Blogधान्य

Jowar lagavd in Marathi

5/5 - (1 vote)

Jowar lagavd in Marathi

Jowar lagavd in Marathi ज्वारी हे महाराष्ट्र मधील महत्वाचे पीक असून धान्य बरोबरच जनावरांचा चारा म्हणून कडब्या साठी या पिकाची खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगाम मध्ये सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. ज्वारी हे तृणधान्यामधील पीक आहे. ज्वारी ही खाण्यासाठी रुचकर आणि आरोग्यदायी आहे. शेतकरी महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वारीची लागवड शेतामध्ये करतात.

लागणारी जमीन :

ज्वारीची लागवड करण्यासाठी चिकन माती, मध्यम काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, तांबडी शेतजमीन असणे सोयीचे ठरते.

ज्वारीची लागवड करण्यासाठी मध्यम ते भारी जमीन असल्यावर,अशा जमिनीमध्ये ओलावा जास्त काळापर्यंत टिकून राहतो.

त्यामुळे ज्वारीच्या पेरणीसाठी अशा जमिनी सोयीस्कर ठरतात.

ज्वारीची लागवड करण्यासाठी जमिनीचा सामू 5.5 ते 8.5 या दरम्यान असल्यास ज्वारीचे पीक घेता येते.

लागणारे हवामान :

Jowar lagavd साठी 27 ते 32 अंश सेल्सिअस तापमान वाढीसाठी पोषक असते.

महाराष्ट्र मधील वातावरण ज्वारीच्या पिकासाठी योग्य आहे.

ज्वारीच्या पिकाची लागवड करण्यासाठी सरासरी वार्षिक पर्जन्यमान 400 ते 1000 मिलिमीटर पर्यंत असल्यास ज्वारीचे उत्पन्न चांगले येते.

दमट वातावरण आणि सतत लागून राहणारा पावसामध्ये ज्वारीचे पीक चांगले येत नाही.

सुधारीत जाती :

1. फुले यशोधा :

या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 120 ते 125 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीची लागवड कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही प्रकारच्या शेती मध्ये केली जाते. या जातीपासून हेक्‍टरी 30 ते 32 क्विंटल उत्पन्न मिळते. तसेच साडेसात टन पर्यंत कडबा हेक्‍टरी मिळतो.

2. पी. के. व्ही :

ज्वारीची ही जात खोडकिडा, खोडमाशी या किडीला प्रतिकारक असून या जातीची लागवड कोरडवाहू आणि बागायती दोन्ही प्रकारे केली जाऊ शकते. लागवड केल्यानंतर सरासरी 120 ते 125 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीपासून हेक्‍टरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन मिळते व सात ते आठ टन पर्यंत कडबा हेक्‍टरी मिळतो.

3. फुले सुचित्रा :

या जातीची लागवड केल्यानंतर 120 ते 125 दिवसांच्या कालावधीमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते .हेक्टरी 24 ते 28 क्विंटल उत्पादन मिळते. ही जात खोडमाशी, खोडकिडा या किडींना प्रतिकारक असून दुष्काळग्रस्त भागांमधील जमिनीवर या जातीची लागवड आपण घेऊ शकतो. या जातीपासून सरासरी सहा ते सात टन कडबा मिळतो.

4. स्वाती :

ज्वारीच्या या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 120 ते 125 दिवसांमध्ये ते काढण्यासाठी तयार होते .या जाती पासून साडेपाच ते सहा टन इतका कडबा हेकटरी मिळतो आणि धान्याचे उत्पादन 24 ते 28 क्विंटल पर्यंत मिळते. या जातीचे लागवड आपण रब्बी हंगामामध्ये करू शकतो.

5. परभणी मोती :

या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 120 ते 125 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते .या जातीपासून हेक्‍टरी 25 ते 30 क्विंटल उत्पन्न मिळते आणि सात ते आठ टन कडबा हेक्‍टर क्षेत्रावर मिळतो. या जातीची लागवड आपण बागायती किंवा कोरडवाहू अशा दोन्ही प्रकारच्या लागवडीसाठी करू शकतो. या जातीच्या ज्वारीचे दाणे मोत्यासारखे चमकदार असतात.

6. सी.एच.एस.19 R :

ही भरघोस उत्पन्न मिळवून देणारी ज्वारीची जात आहे. या जातीपासून हेक्‍टरी 30 ते 32 क्विंटर पर्यंत उत्पादन मिळते आणि आठ ते नऊ टन पर्यंत डबा हेक्‍टरी क्षेत्रावर मिळतो .ही जात शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते .कारण खोडमाशी खोडकिडा या किडीला ही जात प्रतिकारक असून रब्बी हंगामासाठी चांगले उत्पादन देते. या जातीच्या ज्वारीचा दाणा टपोरा असतो आणि या जातीच्या ज्वारीची भाकरी ही चवीला चांगली लागते.

7. फुले उत्तरा :

या जातीची लागवड हुरडा उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर केली जाते. या जातीपासून वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते आणि लागवड केल्यानंतर सरासरी 85 ते 100 दिवसांमध्ये हे पीक काढण्यासाठी तयार होते .या जातीची लागवड रब्बी हंगामामध्ये केली जाते आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असून अतिशय चांगली किंमत या जातीपासून शेतकऱ्याला मिळते.

8. फुले रेवती :

ज्वारीची ही जात हेक्टरी चांगले उत्पन्न शेतकऱ्याला देते. लागवड केल्यानंतर सरासरी 120 ते 125 दिवसाच्या कालामध्ये पीक काढण्यासाठी तयार होते . या जातीपासून हेक्‍टरी 44 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते आणि कडब्याचे उत्पन्न 11 टन पर्यंत मिळते. ही जात खोडमाशी खोडकिडा या किडीसाठी प्रतिकारक्षम असून रब्बी हंगामामध्ये या जातीची लागवड केली जाते.

9. फुले पंचमी :

ज्वारीची ही जात लाह्या बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 115 ते 120 दिवसांमध्ये पिक काढण्यासाठी तयार होते. या जातीपासून हेक्‍टरी 12 ते 14 गुंठे पर्यंत उत्पादन मिळते. तसेच चार टन पर्यंत कडवा सुद्धा हेक्टरी मिळतो. या जातीची लागवड रब्बी हंगामामध्ये केली जाते.

10. फुले रोहिनी :

ज्वारीची ही जात लागवड केल्यानंतर सरासरी 115 ते 120 दिवसांमध्ये काढणी साठी तयार होते आणि या जातीपासून हेक्‍टरी 18 ते 20 क्विंटर पर्यंत उत्पादन मिळते. 11 टन पर्यंत कडब्याचे उत्पादन हेक्टरी मिळते .ही जात शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी या जातीची शिफारस केलेली आहे.

पूर्व मशागत :

Jowar lagvad करण्यासाठी सर्वप्रथम शेताची नांगरणी करून घ्यावे. त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळून घ्यावे.

त्यानंतर कुळवाच्या पाळ्या देऊन शेतातील सर्व काडीकचरा, दसकटे काढून टाकून शेतजमीन साफ करून घ्यावे.

हंगाम ,बियाण्यांचे प्रमाण आणि पेरणी :

महाराष्ट्र मध्ये ज्वारीचे पीक हे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये घेतले जाऊ शकते.

मोठ्या प्रमाणावर खरीपणे रब्बी हंगामामध्ये महाराष्ट्र मध्ये ज्वारीची लागवड केली जाते.

चांगले उत्पन्न घेण्यासाठी चांगले आणि निरोगी बियाणे वापरले जाते धान्याच्या पिकासाठी हेक्टरी 9 ते 10 किलोग्राम आणि कडव्याच्या उत्पन्नासाठी 50 ते 60 किलोग्रॅम बियाणे पेरले जाते.

ज्वारीची पेरणी दुफन किंवा तीफन च्या साह्याने एका ओळीमध्ये केली जाते.

खत आणि पाणी व्यवस्थापन :

पूर्व मशागत करत असताना जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे.

त्यासोबत घन जीवामृत आणि गांडूळ खत सुद्धा मिसळून घ्यावे.

पिकाला पाणी व्यवस्थापन सोबत जीवामृत सोडावे. जीवामृत सोडल्यामुळे जमिनीमध्ये जिवाणूंची संख्या वाढते, त्यामुळे उत्पन्नामध्ये भर होते.

कोरडवाहू शेतीमध्ये पेरणी केल्यानंतर ज्वारीच्या पिकाला पेरणीनंतर साधारणपणे एका महिन्याने पहिले पाणी द्यावे आणि बागायती शेतामध्ये पेरणी केल्यानंतर पेरणीनंतर सुमारे अडीच महिन्यांनी कसदार दाणे भरत असताना आणि फुलोरा असताना पाणी द्यावे.

जमिनीच्या मगदूराप्रमाणे पाणी देण्याच्या पाळ्या कमी जास्त होऊ शकतात.

आंतर मशागत :

भरघोस उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने लागवड केल्यानंतर शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव होऊ नये, याची योग्य काळजी घेणे आवश्यक असते.

पेरणी झाल्यानंतर अंदाजे तीन आठवड्यानंतर पिकामध्ये पहिली कोळपणी करावी.

त्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसानंतर ज्वारीला हलकी कोळपणी करावी.

त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव शेतामध्ये कमी होतो आणि कोळपणी केल्यामुळे जमीन भुसभुशीत होते आणि पिकाच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते.

ज्वारीच्या पिकाला एकूण तीन ते चार कोळपण्या आणि दोन ते तीन खुरपण्या केल्यावर तणांच्या प्रादुर्भाव कमी होतो.

किडी आणि रोग :

ज्वारीवरील किडी :

1.खोडकीडा :

या किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पोंग्यातील पानाच्या वरती लहान लहान पारदर्शक व्रण दिसतात. कोवळ्या पानावर आडव्या रेषेत लहान लहान छिद्र पडलेली सुरुवातीला दिसतात.

पाडणाऱ्या शेंड्यांना इजा होऊन विशिष्ट प्रकारची पोंगामर होते.

किडीचा प्रादुर्भाव हा एका महिन्याचे पीक झाल्यानंतर कंसात दाणे भरु पर्यंत जास्त प्रमाणावर आढळतो.

ही कीड अळी अवस्थेमध्ये असल्यावर आतील गाभा खाते त्यामुळे ताठ आणि कणीस पूर्णपणे वा.

व्यवस्थापनासाठी कीडग्रस्त झाडे उपटावी आणि नष्ट करून टाकावे आणि जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.

शेतामध्ये प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.

2.मावा :

ज्वारीवर वेगवेगळ्या प्रकारचा मावा या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ही कीड पानांमधील रस मोठ्या प्रमाणावर शोषण घेते.

त्यामुळे पाने पिवळी पडतात आणि कालांतराने वाळून जातात.

या किडीवर मोठ्या प्रमाणावर काळी बुरशी वाढते. कारण त्यांच्या शरीरामधून गोडसर रस पानावर पसरतो, त्यामुळे प्रकाश संश्लेषण ची क्रिया मंदावते.

मावा या किडीमुळे विषाणूजन्य रोगांचा देखील प्रसार होतो.

या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी आणि शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा.

3.तुडतुडे :

या किडीचे प्रौढ आणि पिले पोंग्यांमधील रस शोषून घेतात आणि किडीमुळे झालेल्या इजेवर पानातून रस बाहेर पडून पानावर त्याचे साखरेत रूपांतर होते.

त्याच्यावर देखील काळी बुरशी वाढते. त्याला चिकटा पडणे असे म्हणतात.

या किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडतात आणि झाडाची वाढ खुंटते.

कंसाची वाढ होत नाही, तुडतुड्यांवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा.

रोग :

1.दाण्यावरील बुरशी ( ग्रेन मोल्ड ) :

या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

ज्वारीचे दाणे परिपक होत असताना पाऊस पडल्यावर त्या दानांवर मोठ्या प्रमाणावर बुरशीची वाढ होते.

या रोगाचा प्रादुर्भाव हावेद्वारे होतो, या रोगावर नियंत्रण करण्यासाठी रोगांना बळी पडणार नाहीत अशा वाणांची लागवड करावी.

तणांचा प्रादुर्भाव होणार नाही याची योग्य काळजी घ्यावी आणि जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

काढणी आणि मळणी :

ज्वारीच्या पिकाची काढणी ही प्रत्येक जातीनुसार वेगवेगळ्या वेळी होते.पण सरासरी 110 ते 130 दिवसांमध्ये पीक काढणी साठी तयार होते.

काढणीसाठी आलेल्या कणसातील दाणे टणक झालेले दिसतात आणि दाण्यावर टोकाकडून जो भाग असतो तो काळा झालेला दिसतो.

अशा प्रकारची लक्षणे दिसल्यावर पीक काढण्यासाठी तयार झालेले आहे असे समजावे.

ज्वारीची ताटे उभे असताना कणसे खुडून घेऊन सुकवावी. कणसे वेगळी केल्यानंतर आठ ते दहा दिवस उन्हामध्ये चांगली वाळून द्यावी.

त्यानंतर त्याची मळणी करावी. ताटांच्या पेंड्या बांधाव्या आणि एकावर एक रचून ठेवाव्या.

उन्हात वाळवल्यानंतर कंसांची मळणी करावी आणि साठवणूक करून ठेवावे.

उत्पादन :

ज्वारीचे उत्पन्न प्रत्येक जातीनुसार वेगवेगळे येते. ज्वारीचे उत्पन्न हे जमिनीची निवड, वाढीच्या वेळी असणारे वातावरण, जातीचा प्रकार, खत आणि पाणी व्यवस्थापन ,अंतर मशागत, पीक संरक्षण या गोष्टींवर अवलंबून असतो. सरासरी ज्वारीचे 25 ते 30 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/grain

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *