Udid lagvad in Marathi
Udid lagvad
Udid lagvad in Marathi कडधान्य पिकांमध्ये कमी कालावधीमध्ये तयार होणारे, खरीप हंगामा मधील उडीद हे 70 ते 75 दिवसांमध्ये तयार होते. कमी पावसाच्या ठिकाणी देखील आपण उडीद लागवड करू शकतो. मिश्र पीक पद्धतीमध्ये देखील उडीद या पिकाचा समावेश केला जातो. हे पीक हमखास पाऊसमानाच्या प्रदेशांमध्ये भारी, कसदार, काळ्या जमिनीमध्ये खरीप हंगामामध्ये घेतले जाते. उडदामुळे जमिनीचा पोत टिकून राहतो आणि सुधारण्यासाठी देखील मदत होते. Udid lagvad in Marathi मध्ये उडीद पिकाला पाण्याचे प्रमाण कमी लागत असल्यामुळे पाण्याचा वापर कमी केला जातो, परिणामी जमीन पाणथळ होण्यापासून वाचते.
उडदामध्ये साधारणपणे 20 ते 25 टक्के प्रथिनांचे प्रमाण असते. त्यामुळे या डाळीचा वापर आपण आहारामध्ये करू शकतो. उडदाच्या पिकाच्या मुळावरील गाठतील रायझोबियम जिवाणू हवेमधील नत्र शोषून घेतात. त्यामुळे या पिकाला नत्राची मोठी मात्रा नैसर्गिक रित्या पुरवली जाते. या पिकानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम बेवडदेखील तयार होते आणि जमिनीचा कस सुद्धा सुधारला जातो. Udid lagvad in Marathi मध्ये उडदाचे जास्त उत्पादन घेण्यासाठी वाणांची निवड, योग्य प्रकाराच्या जमिनीची निवड, बियाणांचे हेक्टरी पुरेसे प्रमाण, पूर्व मशागत, वेळेवर पेरणी, खतांचा आणि पाण्याचा नियोजन, तन नियंत्रण, आवश्यकतेनुसार रोग व किडींचे प्रभावी नियंत्रण या बाबींना महत्त्व आहे.
लागणारी जमीन :
- उडीद या पिकाची लागवड करण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भारी ते मध्यम जमीन निवडावी.
- ज्या जमिनींमध्ये पाणी साठून राहते, चोपण, क्षारयुक्त जमिनीमध्ये उडदाचे उत्पन्न घेऊ नये.
- अशा जमिनीमध्ये पाणी साठवून राहते आणि मूळ कुज हा रोग होण्याची शक्यता असते.
- ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ जास्त असतात, अशा जमिनीमध्ये लागवड केल्यावर चांगले उत्पन्न मिळते.
- हलक्या जमिनीमध्ये खतांचे आणि पाण्याचे योग्य नियोजन केल्यावर देखील आपण चांगले उत्पन्न घेऊ शकतो.
- उडीद लागवडीसाठी जमिनीचा सामू 5.5 ते 8.5 च्या दरम्यान असल्यास चांगले उत्पन्न मिळते.
लागणारे हवामान :
- या पिकाला स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यावर पीक जोमाने वाढते. उडीद ह्या पिकाला कडाक्याची थंडी अनिष्ट परिणाम करते.
- या पिकाला 15 अंश सेल्सिअस ते 22 अंश सेल्सिअस तापमान मानवते.
- 30 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअस या तापमानामध्ये उडदाचे पीक उत्तम येते.
- उडदाच्या पिकासाठी वार्षिक पर्जन्यमान 70 ते 100 सेंटीमीटर पर्यंत असल्यावर पीक चांगले जोमाने वाढते आणि फुले येण्याच्या काळामध्ये आणि शेंगा भरण्याच्या कालावधीमध्ये कोरडे हवामान असल्यास चांगले उत्पन्न मिळते.
सुधारीत जाती :
1. टीएयु – 1 :
या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 70 ते 75 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. ही जात भूरी या रोगासाठी प्रतिकारक्षम असून ,या जातीपासून सरासरी दहा ते बारा क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.
2. टीएयु – 2 :
ही जात विदर्भ या भागासाठी प्रसारित करण्यात आलेले आहे .लागवड केल्यानंतर सरासरी 70 ते 75 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीपासून सरासरी दहा ते बारा क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.
3. बीडीयू-1 :
या जातीच्या उडदाचे दाणे मध्यम ते काळ्या रंगाचे आणि टपोरे असतात. लागवड केल्यानंतर सरासरी 70 ते 75 दिवसाच्या कालावधी मध्ये पीक काढण्यासाठी पूर्णपणे तयार होते. या जातीपासून 11 ते 12 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.
4. टीपीयु- 4 :
या जातीला महाराष्ट्र ,मध्य प्रदेश व गुजरात या राज्यासाठी शिफारस करण्यात आलेले आहे. या जातीपासून सरासरी दहा ते अकरा क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते. लागवड केल्यानंतर सरासरी 70 ते 75 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते.
5. पी के व्ही-15 :
या जातीची लागवड केल्यानंतर 65 ते 70 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते.या जातीपासून सरासरी दहा ते बारा क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते. या जातीची शिफारस विदर्भ या भागासाठी केलेली आहे.
6. एनयुएल-7 :
उडदाची ही जात भुरी आणि पिवळा विषाणू रोगासाठी प्रतिकारक असून या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 70 ते 75 दिवसानंतर पीक काढण्यासाठी तयार होते .या जातीपासून सरासरी 10 ते 11 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.
7. फुले राजन :
उडदाची ही जात भुरी आणि पिवळा विषाणू या रोगासाठी सर्वसाधारणपणे प्रतिकारक असून या जातीचे दाणे चमकदार आणि टपोरे असतात .लागवड केल्यानंतर सरासरी 75 ते 80 दिवसांमध्ये हे पीक काढण्यासाठी तयार होते आणि या जातीपासून आठ ते दहा क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.
8. फुले वसू :
या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 70 ते 75 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीचे दाणे टपोरे असतात .कमी पावसाच्या ठिकाणी देखील या जातीची लागवड आपण करू शकतो .ही जात भुरी आणि पिवळा विषाणू या रोगासाठी प्रतिकारक असून या जातीपासून सरासरी आठ ते दहा क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.
9. मेळघाट :
या जातीला विदर्भ या भागासाठी प्रसारित करण्यात आलेले आहे.या जातीची लागवड केल्यानंतर 70 ते 75 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. ही जात रब्बी हंगामासाठी योग्य असून या जातीचे दाणे टपोरे असतात .या जातीपासून हेक्टरी सरासरी दहा ते बारा क्विंटल उत्पन्न मिळते.
पुर्व मशागत :
- Udid lagvad in Marathi करण्यासाठी सर्वप्रथम जमीन खोलवर नांगरून घ्यावे.
- त्यानंतर जमिनीला कोळवाच्या पाळ्या मारून जमीन सपाट करून घ्यावे.
- कुळवाच्या शेवटच्या पाळीसोबत जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून घ्यावे.
- जमिनीमधील सर्व धसकटे काडी कचरा वेचून घ्यावा आणि जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करावी.
पेरणी, अंतर आणि बियाने :
- उडदाच्या पिकाची पेरणी ही जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जुलै च्या पहिल्या आठवड्या पर्यंत केली जाते.
- पेरणी करताना वेळेवर करावी, उशिरा केल्यावर उत्पादनामध्ये घट होते.
- हेक्टरी क्षेत्र पेरण्यासाठी सर्वसाधारणपणे उडदाचे 10 ते 15 किलो बियाणे पुरेसे होते.
- उडदाची लागवड ही 45 × 10 सेंटिमीटर अंतरावर केल्यावर उत्पन्नामध्ये वाढ होते.
खत आणि पाणी व्यवस्थापन :
- या पिकाला जमीन नांगरन करत असताना चांगले कुजलेले शेणखत टाकून घ्यावे आणि त्याच सोबत घन जीवामृत आणि गांडूळ खताचा देखील वापर करावा.
- पाण्यासोबतच जमिनीमध्ये जीवामृत सोडावे, त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांची वाढ होते आणि जमीन देखील भुसभुशीत होते.
- पाण्याचे नियोजन करत असताना जमिनीच्या मगदूराप्रमाणे करावे.
- उडदाच्या पिकाला पेरणी केल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी पहिली पाण्याची पाळी दिली जाते.
- पिकाच्या पूर्ण कालावधीमध्ये एकूण पाच किंवा सहा वेळा पाणी द्यावे लागते.
- पीक जेव्हा फुलोऱ्यामध्ये असते आणि शेंगा तयार होण्याचा कालावधी असतो.
- तेव्हा पाण्याची कमतरता होऊ नये याची योग्य काळजी घ्यावी. याचा अनिष्ट परिणाम उत्पादनावर होतो.
आंतर मशागत आणि आंतर पीक :
- पेरणी झाल्यानंतर काढणी होईपर्यंत तणांचे नियोजन करणे गरजेचे असते.
- तणांचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यावर त्याचा अनिष्ट परिणाम उत्पादनावर होतो.
- त्यासाठी पिक पेरल्यानंतर सुरुवातीच्या महिन्यांमध्ये तन नियंत्रणासाठी कोळपणी केली जाते.
- कोळपणी केल्यामुळे दोन ओळींमध्ये तन निघते आणि बाष्पीभवनाचा वेग कमी होतो, त्यामुळे जास्त काळापर्यंत ओल टिकून राहते.
- उडदाच्या रोपांना देखील मातीची भर होते.
- कोळपणी झाल्यानंतर खुरपणी देखील केली जाते.
- उडीद हे पीक ज्वारी, कपाशी, तूर या मुख्य पिकांमध्ये आंतरपीक म्हणून देखील घेतले जाते.
महत्वाच्या किडी आणि रोग :
किडी
1. मावा :
मावा ही कीड रस शोषक असून ही कीड मोठ्या प्रमाणावर उडदाच्या पानांमधून रस शोषण करते आणि या किडीच्या शरीरामधून एक चिकट गोड पदार्थ स्त्रवतो त्या पदार्थावर काळी बुरशी आकर्षित होते. त्यामुळे संपूर्ण झाडावर काळी बुरशीचा देखील प्रादुर्भाव होतो. त्यामुळे प्रकाश संश्लेषण ची क्रिया मंदावते त्याचा अनिष्ट परिणाम झाडाच्या आरोग्यावर होतो. झाड कमकुवत होते त्यामुळे उत्पादनामधील देखील घट होते. या किडीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी आणि शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा.
रोग :
1.लीफ कर्ल किंव्हा लीफ ब्लाईट :
हा रोग विषाणूजन्य असून प्रादुर्भाव झाडांच्या पानावर होतो. पाने नेहमीपेक्षा जास्त कुरवळतात आणि पानांवर फोड दिसू लागतात. त्यामुळे पीक परीपक्वतेच्या वेळी पिवळ्या मोजेक रोगाला बळी पडतो आणि याचा अनिष्ट परिणाम उत्पादनावर होतो. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी आणि रस शोषक किडींचे नियंत्रण करावे.
2. पिवळा मोझेक रोग :
हा रोग देखील विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये पानांवर पिवळे ठिपके पडतात. वेळेनुसार संपूर्ण वनस्पती पूर्णपणे पिवळी पडते. पानावर ठिपके पडल्यामुळे पानांमधील प्रकाश संश्लेषण ची क्रिया ठप्प होते. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि उत्पादनामध्ये देखील घट होते. हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे शेतामधील रस शोषक किडींचे नियोजन केल्यावर या रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो. झाडावर रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यानंतर जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.
3.भुरी :
भुरी या रोगाचा प्रसार वाऱ्यामुळे होतो. याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर खालच्या पानावर ठिपके दिसून येतात. कालावधीनुसार ठिपक्यांची संख्या वाढते आणि पूर्णपणे पांढऱ्या बुरशीने पाने भरून जातात. हळूहळू पाने करपून जातात आणि झाडावरून गळून पडतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते या रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.
काढणी आणि उत्पादन :
- या पिकाची काढणी ही बहुतांश शेंगा पक्व दिसायला लागल्या की पावसाचा अंदाज घेऊन तोडणी केली जाते.
- तोडणी केल्यानंतर त्या शेंगा पसरवून उन्हामध्ये वाळवल्या जातात.
- त्यानंतर काठीने बडवून किंवा मशीन ने मळणी करून हवा खेळती राहील अशा वातावरणामध्ये ठेवून दिल्या जातात.
- उडदाचे उत्पन्न हे जमिनीची निवड, असणारे हवामान, सुधारित जातींचा वापर, खत आणि पाणी नियोजन, आंतरमशागत या बाबींवर अवलंबून असतो.
- उडदाचे सरासरी 10 ते 12 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.
Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi