अशी करा नैसर्गिक पद्धतीने गाजर 🥕या पिकाची लागवड :
गाजर हे मूळ भाजी म्हणून महाराष्ट्रात सर्वच भारतात वापरले जाते. गाजरामध्ये ‘अ ‘, ‘ब ‘ आणि क जीवनसत्व पुरेशा प्रमाणात असतात. गाजर हे नॉन फॉडर पीक आहे. गाजराचा आहारात उपयोग केल्याने डोळ्याचे 👀आरोग्य उत्तम राहते. गाजर मध्ये तांबे, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी खनिज असतात. गाजराचा वापर मिश्र भाजी, कोशिंबिरी, भाज्या, कॅंडी, मोरांबा, सॅलड, आणि लोणचे यात केला जातो. भारतात गाजर लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते बाजाराची लागवड करून शेतकरी जास्तीत जास्त उत्पन्न मिळवत आहेत गाजर हे कमी कालावधीमध्ये तयार होते. गाजर मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळ पाचक तंत्र चांगले राहते आणि गाजर हृदयाला स्वस्त ठेवण्यासाठी मदत करते. बाजारामध्ये अँटिऑक्सिडंट असल्यामुळे आणि विटामिन सी असल्यामुळे गाजरा मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गाजरामध्ये फायबर असल्यामुळे जास्त काळ पोटभर वाढण्यासाठी वाटण्यासाठी गाजर मदत करते. त्यामुळे निश्चितच वजन कमी होते गाजरामध्ये जास्त प्रमाणामध्ये एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे कर्करोगापासून शरीराची रक्षा करते. च्या पानांची भाजी तयार केली जाते. गाजारामध्ये अ जीवनसत्व असल्यामुळे गाजर डोळ्याच्या आरोग्यास सुधारण्यास मदत करते.
हवामान 🏞 आणि जमीन⛰:
जमीन ⛰ :
गाजरासाठी भुसभुशीत, उत्तम पाण्याचा निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थ जास्त प्रमाणात असलेली, हलक्या प्रतीची जमीन लागवडीसाठी निवडावी.ज्या जमिनीमध्ये पाणी साचून राहते त्या जमिनीमध्ये गाजराची लागवड करू नये कारण जास्त पाण्यामुळे गाजर गुजरात शक्यता असते जेणेकरून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते आणि शेतकऱ्याला नुकसान नुकसान होते. गाजराच्या जास्त उत्पादनासाठी 6.5 सामू आदर्श ठरतो.
हवामान🌧:
गाजर हे थंड हवामानात अत्यंत चांगले येते. गाजराला आकर्षक रंग येण्यासाठी योग्य तापमान हवे असते. गाजराच्या उत्तम वाढीसाठी 18 ते 24 अंश सेल्सिअस तापमान अतिशय पोषक ठरते. अतिउच्च तापमान गाजराला हानिकारक ठरते कारण उच्च तापमानात गाजराची वाढ खुंटते आणि कमी तापमानात गाजराचे नुसती लांबी वाढते.
गाजराच्या सुधारत जाती:
१. पुसा केशर : पुसा केसर हे गाजराची सुधारित जात आहे .या जाती च्या गाजरांचा रंग हा इतर गाजारांच्या रंगापेक्षा अधिक लाल असतो आणि खाण्यासाठी खूप चवदार असतात. या जातीची गाजराची पाने खूप लहान असतात आणि मुळ्या जमिनीपर्यंत खोल जातात .या गाजराची पीक 90 ते 120 दिवसात तयार होते.
२. पुसा रुधिरा : पुसरुधीराही गाजराची एक सुधारित जात आहे या जातीच्या गाजरामध्ये पौष्टिक गुणधर्म अधिक प्रमाणात असतात आरोग्यासाठी उत्तम असे हे गाजर असतात या गाजराचे सरासरी उत्पन्न 30 टन प्रती हेक्टर एवढे मिळते.
३. पुसा असिता : या जातीच्या गाजरांचा रंग हा काळा असतो आणि ही जात सपाट भागांमध्ये जास्त करून घेतले जाते या जातीच्या गाजारांपासून शेतकऱ्यांना २०० ते २१० क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन भेटते लागवड केल्यानंतर हे गाजर 90 ते 100 दिवसांमध्ये काढायला तयार होते.
४. पुसा मेघाली : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाने गाजराची ही जात विकसित केलेली आहे या जातीच्या गाजरांचा रंग गडद केशरी असतो ही एक संकरित जात आहे या जातींच्या गाजारामध्ये कॅरोटीनचे प्रमाण जास्त प्रमाणात असते या जातीचे प्रती हेक्टरी 100 ते 120 क्विंटल उत्पन्न मिळते.
पुसा जमदग्नी, पुसा निघाली, ऑरेंज देशी, या पण गाजराच्या सुधारित जाती आहेत.
हंगाम:
गाजराची लागवड खरीप व रब्बी दोन्ही हंगामात करता येते. गाजराचा रंग आणि चव यावर तापमानाचा परिणाम होतो गाजरची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात केली जाते पण रब्बी हंगामातील गाजर जास्त गोड असतात. म्हणून गाजराची लागवड रब्बी हंगामात जास्त केली जाते.
लागवड:
गाजराची लागवड करायच्या अगोदर जमीन तनमुक्त करून घ्यावी.घराची लागवड मुख्यतः दोन प्रकारे केले जाते.गाजराची लागवड हाताने बी फेकून केली जाते आणि हाताने बी टोकून सुद्धा गाजराची लागवड केली जाते. घराची लागवड करताना योग्य अंतरावर करावी जेणेकरून त्याची वाढ चांगली होईल आणि आकार पण वाढेल एका हेक्टर साठी गाजराचे 4-6 किलो बियाणे लागतात.
खत व पाणी नियोजन:
लागवड करण्याच्या अगोदर शेतात घनजीवामृत टाकून घ्यावे आणि लागवडीनंतर पाण्यासोबतच जीवामृत सोडावे. हंगाम, जमिनीचा प्रकार व पाऊस यानुसार गाजराला पाणी द्यावे. जर जमिनीत पाणी साचत असेल तर जास्त अंतरानंतर पाणी द्यावे आणि जर जमिनीमध्ये पाण्याचा योग्य निचरा होत असेल तर कमी कालावधी नंतर पाणी द्यावे.साधारणपणे ४-५ दिवसांनी पाणी द्यावे. पाण्याचे प्रमाण गाजरामध्ये प्रमाणात ठेवावे नाहीतर गाजराची गोडी कमी होते व प्रत ढासळते.
तण नियोजन आणि अंतर मशागत:
गाजराची लागवड जास्त दाट असल्यास विरळणी करावी. खुरपणी करून तणांचा नायनाट करावा आणि जमीन भुसभुशीत ठेवावे जेणेकरून गाजर चांगले वाढतात. जमीन नेहमी घट्ट राहिली तर गाजराची वाढ उत्तमरीत्या होत नाही त्यामुळे वेळोवेळी शेतात आंतरमशागत करावी आणि माती भुसभुशीत करावी.
गाजरा वरील कीड आणि रोग नियंत्रण:
कीड :
अफिड्स ( मावा) : अफिड्स हे लहान व मऊ कीटक असतात .जे हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे असतात या किडी गाजराच्या पानातील रस शोषतात .त्यामुळे गाजराची पाने सुरकुततात आणि वाळून गळून जातात .या किडी एक चिकट पदार्थ स्त्रवतात .त्यामुळे काळे बुरशीचे प्रमाण पानांवर वाढते आणि लागवडीमध्ये खूप नुकसान होते.
उपाय : शेतात संक्रमित असलेली झाडे आणि पाने काढून टाकावेत. प्लास्टिकच्या आच्छादन गाजराच्या शेतात करावे त्यामुळे कीटक नियंत्रित होतात .रोगप्रतिकारक जाते लागवडीसाठी उपयुक्त ठरतात.
गाजर भुंगा : या किडीमुळे गाजराच्या मुळांवर सऱ्या तयार होतात आणि कोवळ्या फांद्या पिवळ्या पडतात त्यामुळे गाजराला बाजारात भाव मिळत नाही या भुंग्यामुळे शेतात खूप नुकसान होते
उपाय: आधीचे सर्व पिकांचे अवशेष शेतातून बाहेर काढून नष्ट करावे जेणेकरून मादी भुंगा तिथे अंडी देणार नाही आणि त्यांची प्रजाती वाढणार नाही
रूट नोट निमेटोड्स: रूट नोट निमेटोड्स म्हणजे डोळ्याला न दिसणारे कीटक जे की जमिनीच्या खाली असतात आणि मुलांना नुकसान पोहोचवतात त्यामुळे उत्पादनात घट होते.
उपाय: मातीमध्ये नैसर्गिक कीटकनाशकांची आळवणी जसे की दशपर्णी अर्क.
गाजरा वरील रोग:
काळी कुज( ब्लॅक रोट) : हा रोग संक्रमित बियांपासून पसरतो .या रोगामध्ये पानांच्या देठाला काळा रिंगा पडतात .ज्याच्यामुळे तिथे कुज होते आणि देठाचा खालचा भाग पूर्णपणे काळा होतो .रोपे ओलसर होतात त्यामुळे कुज पटकन वाढते आणि पूर्ण झाड संक्रमित होते.
उपाय : रोगप्रतिकारक जातीं लागवडीसाठी वापराव्यात.बीज प्रक्रिया केल्याशिवाय बियाणे लावू नयेत. शेतामध्ये पीक फेरपालट करून घ्यावे. कापणीनंतर पिकाचे अवशेष नष्ट करावे.
अल्टरनारिया लीफ स्पॉट : रोगाची लागण झाल्यानंतर संक्रमित पानावर तपकिरी हिरव्या रंगाचे पाण्याने डबले डाग तयार होतात जे की मोठे होऊन काळे होतात संक्रमित झाड पिवळे होते दुखत आणि पावसाचे वातावरण रोगाचे विकास करते.
उपाय : पेरणीच्या अगोदर बीज प्रक्रिया करून घ्यावी. लक्षणे दिसल्यावर जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा.
काढणी व उत्पादन :
गाजराची काढणी लागवडीनंतर 100 ते 120 दिवसात येते. काढणीपूर्वी दोन आठवडे पाणी अगोदर बंद करावे. त्यामुळे गाजर चांगली पोसवली जाते व त्यांची गोडी ही वाढते. त्यानंतर हलक्या हाताने कुदळीने खणून किंवा हाताने व्यवस्थित काढून घ्यावे. पाणे कापून गाजरे विक्रीस पाठवावी. पानांचा उपयोग जनावरांच्या खाद्यास उपयोग म्हणून होतो. गाजराचे हेक्टरी 200 ते 300 क्विंटल उत्पादन मिळते.