Blogफळ

चिकू लागवड

5/5 - (1 vote)

चिकूचे मूळ स्थान हे मेक्सिको हा देश आहे. चिकूचा प्रसार तेथूनच भारतामध्ये झाला .हे चवीला अत्यंत गोड असून , खूप चविष्ट असते .त्याच्या चिकापासून चींगम तयार केला जातो .चिकूच्या फळांमध्ये कॅल्शियम ,फॉस्फरस व लोह ही पोषक अन्नद्रव्य असतात. चिकूच्या फळाचे साल हे अत्यंत पातळ असते मधुर आकर्षक रंगाचा जाड ,रवाळ गर, कमीत कमी बिया आणि आकर्षक गोल आकार या फळाचे वैशिष्ट्य आहेत .चिकूचा उपयोग खाण्यासाठी तसेच जॅम, फ्रुट सॅलड, आईस्क्रीम ,कॉफी वगैरे बनवण्यासाठी केला जातो. चीकूच्या फळांमध्ये 12 ते 15 टक्के शर्करा असते.

लागणारी जमीन :

चिकू हे सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये येऊ शकते .पण नदीकाठची गाळवट , समुद्र किनाऱ्या जवळची जमीन चिकुला चांगली मानवते .भारी जमिनीत निचऱ्यासाठी चरख खणून चिकूची व्यवस्थित लागवड करावे .जिथे पाण्याचा निचरा होत नाही तिथे चिकूची लागवड करू नये .ज्या जमिनीमध्ये सौम्य प्रमाणात खारटपणा असतो तिथे चिकूचे झाड चांगले उत्पादन देते .जमीन ही सेंद्रिय युक्त पदार्थ असलेली,उत्तम निचरा होणारी भुसभुशीत असावी.

लागणारे हवामान :

महाराष्ट्र मधील सर्व विभागांमध्ये चिकूची लागवड चांगली होऊ शकते. उष्ण व दमट हवामान असणाऱ्या विभागात चिकूची लागवड एकदम चांगली होते. 43 अंश सेल्सिअसच्या वरती तापमान गेल्यानंतर चिकूचा फुलोरा गळायला लागतो आणि 10 अंश पेक्षा कमी तापमानामध्ये झाडाची वाडी खुंटते. तापमान कमी झाल्यानंतर लहान झाडांची काळजी घ्यावी लागते.

सुधारित जाती :

1.क्रीकॅट बॉल : या जातीची लागवड तमिळनाडू कर्नाटका महाराष्ट्र वेस्ट बंगाल आणि आंध्र प्रदेश मध्ये केले जाते ही जात खाण्यासाठी जास्तीत जास्त वापरले जाते या जातीची फळे गोल आकाराला मोठी चवीला गोड आणि रवाळ गराची असतात.

2.पीली पत्ती : या जातीची लागवड महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये केली जाते कमी अंतरावर लागवड करण्यासाठी या जातीचा वापर केला जातो या जातीच्या फळांचा आकार हा अंडा सारखं असतो आणि फळांची साल खुर्दरी असते आणि चवीमध्ये मध्यम गोड राहत असते या जातीच्या फळाचा वजन 400 ते 450 ग्राम पर्यंत असते.

3.पी के एम -1 : या वाणाची लागवड तमिळनाडू या राज्यांमध्ये केली जाते या फळांचा वापर कापून खाण्यासाठी केला जातो यासाठी मध्ये शर्कराचे प्रमाण जास्त असते फळाचा आकार हा उभट असतो आणि साल पातळ असते या फळाचे वजन सर्वसाधारणपणे 80 ग्रॅम पर्यंत असते.

4.पाला : जातीची लागवड आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये जास्तीत जास्त केले जाते ही जात खूप प्रसिद्ध आणि याचे उत्पन्न जास्त आहे जातीच्या फळांचा आकार अंड्यासारखा असतो आणि साल पातळ असते त्याची फळ चवीला गोड आणि चविष्ट असतात.

लागवडीचा हंगाम :

ज्या विभागामध्ये पाऊस कमी पडतो त्या विभागामध्ये कलमांची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीलाच करावी आणि ज्या विभागांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असते आणि पाणी साचून राहते अशा विभागांमध्ये चिकूची लागवड पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑगस्ट किंवा सप्टेंबर या महिन्यात करावी.

लागवड :

चिकूची लागवड करण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात निवडलेली जागा 45 सेंटीमीटर पर्यंत खोल नांगरटीच्या साह्याने नांगरून घ्यावी. त्यानंतर जमिनीत तयार झालेले सगळे ढेकळे फोडून जमीन एकसारखी करून घ्यावी. जमिनीवर असलेले हराळी ,लव्हाळा यासारख्या तणांना उपडून बाजूला करावे आणि जमीन सपाट करून घ्यावे .जमीन सपाट करताना जमिनीवरच्या सुपीक मातीचा थर जमिनीत खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी .नंतर लागवडीसाठी आखणी करावी. चिकूच्या झाडांची वाढ ही खूप पसरते आणि चिकूचे झाडे ही 35 ते 50 वर्षापेक्षा अधिक काळा पर्यंत उत्पादन देतात .चिकूची लागवड ही 7×7 मीटर आणि 8×8 मीटर आणि 10×10 मीटर या अंतरावर केली जाते. आखणी केल्यानंतर लागवडीसाठी 1×1×1 मीटर आकाराचे खड्डे काढावेत . खड्ड्यांमध्ये घन अमृत शेणखत किंवा गांडूळ खत भरून घ्यावे. खतासोबत चांगली माती यांनी खड्डा पूर्ण भरून घ्यावा . चिकुचे चे झाड बरोबर खड्ड्याच्या मध्ये लावावे आणि कलम केलेला जोड हा जमिनीच्या वर रहावा याची काळजी घ्यावी .

छाटणी आणि वळण :

चिकू हे झाड सदा बहरलेले असते त्यामुळे या झाडाला नियमित छाटणी करावी लागत नाही .सुरुवातीच्या वेळी मात्र झाडाला योग्य वळण देण्यासाठी आणि आकार देण्यासाठी छाटणी करावी लागते. झाड लावल्यानंतर झाडाला सर्वप्रथम एका काठीचा आधार द्यावा .झाडाच्या खोडावर जमिनीपासून 50 सेंटिमीटर उंचीवर येणारे फुटवे वेळोवेळी काढून टाकावेत. 50 सेंटीमीटर उंची होपर्यंत बुंदा सरळ वाढवून द्यावा आणि त्यानंतर चार ते पाच चांगल्या फांद्या सर्व दिशेने येतील अशा प्रकारे ठेवून झाडाला वळण द्यावे .वळण देण्याचे काम लहान असतानाच करावे .कलमाच्या खुंटावर येणारी फुट ही वेळोवेळी काढून टाकावी आलेला फुलोरा पहिल्या वर्षी काढून टाकावा आणि तीन ते चार वर्षांनंतर उत्पादन घ्यायला सुरुवात करावी जेणेकरून झाड मजबूत होईल .

खते व पाणीपुरवठा :

चिकूच्या झाडाची चांगली वाढ होण्यासाठी त्याला खते देणे गरजेचे असते .लागवडीच्या वेळी आपण खड्डा हा खतांनी भरून घेतो .पण पावसाळ्याच्या दिवसात त्याला शेणखत किंव्हा गांडूळ खत आणि जीवामृत देणे गरजेचे असते. चिकूची काढणी झाल्यानंतर दरवर्षी झाडाला जास्त प्रमाणामध्ये खत द्यावे.झाडाची वाढ आणि त्यातून भरपूर उत्पन्न मिळण्यासाठी आपल्याला पाण्याचा उत्तम नियोजन करावे लागते .पावसाळ्यात चिकूला पाणी देण्याची गरज नसते .पण उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात ठराविक काळानंतर पाणी देणे गरजेचे असते .हिवाळ्यामध्ये दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळ्यामध्ये आठ ते दहा दिवसाच्या अंतराने चिकूच्या झाडाला पाणी द्यावे .झाडे लहान असताना झाडाच्या भोवती आळे करून चिकूला पाणी द्यावे .फळधारणा आणि फुलोऱ्याच्या काळात पाण्याचा ताण पडू नये याची काळजी घ्यावी नाहीतर उत्पादनात घटते.

अंतर पिके व अंतर्मशागत :

चिकूच्या झाडाला भरघोस उत्पन्न येण्यासाठी सात ते आठ वर्ष लागतात .त्यानंतर चिकूचे व्यापारी उत्पादन सुरू होते .चिकूचे झाड खूप सावकाश वाढत असते ,त्यामुळे आपण बागेमध्ये सुरुवातीच्या काळात वांगी ,मिरची ,तोंडली यासारखी भाजीपाला आणि फुल झाडांची आंतरपीक घेऊन नफा मिळवू शकतो .बागेमध्ये तणांचा वेळोवेळी बंदोबस्त करावा लागतो .बागेमध्ये तन उगवू नये म्हणून अच्छादन करावे आणि वेळोवेळी झाडाच्या आळ्यातील गवतांची खुरपणी करावी.

किडी आणि रोग :

किडी :

१. खोड पोखरणारी अळी :

खोड पोखरणारी आळी ही चिकूच्या खोडा ला छिद्र पाडून त्याच्या आतील पेशी खाते आणि त्यावर उपजीविका करते .झाडाच्या खोडाखाली जर भुसा पडला असेल तर या किडीचे अस्तित्व तिथे आहे असे समजावे . या आळी चे नुकसान नियंत्रित करण्यासाठी झाडावरती छिद्र शोधावे आणि त्याच्यामध्ये एखादी तार घालून आळी मारावी .जेणेकरून तिचा प्रादुर्भाव कमी होईल आणि त्यामध्ये जैविक कीटकनाशक टाकावेत आणि खोडावरील छिद्रांना केरोसीन मध्ये बुडवलेल्या कपासाच्या गोळ्याने बंद केल्याने आतील राहिलेली अळी गुदमरून मरते . रोग गस्त फांद्या काढून जाळून टाकाव्यात.

२. फुलकळी पोखरणारी अळी :

या किडीचा प्रादुर्भाव नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि मे – जूनच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो .ही आळी चिकूच्या तयार होणाऱ्या कळ्या पोखरून खाते एका कळीतील सर्व भाग पोखरून खाल्ल्यानंतर त्यातून ती बाहेर पडते आणि शेजारील लगतची जी कळी असेल त्याला पोखरायला सुरुवात करते. याचा परिणाम असा होतो की पोखरलेल्या कळ्या पोकळ बनतात आणि सुकून गळतात .त्यामुळे झाडावर फळधारणा कमी होते आणि उत्पादनात सुद्धा घट होते. ह्या आळी वर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची पंधरा दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी.

३. फळामधील बी पोखरणारी आळी :

ही आळी फळाच्या देठाच्या भागातून कळीच्या पाकळ्या खाऊन फळांमध्ये प्रवेश करते .फळाच्या गरामधून होऊन ती आळी फळाच्या बिया मध्ये प्रवेश करते . फळाच्या वाढीनुसार पडलेले छिद्र हे हळूहळू मुजून जाते आणि आळी आताच राहते.बियांचा वरचा कवच पोखरून आतील बीज दलावर ती आपली उपजीविका करते आणि हळूहळू आकाराने वाढू लागते. आकाराने पूर्ण वाढल्यानंतर फळाच्या घरामधून बाहेर येते साली मधून छिद्र करून बाहेर पडते. या केळीच्या नियंत्रणासाठी झाडाची व्यवस्थित छाटणी करावी. सूर्यप्रकाश पूर्ण बागेत आतपर्यंत येईल अशाप्रकारे छाटणी करावी .कीडग्रस्त गळलेली सर्व फळे या सर्वांचा नायनाट करावा. झाडावर जैविक कीटकनाशकाची फवारणी करावी.

रोग :

1 .फळांची गळ :

पावसाळ्याच्या दिवसात बुरशीजन्य रोगांमुळे मोठ्या प्रमाणात चिकूच्या फळांची गळ होते .या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी बागेत प्रादुर्भाव झालेल्या किंवा रोगट फांद्या काढून नष्ट कराव्यात आणि जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

2 .पानांवरील ठिपके :

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चिकूच्या पानावर गोल तपकिरी असे ठिपके दिसतात. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी रोबोट फांदा झाडावरून नष्ट करून टाकाव्या आणि जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

काढणी आणि उत्पादन :

चिकूच्या झाडाला बहार येण्याचे महाराष्ट्र मध्ये दोन मुख्य हंगाम आहेत पहिला बहार सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये येतो आणि दुसरा बहार हा फेब्रुवारी महिना मध्ये येतो .फळ धारणे पासून फळे तयार होण्यासाठी 150 ते 160 दिवसांचा कालावधी लागतो .फळ तयार झाले हे ओळखण्यासाठी खालील लक्षणे फळांमध्ये दिसतात.

1.फळाचा आकार वाढतो.

2.फळे बटाट्याच्या रंगाची बनतात आणि सालीच्या वर एक भुरकट पावडर दिसू लागते.

3.नखाने फळाला ओखरडा काढल्यास पिवळसर रंग दिसतो. फळ कच्चे असल्यानंतर फळातून पांढरा रंग बाहेर येतो .

चिकूची फळे काढण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या अतुल झेल्याचा वापर करावा .पूर्ण पणे वाढलेल्या चिकूच्या एका झाडापासून सरासरी 1500ते 3000 फळे मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *