Blogधान्य

Tur Lagwad In Marathi

5/5 - (1 vote)

संपूर्ण जगामध्ये कडधान्याचे सर्वात जास्त उत्पादन भारतामध्ये होते कडधान्यांचा वापर आणि आयात देखील मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये दिसून येते. कडधान्यांमध्ये तूर पिक हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि भारतीय लोकांच्या आहारामध्ये तूरडाळीला महत्त्व आहे पाण्याची बचत करण्यासाठी वातावरणामधील बदलांना समोर जाण्यासाठी आणि जमिनीचा कस सुधारणे आणि टिकून ठेवण्यासाठी सुद्धा हे पीक अतिशय उपयुक्त मानले जाते. तुरीच्या मुळावरच्या ग्रंथीमध्ये रायझोबियम जिवाणू हवेतील नत्र शोषून घेत असल्यामुळे या पिकाची नत्राची गरज बऱ्याचश्या प्रमाणात नैसर्गिकरीत्या भागवली जाते आणि जमिनीमध्ये देखील नत्राचे प्रमाण वाढते. तुरीचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी जमिनीची निवड, चांगल्या वाणांचा वापर, रोपांची हेक्‍टरी योग्य संख्या, खतांचा वापर, किडी आणि रोगांचे योग्य नियोजन, आंतर मशागत, या गोष्टींना महत्त्व आहे. पिकाचे योग्य नियोजन केल्यावर चांगले उत्पन्न मिळते.

लागणारी जमीन :

तूर लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी 45 ते 60 सेंटिमीटर खोल जमीन योग्य ठरते. क्षारयुक्त, पाणथळ जमीन, असल्यास पीक चांगले उत्पन्न देत नाही. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असल्यास उत्पन्न चांगले येते. आम्लयुक्त जमिनीमध्ये तूर हे पीक घेऊ नये .कारण आम्ल युक्त जमिनीमध्ये मुळावरील असलेल्या रायझोबियम जिवाणूंच्या ग्रंथीची वाढ होत नाही. त्यामुळे सर्व रोपे पिवळी पडतात आणि उत्पादन कमी मिळते. सेंद्रिय पदार्थ जास्त असलेल्या जमिनीमध्ये लागवड केल्यास भरघोस उत्पन्न मिळते.

लागणारे हवामान :

तुर या पिकासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश, कोरडे हवामान, पुरेसा ओलावा वाढीसाठी आवश्यक असतो.या पिकाला 21 ते 25 डिग्री अंश तापमान चांगले मानवते. फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या कालावधीमध्ये कोरडे हवामान आल्यास उत्पन्नामध्ये भर होते .तूर या पिकाला सरासरी वार्षिक पर्जन्यमान 750 ते 1000 मिमी असल्यास योग्य ठरते.

सुधारीत जाती :

1.राजेश्वरी :

या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 130 ते 1000 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते .ही जात आंतरपीक म्हणून चांगले उत्पन्न देते .दाण्याचा रंग तांबडा असून हेक्टरी 28 ते 30 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.

2. पी के व्ही तारा :

या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 170 ते 180 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. शेंगांमधील दाण्याचा रंग तांबडा असून हेक्‍टरी 19 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळू शकते.

3. विपुला :

तुरीची ही जात मर व वांज रोगासाठी प्रतिकारक्षम असून लागवड केल्यानंतर सरासरी 145 ते 160 दिवसांमध्ये पीक पूर्णपणे काढण्यासाठी तयार होते.या जातीपासून 24 ते 26 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.

4. एकेटी 8811 :

या जातीची लागवड केल्यावर हेक्‍टरी 15 ते 16 क्विंटल उत्पन्न मिळते.या जातीच्या शेंगांमधील दाण्याचा रंग लाल असून लागवड केल्यानंतर सरासरी 155 ते 165 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते.

5. आयसीपीएल 87 :

या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 120 ते 125 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. ही जात दुबार लागवड व खोडण्यासाठी असून या जातीपासून बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.

6. आयसीपीएल 87119 ( आशा ):

तुरीची ही जात मर आणि वांज या रोगासाठी असून बियांचा रंग लाल असतो. या जातीपासून हेक्‍टरी 15 ते 16 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते आणि लागवड केल्यानंतर सरासरी 185 ते 190 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते.

7. वैशाली :

या जातीच्या शेंगांमध्ये दाण्याचा रंग पांढरा असतो.ही जात लागवड केल्यानंतर 175 ते 180 दिवसांमध्ये परिपक्व होऊन काढण्यासाठी तयार होते.या जातीचे हेक्‍टरी 15 ते 16 क्विंटल उत्पन्न मिळते. या जातीला फुले आणि कळी या अवस्थेमध्ये पाण्याची जास्त आवश्यकता असते.

8. अमोल :

ज्या ठिकाणी वार्षिक पर्जन्यमान कमी असते .अशा ठिकाणी या जातीची लागवड आपण करू शकतो. ही जात मर व वांज रोगासाठी प्रतिकारक्षम असून या जातीच्या शेंगांमधील दाण्याचा रंग लाल असतो.

9. बीडीएन -२ :

ही जात डाळी बनवण्यासाठी चांगली असून या जातीच्या शेंगांमधील दाण्याचा रंग पांढरा असतो. लागवड केल्यानंतर सरासरी 155 ते 165 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते.

पूर्व मशागत :

तुरीच्या पिकासाठी जमिनीची खोल नांगरणी करणे गरजेचे असते. कारण तुरीची मुळे जमिनीमध्ये खोल जातात. सर्व जमीन नांगरून झाल्यानंतर ढेकळे फोडून घ्यावे आणि कोळप्याच्या साह्याने पाळ्या घालून घ्याव्या. शेवटच्या पाळीच्या अगोदर हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत पाच टन घालावे आणि जमीन एक सारखी करून घ्यावी.

पेरणीची वेळ, बियानांचे प्रमाण आणि अंतर :

तुरीची पेरणी मान्सूनचा पहिला पाऊस झाल्यानंतर आणि जमिनीमध्ये चांगला वापसा तयार होताच म्हणजेच जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुरीची पेरणी केली जाते.

पिकाचे अपेक्षित उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने हेक्टरी रोपांची संख्या ही योग्य प्रमाणामध्ये असणे खूप गरजेचे असते.

प्रत्येक जातीनुसार आणि वाणाच्या प्रकारानुसार वेगवेगळे बियाणांचे प्रमाण लागते.

अति हळवे वाहन असल्यावर 18 ते 20 किलो हेक्‍टरी बियाणे लागतात.

हळवे वाहन असल्यावर हेक्‍टरी 12 ते 15 किलो बियाणे पुरेशी होतात आणि निम-गरवे वाहन असल्यावर बारा ते पंधरा किलो बियाणे पेरणी साठी लागतात.

खत आणि पाणी व्यवस्थापन :

तुरीसाठी जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत टाकून घ्यावे आणि पाणी देत असताना त्यात सोबत एकरी शंभर लिटर जीवामृत शेताला द्यावे.

त्यामुळे जमीन चांगली भुसभुशीत होते, जमिनीमध्ये सूक्ष्म जीवांची संख्या वाढते आणि उत्पादनांमध्ये देखील भर होते.

तूर हे पीक कोरडवाहू क्षेत्रामध्ये घेतले जाते आणि ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून सुद्धा घेतले जाते.

ज्या ठिकाणी तूर हे आंतरपीक म्हणून घेतले जाते.

अशा ठिकाणी मुख्य पीक निघाल्यानंतर खुरपणी करून शक्य असल्यास एक पाणी द्यावे आणि ज्या ठिकाणी तूर हे सलग पीक म्हणून घेतले जाते, अशा ठिकाणी तुरीला सलग तीन पाळ्या दिल्या जातात.

पाण्याचे व्यवस्थापन हे जमिनीच्या मगदूराप्रमाणे करावे.

आंतर मशागत :

तुरीसाठी पहिले 30 ते 40 दिवस शेत तनविरहित ठेवणे उत्पादनाच्या दृष्टीने खूप गरजेचे असते.

कोळप्याच्या सहाय्याने पीक 20 ते 25 दिवसाचे असताना पहिली आणि 30 ते 35 दिवसाच्या अंतराने दुसरी कोळपणी करावी.

कोळपणी केल्यामुळे जमीन भुसभुशीत राहते त्यामुळे वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते तसेच बाष्पीभवन कमी होऊन अधिक काळापर्यंत जमिनीमध्ये ऑल टिकून राहते. शक्यतो वापसा आल्यावर कोळपणी करावी.

महत्वाच्या किडी आणि रोग :

1. शेंगा पोखरणारी अळी :

या किडीचा प्रादुर्भाव फुलोऱ्यापासून ते काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ही कीड सुरुवातीच्या काळामध्ये या कीडीच्या आळ्या पिकाच्या पानावर ,फुलावर आणि शेंगांवर उपजीविका करतात. नंतर शेंगांमध्ये छिद्र पाडून त्याच्या आतील कोवळ्या दाण्यांवर उपजीविका करतात.लहान अळ्या फुलांना आणि कळ्यांना छिद्रे पाडून खातात. त्यामुळे फुलगळ सुद्धा होते.या किडीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि कामगंध सापळ्यांचा वापर करावा .शेतामध्ये पक्षी थांबा लावावे. मोठ्या दिसणाऱ्या अळ्या हाताने वेजून त्यांचा नाश करावा.

2. तुरीवरील पिसारी पतंग :

किडीची अळी फुलोरा आणि शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो. या किडीचा प्रादुर्भाव पावसाच्या नंतर मोठ्या प्रमाणावर येतो आणि अंड्यातून बाहेर निघल्यावर कळ्या आणि फुलांवर उपजीविका करते .त्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होते. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी लिंबोळी अर्काची फवारणी करावी.

3. तुरीवरील शेंग माशी :

या किडीमुळे 30 ते 40 टक्क्यापर्यंत उत्पादनामध्ये घट होते.ही माशी उशिरा परिपक्व होणाऱ्या जातींमध्ये महत्त्वाची कीड आहे .दाण्यावरील या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक दृष्ट्या जास्त नुकसानकारक ठरतो. ही अळी शेंगांना पारदर्शक शिद्रे पाडून तेथे कोश अवस्ते मध्ये जाते. या किडीला नियंत्रण करण्यासाठी कोवळ्या शेंगांमध्ये जास्त अंडी घालायची सवय लक्षात घेता, शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये पहिली जैविक कीटकनाशकाची फवारणी करावी आणि त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

4. फुलकिडे :

किडीचे पिले आणि प्रौढ दोन्ही पानाच्या खालच्या आणि वरच्या बाजूला राहून पाने खरवडतात. त्यामुळे त्यातून येणारा रसावर ते उपजीविका करतात .ज्यावेळी वातावरण कोरडे असते ,अशावेळी या किडीची वाढ झपाट्याने होते. कोवळ्या पानांचे पेशी मध्ये फुलकिडे अंडी घालतात. दोन ते तीन आठवड्यामध्ये या किडीचा जीवनक्रम पूर्ण होतो. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी चिकट सापळ्यांचा वापर करावा आणि जैविक कीटकनाशकांचे फवारणी घ्यावी.

रोग :

1. मर रोग :

तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पाने पिवळसर पडून झाड पूर्णपणे वाळून जाते. तसेच फुलोरा ते शेंगा पक्व होण्याच्या अवस्थेमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. पिकाच्या मुळामधील जल नलिका प्रादुर्भाव झाल्यामुळे तपकिरी काळसर पडतात. हा एक बुरशीजन्य रोग आहे. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

2. कोरडी मूळकूज :

या रोगाचा प्रादुर्भाव अनियमित पाऊस, तसेच 30 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान, राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मुळे कोरडे आणि शुष्क होऊन कुजू लागतात. परिणामी मुळ्या कुजून झाड पूर्णपणे वाळते. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी. पिकांची फेरपालट करावी आणि रोगप्रतिकारक वाणांची निवड करावी.

काढणी आणि साठवणूक :

तुरीचे पीक हे वेगवेगळ्या जातीनुसार वेगवेगळ्या वेळी काढले जाते.

सर्वसाधारणपणे 150 ते 200 दिवसांच्यानंतर हे पीक काढण्यासाठी तयार होते.

तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घेतले जाते आणि खळ्यावर काटीच्या साह्याने किंवा झोडपून मळणी केली जाते.

साठवणुकीसाठी तुरी कडक उन्हामध्ये पाच ते सहा दिवस वाळवल्या जातात.

त्यानंतर पोत्यामध्ये किंवा कोटीमध्ये साठवणूक केली जाते. साठवणूक करताना ओलसर जागेमध्ये करू नये.

पारंपारिक पद्धतीमध्ये कडुनिंबाच्या पाला साठवणुकीच्या वेळी धान्यामध्ये मिसळून धान्य साठवावे.

त्यामुळे किडींपासून धान्य सुरक्षित राहते.

उत्पादन :

तुरीचे उत्पन्न जातीनुसार, हवामान, जमीन या गोष्टींवर अवलंबून असते. तुरीचे सरासरी 18 ते 20 क्विंटल हेक्टरी उत्पन्न योग्य नियोजन केल्यावर मिळते.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/grain

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *