अशी करा लिंबू या पिकाची लागवड :
लिंबुचे मूळ स्थान हे भारत आणि चीन दरम्यानच्या भूप्रदेशात असल्याचे गृहीत मानले जाते .पक्व लिंबू फळातील रसाचा उपयोग जेवणात केला जातो .लिंबूचे फळ हे टिकण्यासाठी खूप चांगले असते. त्याच्या पासून आपण सायट्रिक ऍसिड,लिंबाचे लोणचे असे बरेच पदार्थ करून फायदा मिळवू शकतो . लिंबुमध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याला खूप मागणी आहे. महाराष्ट्र मध्ये अहमदनगर जिल्हा लिंबू लागवडीत आघाडीवर आहे .तसेच पुणे, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, वर्धा, आणि औरंगाबाद इत्यादी ठिकाणी लिंबुची लागवड केली जाते .
लिंबू साठी लागणारे हवामान :
लिंबू ची लागवड शक्यतो अशा भागात चांगली होते ज्या भागात उन्हाळा उष्ण व हिवाळा कोरडा आणि पाऊस सर्वसाधारणपणे ६० ते ७५ सेंटीमीटर पडतो .अति पाऊस, कडाक्याची थंडी लागवडीसाठी योग्य ठरतं नाहीत . ज्या ठिकाणी अधिक पाऊस असतो त्या ठिकाणी झाड हे कँकर या रोगाला बळी पडते.
लागणारी जमीन :
लिंबूच्या लागवडीसाठी मध्यम काळी , निचरा होणारी जमीन ही योग्य ठरते .लिंबाची लागवड साधारण १ ते १.५ मीटर खोली व जमिनीचा सामू ५.५ ते ८ च्या दरम्यान असणाऱ्या जमिनीत यशस्वी होते. जमिनीत सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात असेल तर झाडांची वाढ चांगली होते. बागेत पाणी साचू नये म्हणून उत्तम निचऱ्याची जमीन लागवडीसाठी निवडावी जमिनीचे पाणी साठत असेल तर मुळ्यांची खुश होऊन भारी प्रमाणात नुकसान होऊ शकते.
लिंबाच्या जाती :
१.पी के एम – १
२.विक्रम प्रमालिनी
३.साई सरबती
४.कागदी लिंबू
५.सीडलेस लेमन
अभिवृद्धी आणि लागवड :
लिंबूची लागवडी दोन प्रकारे केली जाते . रोप अथवा कलम . कलम करण्यासाठी जंबेरी हा खुंट वापरला जातो . जेव्हा रोपांची लागवड करायची असते तेव्हा एका वर्ष वयाची रोपे लावली जातात .लागवड करण्या साठी पावसाळ्यापूर्वी जमीन तयार करून घ्यावी .त्या मध्ये घन जीवामृत जमीन तयार करताना शेतात पूर्णपणे पसरवून घ्यावे. लागवड करताना निरोगी रोपे निवडावी त हि तपासून घ्यावे की कलमांना कोणत्याही इजा झालेल्या नसाव्यात आणि ते बुरशीजन्य रोगांपासून मुक्त असतील. लागवड करताना खड्डे अर्धे घन जीवामृत आणि शेणखत आणि भरून घ्यावेत आणि रोप लावताना कलम केलेली जागा ही जमिनीच्या वर राहील याची काळजी घ्यावी.
हंगाम आणि लागवडीचे अंतर:
लिंबू लागवड कमी पाऊस पडणाऱ्या भागात जुलै महिन्यात व जास्त पाऊस पडणाऱ्या भागात ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात केली जाते .लिंबूची लागवड ६×६ अंतरावर करणे योग्य ठरते . अंतर जास्त ठेवण्याचा कारण असे की लिंबूची लागवड केल्यानंतर फळे येऊ पर्यंत चा कालावधी हा चार ते सहा वर्षाच्या असतो . तोपर्यंत आपण अंतरपिके घेऊन नफा मिळवू शकतो .
वळण आणि छाटणी :
लिंबूच्या झाडाला साधारणता फळधारणा होण्यासाठी ५-६ वर्षाचा कालावधी लागतो . तोपर्यंत लिंबूच्या झाडाला व्यवस्थित वळण देणे व त्याची छाटणी करणे गरजेचे असते . झाडाचे खोड एक मीटर सरळ वाढून द्यावे . खोडावर आलेले वारंवार फुटवे हे कापून टाकावे .जर कलम असले तर खुंटावर येणारी फुटवे पहिले तीन-चार वर्ष वारंवार काढावे लागतात. लिंबूच्या झाडाला व्यवस्थित आकार द्यावा जेणेकरून फळे आल्यानंतर काढायला सोईस्कर होईल.
लागणारी खते व पाणीपुरवठा:
झाड लावल्यानंतर ते रुजू पर्यंत झाडाला व्यवस्थित पाणीपुरवठा करणे खूप गरजेचे असते. झाडांना डबल आळे पद्धतीने पाणी दिले तर खोडाशी पाण्याचा संपर्क येणार नाही आणि मूळकुज सारख्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होईल. जर आपण ठिबकने पाणी देत असू तर जे ड्रीपर आहेत ते खोडा पासून दूर असावे. आणि उन्हाळ्यात दर ५-६ दिवसांनी व हिवाळ्यात १०-१५ दिवसांनी पाणी द्यावे.झाडाला प्रत्येक महिन्याला जीवामृत सोडावे त्याने झाडाची वाढ होण्यास मदत होईल व वेळोवेळी झाडाला घन जीवामृत द्यावे. आळे करून जीवामृत द्यावे जेणेकरून ते मुळांद्वारे लवकर शोषले जाईल. किंवा सुत्ती कपड्यातून गाळून जीवामृत ठिबकद्वारे सोडता येते.
अंतर पिके व अंतर मशागत :
लिंबू लागवडीनंतर पहिले दोन ते तीन वर्ष आपण बागेमध्ये कांदा, लसूण, कोबी, पालेभाज्या, गाजर ,मुळा ,शेवगा , पपई यासारखी पिके घ्यावे किंवा फुलपिके झेंडू ,ऍस्टर, शेवंती, ही फुल पिके घेणे देखील फायदेशीर ठरते. झाडाभोवती जास्त गवत उगवून देऊ नये . वेळोवेळी झाडाच्या आळ्यात खुरपणी करून घ्यावी . जर बागेत खूप जास्त तणांचा प्रादुर्भाव दिसत असेल तर आपण उसाचा पाला अथवा छाटणी करून राहिलेल्या फांद्या या आच्छादन म्हणून वापरू शकतो.
कीड व रोग :
लिंबू वर पडणाऱ्या किडी :
पाने खाणारी आळी : ही कीड झाडावर असणारे छोट्या छोट्या पानांना खाऊन टाकते आणि झाडावरचे पान नाहीसे करते त्याच्यामुळे झाड कमकुवत बनते झाडांमध्ये प्रकाश संश्लेषण ची क्रिया थांबते.
पाने पोखरणारी आळी : ही आळी पानांच्या आतील हरितद्रव्य खाते पानावर नागमोडी पोखरलेले पांढरे पारदर्शक चट्टे दिसतात आणि ही पानाच्या आतून पोखरते त्यामुळे दिसत नाही आळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पाने आकाराने चुरगळलेली आणि लहान राहतात तसेच पाने आखडून चुकतात आणि गळून पडतात. नवीन लागवड केलेल्या बागेत या आळीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो.
पांढरी माशी : ही पानातील आणि पोळ्या फांद्यातील रस शोषते रस शोषल्यानंतर किडीच्या शरीरातून चिकट पदार्थ ठरवतो त्या गोड चिकट पदार्थामुळे दुसरे काळी बुरशी चा प्रादुर्भाव त्या झाडावर होतो . त्यामुळे पानाचा पृष्ठभाग आणि कोवळ्या फांद्या काळ्या पडतात .यालाच कोळशी रोग असे म्हणतात.
फळातील रस शोषणारे पतंग : हे रस शोषणारे पतंग पक्व फळातील रस शोषतात व त्यामुळे फळगळ होते.संध्याकाळी अंधार झाल्यावर पतंग पक्व फळाला छिद्र करून फळातील रस शोषण करतात त्या छिद्र मधून बुरशी व जिवाणू चा शिरकाव होऊन फळे सोडून जातात आणि फळगळ होते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट होते. फक्त पतंग हे लिंबूच्या झाडासाठी हानिकारक असतात. त्याच्या आळ्या ह्या जंगली झाडांच्या पानावर उपजीविका करतात.
मावा : ही कीड कोवळ्या पानातील आणि कोवळ्या शेंड्यातील रस शोषण करते त्यामुळे पाणी आणि कोवळ्या फांद्या सुकतात आणि त्याच चुरगळतात आणि गळून पडतात. याचा परिणाम फुलधारणेवर आणि फळ धारणेवर होतो त्याच्यामुळे उत्पादनात घट होते.
लिंबू वर पडणारे रोग:
काळे दाग :
हा एक बुरशीजन्य रोग आहे याची लक्षणे वेगवेगळ्या असू शकतात मुख्य तर फळावर टनक डाग कमी व्यासाचे खड्ड्यासारखे सर्वप्रथम फळावर दिसतात हे डाग जसे जसे मोठे होते तसेच एकमेकात मिसळतात आणि मोठे ठिपके तयार करतात क्वचित हे फळावर दिसतात पण जर त्याचा प्रादुर्भाव जास्त असेल तर ते पानावर आणि कोवळ्या फांद्यांवर पण दिसतात पालापाचोळा लागोपाठ ओला राहण्यामुळे वसंत ऋतूमध्ये हा रोग लिंबूच्या बागेत खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो पावसामध्ये हा रोग झपाट्याने पसरतो.
डींक्या रोग :
डिंक्या रोग हा लिंबू पिकावर येणारा जागतिक स्तरावर नोंद असलेला रोग आहे हा बुरशीजन्य रोग आहे आणि फायटर या बुरशीमुळे हा रोग होतो. हा रोग पावसाळ्याच्या दिवसात अधिक पसरतो पाण्याचा निचरा न होणारी जमीन आणि सतत ओलावा असणाऱ्या जमीन अशा जमिनीमध्ये ह्या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसतो ह्या ही बुरशी मातीमध्ये असते सर्वप्रथम ही मुळांवर हल्ला करते त्यामुळे मुलांची साल कुजते आणि झाडाला पाणीपुरवठा आणि पोषक द्रव्यांचा पुरवठा कमी होतो त्यामुळे झाड हळूहळू खंगत जाते आणि कमकुवत होते झाडांच्या फांद्या आणि खोडातून डिंकाचा स्तरावर होतो म्हणून या रोगाला डिंक्या रोग असे म्हटले जात कधी कधी रोगग्रस्त माती मधले रूपे वापरल्याने सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
लिंबू वरील खैऱ्या रोग :
लिंबू वरील कैऱ्या हा रोग संसर्गजन्य रोग आहे हा रोग सातत्याने उद्भवत असतो या रोगांमध्ये सर्वप्रथम पानावर सुईच्या आकाराचे खरबरीत असे डाग पडतात हे दाग पानाच्या मागे आणि पुढे दोन्हीकडे पडतात आणि तांबूस रंगाचे असतात. ह्या ठिपक्यांच्या कडा ह्या पिवळा रंगाच्या असतात आणि नंतर त्या नाहीशा होतात हे ठिपके हळूहळू फांद्यावर वाढतात आणि नंतर फळावर ही याचा प्रादुर्भाव होतो आणि अशा फळांना बाजारात भाव भेटत नाही रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास फांद्या जळतात आणि पाने दोन खाली पडतात. या रोगाचा प्रसार वेगवेगळ्या किडी आणि पावसाचे थेंब यांच्यामुळे होतो.
नियंत्रण :
नैसर्गिक पद्धतीने बाग लावल्यावर कोणतेही रासायनिक कीटकनाशकं किंव्हा बुरशीनाशक वापरायचे नसतात. नैसर्गिक कीटकनाशक (दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क) , बुरशीनाशक (ताक, गोमुत्र ,जीवामृत ) वापरून किडींचे व रोगांचे नियोजन करावे . आपण जर वेळोवेळी जीवामृत ची फवारणी घेतली तरीही योग्य नियोजन होऊ शकते .
फळांची काढणी व उत्पादन :
रोपा पासून वाढवलेल्या झाडांना पाच ते सहा वर्षानंतर चांगले उत्पादन येऊ लागते आणि कलमांपासून वाढवल्या झाडांना तीन ते चार वर्षे फळधारणा व्हायला सुरुवात होते. झाडाची पूर्णपणे वाढ झाल्यानंतर प्रत्येक झाडापासून दीड हजार ते दोन हजार फळे मिळतात .10 ते 12 टन पर्यंत उत्पादन मिळते. फळाचा रंग गडद हिरवा जाऊन फिकट हिरव्या तसेच पिवळसर होऊ लागला की फळे काढून एकत्र करून बाजारात विक्रीसाठी पाठवावी .