Blogफळ

आंबा लागवड :

5/5 - (1 vote)

आंबा हे पीक सर्व लोकांचे अत्यंत आवडीचे पीक मानले जाते .आंब्याला फळाचा राजा मानला जातो. आंब्याच्या फळात हे जीवनसत्वे अ,ब,क अधिक प्रमाणात असतात .तसेच आंबा या फळामध्ये साखर आणि खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात .आंब्यापासून लोणचे ,आमरस , आंबावडी,अंबा पोळी ,कैऱ्याची चटणी तयार केली जाते .आंब्याच्या लाकडांचा उपयोग इंधन आणि इमारती बांधण्यासाठी केला जातो .भारतामध्ये आंबा पिकाखाली फार मोठे क्षेत्र आहे . आंब्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा 66% उत्पन्नाचा वाटा आहे. महाराष्ट्र मधील कोकणातील सिंधुदुर्ग ,रत्नागिरी जिल्ह्यातील जमीन व हवामान आंबा लागवडीसाठी योग्य आहे. महाराष्ट्र मध्ये विभागानुसार वेगवेगळ्या जातींचे उत्पादन घेतले जाते.

हवामान व जमीन :

आंबा लागवडीसाठी भरपूर पाऊस आणि दमट वातावरण मानवते .मोहर येण्याच्या वेळी वादळी पाऊस, ढगाळ वातावरण ,गारपीट ,यामुळे पिकाचे खूप नुकसान होते . कडाक्याची थंडी या पिकाला योग्य ठरत नाही. आंब्याच्या उत्तम वाढीसाठी 18 ते 26 अंश सेल्सिअस तापमान असावे. वर्षाला 120 ते 200 सेमी पेक्षा जास्त पाऊस आंब्याला मानवतो.जांभ्या खडकापासून बनलेल्या गाळाच्या खोल ,मध्यम काळी व भारी जमिनीत आंब्याची लागवड चांगली ठरते .जमीन पाणी साठू नये आणि उत्तम असं निचरा होणाऱ्या आम्लयुक्त जमिनीत आंब्याची लागवड चांगली ठरते.

आंब्याच्या सुधारित जाती:

महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या आंब्याच्या जाती लावल्या जातात.

कोकणामध्ये हापूस, रत्ना, केसर ,सिंधू या जाती लावल्या जातात.

पश्चिम महाराष्ट्र मध्ये हापूस ,केसर ,वनराज ,लंगरा आणि तोतापुरी या जाती जास्त प्रमाणावर लावल्या जातात.

मराठवाडा या विभाग मध्ये केसर, निरंजन ,लंगडा, बेनिशान, तोतापुरी ,नीलम ,पायरी या जाती लावल्या जातात.

विदर्भात नागिन ,केशर ,लंगरा, पायरी ,तोतापुरी ,बेनिशान ,नीलम या जातींची लागवड केली जाते.

आंब्याच्या संकरित जाती मल्लिका ,आम्रपाली, रत्ना ,सिंधू कोकण रुची कोकण राजा इत्यादी जाती सुद्धा तयार केलेल्या आहेत .

अभिवृद्धी :

आंब्याची लागवड कलमांपासूनच करावी. कलमे तयार करण्यासाठी मृदकाष्ट कलम विनर कलम कोय कलम ,भेट कलम ,वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. सध्याच्या काळात तयार केलेली कलमे विकत घेऊन शेतात लावण्याची पद्धत वापरली जाते. पण मृदकास्ट पद्धतीने कलम बांधून तयार करणे जास्त उपयोग ठरते झाडांची मर होण्याची शक्यता कमी राहते.

लागवडीसाठी पूर्व मशागत :

जी जागा लागवडीसाठी निवडलेली आहे तेथील झाडे झुडपे तोडून घ्यावेत. आणि जमीन भुसभुशीत करून घ्यावे. पावसाळ्याच्या अगोदर खड्डे पाडून घ्यावे .खड्ड्यांचा आकार 1×1×1 मीटर असावा. खड्ड्यामध्ये चांगली माती ,शेणखत ,सर्व मिश्रण सहित खड्डा भरून घ्यावा. खड्डा भरून घ्यावा. कलमांची निवड झाल्यानंतर कलमे जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर लावण्यास सुरुवात करावी. लागवड करताना परागीकरण उत्पन्न वाढवण्यासाठी एका जातीसोबत दहा ते पंधरा टक्के झाडे वेगळ्या जातीची लावावी .

लागवडीसाठी कलमांची निवड:

१.कलमासाठी वापरलेली सायन फांदी नामांकित जातीच्या मातृ वृक्षाचीअसावी.

२.खुंट व सायन यांची जाडी साधारण एकसारखे असावी.

३.खुंटावर कमीत कमी पंधरा सेंटीमीटर उंचीवर केलेला कलम जोड असावा.

४.कलमाची सायन फांदी उभट,जोमदार आणि सरळ वाढणारे असावी.

५. सायन आणि खुंट यांचा जोड व्यवस्थित एकसंध झालेला असावा अशी कलमे लागवडीसाठी वापरावी.

लागवड :

आंब्याच्या कलमांची पिशवी अलगद कापून काढावी व पिशवीतील कलम खड्ड्याच्या बरोबर मधोमध लावावे. कलम केलेला जोड हा जमिनीच्या वर राहावा याची काळजी घ्यावी लागवडीनंतर कलमांना काठींचा आधार द्यावा. सध्याच्या काळात लागवडीसाठी शेतकरी 5×5 मिटर अंतर ठेवतात.

आंब्याच्या झाडांना वळण आणि छाटणी :

लागवड करताना जर आपण अंतर कमी ठेवले तर झाडांची वेळोवेळी छाटणी करावी लागते .झाडांना सुरुवातीला एक मीटर उंचीपर्यंत सरळ वाढवून द्यावे .त्यानंतर झाडाला समतोल राहील अशा बेताने तीन ते चार फांद्या वाढू द्याव्यात .गुंतागुंतीच्या वाकड्या फांद्या तसेच किडलेल्या फांद्या आणि सुकलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात . खुंट्या पासून येणारी फूट वेळोवेळी काढून घ्यावी .सुरुवातीला चार वर्षे येणारा जो मोहर असेल त्याला छाटून टाकावा आणि पाचव्या वर्षापासून उत्पन्न घ्यायला सुरुवात करावी. झाडाला काही प्रमाणात ठराविक शेंडे राखून मर्यादित छाटणी केलेली असेल तर मोहर येण्याचे प्रमाण वाढते आणि उत्पन्नात वाढ होते.

पाणीपुरवठा:

आंबा हे पावसाच्या पाण्यावर येणारे पीक आहे .परंतु पहिले तीन ते चार वर्ष जलद वाढवण्यासाठी पाणी देणे आवश्यक असते .उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याला दोनदा पाणी देणे गरजेचे असते आणि हिवाळ्यामध्ये आठवड्यातून एकदा पाणी देणे गरजेचे आहे. ठिबक द्वारे पाणी दिल्याने पाण्याची बचत होते आणि पाण्याद्वारे आपण जीवामृत सोडू शकतो. आपण आळे पद्धतिने सुद्धा झाडाला पाणी देऊ शकतो. आळे करताना पाणी हे खोडा पर्यंत जाऊ नये याची काळजी घ्यावी .नाहीतर खोड कुण्याची दाट शक्यता असते.

अंतर पिके आणि अंतर मशागत :

सुरुवातिला तीन ते चार वर्ष आपण झाडांच्या मध्ये आंतरपीक घेऊ शकतो . अंतर पीक म्हणून जास्त खोलमुळे न जाणाऱ्या भाजीपाला लागवड आपण करू शकतो. जसे की टोमॅटो ,वांगी ,वाल ,कोबी ,मुळा पालक, मेथी ,कोथिंबीर उडीद, मूग ,भुईमुगाच्या शेंगा, आंतरपीक म्हणून आपण लागवड करू शकतो. आंतरपीक घेत असल्यामुळे सुरुवातीच्या तीन ते चार वर्षात बागेची मशागत आपोआप होते. पुढे मात्र बागेत वर्षातून एक ते दोन वेळा हलकी नांगरन करावी. झाडाभोवतीच्या अळ्या मधून खुरपून स्वच्छ करावे.

आंब्याच्या झाडांमध्ये फळधारणा आणि मोहर:

महाराष्ट्र मध्ये नोव्हेंबर ते जानेवारी अखेर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आंब्याच्या झाडांना मोहर येतो .फळ तयार होण्याचा काळ हा एप्रिल ते जून पर्यंत असतो. काही जातींचा हंगाम ऑगस्टच्या शेवटपर्यंत चालतो .आंब्याच्या झाडावर कधीही एकत्र मोहर येत नाही. म्हणून या झाडावरील फळे सुद्धा ठराविक अंतरानंतर पक्व होतात.

महत्वाच्या किडी आणि रोग :

महत्त्वाच्या किडी :

१.मोहरा वरील तुडतुडे :

तुडतुडी हे मोहरातील आणि कोवळ्या फळातील हर्ष शोषून घेतात .त्यामुळे मोहर गळून पडतो .याशिवाय तुडतुडे मधासारखा सारखा चिकट पदार्थ शरीराबाहेर टाकतात .तो पानावर पडून नंतर त्यावर काळे बुरशीची वाढ होऊ लागते .त्यामुळे फळे काळे पडतात या किडीवर नियंत्रणासाठी निमास्त्र ची फवारणी करावी.

२.फळमाशी :

फळमाशी फळाच्या साली खाली अंडी घालते .दोन ते तीन दिवसात अंडी उघडून अळ्या फळातील गर खाऊ लागतात. किडलेली फळे गळून पडतात .किडलेली फळे गोळा करून त्यांचा अल्यासोबत नाश करावा. माशाचा प्रादुर्भाव दिसतात रक्षक सापळे झाडावर लावावेत. प्रती हेक्टरी चार ते पाच रक्षक सापळे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या बागेत लावावे .तसेच आंब्याच्या काढणी नंतर फळांना गरम पाण्याच्या तापमानात उष्ण जल प्रक्रिया द्यावी .पाण्याचे तापमान 47 ते 50 डिग्री सेल्सिअस असावे.

३.पिठ्या ढेकूण :

या किडींचा प्रादुर्भाव कोवळ्या फुटिवर , मोहरवर व झाडाच्या मुळांवर होतो .या किडींची पिल्ले झाडावर चढू नयेत म्हणून खोडावर जमिनीपासून एक फुट अंतरावर प्रथम चिखलाने खोडाच्या भेगा बुजवून घ्यावेत व त्यावर 400 गेजची प्लास्टिकची 30 सेंटीमीटरची पट्टी बुंदया भोवती व्यवस्थित बांधावी . तसेच झाडाच्या भोवतीचे गवत, झाडे झुडपे कडून टाकावीत .

४.आंब्यावरील फुल कीड :

सध्याच्या पाच ते सहा वर्षात थ्रिप्सच्या प्रजातीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो.आंब्या बागेतील पालवी ,मोहर व फळावर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे ,या किडीचे प्रौढ पिवळ्या अथवा गडद चॉकलेटी रंगाचे तर पिले पांढरे व पिवळ्या रंगाचे असतात. या कळीचा जीवनक्रम 13 ते 15 दिवसाचा असतो .,या किडीचे पिल आणि प्रौढ किडी मोहर ,कोवळे दांडे आणि फळावर साल खरवडून त्यातील पाझरनारा रस शोषून त्यावर आपली उपजीविका करतात .कोवळ्या सालीचा भाग खरवडल्यामुळे तो भाग काळा पडतो झाडाची पाने वेडी वाकडे होतात .आणि नंतर गळून पडतात त्यामुळे प्रकाश संश्लेषण च्या क्रियेमध्ये खंड पडतो .मोहर काळा होऊन गळून पडतो . लहान फळावर देखील थ्रिप्स हल्ला करते.फळांची वाढ खुंटते व प्रतही बिघडते .लहान फळांचे मोठ्या प्रमाणावर गळ होते .अशा फळांना दर कमी मिळतो या किडींचा जीवनक्रम कमी असल्यामुळे प्रादुर्भाव झाल्यानंतर यांची संख्या गतीने वाढवून आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते . झाडावर जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी . फवारणी करताना मोहर नुकताच आला असल्यास फळधारणा झालेल नसल्यास शक्यतो फवारणी फळधारणा होईपर्यंत टाळावे किंवा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास आणि फवारणी करणे गरजेचे असल्यास बागेतील परागीकरण कीटकांचा यासाठीच कालावधी वगळून सकाळी 10 ते दुपारी 12 फवारणी करावी. बागेत गर्द निळ्या रंगाचे चिकट कागद कार्डबोर्ड सापळे लावावेत.

आंब्यावरील रोग :

१.करपा :

या रोगाच्या नियंत्रणासाठी बागे स्वच्छता राखावी रोगट फांद्या कापून काढाव्यात आणि गळून पडलेल्या पानांचा नाश करावा.

२.फांद्या वाळणे ( पिंक रोग ) :

सुरुवातीला फांद्यावर पांढऱ्या रंगाची गोलाकार ठिपके पडतात. कालांतराने ते एकमेकात मिसळून झाडाचा जोम कमी होतो .लागण झालेल्या भाग खरडून टाकावा आणि कापलेल्या फांद्या जाळून टाकाव्यात.

३.आंब्याची फळकुज :

आंब्याची फळकुज हा काढणी पश्चात प्रमुख बुरशीजन्य रोग असून फळे काढल्यानंतर पिकाच्या अवस्थेपर्यंत फळावर तपकिरी काळा रंगाच्या चट्टे दिसून येतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होते .त्यासाठी फळ काढणी नंतर 50 ते 52 अंश सेल्सिअसच्या पाण्यात दहा मिनिटे बुडवून काढावीत. अशी फळे खोक्यात भरावेत अथवा विक्रीसाठी पाठवावीत .

आंब्याची काढणी व उत्पन्न :

काढण्यास तयार झालेल्या फळांचा गर्द हिरवा रंग जाऊन फिकट पिवळसर हिरवा होतो. देठाजवळ खड्डा पडतो व दोन्ही खांदे उंचावतात आणि झाडावरून एखाद दुसरे पिकलेले फळ गळून पडते . काढणे सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळच्या 4 नंतर करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *