फळ

नैसर्गिक केळी 🍌लागवड व तंत्रज्ञान :

5/5 - (1 vote)

केळी हे महाराष्ट्र मधील मुख्य फळपिकांपैकी एक असून व्यापारिक दृष्ट्या खूप म्हंतवाचे पीक आहे. केळीचे मूळ स्थान भारतातील आसाम राज्य आहे. महाराष्ट्रमध्ये जळगाव, नांदेड, परभणी, धुळे, पुणे, सांगली, वर्धा या जिल्ह्यात केळी खालील लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. पिकलेली केळी हे उत्तम पौष्टिक अन्न असून या फळांमध्ये साखरेचे प्रमाण १८ ते २०टक्के पर्यंत असते, त्याच्यासोबतच प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह ही खनिजे आणि बी गटातील जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.

लागवडीसाठी लागणारे हवामान व जमीन :

 साधारणत उष्ण व दमट हवामान उत्पादनासाठी पोषक असते. तापमान १५° ते ४०° सेल्सिअस या पिकास चांगले मानवते या पिकाला पाऊस देखील चांगला मानवतो .परंतु हिवाळ्यातील कडाक्याची थंडी आणि उन्हाळ्यातील उष्ण वारे हानिकारक ठरते. केळीला लागणारी माती भरपूर सेंद्रिय पदार्थ युक्त, काळी कसदार, गाळाची, भरपूर किंवा मध्यम काळी, भारी कसदार एक मीटर पर्यंत खोल व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागते. क्षारयुक्त जमीन शक्यतो केळीच्या लागवडीसाठी टाळावी.

केळीच्या जाती :

१. केळी शिजवून किंवा तळून खाण्यासाठी : राजेळी

२. केळीच्या पानांचा उपयोगाच्या आणि शोभेसाठी : रान केळ

३. केळी पिकून खाण्यासाठी : लाल वेलची, सफेद वेलची, हरी साल, ग्रँड नैन, बसराई, श्रीमंती, मुठेळी.

केळीची अभिवृद्धी आणि लागवड पद्धत :

केळीची लागवड केळीच्या मुनव्या किंवा पिलांपासून करतात. केळीच्या झाडाच्या खोडाभोवती किंवा पिल्ले येतात. ते मुनवे दोन ते तीन महिन्याचे झाल्यानंतर कंदा सहित काढून लागवडीसाठी आपण वापरू शकतो. म्हणून मूनवे निवडताना अशा झाडांची निवडावे जी झाड भरपूर उत्पादन देणारी आणि पर्णगुच्छ किंवा मोजेक या रोगापासून मुक्त असणारे निवडावी. मुनव्यांचं वजन कमीत कमी ५०० ते ७०० ग्राम वजना च्या नारळाच्या आकाराचे असावे. अलीकडे ऊतीसवर्धित लागवडीसाठी वापरण्याचे प्रमाण जास्त आहे.हंगाम व

लागवडीचे अंतर :

केळीची लागवड ही दोन हंगामात केली जाते. लागवडीच्या या दोन हंगामात मृगबाग किंवा कांदेबाग असे म्हणतात मृग बागेची लागवड जून महिन्यात प्रामुख्याने करण्यात येत असली तरी फेब्रुवारीपासून जून जुलैपर्यंत हंगामात मृग बागेची लागवड करतात. कांदेबाग याची लागवड सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये प्रारंभ होते डिसेंबर जानेवारीपर्यंत ती चालू असते. ऑक्टबर मध्ये लावणाऱ्या बागेत दोन ओळीत कांद्याची लागवड घेतात म्हणून याला कांदेबाग असेही म्हणलं जातं. केळी या पिकाची लागवड १५०×१५० सेमी मृगबगेसाठी १३५×१३५ सेमी किंव्हा कांदेबाग साठी १५०×१३५ सेमीलागवडीसाठी ९० ते १०० बैलगाडा शेणखत नांगरताना शेतात टाकून द्यावे. लागवड ही चौरस पद्धतीने केली जाते .आपण लागवड करताना खड्डे खोदून किंवा नागरच्या साह्याने साऱ्या पाडून ही लागवड करू शकतो. खड्डे ४५×४५×४५ सेंटीमीटर आकाराचे असावेत.

निगा :

लागवडीच्या सुरुवातीच्या काळात बागेतील तण काढून अधून मधून खंदनी करावी आणि वरंबे नीट बांधून घ्यायचे. वाढलेले मुणवे नियमितपणे कापून टाकावे त्याचप्रमाणे झाड वाढत असताना त्याच्याबद्दल अनेक पिल्ले येतात ती कापून टाकावे. मुनवे कापल्यामुळे उत्पादनात वाढ होते मत्रवृक्ष फुलावर आल्यावर जोमाने वाढणारा एकच मुनवा ठेवावा बाकी सगळे कापून टाकावे. घडाची वाढ होऊ लागल्यानंतर घडाच्या शेंड्यात असलेली नर फुले काढून टाकावे. घडाच्या वजनाने झाड वाकूने म्हणून त्याला आधार द्यावा तसेच सूर्यप्रकाशामुळे फळांचे नुकसान होऊ नये म्हणून त्याला गोणपाटाने झाकून ठेवावे. तीन वर्षानंतर नवीन लागवड करणे जरुरीचे असते.

केळीच्या झाडाला लागणारी खते व पाणीपुरवठा :

केळीला सेंद्रिय खतांची मात्रा ही जास्त लागते. त्यामुळे ठराविक अंतरानंतर शेणखत, गांडूळ खत, याची भर केळीच्या झाडाला द्यावी व जीवामृत सुद्धा झाडाच्या बुंध्यात द्यावे. हिवाळ्यात आठ ते दहा दिवसांनी आणि उन्हाळ्यात चार ते पाच दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी परंतु जमिनीचा वरचा तर नेहमी ओला राहून देऊ नये. ठिबक पद्धतीने पाणी दिल्यास दर्जेदारण चांगले उत्पन्न मिळते.

आंतरमशागत :

जमीन भुसभुशीत व तन विहिरीत रहावे म्हणून केळीच्या पिकाची लागवड केल्यानंतर तीन-चार महिन्यात बाग चार-पाच वेळा उभे आडव्या कोळप्याच्या पाळ्या २० दिवसाच्या अंतराने देणे आवश्यक आहे. जमिनीची चांगली मशागत करून वरंभ बांधून झाडाभोवती मातीचे भर द्यावी त्यामुळे काय केळीच्या झाडाला आधार मिळतो. केळीच्या लागवडी बरोबरच वारे प्रतिबंधक शिवरीसारख्या लवकर वाढणाऱ्या झाडांची लागवड करावी कारण उन्हाळ्यात उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण करणे खूप गरजेचे होते कारण केळीचे पाने ही मोठे असल्यामुळे वाऱ्याने ती फाटतात. हिवाळ्या तापमान चार ते पाच अंश सेल्सिअस पेक्षा खाली गेल्यास झाडावर विपरीत परिणाम दिसू लागतात. त्यामुळे शेताभोवती रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटवून धूर करावा .जेणेकरून बागेतील तापमान गरम राहील आणि बागेचे तापमान वाढवण्यासाठी विहिरीचे पाणी द्यावे.

केळीचे रोग व कीड :

कीड

मावा : मावा ही एक रसशोषक कीड आहे. या किडीमुळे केळीमध्ये पोगासड हा रोग उत्पन्न होतो .ही कीड केळीच्या कोवळ्या पानातून, कोळ्या फळातून रस शोषते आणि झाडाला कमकुवत बनवते व याचा प्रादुर्भाव झालेली फळे छोटी राहतात.

उपाय : बागेत काकडी वर्गीय पिके घेऊ नये. या झाडाच्या ज्या भागावर मावा ही कीड दिसेल तो भाग कापून व्यवस्थित नष्ट करावा. जेणेकरून त्यांची प्रजाती पुढे वाढणार नाही

केळीवरील सोंड कीड: जर झाडाच्या किंवा कोवळ्या पानांच्या जवळ बारीक छिद्र आणि चिकटविष्ट दिसली तर तिथे सोंड कीड चा प्रादुर्भाव असतो . किडींचा अळ्या खोडातून आरपार बोगदे करून झाडाचे भरपूर नुकसान करतात. त्यामुळे पाणी आणि पोषक द्रव्य झाडाच्या भागात पोहोचत नाहीत .पाने पिवळे पडतात व झाडाची वाट खुंटत जाते .झाडाचे भाग रंगहीन होतात घड आणि फळे व्यवस्थित विकसित होत नाही.

उपाय : रोगाला प्रतिकारक अशी जातिची लागवड करावी .किड्यांना सापळा म्हणून चिरलेली खोडे आडवी जमिनीवर टाकावेत. बागेतील कुजलेली झाडाचे अवशेष नष्ट करून टाकावेत जेणेकरून तिथे मादी अंडी घालणार नाही.

रोग :

१.मर रोग (पणामा ) : हा रोग जमिनीतील कवकामुळे होतो. केळीच्या खुंटाणा आणि पिलांना हां रोग मोठ्या प्रमाणात होतो.रोग झाल्यामुळे पिल्ले मरतात .रोग झाले की मुख्य खोड सुखून त्याचा पाणापर्यंतचा भाग हा आपल्याला चिरलेला दिसतो .रोग झालेलं झाड फळधारणे पूर्वी मरून जाते.

उपाय: ज्या जमिनीमध्ये हा रोग दिसत असेल तिथे केळीची लागवड करू नये . लागवड करताना रोगमुक्त बेण्यांचा वापर करावा. रोग प्रतिकारक जातींची निवड करावी .

२.पर्णगुच्छ (बोकड्या ) : हा रोग झाल्यानंतर झाडाच्या शेंड्याला पानाचा गुच्छ तयार होतो .त्यामुळे या रोगाला बंची टॉप असे देखील म्हणतात. या रोगामुळे कितीतरी एकरावरच्या केळीच्या बागेंचे नुकसान झाले आहे . हा रोग झाल्यानंतर झाडाच्या देठावर पानाच्या खालील बाजू अनियमित लांबीचे अतिशय लहान गडद लांबट हिरव्या रंगाचे चट्टे दिसतात. ज्या पानावर चट्टे दिसतात ती पाने आकारात लहान असतात .पानाच्या कडा नागमोडी होऊन पिवळा पडतात. पाने लगेच कुजून वाळून जातात अशा प्रकारे च्या पानांमुळे झाडांची वाढ खुंटते. रोगट झाडातून केळीचा घड बाहेर पडत नाही .जरी पडले तरी त्यातील केळीही लहान आकाराचे असतात.

उपाय : रोगमुक्त मुनवे वापरावे .बागेत असे कोणतेही रोगट झाड दिसल्यास ते झाड काडुन टाकावे. बेणे बीजप्रक्रिया करून लावावेत.

३.पोगासड: केळीवर हा रोग मावा या किडीमुळे येतो ह्या रोगांमध्ये झाडाची पाने पिवळी पडतात. पोग्यातील पाने कुजयला सुरू होतात. खोडातील सर्व पेशी मृत होतात . झाड कमकुवत होते . या रोगामध्ये झाड कुजायला सुरुवात होते. कुजण्याची ची सुरुवात झाडाच्या वरच्या भागापासून सुरू होऊन खाली गड्ढा पर्यंत पोहोचते .रोग झालेल्या झाडाचा उग्र वास येतो. पानांच्या कडा आतल्या बाजूने गुंडाळला जातात.

उपाय : या रोगाचा प्रादुर्भाव नसेल अशाच बागेतून बेणे आणावे. प्रथम रोगट झाडे कापून गोळा करून ती नष्ट करून टाकावी .मावा या रोग किडीचे योग्य नियोजन करावे. केळीच्या बागेत काकडी वर्गीय कोणतीही पिके घेऊ नये.

४.पानावरील करपा: पानावरील करपा म्हणजेच लिफ् स्पॉट केळीवर पडणारा या रोगाचा प्रादुर्भावामुळे उत्पादनात खूप घट येते व आर्थिक नुकसान होते .हा एक बुरशीजन्य रोग आहे .याच्यात पण प्रकार आहेत काळात सिगटोका ,पिवळा सिगार टोका .ह्या रोगांमध्ये पानांवर पिवळे व काळे स्पॉट पडतात.या रोगाला सिगाटोका सुद्द्धा म्हणले जाते .

उपाय : योग्य अंतरावरच लागवड करावी .बागेत पाणी साठू नये याची काळजी घ्यावी .रोगग्रस्त पाने काढून टाकावेत .बागेचा परिसर तण विरहित ठेवावा. बागेतील लहान पिले योग्य वेळी काढून नष्ट करून टाकावीत.

पोगासड: हा रोग फक्त केळीच्या घडावरील केळावरच आढळतो. काही फळांची खालची टोके काळे पडून कुजू लागतात .हि कुज हळूहळू वाढत जाते आणि कुजलेल्या भाग वाळून त्याच्यावर आडव्या गोलाकार रेषा वलयाप्रमाणे पडलेल्या दिसतात. रोगट फळांचा हिरवा भाग लवकर बिलबिलीत होऊन आतील घर उघडा पडतो आणि फळ गळून जाते .अशा फळांना बाजार मध्ये भाव भेटत नाही

उपाय : वेळोवेळी घडांची तपासणी करावी घडामध्ये जर रोगट फळे असतील तर ते काढून नष्ट करून टाकावेत. घडांवर प्लास्टिकच्या पिशव्या बांधावे .त्यामुळे केळीच्या सालावर खरोक्या पडत नाही . पिशवी टाकल्यामुळे बुरशी फळांमध्ये प्रवेश करणार नाही .बागेत रोगग्रस्त पाने फळे व फुले सतत काढत राहावेत जेणेकरून बुरशी पसरणार नाही .

केळीचे उत्पन्न :

 लागवडीनंतर २५० ते २८० दिवसात केळीला फळधारणा होण्यास सुरुवात होते. त्यानंतर ९०ते १०० दिवसात फळे तयार होतात. हिरवा पिवळसर होऊन फळांना गोलाई आली की ही घड काढण्यासाठी योग्य झाल्याचे लक्षण आहे. लांबच्या बाजारपेठेसाठी ७५ टक्के पक्व घड काढावा. घडाचा दांडा लांब आहे या पद्धतीने घड कापावा. कारण घडाचा चीक जर फळांवर पडला तर त्याचे दाग फळांवर पडतात. केळीचे भारतातील सरासरी उत्पन्न प्रतिहेक्टर १५ ते २० आहे. महाराष्ट्रात ५० ते ६०टना पर्यंत त्याचे उत्पादन घेतले जाते.

पोस्ट इंग्लिश मधे वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

👉 https://naturekrushi.com/how-to-reduce-fruit-congestion

आणि पोस्ट पाहण्यासाठी फेसबुक पेजला फॉलो करा 

https://naturekrushi.com/naturekrushi-facebook-page  https://www.facebook.com/naturekrushi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *