप हंगामामध्ये कांद्याचे प्रती हेक्टरी सरासरी उत्पादन 15 ते 20 टन व रांगडा कांद्याचे उत्पादन 25 ते 30 टन आणि रब्बी होणार कांद्याचे उत्पादन मिळते.

कांद्याची साठवण :

काढणीनंतर कांद्याची साठवण योग्य प्रकारे करणे खूप गरजेचे असते .आकारानुसार त्याची व्यवस्थित वाळल्यानंतर प्रतवारी करावी लागते.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कांदे काढणीनंतर शेडमध्ये वाळवावेत. कांद्याची साठवण ही हवेशीर आणि कोरड्या जागेवरच करावी .

त्यासाठी कौलारू किंवा गवताने झाकलेल्या क्षेत्रात बांबूंच्या चाळे बांधाव्यात या चाळींमध्ये कांदा साठवतात.

सर्व कांदा शेतकरी ह्या चाळी बांधतात आणि याच पद्धतीने कांदा ची साठवण करतात.

आठ ते दहा दिवसांच्या कालावधीनंतर सडलेले कोंब आलेले कांदे बाजूला करावे.

साठवणी मध्ये बाष्पीभवन व सडण्याची क्रिया होते तर कमी तापमानात कोण येऊन कांदे खराब होतात.

त्यामुळे चाळी मध्ये हवेशीर कांद्याची साठवणूक करावी.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/vegetables

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *